Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मे ०८, २०२१

स्मार्ट पार्किंग जनतेच्या सेवेत उपलब्ध मनपा - स्मार्ट सिटीचे संयुक्त उपक्रम, महापौरांनी केली पाहणी

स्मार्ट पार्किंग जनतेच्या सेवेत उपलब्ध मनपा - स्मार्ट सिटीचे संयुक्त उपक्रम, महापौरांनी केली पाहणी



नागपूर, ता. 8 : नागपूर महानगरपालिका व नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कारपोरेशन लिमिटेडच्या वतीने रामदासपेठ, सेन्ट्रल बाजार रोड, होटल तुली इंपीरियल जवळ चार चाकी वाहनांसाठी तयार करण्यात आलेल्या "स्मार्ट पार्किंग" जनतेसाठी सुरु करण्यात आले. कोरोनामुळे काही महिन्यापासून थांबलेले हे कार्य महापौरांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आले. महापौरांनी शुक्रवारी स्मार्ट पार्किंगची पाहणी केली. महापौर आपल्या संदेशात म्हणाले की, नागपूर स्मार्ट सिटी वाटचाल करीत आहे. इथल्या नागरिकांसाठी स्मार्ट पार्किंग उपलब्ध होणे अभिमानास्पद बाब आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि नागपूरला पार्किंगच्या त्रासापासून मुक्त करण्यास मदत करावी.

स्मार्ट पार्किंग चे कार्य पुर्ण करण्यामध्ये मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. , स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस., अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा व पुलिस उपायुक्त (वाहतुक) श्री. सारंग आव्हाड यांचे सहकार्य लाभले.

नागपूर स्मार्ट सिटीच्या वतीने तयार करण्यात आलेले संगणकीय डिजीटल प्रणालीव्दारे वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. ही प्रणाली स्मार्ट सिटीच्या सीईओ श्रीमती भुवनेश्वरी एस यांचा नेतृत्वात व ई- गर्व्हेनेंस विभागाच्या चमू यांनी महाव्यवस्थापक डॉ.शील घुले यांचा मार्गदर्शनात तयार केली आहे. हया संपूर्ण व्यवस्थेचे संचालन मनपाचे वाहतुक अभियंता श्री श्रीकांत देशपांडे करणार आहे तसेच श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी सिटी आपरेशन सेंटर च्या माध्यमातून व्यवस्था उत्तम राखण्यासाठी नियंत्रण ठेवणार आहे. 

स्मार्ट पार्किंगसाठी इलेक्ट्रॉनीक उपकरणे (गॅजेटस) लावण्यात आले आहे. सध्या ४० पार्किंग बे कार्यरत असुन उर्वरित २९ पार्किंग बे ची दुरुस्ती नंतर ते सुध्दा ऑपरेशन मध्ये येईल. या व्यवस्थेव्दारे चार चाकी वाहनतळ डिजीटल कॅमेरा, बुम बॅरीअर, इलेक्ट्रॉनिक सेंसर, इतर गॅजेटस व्दारे ऑपरेट होणार असुन चार चाकी वाहन धारकांसाठी ऑन लाईन पेमेंट ची व्यवस्था करण्यात आली आहे. डिजीटल पेमेंट सेवा उपलब्ध नसलेल्या वाहन धारकांना रोख शुल्क भरण्याची सुध्दा व्यवस्था करण्यात आलेली आहे. इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड च्या माध्यमातुन स्मार्ट वाहन स्थळाच्या ठिकाणी पार्किंगसाठी उपलब्ध असलेल्या पार्किंग बे ची माहिती मिळणार आहे. या स्मार्ट पार्किंग स्थळाचे ऑपरेशन आणि मेंटनेंस मे. अशफाक अली रमझान अली या कंत्राटदाराव्दारे करण्यात येणार आहे. तांत्रीक सहकार्य स्मार्ट सिटी चे राहणार आहे. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.