*निफंद्रा येथे शिक्षक पालक संघाची स्थापना* Establishment of Teacher Parents Association at Nifandra
सावली तालुक्यातील निफन्द्रा येथील प्रवीणभाऊ आडेपवार माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात चालू शैक्षणिक वर्षातील सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य रवींद्र कुडकावार,प्रमुख अतिथी म्हणून पालक भक्तदास डहलकर, गुरुदास गंडाटे, मनीषा धुडसे उपस्थित होते.या प्रसंगी मुख्याध्यापकांनी विद्यार्थी लाभाच्या योजना,त्यासाठी लागणारे कागदपत्रे,विद्यार्थ्यांच्या जडण घडणीत पालकांचा सहभाग, पालक-शिक्षक-विद्यार्थी हे तिन्ही घटक एकत्र येऊन गुणवत्ता वाढ कशी होऊ शकते,तसेच एन. एम.एम.एस , एन. टी. एस.पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यांचे फायदे व विदयार्थ्यांना भविष्यात कसे महत्त्वाचे आहे हे समजून सांगितले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ,शिक्षक पालक संघ,विद्या समिती,शाळा व्यवस्थापन व विकास समिती अश्या शाळा स्तरावरील समित्यांचे गठन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणित शिक्षक गोविंदा बुरांडे, संचालन भाषा शिक्षक प्रदीप दोडके,आभार शारीरिक शिक्षक विनोद बोरकर यांनी मानले.यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.