मनोज चिचघरे/भंडारा, जिल्हा प्रतिनिधी
भंडारा जिल्ह्यातील मंजूर असलेल्या एकमेव स्वतंत्र महिला रुग्णालयाचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणी बेला ग्राम पंचायत सरपंच पूजाताई बालू ठवकर यांनी राज्याचे आरोग्य मंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. पाच वर्षापूर्वी भंडारा शहरात जिल्ह्या जिल्ह्यातील एकमेव स्वतंत्र महिला रुग्णालयाला मंजुरी देण्यात आली. त्याकरिता राष्ट्रीय महामार्ग लागत जलशुद्धीकरण परिसरात जागासुद्धा आवंटित करण्यात आली आहे. महिला रुग्णालयाच्या बांधकामासंदर्भात बांधकाम विभागाच्या वतीने बांधकामाची निविदा सुद्धा काढण्यात आली आहे.
मात्र, त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले,
जिल्ह्यात महिलांसाठी वेगळे रुणालय नसल्याने उपचार उपचाराकरिता येणाऱ्या महिलांची कुंचबना होत असून अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. नियोजित महिला रूग्णालया करिता अनेकदा धरणे, आंदोलन, मोर्चे, आधी करण्यात आले मात्र त्याकडे सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. करिता भंडारा शहरातील नियोजित जागी स्वतंत्र महिला रुग्णालयाचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व सरपंच पूजाताई बालू ठवकर यांनी निवेदनातून केली आहे,