Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

नागपुर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नागपुर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, जुलै २९, २०२२

 state government approved RDSS worth around 39,602 crore

state government approved RDSS worth around 39,602 crore

 Mumbai:Keeping in mind the need for further empowerment and modernization of the current electricity distribution system to meet the increasing demand of electricity in the future, the state government has recently approved the Revamped Distribution Sector Scheme(RDSS) of about 39 thousand 602 crore to improve the quality of electricity supply, reduce distribution losses and enhance consumer service.

In order to improve the financial stability of the power distribution companies in the state, the RDSS will be implemented with the financial assistance of the Central Government. Due to this scheme, there will be a radical change in the power distribution system of MSEDCL. Features of the scheme are to improve financial stability and operational efficiency through conditional financial assistance, strengthen basic distribution infrastructure, improve quality and availability of power supply, focus on energy audit through smart metering and provide funds for power loss reduction works.

To provide quality, reliable and affordable power supply to the consumers of MSEDCL, to reduce technical and commercial losses to 12 to 15 percent by FY 2024-25 and to bring to zero the gap between the average cost per unit of electricity supply and the average revenue per unit by FY 2024-25. These are the main objectives of this scheme.

In the scheme smart meters will be installed to 1 crore 66 lakh consumers and about Rs 11 thousand 105 crore will be spent on this. Special efforts will be made to reduce the distribution losses and about Rs. 14 thousand 231 crore will be spent on this. This includes construction of 527 new 33/11 KV sub-stations at various places in the state, capacity enhancement of 705 sub-stations, installation of about 29 thousand 893 new distribution transformers and development of SCADA system in 21 cities of the state etc. Similarly, about 14 thousand 266 crore will be spent on empowerment and modernization of power distribution system.

As smart meters will be installed in this scheme, the customers will get accurate electricity bills and as a result, distribution loss will reduce and increase revenue. Also, due to this scheme, uninterrupted and quality power supply will be supplied to the customers. Special efforts have been made by Mr. Vijay Singhal, Chairman and Managing Director of MSEDCL under the guidance of Principal Secretary (Energy) of the State and Chairman and Managing Director of MSETCL Mr. Dinesh Waghmare for the approval of this scheme.

सोमवार, जुलै १८, २०२२

 नागपुरातील दोन युवा वकिलांचा मनसेत प्रवेश

नागपुरातील दोन युवा वकिलांचा मनसेत प्रवेश





सध्या महाराष्ट्रातील अस्थिर व गोंधळलेली राजकीय परिस्थिती, राजकारणाचा घसरलेला स्तर यामध्ये बदल करण्याचे सामर्थ्य फक्त मनसे अध्यक्ष *श्री राजसाहेब ठाकरे* यांच्यात आहे हे लक्षात घेऊन नागपूर मनसे करीत असलेल्या चांगल्या कामाला मजबुती प्रदान करण्याच्या उद्देशाने आम्ही आज मनसेत प्रवेश करीत आहोत असे प्रतिपादन नागपुरातील युवा वकील *ॲड. यशोधन गानु व केयुर रहाळकर* यांनी केले. #maharashtranavnirmansena

 मनसे राज्य सरचिटणीस *श्री हेमंत गडकरी* यांच्या उपस्थितीत या दोघांनी मनसेत प्रवेश केला.
 शहर अध्यक्ष *अजय ढोके*  विभाग अध्यक्ष *तुषार गिऱ्हे*, विभाग उपाध्यक्ष *चेतन बोरकुटे* व इतर मनसे पदाधिकारी  यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. ॲड.यशोधन व केयुर यांच्या सारख्या युवा वकिलांच्या प्रवेशामुळे स्थानिक स्तरावर  मनसेला नक्कीच फायदा होईल असे मत व्यक्त करून हेमंत गडकरी यांनी मनसेचा दुपट्टा घालून त्यांचे स्वागत केले. रामदास पेठ व धरमपेठ सारख्या शहरातील उच्चभू समजल्या जाणाऱ्या परिसरातील या युवा वकिलांच्या प्रवेशामुळे शहरात मनसेचे जाळे सर्वत्र पसरते आहे असे अजय ढोके यांनी सांगितले.  ॲड. यशोधन गानु व ॲड. केयुर रहाळकर व सहकारी यांच्या मनसे प्रवेशासाठी विभाग अध्यक्ष तुषार गिऱ्हे यांनी पुढाकार घेतला.

#maharashtranavnirmansena #maharashtra #mnsadhikrut #rajsaheb #rajsahebthackeray #isupportrajthackeray #mns #rajthackeray #amitthackeray #manse #mumbai #mnsadhikrutmumbai #maharashtramaza #mipanrajsaheb #maharashtrian #balanandgaonkar #ig #rajsamarthak #marathi #fc #isupportavinashjadhav #mnsadhikrutpune #mnsadhikrutnashik #amitthakrey #maharashtrasainik #cmomaharashtra #rajupatilmns #maharashtrapolitics #mipanrajthakery #adityathackeray  #maharashtranavnirmansena #maharashtra @mnsadhikrut 

शनिवार, जानेवारी ०८, २०२२

 हरीश तिवारी बने अध्यक्ष पश्चिम नागपुर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ( मीडिया सेल ) #NCPMEDIACELL

हरीश तिवारी बने अध्यक्ष पश्चिम नागपुर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ( मीडिया सेल ) #NCPMEDIACELL



संगठन को मजबूत करेंगे: अमित दुबे।

राष्ट्रवादी कांग्रेस मिडिया सेल के जिलाध्यक्ष नागपुर शहर अमित दुबे इन्होंने नववर्ष के उपलक्ष्य मे हरीश तिवारी की "पश्चिम नागपुर अध्यक्ष" पद पे नियुक्ति की है हरीश तिवारी पिछ्ले कुछ वर्षो से सामाजिक क्षेत्र से जुडे है कोरोना महामारी के समय उन्होने विभिन्न सामाजिक कार्यो मे समिल्लित होकर कईयो बेसहारा लोगो की निस्वार्थ भावना से मदत की थी उनके द्वारा इस तरह के उत्कृष्ट सामाजिक कार्यों को देखते हुए पार्टी ने इस बात की दखल देते हुवे उनकी नियुक्ति राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मीडिया सेल मे की गयी।

   इस अवसर पर हरीश तिवारी इन्होंने कहा कि वे शहर भर का दौरा करके संगठन को बढ़ाने व मजबुत करने का कार्य अपनी टीम के साथ व राष्ट्रवादी कांग्रेस मीडिया सेल नागपुर शहर जिलाध्यक्ष अमित दुबे के नेतृत्व में मीडिया सेल संबंधित समस्याओं को लेकर सदैव कार्य करते रहेंगे।

  हरीश तिवारी इन्होंने अपनी नियुक्ति पर माजी गृहमंत्री अनिल देशमुख, विजय विश्वकर्मा, सुनील लव्हात्रे, प्रकाश पसेरकर, शीतल नंदनवार, अवनीश सिंह, आकाश शर्मा इन सभी का आभार माना व ऐसा ही मार्गदर्शन मिलता रहे ऐसी विनंती की है। 


सोमवार, मे १७, २०२१

 कोव्हिडमधून बरे झाल्यानंतरही घ्या सुरक्षेची काळजी  ‘कोव्हिड संवाद’मध्ये तज्ज्ञांचा सल्ला

कोव्हिडमधून बरे झाल्यानंतरही घ्या सुरक्षेची काळजी ‘कोव्हिड संवाद’मध्ये तज्ज्ञांचा सल्ला

 कोव्हिडमधून बरे झाल्यानंतरही घ्या सुरक्षेची काळजी

‘कोव्हिड संवाद’मध्ये तज्ज्ञांचा सल्ला

 

नागपूर, ता. १७ : कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये नागरिकांमध्ये खूप भीती आहे तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढत असतानाच रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी प्रत्येक आरोग्य कर्मचा-याची धडपड सुरू आहे. अशा स्थितीमध्ये प्रत्येक जण आता सुरक्षेबाबत सजग झालेला आहे. आता कोरोना पाठोपाठ इतर आजारांचा शिरकाव होत आहे. याला कोरोनामधून बरे झालेले रुग्ण जास्त प्रमाणात बळी पडत आहेत. त्यामुळे संकटाला थोपवून लावण्यासाठी अधिक सजग राहण्याची गरज आहे. कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णाने मास्क लावणे बंधनकारक आहे. घराबाहेर वा जिथे गर्दी होत असेल अशा ठिकाणी किमान काही महिने जाणे टाळणे आवश्यक आहे. एकूणच कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर प्रत्येक रुग्णाने सुरक्षेची सर्व काळजी घेणे अत्यावश्यक आहे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.

  नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने व महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेने सुरू करण्यात आलेल्या ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात सोमवारी (ता.१७) व्हॅस्कूलर अँड इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीस्ट डॉ.अतुल रेवतकर आणि कन्सल्टंट रेडिओलॉजीस्ट डॉ.वर्षा सारडा यांचे 'कोव्हिड नंतरची गुंतागुंत फायब्रोसिस व थ्रोम्बोसिस निदान व उपचार' या विषयावर मार्गदर्शन केले व यावेळी नागरिकांमार्फत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देउन त्यांनी शंकांचे निराकरण केले.

  कोरोनामध्ये रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागल्यानंतर त्यामध्ये त्याच्यावर अनेक औषधांचा उपचार केला जातो. जीव वाचविण्यासाठी अनेक ‘हेवी डोज’ सुद्धा द्यावे लागतात. त्याचा प्रभाव प्रतिकारशक्तीवर पडतो. परिणामी रुग्ण बरा झाल्यानंतरही त्याला कमजोरी जाणवते. अशा वेळी रुग्णाला फायब्रोसिस व थ्रोम्बोसिसचा धोका संभावतो. फायब्रोसिस म्हणजे फुफ्फुसामध्ये होणारे बदल व त्यातून पुढे संभावणारा धोका. ते टाळण्यासाठी त्याचे योग्य निदान होणे आवश्यक आहे. यासाठी रुग्णाचे एचआरसीटी स्कॅन करणे आवश्यक ठरते. कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये बहुतांशी लोक एचआरसीटी स्कॅन काढत आहेत. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते काढले जावे. एचआरसीटी स्कॅन मुळे रुग्णाच्या संसर्गाचे प्रमाण लक्षात येते. रुग्ण बरा झाल्यानंतर एचआरसीटी स्कॅन केल्यास त्याला होउ शकणारा संभाव्य धोका लक्षात येतो व तसे उपचार करता येतात. कोरोनामधून बरे झाल्यानंतर अनेक रुग्ण डॉक्टरांनी दिलेले औषध बंद करतात ही धोकादायक बाब आहे. कोणत्याही रुग्णाने स्वत:च्या मनाने औषधे बंद करू नये. बरे झाल्यानंतर सकस आहार, हलका व्यायाम सुरू ठेवावा, असा सल्ला डॉ.वर्षा सारडा यांनी यावेळी दिला.

  फायब्रोसिस प्रमाणेच थ्रोम्बोसिसला अनेक रुग्ण बळी पडत असल्याचे दिसून येत आहे.  थ्रोम्बोसिस  म्हणजे रक्तात गाठ झाल्याने उद्भवणारा धोका. कोरोनाचा व्हायरस फुफ्फुसावर आघात करतो तसाच तो रक्तवाहिन्यांमध्य सुद्धा आघात करतो. शरीरातील ज्या रक्तवाहिन्यांवर आघात झाला त्याचे परिणाम दिसून येतात. डोक्यातील रक्तवाहिनीमध्ये गाठ निर्माण झाल्यास अर्धांगवायूचा धोका असतो. छातीमध्ये झाल्यास हृदयविकार व असे वेगवेगळ्या अवयवांबाबत विविध धोके संभावतात. थ्रोम्बोसिसचे निदान होण्यासाठी सुद्धा एचआरसीटी स्कॅन महत्वाचे ठरते. रक्त वाहिन्यांमध्ये गाठ होणे हे कोव्हिडपूर्वी पण होतेच मात्र कोव्हिडमध्ये त्याची तीव्रता जास्त दिसून येते. त्यामुळे कोव्हिड नंतर किंवा कोव्हिडमध्ये कुठल्याही सौम्य लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधून सल्ला घ्यावा. कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे सुरू ठेवा. सोशल मीडियावरून मिळालेल्या माहितीद्वारे उपचार करू नका. आहार, व्यायाम याकडे नियमित लक्ष द्या, असा सल्ला डॉ.अतुल रेवतकर यांनी दिला.

रुग्णालयांनी बेड्सची माहिती अद्ययावत द्यावी : महापौर

रुग्णालयांनी बेड्सची माहिती अद्ययावत द्यावी : महापौर

 रुग्णालयांनी बेड्सची माहिती अद्ययावत द्यावी : महापौर


कोरोना नियंत्रण कक्षाला भेट : नागरिकांना होतेय मदत


नागपूर, ता. १७ : नागपूर महानगरपालिका, विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने बेड्स उपलब्धतेसाठी सुरू करण्यात आलेल्या केंद्रीय नियंत्रण कक्षामुळे नागरिकांचे काम सोपे झाले आहे. फक्त रुग्णालयांनी त्यांच्याकडे उपलब्ध बेड्सची माहिती वेळच्या वेळी अद्ययावत केल्यास गरजू रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यास मदत होईल, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.


रविवारी (ता.  १७) त्यांनी मनपा मुख्यालयातील केंद्रीय नियंत्रण कक्षाला भेट देऊन तेथून नागरिकांना मिळत असलेल्या सेवेचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, स्वयंसेवी संस्थेच्या नीरजा पठाणीया उपस्थित होते. त्यांनी महापौरांना संपूर्ण व्यवस्थेची माहिती दिली. 


याबद्दल बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, केंद्रीय नियंत्रण कक्ष सुरू करण्याची तयारी मनपाने केलेलीच होती. दरम्यान उच्च न्यायालयाचा आदेश आला. तयारी असल्याने दुसऱ्याच दिवशी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला. कुठल्याही रुग्णाला त्यांच्या सोयीनुसार बेड्स मिळणे सोपे झाले आहे. शासनाचा आदेश असतानाही खाजगी रुग्णालयात ८० टक्के बेड्स शासकीय दराने उपलब्ध करून देण्याचा नियमाला हरताळ फासण्यात येत होता. मात्र नियंत्रण कक्षामुळे त्याला आला बसला आहे. नियंत्रण कक्षातील कर्मचारी समर्पण भावनेने कार्य करीत आहे. उत्कृष्ट संचलन होत आहे. ज्यांना बेड्सची आवश्यकता आहे, त्यांना ओटीपी दिला जातो. तोच ओटीपी रुग्णालयाला पाठविला जातो. त्या आधारावर रुग्णालयात प्रवेश मिळतो, अशी माहिती त्यांनी दिली. 


नागपुरात ९९६ व्हेंटिलेटर बेड्स आहेत. मात्र ऑनलाईन साईटवर २७ उपलब्ध दाखवित आहे. याचा अर्थ स्थिती खराब आहे अथवा रुग्णालयांनी माहिती अपडेट केली नसावी. मनपा प्रशासनाने रुग्णालयांना आकस्मिक भेट देऊन याबाबत शहानिशा करावी, अशी सूचना महापौर दयाशंकर तिवारी यांनी केली.

 मनपाने केली १० झोनमध्ये सहा हजार 'सुपर स्प्रेडर्स'ची चाचणी

मनपाने केली १० झोनमध्ये सहा हजार 'सुपर स्प्रेडर्स'ची चाचणी

 मनपाने केली १० झोनमध्ये सहा हजार 'सुपर स्प्रेडर्स'ची चाचणी


नागपूर, ता. 17 : कोरोनाची साखळी खंडित व्हावी यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने बाज़ारपेठा, बँक,  शासकीय आणि खाजगी कार्यालय, दुकाने इत्यादि ठिकाणी 'सुपर स्प्रेडर'ची कोरोना चाचणी करण्यात आली. अशी चाचणी दहाही झोनमध्ये करण्यात येत आहे. 


मनपाच्या आरोग्य विभागातर्फे शनिवारी (ता. १५)  सहा हजारांपेक्षा अधिक नागरिकांची चाचणी करण्यात आली.


महापौर श्री. दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी आरोग्य विभागाला सुपरस्प्रेडर्सची चाचणी करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, आणि श्री  संजय निपाणे यांच्या नेतृत्वात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्या सहकार्याने डॉ. शुभम मनगटे आणि चमूकडून चाचणी करण्यात आली. या कार्यात ११ मोबाइल व्हॅन आणि ४५ चाचणी केंद्रांचा उपयोग करण्यात आला. सकाळी ६ ते रात्री ८ पर्यत कोरोना चाचणी करण्यात येत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या चमूव्यतिरिक्त आता नवीन १० चमूसुद्धा चाचणीसाठी  तयार करण्यात आल्या आहेत. नवीन चमूच्या माध्यमातून बालकांची तसेच मधुमेह आज़राने त्रस्त नागरिकांची चाचणी करण्यात येणार आहे. 


मनपाच्या वतीने कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी विशेष शिबीर आयोजित करून चाचणी करण्यात आली. तसेच विविध आजाराने ग्रस्त, सिकलसेल रुग्ण यांचीसुद्धा चाचणी करण्यात येणार आहे. या कार्यात डॉ. संगम मकड़वाड़े,  डॉ. पराग ढाके, डॉ. गोपाल समर्थ यांचे सहकार्य मिळत आहे. दहाही झोनचे सहायक आयुक्त आणि झोनल वैद्यकीय अधिकारी यांनी चाचणीच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व व्यवस्था आपापल्या संबंधित झोन मध्ये केलेली आहे. ज्या नागरिकांना कोरोनासदृश लक्षणे आहेत अथवा जे कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आले आहेत, अशा व्यक्तींनी चाचणी करून कोरोनाची साखळी तोडण्यास सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

शुक्रवार, मे १४, २०२१

नागपुरात ज्येष्ठांसाठी 'ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन  'सेवा सुरु झाल्याचे समाधान - डॉ.नितीन राऊत

नागपुरात ज्येष्ठांसाठी 'ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन 'सेवा सुरु झाल्याचे समाधान - डॉ.नितीन राऊत

नागपुरात ज्येष्ठांसाठी 'ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन

'सेवा सुरु झाल्याचे समाधान - डॉ.नितीन राऊत




नागपूर दि. १४ : मुंबई पाठोपाठ नागपूर येथे डॉ.नितीन राऊत यांचे सूचनेनुसार नागपूर महानगरपालिकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन ला सुरुवात केल्याचा मनस्वी आनंद असल्याचे मत पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी व्यक्त केले. 

बेडची उपलब्धताऑक्सिजन बेडव्हेंटिलेटर बेड यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक सुविधा करणारा नागपूर जिल्हा या उपक्रमातही अग्रेसर असून महानगरपालिकेने पुढाकार घेऊन ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन मोहिम सुरू केल्याबद्दल डॉ.नितीन राऊत यांनी मनपाचे कौतुक केले.

आज नागपूर शहरातील बैद्यनाथ चौक येथील ट्रीलीयन मॉलमध्ये त्यांनी साठ वर्षांवरील जेष्ठांच्या ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन मोहिमेची सुरुवात केली. यावेळी त्यांनी वाहनात आलेल्या श्यामदास छाबराणी (८३ वर्ष )कृष्णा छाबराणी (६२ वर्ष ) या ज्येष्ठांचे लसीकरण केल्यानंतर गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. छाबराणी परिवाराशी त्यांनी संवाद साधला. यावेळी नागपूर महानगरपालिकेचे महापौर दयाशंकर तिवारीआमदार अभिजित वंजारीनागपूर महानगरपालिकेचे आयुक्त  राधाकृष्णन बी,स्थायी समितीचे सभापती प्रकाश भोयर,मनपा विरोधी पक्षनेते तानाजी वनवेधंतोली विभागाच्या सभापती वंदना भगतमहानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशीसहाय्यक आयुक्त किरण बगडेयांच्यासह अन्य पदाधिकारी व आरोग्य अधिकारी संजय चिलकर यांच्या नेतृत्वातील आरोग्य पथक उपस्थित होते. 

आज सकाळी ग्लोकल स्क्वेअर मॉल या ठिकाणी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते 'ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन 'चे उद्घाटन झाले. त्यानंतर दिवसभरात हा अशा पद्धतीच्या लसीकरणाचा दुसरा कार्यक्रम आहे.

नागपूर शहरातील ज्या नागरिकांना स्वतः एकटे येणे शक्य नाहीजे ज्येष्ठ नागरिक अंथरूणाला खिळून आहेत. किंवा अन्य आजाराने ग्रस्त आहेत. ज्यांना कोणाच्या तरी मदतीची गरज आहे. अशा 60 वर्षावरील नागरिकांना त्यांच्या नातेवाईकांनी किंवा ओळखीच्या व्यक्तीने स्वतःच्या वाहनांमध्ये याठिकाणी आणल्यास वाहनात बसून असतानाच त्यांचे महानगरपालिकेच्या वैद्यकीय पथकाकडून लसीकरण केले जाते. या ठिकाणी स्वतःच्या वाहनाशिवाय ऑटोमध्ये देखील ज्येष्ठ नागरिकांना आणले जाऊ शकते. जे जेष्ठ नागरिक स्वतःचे वाहनदुचाकी चालवू शकतातत्यांना देखील या ठिकाणी सुविधा दिली जाणार आहेतथापि ही सुविधा केवळ 60 वर्षावरील असाह्य ज्येष्ठ नागरिकांसाठी असून नागपुरातील तरुणाईने यासाठी आपल्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना याठिकाणी पोहोचवून त्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी मदत करावी असे आवाहनही करण्यात आले आहे.

     पालकमंत्र्यांनी यावेळी काही नागरिकांचे लसीकरण होईपर्यंत वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रशासन तिसऱ्या लाटेसाठी सज्ज होत असल्याचे स्पष्ट केले. सध्या नागपूर शहरांमध्ये बेड,ऑक्सिजन,रेमडेसिवीर इंजेक्शन व अन्य औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे.जिल्ह्यामध्ये कोरोना विरुद्धची लढाई सर्व मिळून सर्वांच्या सहकार्याने लढली जात आहे. पुढील काळातील नियोजनासाठी प्रयत्न केले जात असून दर चार तासाने प्रत्येक बाबीचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील काळात ही लाट नियंत्रित करण्यासाठी कडक निर्बंधाचे पालन करावे. गरज नसेल तर घराबाहेर निघूच नये. लसीकरण पूर्ण होईपर्यंत घराबाहेर पडणे आपल्या सोबत इतरांना धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी लसी उपलब्ध होणे आवश्यक असून शंभर टक्के लसीकरण हे सध्या एकमेव उद्दिष्ट आहे. नागरिकांनी यासाठी सहकार्य करावेनागपूर शहरातील तरुणांनी या दोन केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी आणण्यात मदत करावीस्वयंसेवी संस्थांनी मदत करावीअसेही आवाहन डॉ.राऊत यांनी केले. 


सात दिवसात मान्सून पूर्वतयारीची कामे  पूर्ण झाल्याचा अहवाल द्या : रवींद्र ठाकरे

सात दिवसात मान्सून पूर्वतयारीची कामे पूर्ण झाल्याचा अहवाल द्या : रवींद्र ठाकरे

सात दिवसात मान्सून पूर्वतयारीची कामे पूर्ण झाल्याचा अहवाल द्या : रवींद्र ठाकरे





जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सर्व विभाग प्रमुखांची मान्सूनपूर्व बैठक

·        जिल्हयात १५ जूनपर्यत पाऊस बरसणार

·        यावर्षी 96 ते १०४ टक्के पावसाची शक्यता

·        कोरोना संसर्ग पार्श्‍वभूमीवर यंदाचे नियोजन

·        सोमवारी मध्यप्रदेश अधिकाऱ्यांसोबत बैठक

 

·        बैठकीतील निर्णय

·        बोटीलाईफ जॅकेटप्रशिक्षित मणुष्यबळ यंत्रसामुग्री तपासून तयार ठेवा

·        कोरोनासह अन्य संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपायोजना करा

·        वीज पडून मृत्युमुखी पडणार नाही यासाठी जनजागृती मोहीम राबवा

·        सर्व मोठ्यामध्यम,लघू प्रकल्प व जिल्ह्यातील तलावांचे परीक्षण करा

·        जिल्ह्यातील संपूर्ण 341 गावांमध्ये आवश्यक संपर्क यंत्रणा व सतर्कता ठेवा

·        अर्धवट पूल व अर्धवट रस्त्यांच्या कामाच्या ठिकाणी फलक लावा

 

नागपूर दि १४ : गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस तीनशे पंधरा वर्षातील सर्वात मोठ्या पुराला अनुभवलेल्या नागपूर जिल्ह्याने येत्या मान्सूनसाठी अतिशय गंभीरतेने तयारी सुरू केली आहे. आज यासंदर्भात झालेल्या जिल्हा प्रशासनाच्या  मान्सून पूर्व बैठकीत कोरोना संसर्ग आणि गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन जिल्ह्यातील पुराचा धोका असणाऱ्या सर्व 341 गावांना कोणताही धोका पोहोचणार नाही,अशा पद्धतीचे सुसज्ज नियोजन करण्याचे निर्देश  जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले.

गेल्यावर्षी 28 व 29 ऑगस्ट रोजी मध्यप्रदेशातील चौराई धरणाच्या ग्रहण क्षेत्रात काही तासांमध्ये 414 मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे चौराई धरणातून 98 टक्के भरलेल्या तोतलाडोह धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आले. तोतलाडोहचा विसर्ग वाढविणे आवश्यक असल्याने गेल्या तीनशे पंधरा वर्षात आला नसेल इतका भयानक पूर नागपूर जिल्ह्यातील पारशिवनीमौदासावनेर तालुक्याने बघितला. सुदैवाने प्रशासनाच्या जागरूकतेने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र प्रचंड वित्त हानी झाली. त्यामुळे यावर्षी मान्सूनपूर्व तयारी करताना गेल्या वर्षी जे घडले ते पुन्हा घडणार नाहीअशा पद्धतीचे नियोजन करण्याची सूचना आजच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकार्‍यांनी केली. या बैठकीला जिल्हाधिकारी कक्षातून जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकरजिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडेनिवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. या ऑनलाईन बैठकीला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल,राज्य आपत्ती प्रतिसाद दलहोमगार्डपोलिसस्वयंसेवी संस्थारेड क्रॉस आदी उपस्थित होते.  

बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी केले. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी या वर्षीचे सर्व विभागाचे नियोजन पुढील सात दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्याचे निर्देश दिले. हवामान खात्याने या वर्षी 96 ते 104 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच 15 जून पर्यंत नागपूरला मान्सूनचा पाऊस सुरू होणार आहे. त्यामुळे पुढील महिनाभरात सर्व नियोजन पूर्ण करायचे असून त्यासाठी सर्वप्रथम त्यांनी जिल्ह्यातील पाच मोठ्या व 12 मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट करावे ,यासोबतच लघु प्रकल्पतसेच तलाव बंधारे याबाबतही काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे.

नागपूर जिल्ह्यामध्ये 1991 मध्ये मोवाड येथील दुर्घटना व त्यानंतर गेल्या वर्षी 28 व 29 ऑगस्ट रोजी आलेला महापूरया ताज्या घटना आहे. त्यातून धडा घेत नव्याने नियोजन झाले पाहिजेअसे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी मध्यप्रदेशातील आपत्ती व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांसोबत विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात एक बैठक होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मध्य प्रदेशातून येणाऱ्या नद्यांवरील धरणातील पाण्याचा विसर्ग व अन्य बाबींवर चर्चा करण्यासाठी नागपूर भंडारा जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहे .गेल्यावेळी 28 हजार पूरग्रस्तांना हलविण्यात आले होते. त्यामुळे संपर्क व्यवस्था अतिशय मजबूत ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

बोटीलाईफ जॅकेटप्रशिक्षित मणुष्यबळ यंत्रसामुग्री तपासून तयार ठेवणेकोरोनासह अन्य संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने  दुर्गम गावांपासून सर्वत्र उपायोजना करणेवीज पडून मृत्युमुखी पडणार नाही यासाठी जनजागृती मोहीम राबवणेसर्व मोठ्या मध्यमलघूप्रकल्प व जिल्ह्यातील तलावांचे परिक्षण करणेजिल्ह्यातील संपूर्ण 341 गावांमध्ये आवश्यक संपर्क यंत्रणा व सतर्कता ठेवण्याची यंत्रणा बळकट करण्याची सूचना त्यांनी केली.

सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्धवट पूल व अर्धवट रस्त्यांच्या कामाच्या ठिकाणी फलक लावावेत,अपघात प्रवण स्थळांची निश्‍चिती व्हावीज्या पुलाचे काम सुरू असेल त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था उत्तम प्रकारे करण्याचेही त्यांनी सांगितले. एक जून पासून प्रत्येक विभागातील आपत्ती व्यवस्थापन केंद्राला अद्यावत करण्यात यावे. त्या केंद्राचा जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन केंद्राशी चर्चा उत्तम समन्वय राहील असे नियोजन ठेवण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

वीज पुरवठा संदर्भातील तक्रारी या काळात अधिक असतात. याबाबतचे दुर्गम भागातील नियोजन ठेवावे. तसेच धरण क्षेत्रात ज्या ठिकाणी अधिक जोखीम आहे अशा ठिकाणी मोबाईल संपर्क यंत्रणा काम करत नसेल तर पर्यायी यंत्रणा कार्यान्वित ठेवावी. तसेच सर्व मोबाईल ऑपरेटरला याबाबत सतर्क करावेज्या ठिकाणी यंत्रणा काम करत नसेल त्याची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी,असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलराज्य आपत्ती प्रतिसाद दलहोमगार्ड पोलीस,रेड क्रॉसआदी संघटनांच्या प्रमुखांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच या काळातील जबाबदारी ओळखून नियोजन करण्याचे निर्देश दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी ही संवाद साधला. गेल्या वर्षी महापुरामध्ये पूरग्रस्त गावातील नागरिकांना अतिशय कौशल्याने प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी हलविले. पुन्हा अशी वेळ आल्यास काय करायचे हा विचार करून नियोजन कराबचाव कार्याचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक सराव वेळेत पूर्ण करण्याचेही त्यांनी सांगितले.

नागपुरात कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या  ड्राईव्ह इन लसीकरणाला प्रारंभ

नागपुरात कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या ड्राईव्ह इन लसीकरणाला प्रारंभ

नागपुरात कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या ड्राईव्ह इन लसीकरणाला प्रारंभ


- केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग तसेच केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उ‌द्‌घाटन 

 नागपुर 14  मे 2021

 



नागपूर महानगरपालिके तर्फे कोविड प्रतिबंधात्मक लसीच्य  ड्राईव्ह इन  लसीकरण केंद्राचे  आज स्थानिक सीताबर्डी येथे ग्लोकल मॉलमध्ये  केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग तसेच केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितिन गडकरी यांच्या  हस्ते उद्‌घाटन  करण्यात आले .  याप्रसंगी  महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त बी राधाकृष्णन उपस्थित होते. या ड्राईव्ह इन लसीकरणात मॉलच्या पार्किंग एरियामध्ये गाडीतून येणाऱ्या  60 वर्षावरील   जेष्ठ नागरिकांचे लसीकरण सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत करण्यात येत आहे . याप्रसंगी गडकरी यांनी जेष्ठ नागरिकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले . सदर लसीकरणासाठी जेष्ठ नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे. 


या उद्घाटनानंतर गडकरी यांनी प्रसार माध्यमांच्या  प्रतिनिधींशी बोलतांना वर्धाच्या जेनेटिक लाईफ सायन्सेस मध्ये 17 हजार रेमडेसिविर इंजेक्शनच्या पहिल्या खेपेचे वितरण हे विदर्भात होणार आहे. आज सुद्धा 25 हजार इंजेक्शनची खेप निघणार आहे. यांचे वितरण महाराष्ट्र ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी सुद्धा होणार असून इंजेक्शनच्या उपलब्धतेमुळे या इंजेक्शनच्या काळाबाजाराला आळा बसणार असल्याचे सांगितले. 

 

कोविड मधून जे लोक बरे झाले आहेत त्यातील काहींना 'ब्लॅक फंगस 'चा संसर्ग होऊन डोळ्यांना अपाय होण्याची शक्यता असते त्यामुळे असे लक्षणे दिसताच त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन गडकरी यांनी केले. कोरोनाच्या  संभाव्य तिसऱ्या लाटेचा बालकांना संसर्ग होऊ नये यासाठी नागपूरातील डागा इस्पितळात एक स्पेशल वार्ड तयार करण्यास सुद्धा महानगरपालिका सज्ज  असल्याचे गडकरी यांनी सांगितले. 


 लष्करप्रमुखांच्या मनाईनंतर ‘कोर्ट मार्शल’ अयोग्य

लष्करप्रमुखांच्या मनाईनंतर ‘कोर्ट मार्शल’ अयोग्य

 लष्करप्रमुखांच्या मनाईनंतर ‘कोर्ट मार्शल’ अयोग्य

⭕लष्कराच्या कारवाईला मे.उच्च न्यायालयाची चपराक, 

⭕सेवानिवृत्त कर्नलचे आव्हान.......


(मंगेश राऊत),


 नागपूर : कोर्ट ऑफ इंक्वायरीच्या अहवालानंतर लष्करप्रमुखांनी कोर्ट मार्शलची कारवाई अनुचित व अव्यवहार्य ठरवल्यानंतरही जुन्याच पुराव्यांच्या आधारे व कोणतेही नवीन आरोप नसताना दुसऱ्यांदा सेवानिवृत्तीनंतर कोर्ट मार्शलची कारवाई करणे, 

लष्कर कायद्यानुसार अयोग्य असल्याचे मत मै.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले. 

कर्नल इवान सिंग कुंवर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अविनाश घारोटे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. 

ऑक्टोबर २०१७ मध्ये ११८ इंफंट्री बटायलियनमध्ये सैन्य भरतीचा निर्णय घेण्यात आला. 

त्या सैन्य भरतीत तत्कालीन कर्नल उदय बारावरकर आणि त्यांचे सहकारी अमोल पाटील यांच्याविरुद्ध अनियमितता आणि मंदिराच्या निधीत गैरव्यवहार करण्याची तक्रार सिंग यांनी वरिष्ठांकडे केली होती.

 पूर्वी या बटालियनचे कार्यालय नागपुरात होते व आता ते भुसावळला स्थानांतरित झाले. 

त्या तक्रारीवर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली व सिंग मुख्य साक्षीदार होते. 

दरम्यान, २३ एप्रिल २०१८ ला बारावरकर यांच्याविरुद्धची चौकशी कोणत्याही कारणाविना रद्द करण्यात आली.

 त्याउलट १ फेब्रुवारी २०१९ ला कर्नल इवान सिंग यांच्याविरुद्धच २० जुलै २०१४ ते १३ जून २०१८ या कालखंडात आपले पद, अधिकार, सुविधा आणि मनुष्यबळाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला. 

त्यानंतर कोर्ट ऑफ इंक्वायरीतर्फे त्यांना नोटीस बजावून देवळालीतील ११६ इंफंट्री बटालियनमध्ये चौकशी करण्यात आली. 

या चौकशीवर कर्नल सिंग यांनी अनेक आक्षेप घेतले.

 मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीपासून राज्यातील विद्यार्थी अजूनही वंचितच

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीपासून राज्यातील विद्यार्थी अजूनही वंचितच

 मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीपासून राज्यातील विद्यार्थी अजूनही वंचितच

 

नागपूर :  इतर मागासवर्ग आणि भटक्या विमुक्त प्रवर्गातील मुला-मुलींसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती (वर्ग पहिली ते दहावी) योजनेची घोषणा करून दोन वर्षे झाली,परंतु अद्याप पहिल्याच वर्षीची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली नाही. विशेष म्हणजे, २०१९-२० शैक्षणिक सत्रासाठी निधीची तरतूद केली, परंतु प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे प्रारंभीच या योजनेपासून विद्यार्थी वंचित राहिले आहेत. मागास प्रवर्गातील शाळकरी मुला-मुलींसाठी शैक्षणिक सत्रातील दहा महिने शिष्यवृत्ती देण्याची योजना २०१९ ला सुरू झाली. या योजनेत पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना प्रतिमहिना ६० रुपये प्रमाणे सहाशे रुपये आणि आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रतिमहिना १०० रुपये प्रमाणे हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याचे प्रस्तावित आहे.

शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी पहिल्या वर्षी केवळ उत्पन्नाचा दाखल आवश्यक करण्यात आला. आता उत्पन्नाचा दाखला आणि जाती प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, पहिल्या वर्षीची शिष्यवृत्ती अद्यापही देण्यात आली नाही. दुसरे वर्ष करोनात गेले.या योजनेत केंद्र आणि राज्याचा वाटा प्रत्येकी ५० टक्के आहे. यासंदर्भात विद्यार्थी संघटनांनी पाठपुरावा केला असता  केंद्राने आपला वाटा राज्याला पाठवल्याचे समजले. 

राज्याने वाटा दिला नसल्याने शिष्यवृत्तीचे कसे वाटप करावे ?, 

असा प्रश्न राज्यासमोर होता. त्यानंतर पुण्यातील इतर मागासवर्ग संचालनालयाकडे विचारणा केली. तेव्हा  केंद्राकडून आलेले १० कोटी ३० लाख रुपये प्रादेशिक उपायुक्तांमार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांना पाठवले आहेत, परंतु राज्य आपला वाटा जो पर्यंत देत नाही तोपर्यंत शिष्यवृत्ती वाटणे शक्य नाही, असे सांगण्यात आले.

 दोन महिन्यानंतर ‘पॉझिटिव्हिटी’च्या टक्केवारीत घट

दोन महिन्यानंतर ‘पॉझिटिव्हिटी’च्या टक्केवारीत घट

 दोन महिन्यानंतर ‘पॉझिटिव्हिटी’च्या टक्केवारीत घट


७ ते १२ मे दरम्यान पॉझिटिव्हिटीचा दर १२ टक्के : पुन्हा घसरण होण्याची शक्यता


नागपूर, ता. १३ : मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून नागपूर शहरात वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येला तब्बल दोन महिन्यानंतर काही प्रमाणात ‘ब्रेक’ लागल्याचे चित्र आहे. पॉझिटिव्हिटीचा दर हा एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात ३१ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. मात्र ७ मे ते १२ मे या आठवड्यात हा दर १२.०२ टक्क्यांवर आल्याने नागपूरकरांना दिलासा मिळाला आहे. 


कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात दुसरी लाट आली. रुग्णसंख्या वाढू लागली. या काळात चाचण्यांची संख्याही वाढविण्यात आली. २६ फेब्रुवारी ते ४ मार्च या आठवड्यात ५०५९१ चाचण्या झाल्या आणि ५८७२ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. पॉझिटिव्हिटीचा हा दर ११.६१ टक्के होता. यानंतर ही टक्केवारी वाढतच राहिली. ५ ते ११ मार्च या कालावधीत ४८१६१ चाचण्या झाला. ८७०० पॉझिटिव्ह (१८.०६ टक्के) रुग्णांची नोंद झाली. १२ ते १८ मार्च दरम्यान ६४९०३ चाचण्या तर १५६७५ रुग्ण पॉझिटिव्ह (२४.१५ टक्के), १९ ते २५ मार्च या आठवड्यात ७५१९९ चाचण्या १८९३३ पॉझिटिव्ह (२५.१८ टक्के), २६ मार्च ते १ एप्रिलदरम्यान ६८२५२ चाचण्या आणि १५६८३ रुग्ण पॉझिटिव्ह (२२.९७ टक्के), २ एप्रिल ते ८ एप्रिल दरम्यान ७३५२३ चाचण्या झाल्या. २०७३२ (२८.३ टक्के) रुग्ण पॉझिटिव्ह आलेत. यानंतर ९ ते १५ एप्रिलदरम्यान ९७०५७ चाचण्या झाल्या. २७५२३ रुग्ण पॉझिटिव्ह (२८.३६) आले. १६ ते २२ एपिल दरम्यान १०४४६० चाचण्या झाल्या. ३२६४६ रुग्ण पॉझिटिव्ह आलेत. ही टक्केवारी ३१.२५ टक्के इतकी होती. जी दुसऱ्या लाटेत सर्वाधिक गणली गेली. यानंतर मात्र पॉझिटिव्हिटीच्या टक्केवारीत घट व्हायला सुरुवात झाली. २३ ते २९ एप्रिल या आठवड्यात सर्वाधिक १२३४३४ चाचण्या झाल्या. ३०००३ रुग्ण पॉझिटिव्ह आलेत. ही टक्केवारी २४.३१ इतकी होती. ३० एप्रिल ते ६ मे या आठवड्यात ११०६०२ चाचण्या झाल्या. १९९७७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. पॉझिटिव्हिटीची ही टक्केवारी १८.०६ इतकी होती. आता मागील आठवड्यात टक्केवारी १२.०२ इतकी झाली. म्हणजेच मागील तीन आठवड्यांपासून प्रत्येक आठवड्यात पॉझिटिव्हिटीचा दर सहा टक्क्यांनी कमी होतो आहे. 


कडक निर्बंधांचा परिणाम


दुसऱ्या लाटेमुळे नागपूरच्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडला होता. यामुळे शहरात प्रथम मनपा प्रशासनाने आणि नंतर शासनाने कडक निर्बंध लावले. गर्दीची ठिकाणे बंद करण्यात आली. बाजारपेठा बंद करण्यात आल्या. यामुळे संसर्ग थांबण्यास मदत झाली. आता ३१ मे पर्यंत कडक निर्बंध वाढविण्यात आले आहे. त्यामुळे पुढील दोन आठवड्यात पॉझिटिव्हिटीचा दर अत्यंत कमी होईल, असा विश्वास मनपा प्रशासनाने व्यक्त केला.

मंगळवार, मे ११, २०२१

 कोरोनावरील लसीकरणासाठी वर्गणी गोळा करु नये - डॉ. संजीव कुमार  केंद्र व राज्य शासनातर्फे लस मोफत

कोरोनावरील लसीकरणासाठी वर्गणी गोळा करु नये - डॉ. संजीव कुमार केंद्र व राज्य शासनातर्फे लस मोफत

 कोरोनावरील लसीकरणासाठी वर्गणी गोळा करु नये - डॉ. संजीव कुमार

केंद्र व राज्य शासनातर्फे लस मोफत


नागपूर, दि.10 :  नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र व राज्य शासनाच्या निधीमधून विविध केंद्रामधून मोफत करण्यात येत आहे. लसीकरणासाठी स्थानिक स्वराज्य संस्था अथवा इतर कोणत्याही खाजगी संस्थांनी निधी गोळा करु नये, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.

नागपूर विभागात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार 45 वर्षावरील नागरिकांना तसेच कोविन ॲपवरील नोंदणी केल्यानंतर 18 वर्षावरील नागरिकांना नि:शुल्क लस देण्यात येत आहे. यासाठी शासनाने निर्धारीत केलेल्या केंद्रावर कुठेही शुल्क आकारण्यात येत नाही. लसीकरणासाठी कोणीही निधी गोळा करु नये, असे आवाहन यावेळी डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.

कोरोनाबाधित तसेच इतर रुग्णांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विविध नोंदणीकृत संस्था, सामाजिक संस्था, खाजगी तसेच नोंदणीकृती आस्थापनाकडून आवश्यक वैद्यकीय मदत देण्यात येत आहे. या मदतीसाठी स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला आहे. अशा कामासाठी गोळा केलेला निधी खर्च करता येऊ शकतो. परंतु लसीकरणासाठी अथवा लस खरेदीसाठी निधी गोळा करु नये. यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे लस उपलब्ध करुन देण्यात असल्याचे विभागीय आयुक्त यांनी स्पष्ट केले आहे.

शनिवार, मे ०८, २०२१

पदोन्नतीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण नाकारण्याचा निर्णय हे जातीय तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र

पदोन्नतीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण नाकारण्याचा निर्णय हे जातीय तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र

पदोन्नतीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण नाकारण्याचा निर्णय हे जातीय तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र

माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व भाजपा प्रदेश सचिव मेश्राम यांचा आरोप

 



 

    नागपूरता 8 : पदोन्नतीतील आरक्षणाच्या संदर्भात मागील तीन महिन्यापासून कुठलीही ठोस भूमिका घेण्यास असमर्थ ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारद्वारे पदोन्नतीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण नाकारण्याचा शासन निर्णय जारी करणे  हे मागासवर्गीय आणि खुल्या प्रवर्गामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र आहेअसा आरोप माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व भाजपाचे प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी एका संयुक्त पत्रकाद्वारे केला आहे.

    पदोन्नती कोट्यातील 33 टक्के आरक्षित पदे रिक्त ठेवून खुल्या प्रवर्गातील सर्व रिक्त पदे भरण्याचा निर्णय रद्द करून पदोन्नती च्या कोट्यातील सर्व रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचा निर्णय घेण्याच्या सरकारच्या भूमिकेचा राजकुमार बडोले व ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे समाचार घेतला.

    पदोन्नती कोट्यातील 33 टक्के आरक्षित पदे रिक्त ठेवून खुल्या प्रवर्गातील सर्व रिक्त पदे भरण्याचा 20 एप्रिल 2021 चा शासन निर्णय रद्द करून 5 मे 2021 रोजी मराठा समाजाला सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण नाकारल्या नंतर 7 मे 2021 रोजी नवा शासन निर्णय काढून त्यात पदोन्नती च्या कोट्यातील सर्व रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचा निर्णय घेणेहा सरकारचा मराठा समाजाला खूश करण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचाही टोला बडोले व ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी लगावला.

    मुंबई उच्च न्यायालयाने 4 ऑगस्ट 2017 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अन्वये पदोन्नतीतील मागासवर्गीयांचे आरक्षण अवैध ठरविण्यात आले. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले असताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमती याचिका दाखल केली. त्यात मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण नियमानुसार देण्याची विनंती केली होती. परंतू महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर 18 फेब्रुवारी 2021 च्या शासन निर्णयाद्वारे पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर अमागासवर्गीयांना पदोन्नती देणारा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर 20 एप्रिल 2021 ला पदोन्नती कोट्यातील 33 टक्के आरक्षित पदे रिक्त ठेवून खुल्या प्रवर्गातील सर्व रिक्त पदे भरण्यात यावीअसा शासन निर्णय करण्यात आला.

दरम्यान मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांना भेटले असता पदोन्नतीतील आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरावर मोर्चा काढामी स्वत: या                मोर्च्यात सहभागी होईनअसे वक्तव्य  पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले होते.

      मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आग्रहामुळे सरकारने 20 एप्रिल 2021 ला पदोन्नतीच्या कोट्यातील 33 टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील सर्व आरक्षित पदे भरण्यात यावीअसा शासन निर्णय घेतला. परंतु त्यानंतर 5 मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने 20 एप्रिल 2021 चा शासन निर्णय रद्द करीत 7 मे 2021  रोजी नवा शासन निर्णय काढला. त्यामध्ये पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यात यावीअसे स्पष्ट केले.

     महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णयामध्ये मागासवर्गीयांवर अन्याय होत असल्याचे स्पष्ट दिसून येत असून राज्यातील सरकार अतिशय गोंधळलेले आहे. तिघाडीच्या या सरकारमध्ये कुठल्याही विषयांवर एकमत होत नसल्याचे दिसून येत आहे. अशा निर्णयामुळे या सरकारचा तथाकथित पुरोगामीत्वाचा बुरखा फाटलेला असून हे सरकार मागासवर्गीयांवर अन्याय करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. एवढेच नव्हे तर या निर्णयामुळे मागासवर्गीय व खुला प्रवर्ग अशी वर्गवारी करून या दोन्ही प्रवर्गातील अधिकारीकर्मचाऱ्यांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करीत आहेअसेही राजकुमार बडोले व ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी नमूद केले

     मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे ही आपली भूमिका असून या पद्धतीने सरकारने निर्णय घेऊन मराठा समाजाला खूश करण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविलेला असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे हा अशा पद्धतीचा जातीय तेढ निर्माण करणारा शासन निर्णय रद्द करून 20 एप्रिल 2021 चा शासन निर्णय कायम करण्यात यावाअशी मागणीही बडोले व मेश्राम यांनी पत्रकात  केली आहे.


स्मार्ट पार्किंग जनतेच्या सेवेत उपलब्ध  मनपा - स्मार्ट सिटीचे संयुक्त उपक्रम, महापौरांनी केली पाहणी

स्मार्ट पार्किंग जनतेच्या सेवेत उपलब्ध मनपा - स्मार्ट सिटीचे संयुक्त उपक्रम, महापौरांनी केली पाहणी

स्मार्ट पार्किंग जनतेच्या सेवेत उपलब्ध मनपा - स्मार्ट सिटीचे संयुक्त उपक्रम, महापौरांनी केली पाहणी



नागपूर, ता. 8 : नागपूर महानगरपालिका व नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कारपोरेशन लिमिटेडच्या वतीने रामदासपेठ, सेन्ट्रल बाजार रोड, होटल तुली इंपीरियल जवळ चार चाकी वाहनांसाठी तयार करण्यात आलेल्या "स्मार्ट पार्किंग" जनतेसाठी सुरु करण्यात आले. कोरोनामुळे काही महिन्यापासून थांबलेले हे कार्य महापौरांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आले. महापौरांनी शुक्रवारी स्मार्ट पार्किंगची पाहणी केली. महापौर आपल्या संदेशात म्हणाले की, नागपूर स्मार्ट सिटी वाटचाल करीत आहे. इथल्या नागरिकांसाठी स्मार्ट पार्किंग उपलब्ध होणे अभिमानास्पद बाब आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि नागपूरला पार्किंगच्या त्रासापासून मुक्त करण्यास मदत करावी.

स्मार्ट पार्किंग चे कार्य पुर्ण करण्यामध्ये मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. , स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस., अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा व पुलिस उपायुक्त (वाहतुक) श्री. सारंग आव्हाड यांचे सहकार्य लाभले.

नागपूर स्मार्ट सिटीच्या वतीने तयार करण्यात आलेले संगणकीय डिजीटल प्रणालीव्दारे वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. ही प्रणाली स्मार्ट सिटीच्या सीईओ श्रीमती भुवनेश्वरी एस यांचा नेतृत्वात व ई- गर्व्हेनेंस विभागाच्या चमू यांनी महाव्यवस्थापक डॉ.शील घुले यांचा मार्गदर्शनात तयार केली आहे. हया संपूर्ण व्यवस्थेचे संचालन मनपाचे वाहतुक अभियंता श्री श्रीकांत देशपांडे करणार आहे तसेच श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी सिटी आपरेशन सेंटर च्या माध्यमातून व्यवस्था उत्तम राखण्यासाठी नियंत्रण ठेवणार आहे. 

स्मार्ट पार्किंगसाठी इलेक्ट्रॉनीक उपकरणे (गॅजेटस) लावण्यात आले आहे. सध्या ४० पार्किंग बे कार्यरत असुन उर्वरित २९ पार्किंग बे ची दुरुस्ती नंतर ते सुध्दा ऑपरेशन मध्ये येईल. या व्यवस्थेव्दारे चार चाकी वाहनतळ डिजीटल कॅमेरा, बुम बॅरीअर, इलेक्ट्रॉनिक सेंसर, इतर गॅजेटस व्दारे ऑपरेट होणार असुन चार चाकी वाहन धारकांसाठी ऑन लाईन पेमेंट ची व्यवस्था करण्यात आली आहे. डिजीटल पेमेंट सेवा उपलब्ध नसलेल्या वाहन धारकांना रोख शुल्क भरण्याची सुध्दा व्यवस्था करण्यात आलेली आहे. इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड च्या माध्यमातुन स्मार्ट वाहन स्थळाच्या ठिकाणी पार्किंगसाठी उपलब्ध असलेल्या पार्किंग बे ची माहिती मिळणार आहे. या स्मार्ट पार्किंग स्थळाचे ऑपरेशन आणि मेंटनेंस मे. अशफाक अली रमझान अली या कंत्राटदाराव्दारे करण्यात येणार आहे. तांत्रीक सहकार्य स्मार्ट सिटी चे राहणार आहे. 

शुक्रवार, मे ०७, २०२१

मनोजकुमार सुर्यवंशी यांची संकल्पना ठरतेय यशस्वी

मनोजकुमार सुर्यवंशी यांची संकल्पना ठरतेय यशस्वी

 मनोजकुमार सुर्यवंशी यांची संकल्पना ठरतेय यशस्वी

कार्यालयात न येताof ऑनलाईन अर्ज, ड्रॉपबॉक्स सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद



नागपूर, ०७ मे २०२१: नागपूर शहरात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या कडक निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (नामप्रविप्रा) या दोन्ही कार्यालयात नागरिकांना प्रवेश प्रतिबंध करण्यात आले असून कमीत कमी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थित हे दोन्ही कार्यालय सुरू आहेत. 


मात्र, नागरिकांना कोणतिही अडचण होऊ नये व कार्यलयाशी संबंधित त्यांची कामे पूर्ण करता यावी यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे व कार्यालयात लावण्यात आलेल्या ड्रॉपबॉक्स सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन 'नासुप्र'चे सभापती तथा 'नामप्रविप्रा'चे महानगर आयुक्त मा. श्री. मनोजकुमार सूर्यवंशी यांनी नागरिकांना केल्यानंतर या संकल्पनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.


बहुतांश नागरिक ऑनलाईन अर्ज  करत आहेत, तर पहिल्यांदाच ड्रॉप बॉक्स सुविधा उपलब्ध करून दिल्याने केवळ एका महिन्यातच १७५ अर्ज ड्रॉप बॉक्सच्या माध्यमातून दोन्ही कार्यलयात प्राप्त झाले आहे. नागरिकांच्या अर्जावर तातडीने कारवाई करत आतापर्यंत ड्रॉप बॉक्समधील १४५ अर्ज निकालीही काढण्यात आले.  उर्वरित अर्ज ही लवकरच निकाली काढण्यात येणार आहे.  


राज्य शासनातर्फे १५ मे पर्यंत कडक निर्बंध वाढवण्यात आल्याने तेव्हा पर्यंत नागरिकांना नासुप्र व नामप्रविप्रा कार्यालयात येता येणार नाही, त्यामुळे नागरिकांनी पुढे ही ऑनलाईन आणि ड्रॉप बॉक्स सुविधेचा वापर करत राहण्याचे आवाहन पुन्हा एकदा मनोजकुमार सूर्यवंशी यांनी नागरिकांना केले आहे.

गुरुवार, मे ०६, २०२१

 सेवा श्री. साई पतसंस्थेचे अध्यक्ष रविंद्र सातपुते यांचे निधन

सेवा श्री. साई पतसंस्थेचे अध्यक्ष रविंद्र सातपुते यांचे निधन

 सेवा श्री. साई पतसंस्थेचे अध्यक्ष रविंद्र सातपुते यांचे निधन


नागपूर, ६ मे - सेवा श्री साई सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, नागपूर  शहर काँग्रेसच्या ब्लॉक क्रमांक १५ चे उपाध्यक्ष व विनोबा भावे नगरातील रहिवासी रविंद्र सातपुते यांचे आज निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते.


उत्तर नागपुरातील काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये रविंद्र सातपुते यांचा समावेश होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पतसंस्थांच्या माध्यमातून समाजातील वंचित व उपेक्षित घटकांना आर्थिकदृष्ट्या त्यांनी सबळ केले. रविंद्र सातपुते सेवा श्री साईं सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष होते. यासोबतच ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पतसंस्थेचे संचालक, नागपूर जिल्हा पत संस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष होते. 

उत्तर नागपुरातील  नागपूर शहर काँग्रेस कमेटी ब्लॉक क्र. 15 चे उपाध्यक्ष होते.  तसेच विशेष कार्यकारी अधिकारी सुद्धा होते. त्याच्या पश्चात पत्नी चंदा, मुलगा वत्सल, मुलगी सृष्टी व आई आहे. 


पालकमंत्र्यांची शोक संवेदना

रविंद्र सातपुते यांच्या निधनाने व्यक्तीगत हानी झाल्याची शोक संवेदना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्षाने एक निष्ठावान कार्यकर्ता गमावला आहे. गेल्या २० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून रविंद्रचे काम मी जवळून पाहत आलो आहे. घरची परिस्थिती बेताची होती, परंतु स्वप्न मात्र मोठे होते. पतसंस्थांच्या माध्यमातून रविंद्रने केवळ माणसे जोडली नाही तर या माणसांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याचे व त्यांच्या अडचणीत धावून जाण्याचा त्याचा स्वभाव होता. अगदी शून्यातून रविंद्रने पतसंस्थांचे जाळे विणले, असे डॉ. राऊत यांनी शोक संदेशात म्हटले आहे.

 फडणवीसांनी दिले लसीकरणासाठी मनपाला एक कोटी

फडणवीसांनी दिले लसीकरणासाठी मनपाला एक कोटी

 फडणवीसांनी दिले लसीकरणासाठी मनपाला एक कोटी 



नागपूर, ता. ६ : राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्ष नेता व माजी मुख्यमंत्री श्री. देवेन्द्र फडणवीस यांनी नागपूरच्या नागरिकांचे सुरळीत लसीकरण करण्यासाठी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांच्या आवाहनावर आपल्या आमदार निधीतून मनपाला रुपये १ कोटीचा निधी चे पत्र महापौरांना दिले. 

यावेळी आमदार श्री. प्रवीण दटके, सत्तापक्ष नेते श्री. अविनाश ठाकरे, माजी महापौर श्री. संदीप जोशी, स्थायी समिती सभापती श्री. प्रकाश भोयर, माजी सत्तापक्ष नेता श्री. संदीप जाधव, ज्येष्ठ नगरसेवक श्री. सुनील अग्रवाल उपस्थित होते.

 स्वनिधीतून लस खरेदीच्या परवानगासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

स्वनिधीतून लस खरेदीच्या परवानगासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

 स्वनिधीतून लस खरेदीच्या परवानगासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

महापौर दयाशंकर तिवारी यांची पत्रकार परिषदेत माहिती : तिस-या लाटेपूर्वी संपूर्ण नागपूरकरांच्या लसीकरणासाठी मनपाचे शर्थीचे प्रयत्न

 

नागपूर, ता. ६ : नागपूर शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दुसरीकडे लस उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनाची ही दुसरी लाट ओसरल्यानंतर तिसरी लाट सुद्धा येण्याची शक्यता तज्ज्ञांद्वारे वर्तविण्यात आली आहे. अशा स्थितीत लस हेच मोठे शस्त्र असून तिस-या लाटेपूर्वी नागपूर शहरातील सर्व नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या कोट्याव्यतिरिक्त नागपूर महानगरपालिका स्वनिधीतून निधी खरेदी करण्यास तयार आहे व त्यासाठी परवानगी देण्यात यावी, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविण्यात आले आहे, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली. नागपूर शहरातील लसीकरणाला गती मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या पत्रासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल उपस्थित होते.

  महापौरांनी सांगितले की, कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून ती दुस-या लाटेपेक्षाही घातक असण्याची शक्यता तज्ज्ञांमार्फत वर्तविण्यात आली आहे. अशा स्थितीत सुरक्षेसाठी लस हे अत्यंत आवश्यक असून नागपूरकर जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने मनपाने महत्वाचे पाउल उचलले आहे. तिस-या लाटेपूर्वी शहरातील सर्व नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त होणा-या लसींशिवाय मनपाला स्वनिधीतून लस खरेदी करण्याची परवानगी दिल्यास नागपूर शहरातील लसीकरणाला गती प्रदान होईल व सर्व नागपूरकरांचे लसीकरण गतीशीलतेने पूर्ण होउ शकेल, असे सांगतानाच पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर महानगरपालिका १० कोटी निधी खर्च करण्यास तयार असून पुढे पुढे सुद्धा निधीची व्यवस्था केली जाईल, असे पत्रात नमूद केले असल्याचेही महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.

  संपूर्ण नागपूरकरांचे सुरळीत लसीकरण व्हावे यासाठी लस खरेदीसाठी निधीच्या संकलनासाठी शहरातील सर्व खासदार, आमदार, नगरसेवक यांना विनंती करण्यात आले असल्याचे सुद्धा महापौरांनी सांगितले. शहरातील सर्व नगरसेवकांनी त्यांच्या विकास निधीतून १० लाख रुपये तसेच इच्छूक नगरसेवकांनी आपल्या मानधनातील काही निधी लस खरेदी करण्यासाठी ‘महापौर सहायता निधी’मध्ये देण्यासाठी पत्र द्यावे. सर्व नगरसेवकांनी स्वेच्छेने विकास निधी अथवा अन्य निधीमधून १० लक्ष रूपये दिल्यास लस खरेदी करण्यासाठी मनपाकडे १५ कोटी रुपयांची व्यवस्था होईल. याशिवाय शहरातील सर्व खासदार यांनी त्यांच्या खासदार निधीतून रुपये दोन कोटी तर आमदारांनी आमदार निधीतून रुपये एक कोटी चे सहकार्य करण्याबाबत पत्र देण्यात आले. त्या पत्राला त्वरीत प्रतिसाद देत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार प्रवीण दटके व आमदार मोहन मते यांनी प्रत्येकी १ कोटी निधी देण्याचे पत्र दिले आहे. शहरातील सर्व खासदार, विधानसभा व विधानपरिषद सदस्य यांनी निधी दिल्यास त्यातून पुन्हा १५ कोटी रुपयांची व्यवस्था होउ शकेल. सगळी निधी मिळून १० लाख लोकांच्या लसीकरणाची व्यवस्था नागपूर महानगरपालिका करू शकणार आहे. याशिवाय नागपूर शहरातील उद्योजक, कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्तींनी त्याचा सीएसआर निधी लस खरेदी करण्यासाठी द्यावा. तसेच शहरातील जी व्यक्ती लस खरेदी करू शकतात त्यांनी मनपाच्या लसीकरण केंद्रावरून नि:शुल्क घ्यावी. मात्र इतर नागरिकांनाही लस मिळावी यासाठी स्वेच्छेने लसीला लागणारे शुल्क ‘महापौर सहायता निधी’मध्ये जमा करावे, असेही आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.


 

‘महापौर सहायता निधी’मध्ये निधी जमा करा

नागपूर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील शंभर टक्के लसीकरण व्हावे यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे पुढाकार घेण्यात आला आहे. या पुढाकारामध्ये शहरातील लोकप्रतिनिधी, व्यावसायीक, उद्योजक, कॉर्पोरेट क्षेत्रातील मान्यवर, सधन नागरिक या सर्वांनी स्वेच्छेने ‘महापौर सहायता निधी’मध्ये सहकार्य करण्याचे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे. ‘महापौर सहायता निधी’ बँक ऑफ महाराष्ट्र, सिव्हिल लाईन्स नागपूर, IFSC Code क्रमांक - MAHB0001195, बँक खाते क्रमांक - 60346554131 (खाते प्रकार - बचत) येथे निधी जमा करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.



 

युवक काँग्रेसचा धडाडीचा कार्यकर्ता धीरज पांडे यांचे निधन

युवक काँग्रेसचा धडाडीचा कार्यकर्ता धीरज पांडे यांचे निधन

 युवक काँग्रेसचा धडाडीचा कार्यकर्ता धीरज पांडे यांचे निधन


नागपूर, ६ मे - नागपूर शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष धीरज पांडे यांचे दु:खद निधन झाले. ते ३७ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनामुळे आजारी होते. त्यांचा जीवनसंघर्ष आज सकाळी संपला. 

कुटुंबातूनच काँग्रेसच्या विचाराचे संस्कार मिळालेल्या धीरज पांडे यांनी काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यात व युवकांना काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात आणण्यात मोठी भूमिका बजावली होती. उत्तर नागपुरातील युवक काँग्रेसचे जाळे विणण्यात धीरज याचे संघटन कौशल्य कारणीभूत होते. काँग्रेस पक्षाप्रती निष्ठावान असलेल्या धीरज यांनी समाजातील प्रत्येक घटकाला मदत करण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही गरजूपर्यंत मदत पोहोचविण्यात धीरज अग्रेसर राहत होते. अत्यंत मनमिळावू व सर्वांना मदत करण्यासाठी तत्पर राहणारे धीरज पांडे हे काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय संघटक कृष्णकुमार पांडे यांचे सुपुत्र होते. 


पालकमंत्र्यांची शोक संवेदना

धीरज पांडे हे माझ्या कुटुंबातील एक सदस्य होते. त्यांच्या निधनाने पांडे कुटुंबियांवर प्रचंड मोठा आघात झाला आहे. त्याप्रमाणे माझी व्यक्तीगत हानी झाली आहे. अत्यंत मनमिळावू व काँग्रेसच्या विचारांशी एकनिष्ठ असलेल्या कुटुंबाचा हा वारसा धीरज समर्थपणे पुढे नेत होता. काँग्रेसला अशा कार्यकर्त्यांची गरज असताना त्याचे अकाली निधन होण्याने काँग्रेस परिवाराचे फार मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.