सध्या महाराष्ट्रातील अस्थिर व गोंधळलेली राजकीय परिस्थिती, राजकारणाचा घसरलेला स्तर यामध्ये बदल करण्याचे सामर्थ्य फक्त मनसे अध्यक्ष *श्री राजसाहेब ठाकरे* यांच्यात आहे हे लक्षात घेऊन नागपूर मनसे करीत असलेल्या चांगल्या कामाला मजबुती प्रदान करण्याच्या उद्देशाने आम्ही आज मनसेत प्रवेश करीत आहोत असे प्रतिपादन नागपुरातील युवा वकील *ॲड. यशोधन गानु व केयुर रहाळकर* यांनी केले. #maharashtranavnirmansena
मनसे राज्य सरचिटणीस *श्री हेमंत गडकरी* यांच्या उपस्थितीत या दोघांनी मनसेत प्रवेश केला.
शहर अध्यक्ष *अजय ढोके* विभाग अध्यक्ष *तुषार गिऱ्हे*, विभाग उपाध्यक्ष *चेतन बोरकुटे* व इतर मनसे पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. ॲड.यशोधन व केयुर यांच्या सारख्या युवा वकिलांच्या प्रवेशामुळे स्थानिक स्तरावर मनसेला नक्कीच फायदा होईल असे मत व्यक्त करून हेमंत गडकरी यांनी मनसेचा दुपट्टा घालून त्यांचे स्वागत केले. रामदास पेठ व धरमपेठ सारख्या शहरातील उच्चभू समजल्या जाणाऱ्या परिसरातील या युवा वकिलांच्या प्रवेशामुळे शहरात मनसेचे जाळे सर्वत्र पसरते आहे असे अजय ढोके यांनी सांगितले. ॲड. यशोधन गानु व ॲड. केयुर रहाळकर व सहकारी यांच्या मनसे प्रवेशासाठी विभाग अध्यक्ष तुषार गिऱ्हे यांनी पुढाकार घेतला.
#maharashtranavnirmansena #maharashtra #mnsadhikrut #rajsaheb #rajsahebthackeray #isupportrajthackeray #mns #rajthackeray #amitthackeray #manse #mumbai #mnsadhikrutmumbai #maharashtramaza #mipanrajsaheb #maharashtrian #balanandgaonkar #ig #rajsamarthak #marathi #fc #isupportavinashjadhav #mnsadhikrutpune #mnsadhikrutnashik #amitthakrey #maharashtrasainik #cmomaharashtra #rajupatilmns #maharashtrapolitics #mipanrajthakery #adityathackeray #maharashtranavnirmansena #maharashtra @mnsadhikrut