Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

इतिहास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
इतिहास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, मे ०५, २०२१

प्राचिन माण

प्राचिन माण

प्राचिन माण 
________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव
_________________________

फेसबुक लिंक http://bit.ly/3xNDK1p
माण हा सध्या सातारा जिल्ह्यातील प्रदेश आहे.माण या नावाचे कोणतेही गाव नाही पण माण नदीच्या नावावरून या प्रदेशाला "माण" हे नाव मिळाले.या माणचे बरेच एेतिहासिक संदर्भ मिळतात.सातवाहनांनंतर चौथ्या शतकात हा प्रदेश पूर्वकालीन राष्ट्रकूटांच्या अंमलाखाली होता. त्या वंशाचा मूळ पुरुष मानांक (कार. इ. स. ३५०–७५) याने आपल्या नावे मानपूर नामक नगर स्थापून तेथे आपली राजधानी केली होती हे मानपूर म्हणजेच सातारा जिल्ह्यातील माण असावे. या वंशाच्या अंमलाखालचा प्रदेश प्राचीन कुंतल देशात अंतर्भूत होत असल्याने येथील राजास कुन्तलेश्वर किंवा कुंतलाधिपती म्हणत. कुंतल देशात कृष्णवर्णा किंवा कृष्णा नदीकाठच्या प्रदेशाचा अंतर्भाव होत असे. ‘करहाटक ४०००’ या प्रदेशाचा कुंतल देशात समावेश होता. या राजांना उत्तरेतील गुप्त सम्राटांचा पाठिंबा होता.राजशेखर, भोज, क्षेमेंद्र इ. संस्कृत ग्रंथकारांनी उल्लेखिलेल्या परंपरेप्रमाणे गुप्तराजा दुसरा चंद्रगुप्त -विक्रमादित्य याने स्वकालीन राष्ट्रकूट राजाच्या म्हणजे मानांकाचा पुत्र देवराजच्या दरबारात कविकुलगुरू कालिदास याला आपला दूत म्हणून पाठविले होते. नंतर या घराण्याचे विदर्भातील वाकाटकांशी विवाहसंबंध झाले आणि पुढे ते त्यांचे सामंत झाले. या काळात उदयास आलेल्या विष्णुकुंडिन वंशातील दुसरा माधव वर्मा (६ वे -७ वे शतक) याच्या खानापूर ताम्र पटात रेठ्ठूरक (रेठरे बुद्रुक) या गावचा उल्लेख असून त्याच्या स्तंभाच्या निर्देशात राजमाची, शेणोली, कोला व मलखेट या गामांचा उल्लेख आहे. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,शिवाय दानपत्रातील बेलवाटिका व वठ्ठरिका म्हणजे अनुक्रमे बेलवंडे व वाठार हेही स्पष्ट आहे. यावरून काही काळ या वंशाचा या प्रदेशावर अंमल असावा. चालुक्य दुसरा पुलकेशीने हे राज्य खालसा करून (६३१) तिथे आपला भाऊ विष्णुवर्धन याची काही काळ नियुक्ती केली.बदामीच्या चालुक्यांच्या पतनानंतरचा या प्रदेशाचा इतिहास सुस्पष्ट नाही तथापि तो नंतरच्या राष्ट्रकूट (७५३–९७५) घराण्याच्या साम्राज्यात अंतर्भूत झाला असावा आणि त्यांनी त्यावर एखाद्या सामंताची नेमणूक केली असावी. या काळातील त्यांची राजधानी सातारा जिल्ह्यातील कराड येथे असावी. कर्नाटकातील उत्तरकालीन सिंदराजे स्वतःचा ‘करहाटपूर वराधिश्वेर’ असा निर्देश करतात, यावरून ते मूळचे करहाटचे होते, हे निश्चित. कर्नाटकातील काही सिंदराजांच्या लेखांत ते मूळचे करहाटकचे होते, असे उल्लेख येतात. यावरून सिंदनृपती आदित्यवर्मा याची राजधानी करहाटकच असावी असे वाटते. नंतर शिलाहार द्वितीय जतिग याने तो प्रदेश जिंकून करहाटक येथे आपली राजधानी केली असावी. या शाखेचा पहिला ज्ञात लेख मारसिंहाचा (१०५८) मिरज ताम्रपट होय.
मारसिंह (कार. १०५०–७५) याच्या ताम्र पटात द्वितीय जतिगाचा मुलगा व उत्तराधिकारी गोंक याचे वर्णन असून तो करहाटक, कुण्डी, मिरिज देश यांचा अधिपती असल्याचा उल्लेख आहे. गोंकानंतर त्याचा मुलगा मारसिंह गादीवर आला. त्यावरून शिलाहारांची आरंभीची राजधानी करहाटक असावी.
शिलाहारवंशी राजकन्या चंद्रलेखा हिच्या चालुक्य राजा सहाव्या विक्रमादित्या बरोबरच्या करहाटक येथील स्वयंवराचे वर्णन बिल्हणाच्या विक्रमांकदेव चरितात आहे. तिच्या पित्याचे नाव करहाटपती असे त्यात आले आहे. राजा मारसिंह हा तिचा पिता असावा. या शाही विवाहानंतर शिलाहारांनी आपली राजधानी करहाटकहून कोल्हापुरास हलविली असे दिसते तथापि करहाटक येथे चालुक्य राजपुत्र मल्लिकार्जुन (चंद्रलेखेचा पुत्र) आणि सहाव्या विक्रमादित्याचा मांडलिक जोगम हे काही वर्षे राज्य करीत होते, असे कोरीव लेखांत उल्लेख आढळतात. कोल्हापूर व त्याच्या आसमंतात सापडलेल्या अनेक कोरीव लेखांत व वाङ्‌मयातही त्यांचा उल्लेख ‘करहाटाधिपती’ असाच आढळतो. शिलाहार वंशातील दुसरा भोज (कार. ११७५–१२१२) हा शेवटचा व श्रेष्ठ राजा होय. त्याने सातारा जिल्ह्यात १०–१२ किल्ले बांधले. त्यांपैकी सप्तर्षी (सातारा किंवा अजिंक्यतारा), चंदन-वंदन वगैरे काही प्रसिद्घ किल्ले होत. यादव राजा सिंघण (कार. १२१०–४६) याने भोजाचा पराभव केला. त्यानंतर हा प्रदेश यादवांच्या आधिपत्याखाली आला. या काळातील कोरीव लेखांत या प्रदेशाविषयी उल्लेख नाहीत. मात्र यादव वास्तुशिल्प शैलीतील मंदिरे फलटण (जबरेश्वर), परळी (शिवमंदिर व वीरगळ), कातरखटाव (कातरेश्वर), देऊर (विठ्ठल-रुक्मिणी), खटाव (नागनाथ), किकली (भैरवनाथ), शिंगणापूर (महादेव) इ. ठिकाणी आहेत. यांपैकी किकलीच्या भैरवनाथ मंदिरासमोर एक अस्पष्ट कोरीव लेख असून त्यातील ‘सिंघणदेव’ ही पुसट अक्षरे यादव वंशाच्या आधिपत्याचा निर्देश दर्शवितात.शिंगणापूरची स्थापना शिंगणराजे यादव (सन १२१० - ४७) या राजाने केली म्हणून यास शिंगणापूर हे नाव दिले आहे. इथल्या डोंगरमाथ्यावर एखाद्या शिरपेचाप्रमाणे शोभणारे शंभू महादेवाचे मंदिर हे माणदेशात सर्वात उंच ठिकाणी वसलेले तीर्थक्षेत्र आहे असे मानले जाते. हे देवस्थान अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते.
यादवांच्या पतनानंतर (१३१८) दक्षिण हिंदुस्थानात राजकीय अनागोंदी होती. बहमनी सत्तेखाली (१३४७–१५३८) गुलबर्गा तरफाचा सातारा भाग होता. कोकण भाग वगळता अन्य प्रदेश बहमनी साम्राज्यात होता. मुहंदशाह बहमनी (कार. १३५८–७५) याने खुद्द सातारा किल्ल्याची डागडुजी करून परिसरात अनेक किल्ले बांधून संरक्षण व्यवस्था भक्कम केली. या काळात वाई व माण ही दोन प्रमुख लष्करी ठाणी होती. बहमनी सत्तेच्या विभाजनानंतर हा प्रदेश आदिलशाही अंमलाखाली आला. याकाळात जावळीचे चंद्रराव मोरे, फलटणचे राव नाईक निंबाळकर, मलवडीचे झुंझारराव घाटगे, म्हसवडचे माने आदी मातब्बर मराठा मांडलिक घराणी वंशपरंपरेने आपल्या जहागिरीच्या ठिकाणी कार्यरत होती. त्यांच्या जीवावरच आदिलशाही सत्ता कोकणात स्थिरावली आणि पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी आपली सत्ता दृढतर केली. याचकाळात छ.शिवाजी महाराजांनी जावळी व परिसर पादाक्रांत करून (१६५६) रायरी (रायगड) घेतला आणि पुढे अफजलखानाचा निःपात करून (१६५९) वाई देश जिंकला. शिवाजी महाराजांच्या निधनापर्यंत व नंतरही किरकोळ अपवाद सोडता सातारा किल्ला व त्याचा परिसर मराठ्यांच्या अंमलाखाली होता. पुढे छ.राजारामांनी सातारा ही मराठ्यां ची राजधानी केली. औरंगजेबाने सातारा-परळी किल्ल्यांसह बराच भाग मोगल सत्तेखाली आणला (१६९९). त्याच्या मृत्युनंतर (१७०७) तो छ. शाहूंच्या अखत्यारीत आला आणि सातारा संस्थानची निर्मिती झाली.प्रतापसिंह भोसले (कार. १८०८–३९) यांच्या कारकीर्दीत सातारा शहर व जिल्ह्यात अनेक सुधारणा झाल्या. हा प्रदेश पेशवाईच्या अस्तापर्यंत (१८१८) मराठी सत्तेखाली होता पुढे सुरूवातीस बिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे त्यावर वर्चस्व होते. नंतर तो अव्वल इंग्रजी अंमलाखाली भारत स्वतंत्र होईपर्यंत होता. माण तालुक्यात अतिशय प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूर (महाराष्ट्राचे कुलदैवत), दहिवडी (श्री काशीपाते निलकंठ महाराज), जांभूळणी येथील श्री भोजलिंग व जोगेश्वरी मदिंर मोही (श्री महालक्ष्मी मंदिर), भवानी आई मंदिर (मार्डी), गोंदवले (श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज), वारुगड, म्हसवड (श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी मंदिर ) मलवडी (खंडोबा, श्री महंत शांतिगिरीजी महाराज), पांगरी (बिरोबा, सतोबा),बिजवडी  , कुलकजाई (सीताबाई मंदिर), किरकसल (श्री नाथ मंदिर), कुकुडवाड (महादेव मंदिर), मंकलेश्वर (धुलोबा) मंदिर धुळदेव, नागोबा मंदिर विरकरवाडी इत्यादी. आसपास वारुळगड, महिमानगड व वर्धनगड हे काही किल्ले आहेत.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498

प्राचिन माण

रविवार, मे ०२, २०२१

शिवशाहीतील अज्ञाताचा शोध -जिंतीकर भोसले

शिवशाहीतील अज्ञाताचा शोध -जिंतीकर भोसले

.

शिवशाहीतील  -जिंतीकर भोसले  

सोलापूर करमाळा तालुक्यातील मौजे जिंतीगावची छत्रपतींची थोरली गादी

दि. २ मे २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/336VCpT
जिंती,ता. करमाळा,जि सोलापूर
छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या पेक्षा मोठे बंधू होते. त्यांचे नाव(थोरले) संभाजी असे होते. कनकगिरिच्या युध्दात शहाजीराजे सोबत लढताना त्यांचा मृत्यू झाला.यावेळी शहाजीराजे,संभाजी व अफजलखान हे सरदार विजापूर आदिलशहाच्या पदरी नोकरीत होते,कनकगिरिच्या युध्दात अफजलखानाने कपटाने थोरले संभाजी यांना ठार मारले व ते लढाईत धारातीर्थी पडले असा देखावा केला.पुढे याचा बदला छ शिवाजी महाराज यांनी घेतला हा भाग वेगळा.आपण जिंतीकर भोसले यांचेविषयी जाणुन घेत आहोत.छत्रपतींच्या सातारा व कोल्हापूर या शाखेबरोबरंच तंजावरच्या भोसले घराण्याची देखील महाराष्ट्राला ओळख आहे. परंतु महाराष्ट्रातच असणारी छत्रपतींचे थोरले बंधू थोरले संभाजीराजे यांची शाखा महाराष्ट्राला पूर्णपणे अज्ञात आहे.याचे कारण म्हणजे हे थोरले संभाजीराजे अल्पवयातच मारले गेले असा एक समज इतिहासाकारांनी करून घेतला/दिला, त्यामुळे हे घराणे व त्यांचे कर्तुत्व कायम अज्ञातंच राहिले. मोठ-मोठया इतिहासाकारांनी देखीला या थोरले संभाजीराजे घराण्याचा परामर्ष घेतला नाही, बखरकारांनी अज्ञानातून जे चित्र रेखाटले त्यामुळे या घराण्याचा फारसा विचार झाला नसून, काही माहिती पुढे आली, तीदेखील चुकीची ठरली.            

हाजीराजे आणि मातोश्री जिजाऊ याचे थोरले संभाजीराजे हे ज्येष्ठ पुत्र,‘राधामाधवविलासचंपू’ कर्त्या जयरामने या थोरल्या संभाजीराजांचा उल्लेख ‘ युवराज संभाजीराजे’ असा केलेला आहे.मराठयांच्या इतिहासात प्रमाण मानल्या गेलेल्या सभासदाने आपल्या बखरीत या थोरल्या संभाजीराजांच्या जन्माचा उल्लेखदेखील केलेला नाही; फक्त अफजलखान प्रकरणात शिवाजी महाराजांच्या तोंडी या थोरल्या संभाजीराजांच्या मृत्युचा उल्लेख सभासद करतो.चित्रगुप्त, एक्क्याण्णवकलमी बखर, मराठी साम्राज्याची छोटी बकर, शेदगावकर भोसले बखर, श्री शिवदिग्विजय, शिवाजीप्रताप यामध्ये थोरल्या संभाजी राजांचा उल्लेख आलेला आहे.याबरोबर बृहदीश्वर शिलालेखात काही माहिती विस्ताराने सापडते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,परमानंदाने आपल्या शिवभारतात शहाजींना जिजाऊ पासून सहा शुभलक्षणी पुत्र झाले.त्यापैकी थोरले शंभू व शिवाजी हे दोघेच वंशवर्धक झाले असा उल्लेख केलेला आहे.फारसी साधनात बादशहानाम्यात थोरल्या संभाजी राजांचा उल्लेख दोन हजारी मनसबदार असा दिसतो. थोरल्या संभाजीराजांचा बहुतेक काळ कर्नाटकात गेल्याने महाराष्ट्राशी त्यांचा संबंध आला नाही. त्यामुळे नंतरच्या काळातदेखील मराठयांच्या इतिहासात त्यांचे उल्लेख आढळत नाहीत व अज्ञाताचे हे गूढ वाढतंच जाते.एक्क्याण्णव कलमी बखरीत थोरल्यासंभाजीचा पुत्रौमाजी याचा उल्लेख एकदा आलेला आहे.याशिवाय अन्य बखरकारांनी थोरल्यासंभाजीराजांच्या पुत्रांचा उल्लेख केलेला नाही.
परमानंदाने देखील शिवभारतात थोरलेसंभाजी व जयंतीबाई यांच्या विवाहा विषयी विस्ताराने लेखन केले असले तरी त्यांच्या मुलाविषयी मौन पाळलेले आहे.शेडगावकर भोसले बखरीत तर ‘त्यांच्या पोटी संतान नाही’ असा उल्लेख सापडतो. बृहदीश्वर शिलालेखात थोरल्या संभाजीराजांचा पुत्र उमाजीचा स्पष्ट उल्लेख केला गेलेला आहे. त्याचबरोबर उमाजींचा पुत्र परसोजी याचा जन्म झाल्याची नोंद या शिलालेखात सापडते.
याशिवाय अफजलखान-वधाच्या पोवाडयात उमाजींचा उल्लेख आलेला आहे. उमाजीचा या पोवाडयामधील उल्लेख थेट थोरल्या संभाजींचा पुत्र असा जरी नसला तरी ‘पुतण्या उमाजी राजाला’ (म्हणजे शिवाजी राजांना) असा आलेला आहे.
बृहदीश्वर शिलालेखानुसार थोरल्या संभाजींना जयंतीबाई खेरीज गौरीबाई आणि पार्वतीबाई अशा आणखी दोन स्त्रिया असल्याची माहिती मिळते,उमाजी हे थोरल्या संभाजीराजांचे दत्तक पुत्र नव्हते हे जेधे शकावली मधल्या नोंदीवरून सिद्ध होते. जेधे शकावली मध्ये उमाजींचा जन्म २५ नोव्हेंबर १६५४ ला झाला अशी नोंद मिळते.
शहाजीराजे इ.स. १६६४ मध्ये वारले तेंव्हा हा उमाजी दहा वर्षांचे होते. उमाजीस विजापूरकरांतर्फे जहागीर होती.ऐन तिशीच्या सुमारास हे आपल्या तलवारीच्या बळावर पराक्रम गाजवत असल्याचा पुरावा इ.स.१६८३ च्या एका महजरावरून मिळतो.
उमाजींना बहादूरजी नावाचा एक पुत्र होता.त्यांचा देखील एक हुकूम उपलब्ध आहे.मालोजीराजे भोसले यांचे फर्जंद शहाजी संभजी यांचे फर्जंदौमाजी याचे बहादूरजी.....’ सरचा हुकूम १२ डिसेंबर १६८९ चा आहे.
उमाजी शिवाय थोरल्या संभाजीराजांना सुरतसिंग आणि मातोजी असे आणखी दोन पुत्र असल्याचे पुरावे कानडी साधनात मिळतात.मराठी साधनात मात्र यांचे उल्लेख नाहीत.
उमाजी या एकाच थोरल्या संभाजीपुत्राचा महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंध आला, त्यांची शाखा महाराष्ट्रार विस्तारली म्हणून त्याची काही माहिती मराठयांच्या इतिहासात मिळते.थोरल्या संभाजीराजांची पत्नी जयंतीबाई यांचेच दुसरे नाव मकाऊ होते असा *गैरसमज* काही इतिहासकारांच्या लेखनामुळे रुढ झालेला आहे.
ऐतिहासिक वंशावळी मध्ये देखील मकाऊ या थोरल्या संभाजीराजांची पत्नी असल्याचा उल्लेख येतो.
ही वंशावळ इनाम कनिशन पुढे ग्राह्य ठरलेली आहे. वास्तवात गोष्ट अशी की, जयंतीबाई या विवाहानंतर थोरल्या संभाजीराजांच्या बरोबर कर्नाटकात कोलारप्रांती गेल्या त्या अखेरपर्यंत तिकडेच होत्या.
थोरल्या संभाजीराजांच्या मृत्यु नंतर देखील कोलार तालुक्यात जयंतीबाईंनी केलेल्या दान व बक्षिसाचे पुरावे ही बाब सिद्ध करतात.
जयंतीबाईंनी दान केल्याचा अखेरचा शिलालेख हा इ.स.१६९३ चा आहे. म्हणजेच जयंतीबाई या १६९३ पर्यंत हयात होत्या व त्या कर्नाटकात वास्तव्य करून होत्या हे ठामपणाने सांगता येते.
दुसरी गोष्ट म्हणजे मकाऊ भोसले या इ.स १७४० पर्यंत जिंतीचा कारभार करताना दिसतात.
त्यांची समाधी देखील जिंती या गावी आहे. यावरून जयंतीबाई व मकाऊ या दोघी एक नव्हेत हे सिद्ध होते
सासू आणि सून यांची बखरकारांनी गल्लत केलेली आहे. मकाऊ या थोरलेसंभाजीराजे यांचे पुत्र उमाजी भोसले याचीं पत्नी होत्या. यांस बहादूरजी नावाचा पुत्र होता,
परंतु त्याच्यानंतर मकाऊने भांबोरेकर भोसले घराण्यातील परसोजी हा दत्तक घेतला.
हे परसोजी म्हणजे शहाजीराजांचे चुलतभाऊ परसोजी यांचा पणतू, यांच्यापासून जिंतीकर बोसले घराण्याचा वंश पुढे वाढला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू थोरलेसंभाजीराजे यांच्या महाराष्ट्रात वाढलेल्या वंशाचा इतिहास असा आहे. भोसले घराण्याची जी पाटीलकीची गावे वंश परंपरागत आलेली होती त्यापैकी जिंती हे एक होते. बादशाही कागदपत्रात मकाऊचा उल्लेख मकुबाई पाटलीण जिंतीकर असा येतो. नात्याने मकुबाई शाहू महाराजांच्या चुलत चुलती लागत होत्या, त्यांचा स्नेह शाहू दप्तरातील कागद पत्रांतून वारंवार दृष्टीस पडतो.
शाहूनी वेळोवेळी आपल्या या चुलतीचा परामर्ष घेतल्याचे दिसते.मकाऊस काही अडचण आल्यास ती निवारण करण्याचे आदेश शाहूनीे आपल्या कमाविस दारास दिलेले दिसतात. शाहूछत्रपती मोगलांचे कैदेत असताना छत्रपती राजारामांनी मकाऊस धनाजी जाधवाकडून एक गाव दिल्याची नोंद ताराबाईकालीन कागदपत्रात सापडते.
इ.स.१७३० च्या सुमारास मोगलांचा करमाळा येथील बंडखोर सरदार राजा रावरंभा निंबाळकर याने जिंती गावास व मकाऊस काही उपद्रव केला.
त्या वेळी बादशहाने निंबाळकरास मकाऊस उपद्रव न करण्याची तंबी दिल्याचे पत्र जिंती दप्तरात पहावयास मिळते.

शिवशाहीतील  -जिंतीकर भोसले

इ.स.१७४० पर्यंत शाहू दप्तरात मकाऊचे उल्लेख सापडतात. आपल्याया आदर्श कारभाराने मकाऊ देवत्वास पोहोचल्या.
आज जिंती गावात त्यांचा उल्लेख मकाई असा केला हातो. ग्रामस्थ तिला देवी मानतात व दरवर्षी त्यांची जत्रा भरते.
थोरले संभाजीराजे सोलापूर, पुणे जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणाऱ्या जिंती गावात आजही मकाऊचा चार बुरुजांनी युक्त असा वाडा आहे,त्यात थोरल्या संभाजीराजांच्या या शाखेचे विद्यमान वंशज राहतात.
वाडयाच्या तटाची बरीच पडझड झालेली आहे, परंतु सतराव्या शतकातील वैशिष्टये दाखविणारे महाद्वार अजून चांगल्या अवस्थेत आहे.

चिरेबंदी असणार्याय या महाद्वारावर वरच्या बाजूल लाकडातंच सुबक अशी गणेशपट्टी कोरलेली आहे. या मधील गजानन हा ऋद्धीसिद्धी सहित असून उजव्या सोंडेचा आहे. बाजूला दोन्हीकडे सुबक अशी वेलबुट्टी कोरलेली आहे. गणेशपट्टीच्या वर असणारा भाग हा पातळ विटांत बांधलेला असून विटांमध्ये नक्षीकाम केलेले आहे.
वाडयाच्या अंतर्भागात मोठी पडझड झालेली असून आतील सर्व बांधकाम काळाच्या ओघात नष्ट झालेले आहे. वाडयाच्या खालच्या भागात असणारे भुयार मात्र अगदी चांगल्या अवस्थेत आहे. याची उंची साधारणत: सात-साडेसात फूट एवढी आहे. याचे बांधकाम अगदी चिरेबंदी असे आहे. यात आत उतरण्यास दोन्ही बाजूंनी जिने आहेत. या भुयाराच्या भिंतीमध्ये कोनाडे काढलेले असून त्यामध्ये खजिन्यासाठी रांजण बसविलेले आहेत.
जिंती गावच्या शेजारी एका चौथार्याचवर या गावची पाटलीण मकूबाई भोसले जिंतीकर उपाख्य मकाईची एक छोटेखानी अशी समाधी आहे.
एवढीच आज या गावात मकाऊची स्मृती आहे.
गावातले आणि आसपासची काही बांधकामे सतराव्या शतकाची वैशिष्टये बाळगून आहेत.
मराठयांच्या इतिसात जिंती गाव आणि जिंतीकर भोसले घराणे यांची फारशी दखल घेतली गेलेली नाही, हे या ठिकाणी प्रकर्षाने जाणवते.
श्रीशिवछत्रपतींचे थोरले बंधू थोरलेसंभाजीराजे हे आदिलशाही मनसबदार होते. कर्नाटकात शहाजीराजांचे व त्यांचे वास्तव्य हे एखाद्या स्वतंत्र राजासारखे होते,
परंतु काळओघात महाराष्ट्रात ही शाखा असूनदेखील ती आज अशी अज्ञातात आहे.
जिंती गावात आजदेखील मकाऊसाहेबांचा चार बुरुजांनी युक्त असा वाडा आहे. वाड्याच्या तटाची बरीच पडझड झाली आहे. परंतु १७व्या शतकातील वैशिष्ट्ये दाखवणारा महाद्वार अजून देखील चांगल्या अवस्थेत आहे. थोरल्या संभाजी महाराजांचे सध्याचे वंशज 'राजेभोसले' ह्या वाड्यात राहतात.
____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498 ☜♡☞
🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🥇
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            ጦඹիiᎢi

गुरुवार, एप्रिल २९, २०२१

छ. शिवाजी महाराज व शाह शरीफ दर्गा

छ. शिवाजी महाराज व शाह शरीफ दर्गा

छ. शिवाजी महाराज व शाह शरीफ दर्गा  


दि. २९ एप्रिल २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3gNDfyg
ही गोष्ट कदाचित तुमच्या ही कानी पडली असेल कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याचा अहमदनगर मधील ‘शाह शरीफ’ दर्ग्याशी संबंध आहे. चला जाणून घेऊया काय आहे हा संबंध…!छत्रपती शिवाजी महाराजांची जी वंशावळ उपलब्ध आहे ती सुरु होते बाबाजी भोसले यांच्यापासून. त्यांचा जन्म १५३३ सालचा. त्यांनामालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले हे दोन पुत्र! त्यापैकी मालोजी राजे यांचे पुत्र म्हणजे- शहाजी राजे आणि शरीफजी राजे.      

छ. शिवाजी महाराज व शाह शरीफ दर्गा
        

आता हा प्रश्न अनेकांना पडतो की, मालोजी राजांच्या दोन्ही पुत्रांच्या नावामध्ये मुसलमानीनावांचा प्रभाव डोकावतो. असे का?तर या मागे एक कथा सांगितली जाते.त्याचं झालं असं की, मालोजी राजांना मुल होतं नव्हतं. तेव्हा अहमदनगर मधील शाह शरीफ दर्ग्याची ख्याती मालोजींच्या कानी आली. या दर्ग्यात जे काही चांगल्या मनाने मागालं ते पूर्ण होतेच अशी भाविकांमध्ये श्रद्धा होती. त्यानुसार मालोजी राजांनी संतान प्राप्तीसाठी दर्ग्यात नवस म्हटला आणि नवस पूर्ण झाल्यास होणाऱ्या मुलाला ‘तुझे’ नाव देईन असा शब्द दिला.  पण पुढे मालोजींना दोन पुत्र झाले. दिलेल्या वचनाला जागले पाहिजे या भावनेतून मालोजी राजांनी दर्ग्याच्या नावातील ‘शाह’ या शब्दावरून एका मुलाचे नाव ‘शहाजी’ ठेवले आणि ‘शरीफ’ या शब्दावरून दुसऱ्या मुलाचे ‘शरीफजी’ असे नामकरण केले. तसेच या निमित्ताने दर्ग्यावर रोज नगाऱ्याची नौबत वाजवण्याची प्रथा सुरु केली.
पुढे जेव्हा औरंगजेब दक्षिणेत उतरला होता, तेव्हा नगरात असताना एके दिवशी सकाळी ही नौबत त्याच्याकानी पडली. आपल्या धर्मासमोर काफिरांचे वाद्य वाजवणे पाहून त्याला चीड आली त्याने ती नौबत बंद करवली. त्यानंतर शाह शरीफ यांनी औरंगजेबाच्या स्वप्नात जाऊन ‘तू माझी नौबत बंद करवलीस आतामी तुझी नौबत बंद करतो’ असे सांगितले आणि नंतर अहमदनगर मध्ये असतानाच औरंगजेबाचा मृत्यू झाला. अशी कथा स्थानिकांनध्ये प्रचलित आहे.आजही अहमदनगर मध्ये हा दर्गा पहावयास मिळतो. शाह शरीफच्या दर्ग्याचे जे विद्यमान मुजावर आहेत त्यांना या गोष्टीचा अभिमान आहे की या दर्ग्याचे महापराक्रमी भोसले घराण्याशी नाते आहे. आजही भोसले घराण्याकडून दर्ग्याला वर्षासन मिळते आणि भोसले घराण्यातील मंडळी येथे दर्शनासाठी येतात.तर या दर्ग्याच्या आशीर्वादाने मालोजी राजेंना झालेला शरीफजी हा पुत्र देखील शूर निपजला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498 ☜♡☞
🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🥇       
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

बुधवार, एप्रिल २८, २०२१

बाजीरावाना अजुन थोडे आयुष्य मिळायला हवे होते

बाजीरावाना अजुन थोडे आयुष्य मिळायला हवे होते

 बाजीरावाना अजुन थोडे आयुष्य मिळायला हवे होते 

फेसबुक लिंक http://bit.ly/3nu3Ph6
१७३७ डिसेंबरचा मध्य चिमाची आपांचे शाहू महाराजांना पत्र आले -
"रायाची पत्रे ४ रमजानची (१६ डिसेंबर) आली. नबाब (निजाम) भूपाळगडी कोंडला आहे. दाणावैरण बंद. असा समय त्यास कधी घडला नाही. अतिसंकटी पडला आहे. त्याचे साहीत्यास औरंगाबादची फौज येणार ती तिकडे गोवून पडावी म्हणजे नबाबाचा पाडाव ऊत्तम होतो. ३ रमजानी एक युद्ध झाले. दुसरे कालही एक जाले. बरासा तमाशा नबाबाने पाहीला. महाराजांचे प्रतापे नबाबावर सलाबत चढली. करोलचा मारा देत आहो. मोगलांचा आरगानरगा (पूर्ण वेढा) केला आहे. दाणा, गल्ला, वैरण, काडी कूल बाद झाली आहे. बंगसाचीच गत यास जाली आहे. स्वामींच्या आशिर्वादे निजाम या ठिकाणी बुडत आहे. अगर सुटका झाली तरी उत्तमच होईल. किल्लेबंद झाल्यामुळे अब्रू राहीली नाही.
"
आधी फेब्रुवारी १७२९ मध्ये पालखेडवरती निजामाला धूळ चारली. तब्बल १० वर्षांनी पुन्हा निजामाला जेरबंद करुन त्याची अब्रू घालवली. निजाम बुडला तरी ठिक नाही बुडला तर त्याची जीवघेणी मानखंडना झाली आहे असे चिमाजी अप्पा म्हणतात. तब्बल तीन आठवडे निजामाचा कोंडमारा केला. निजामाच्या सैन्याला भोपाळच्या किल्यात आश्रय घ्यावा लागला. निजामा जवळ तोफा होत्या आणि भोपाळ तलावाचे नाले दरम्यान होते म्हणून मराठे जास्त सलगी करु शकत नव्हते. अन्यथा निजामाचा बेडा पार व्हायचाच. जवळचे धान्य संपल्याने निजामाच्या सैन्याने चक्क जनावरे फाडून खायला सुरुवात केली. निजामाच्या सैन्याचे ठिक होते पण बाजीरावांविरुद्ध निजामाच्या मदतीला आलेले रजपूत शाकाहारी अन्नाविना उपाशी तडफडू लागले. दुर्बुद्धी झाली आणि निजामाच्या कच्छपी लागलो असे त्यांना वाटू लागले. अखेर ७ जानेवारी रोजी अपमानास्पद तहा वरती स्वाक्षर्‍या करुन निजामाला सुटका करुन घ्यावी लागली.
बाजीरावांना थोडे अधिकचे आयुष्य मिळाले असते तर कदाचित अटकेवरील झेंडे त्यांच्याच कारकिर्दित बघायला मिळाले असते. २८ एप्रिल १७४०, मध्य प्रदेशात खरगोण जिल्ह्यातील नर्मदा काठावरील रावेरखेडीे येथे उष्माघातामुळे आजारी पडून बाजीरावांचा मृत्यु झाला. आज त्यांची २७६वी पुण्यतीथी.Ⓜ


बाजीरावाना अजुन थोडे आयुष्य मिळायला हवे होते

छ. शिवाजी महाराजांचे चित्र

छ. शिवाजी महाराजांचे चित्र

छ. शिवाजी महाराजांचे चित्र 


फेसबुक लिंक http://bit.ly/3u0W4BN
सदर चित्र हे थोर इतिहास संशोधक आणि संपादक, द. ब. पारसनिसांचे सहकारी आणि ऐतिहासिक वस्तुंचे संग्राहक पुरुषोत्तम विश्राम मावजी यांच्या संग्रहातील असून मूळ चित्र मावजींच्या सातारा येथील संग्रहात होते. पुढे मावजींनी ते मुंबईच्या तत्कालीन 'प्रिन्स ऑफ वेल्स म्युझिअम' अथवा सध्याच्या 'छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया'ला भेट म्हणून दिले.
काही वर्षापूर्वीपर्यंत सदर चित्र हे दर्शनी पहावयास ठेवले होते. परंतू या चित्राच्या सद्य स्थितीतील अवस्थेतून पुनर्जिवित करण्याच्या हेतूने ते सध्या प्रदर्शनास नाही. सदर चित्राच्या कॉपीज्‌ संग्रहालयाच्या विक्रिकक्षात मूल्य रु ५० ला विक्रिसाठी उपलब्ध आहेत.
सदर चित्र दख्खनी चित्रशैलीतील असून महाराजांच्या उजव्या हातात फिरंग / धोप जातीची सरळ पात्याची तलवार आणि डाव्या हातात पट्टा आहे. कमारेला शेल्यात कट्यार खोवलेली असून वर्ण सावळा दाखवला आहे. एकंदरित चित्रशैली पाहताना हे चित्र समकालीन असण्याची दाट शक्यता आहे. चित्रकाराचे नाव उपलब्ध नाही. चित्रकाराने आपली जान चित्रात आोतलेली असुन सर्वांगसुंदर हे चित्र आहे.

छ. शिवाजी महाराजांचे चित्र

पाथर्डीतले सातवाहन कालीन रांजण!

पाथर्डीतले सातवाहन कालीन रांजण!

पाथर्डीतले सातवाहन कालीन रांजण ! 

फेसबुक लिंक http://bit.ly/3gKukxF
नाशिकमधील पांडवलेणी येथील अनेक शिलालेखांमध्ये व्यापाऱ्यांनी दान दिल्याचा उल्लेख आहे, तसेच पूर्व महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी कल्याण-कसारा-नाशिक हा व्यापारी मार्ग प्रसिद्ध होता.

पाथर्डीतले सातवाहन कालीन रांजण !

गोवर्धन व अंजनेरी ही प्रसिद्ध बाजारपेठ होती, या इतिहासाला भक्कम दुजोरा ‌देणारे सातवाहनकालीन दगडी तीन रांजण पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या पाथर्डी गावात आढळले आहेत. व्यापारासाठी या मार्गाचा वापर करणारे व्यापारी या रांजणांत ठरवून दिलेला कर टाकत असत. या अनोख्या दगडी रांजणांमुळे व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास समोर येणार आहे.
सातवाहन राजे हे महाराष्ट्राचे पहिले राजे म्हणून ओळखले जातात. साधारण इसवी सनापूर्वी २०० सालातल्या कालखंडात महाराष्ट्र समृद्धीच्या शिखरावर होता. त्याच्या खाणाखुणा इ. स. ७०० पर्यंत नाशिकच्या पांडवलेणीत पाहायला मिळतात.
जगभरातील व्यापारी कल्याण बंदरावर आपला माल घेऊन उतरत. त्यानंतर हा माल सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान (आताचे पैठण), उपराजधानी जीर्णनगर (आताचे जुन्नर), तसेच सातवाहनांच्या अधिपत्याखाली असलेल्या नाशिकच्या मुख्य बाजारपेठेत म्हणजे गोवर्धन (गोवर्धन आता बाजारपेठ नाही.) येथे व्यापारी हा माल घेऊन येत. कल्याण-नाणे घाट-जुन्नर-नगर-
पैठण हा महाराष्ट्रातील प्राचीन व्यापारी मार्ग होता. त्यामुळे या मार्गावरील जुन्नरची बाजारपेठ तेव्हापासूनच प्रसिद्ध होती. त्या काळी पूर्व महाराष्ट्रात जाण्यासाठी कल्याण-कसारा-नाशिक या मार्गाला व्यापारी पसंती देत. त्यामुळेच या मार्गावर त्रिंगलवाडी लेणी, पांडवलेणी (त्रिरश्मी लेणी) व अंजनेरी लेणी निर्माण झाल्या. डोंगराळ भागातून येणाऱ्या या व्यापारी मार्गाचे संरक्षण व्हावे, तसेच लूटमारीपासून बचाव व्हावा म्हणून या मार्गावर किल्ल्यांची निर्मितीही झाल्याचे दिसते. कावनई किल्ला, ‌त्रिंगलवाडी किल्ला, अंजनेरी किल्ला, ब्रह्मगिरी किल्ला याचीच उदाहरणे आहेत.Ⓜ

अंजनेरीची बाजारपेठही सातवाहनांच्या काळात प्रसिद्ध बाजारपेठ होती. या बाजारपेठेत येण्यासाठी व्यापाऱ्यांवर कर आकारणी केली जाई. त्या बदल्यात व्यापाऱ्यांना स्थानिक बाजारपेठेत व्यवसाय करता येई, तसेच त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी स्थानिक राजा घेत असे. त्याच्या पाऊलखुणा यापूर्वी नाशिकमध्ये उजेडात आल्या नव्हत्या. त्यामुळे नाशिकमार्गे महाराष्ट्रात इतरत्र जाणाऱ्या व्यापाऱ्यांवर कर आकारणी होत होती का, याचे उत्तर मिळत नव्हते. मात्र, पाथर्डीत कर आकारणी करण्यासाठी महत्त्वाचे असलेले दगडी रांजण मिळाल्याने कल्याण-कसारा-नाशिक या मार्गे नाशिकमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही कर द्यावा लागत असे, हे आता स्पष्ट झाले आहे. या रांजणांमुळे सातवाहनकालीन व्यापारावर नव्याने प्रकाश पडणार आहे.
लेण्यांसाठी व्यापाऱ्यांकडून दान पांडवलेणी, अंजनेरी लेणी, तसेच जैन मंदिरांसाठी व्यापाऱ्यांनी दान दिल्याची अनेक उदाहरणे शिलालेखाच्या माध्यमातून लक्षात येतात. विदेशी बनावटची भांडी व काचेच्या वस्तू नाशिकमध्ये आढळल्या आहेत. जुनी नाणी, सोन्याच्या मोहराही व्यापारी मुक्त हस्ताने दान करीत असत. त्यामुळे नाशिकमध्ये बौद्ध लेणींची सातवाहन काळात भरभराट झाल्याचे दिसते.

ठेवा व्हावा संरक्षित!
पाथर्डीत सापडलेले दगडी रांजण चार फूट व्यासाचे आणि पाच फूट उंचीचे आहेत. हे रांजण पूर्वी जकातीसाठी वापरले जात असत. जकात कर रूपाने यात तत्कालीन ‘कर्षापण’ नावाची नाणी टाकली जात असत. पाथर्डीतील तीन रांजणांपैकी एक अजूनही सुस्थितीत आहे, तर दोन रांजण काहीअंशी जमिनीत गाडले गेलेले आहेत. आता हा अनमोल ठेवा सुरक्षित ठिकाणी हलवून त्याचे संवर्धन करण्याची गरज आहे.Ⓜ

__________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
__________________________

बुधवार, एप्रिल २१, २०२१

मिर्झाराजे जयसिंग छत्री. बुरहानपुर, मध्यप्रदेश

मिर्झाराजे जयसिंग छत्री. बुरहानपुर, मध्यप्रदेश


 मिर्झाराजे जयसिंग छत्री. बुरहानपुर, मध्यप्रदेश.

 

फेसबुक लिंक http://bit.ly/3en7AAU
       शिवकालीन इतिहासामधे पुरंदरच्या तहामुळे मराठ्यांच्या इतिहासामधे वारंवार उल्लेख येतो तो मिर्झाराजे जयसिंग यांचा. मिर्झाराजे हे मोगल बादशहा औरंगजेबाचे सरदार होते. त्यांना शिवाजी महाराजांच्या मोहीमेवर पाठवले होते.......
      हे जयपुरचे राजपुत (कछवाह) घराणे तीन चार पिढ्यां मोगलांशी घरोबा करुन आणि इमान राखुन होते. अकबर बादशहाच्या दरबारातील प्रसिध्द राजा मानसिंग हे जयसिंगाचे आज़ोबा होय.
शहाजहानच्या काळात शहजादा शहाशुजाबरोबर ते अफघानिस्तानच्या मोहीमेत सहभागी होते.काबुल कंदहारच्या परिसरावर विजय मिळवुन तेथील सुभेदारी ही जयसिंग यांना मिळाली होती.....
      हा पराक्रमी योध्दा सात हजारी मनसबदार झाला.मोगल दरबारातील रितीरिवाज आणि शिष्ठाचारात मिर्झाराजे पारंगत होते. उर्दु, तुर्की आणि फारसी भाषांचे  ते उत्तम जाणकार होते. औरंगजेबाने साजशृंगारीत घोडा, हत्ती,मोत्यांची माळ आणि मिर्झाराजा ही पदवी बहाल केली.हा मान फक्त शहजादे यांनाच मिळत असे. एवढा मान मरतब मिळवणाऱ्या रणधुरंधर,युद्ध कुशल सेनानीला दख्खन जिंकण्यासाठी आणि मराठयांचे राज्य आणि राजा यांचा बिमोड करण्यासाठी पाठविण्यात आले.

मिर्झाराजे जयसिंग छत्री

      माझ्याजागी मी तुम्हाला दख्खनेत पाठवित आहे असा संदेश औरंगजेबाने मिर्झाराजांना दिला होता. एवढे निष्ठावान मिर्झाराजे जयसिंग असूनही औरंगजेब बादशहाच्या मनात संशय होताच. एवढी मोठी युद्ध सामग्री,प्रचंड सेनासागर आणि मोठा खजीना एका युद्धकुशल हिंदू सेनापती बरोबर पाठवणे धोक्याचे ठरेल. जर हिंदू म्हणून दोघेही एकत्र आले तर मोगलांच्या साम्राज्याला धक्का बसेल. औरंगजेबाने आपल्या बापावर, भावांवर, बहीणीवर आणि मुलांवर विश्वास ठेवला नव्हता तो परक्यावर कसा ठेवील.म्हणून औरंगजेबाने मिर्झाराजेवर अंकुश ठेवण्यासाठी दिलेरखानाला सोबतीला पाठवल होते.......
    दक्षिणेतील कामगिरीत पुर्णपणे यश मिळवता आले नाही. पण शिवाजी महाराजांना काहीसा आवर घालण्यात त्यांना यश आले.......... पुढे महाराज औरंगजेबाला भेटण्यासाठी आगऱ्याला गेले.......... नजर कैदेत अडकले....... आणि त्यातून निसटून राजगडावर परतले......
    औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंगाला परत बोलावून घेतले.बुरहानपुरला येताना हातनूरजवळ ते आजारी पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यु झाला......मिर्झाराजे विषप्रयोगाने मृत्यु पावले असा संशय त्यांचा मुलगा कीरतसिंह याला आला.हा विषप्रयोग त्यांचा मुंशी उदयराज याने औरंगजेबाच्या सांगण्यावरुन केला या संशयावरून त्याने उदयराजची सर्व मालमत्ता जप्त करुन त्याला ठार मारण्यासाठी निघाला. पण उदयराज मुन्शी सावध होवून निसटला आणि त्याने बुरहानपुरच्या सुभेदाराच्या घरात आश्रय घेतला....
     आपल्या वडीलांच्या खुन्याला सोडणार नाही ही भुमिका कीरतसिंगाने घेतली. एक चमत्कार झाला आणि मिर्झाराजे जयसिंग यांचा मुन्शी उदयराज दोन दिवसांनी सुभेदाराच्या घरातून बाहेर पडला.उदयराजने मुस्लिम धर्म स्विकारल्यामुळे किरतसिंगाला काही करता आले नाही......
     मिर्झाराजांची छत्री बुरहानपुर येथे बांधण्याची औरंगजेबाची आज्ञा झाली. तापी आणि मोहना नदीच्या संगमावर बोहरडा गावाजवळ ही छत्री बांधण्यात आली. उंच चौथऱ्यावर ३६ स्तंभाची ही छत्री वरील घुमटांमुळे दूर वरुनही लक्ष वेधून घेते. तसेच जयपुर जवळील आमेर किल्ल्याच्या पायथ्यालाही राजपरिवारातील छत्र्यामधेही मिर्झाराजे यांची छत्री आहे. आयुष्यभर मोगलांची प्रामाणिक पणे सेवा करुन त्यांची झालेली मृत्युची कहानी मनाला चटका लावून जाते. म्हणून म्हणतात ' असंगाशी संग प्राणाशी गाठ '   जयपुर, जोधपुर आणि मेवाड एकत्र आले असते तर देशाचा इतिहास आणि भुगोल आज वेगळा असता. अर्थात त्यासाठी युगपुरुष जन्माला यावा लागतो.....               
  -प्रमोद मारुती मांडे ♏

मंगळवार, एप्रिल १३, २०२१

महाराजांचे अस्सल रेखाचित्र शोधून काढणारे भीष्माचार्य इतिहासकार : वासुदेव सीताराम बेंद्रे

महाराजांचे अस्सल रेखाचित्र शोधून काढणारे भीष्माचार्य इतिहासकार : वासुदेव सीताराम बेंद्रे

महाराजांचे अस्सल रेखाचित्र शोधून काढणारे भीष्माचार्य इतिहासकार : वासुदेव सीताराम बेंद्रे 


दि. १३ एप्रिल २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3wZwb7F
फ्रान्सच्या पॅरिस मध्ये असणाऱ्या या चित्रमागची कथा अशी –Niccolao Manucci नावाचा एक इटालियन प्रवासी Veniceहुन आपल्याकडे आला. त्याने मुघलांच्या दरबारात असलेल्या चित्रकाराकडून (त्याचं नाव मीर मुहम्मद) जवळजवळ ५२ चित्र काढून घेतली. त्यासाठी त्याला भरपूर पैसे दिले. पण ती चित्र ही कल्पना करून काढलेली होती. त्यात शायिस्तेखानाच्या आणि महाराजांच्या चित्रात थोडा फार फरक! अशा प्रतीचं ते चित्र होतं. Venice च्या Senate ने ते (Manucci ने लिहिलेल्या manuscript सोबत) publish करावं अशी त्याची इच्छा होती.

महाराजांचे अस्सल रेखाचित्र शोधून काढणारे भीष्माचार्य इतिहासकार : वासुदेव सीताराम बेंद्रे

पण त्याआधीच नेपोलियनने Venice ला असलेलं सगळं लुटून त्याच्यासोबत नेलं, त्यात manuscript मात्र नव्हती. पुढे तेच चित्र पॅरिसच्या Musée Guimet येथे ठेवण्यात आलं!
वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी शोधून काढलेल्या चित्राची खासियत अशी की ते “रेखाचित्र” हे त्या आर्टिस्ट ने प्रत्यक्ष महाराजांना बघून काढलेलं होतं!           

महाराजांनी सुरत १६६४ आणि १६७० अशी दोन वेळा लुटली. त्यापैकी १६६४ सालच्या स्वारीच्या वेळी सुरतेला डच आरमार होतं. डच लोकांना एक सवय होती, ते महत्त्वाच्या व्यक्तींचं चित्र काढून घ्यायचे. त्यावेळी तिथे वॅलेंटाईन नावाचा गव्हर्नर होता. त्याने महाराजांचं वर्णन सुद्धा करून ठेवलेलं आहे. ते वर्णन आणि चित्रातले महाराज अगदी तंतोतंत जुळतात. बारीक मिशी, चेहऱ्यावरचं स्मितहास्य, धारदार नाक असं सगळं आपल्याला त्या चित्रात दिसून येतं. साधारणपणे १९४०च्या सुमारास बेंद्रे हेगला गेले. तिथेत्यांनी हे चित्र शोधून काढलं आणिते आपल्याकडे घेऊन आले. त्यांनी १९७२ साली शिवचरित्र दोन volumes मध्ये प्रकाशित केलं. त्यात हे चित्र छापलेलं आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट.हे जगातलं महाराजांचं पहिलं असं चित्र आहे की जे चित्रावरून काढलेलं नाही, महाराजांना प्रत्यक्ष बघून काढलेलं आहे! हे बेंद्र्यांचं एक मोठं काँट्रीब्युशन आहे.
बेंद्र्यांनी लंडनमधे ठेवलेल्याजगदंबा तलवारीचाही शोध लावला. आज जी भवानी तलवार म्हणून आपण वाचतो, ऐकतो. ती जगदंबा तलवार आहे. तसेच शिवाजी महाराजांचे आजोबा, शहाजी राजांचे वडील मालोजीराजे यांची जी ईंदापूरला समाधी आहे ती बेंद्र्यांनीच शोधून काढली आहे. ती जेव्हा त्यांनी शोधून काढली तेव्हा तिचा दर्गा झाला होता. इतकच नव्हे तर कोरेगावला भीमा नदीच्या काठी जी संभाजी महाराजांची समाधी आहे तिचा शोधदेखील बेंद्र्यांनीच लावला आहे. केवढं मोठं हे त्यांचं योगदान होतं याचा विचार करा.
महाराजांचे अस्सल रेखाचित्र शोधून काढणारे भीष्माचार्य इतिहासकार : वासुदेव सीताराम बेंद्रे

संभाजी महाराजांचं जे चरित्र बखरींमधून रंगवण्यात आलंय ते सुधारण्याचं कामसुद्धा बेंद्र्यांनी केलं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे त्यांना गुरुस्थानी मानतात. त्यांनी ईंग्रजीतूनदेखील पुस्तके लिहिली. संत तुकारामांची “मंत्रगीता” सुद्धा त्यांनी संपादित केली. “साधन चिकित्सा” नावाचा त्यांचा ग्रंथ हा इतिहास संशोधकांमध्ये प्रसिद्ध आहे. त्यांचं एवढं मोठं योगदान असूनही स्वातंत्र्यानंतरसुद्धा त्यांना हवा तसा मानसन्मान आणि ओळख मिळाली नाही.
शिवचरित्र लिहून काढण्यामागे यशवंतराव चव्हाण यांचा आग्रह हे प्रमुख कारण आहे असं स्वत: बेंद्र्यांचं म्हणणं होतं. शिवकाळाचा अभ्यास करण्यात ३० – ४०वर्षे खर्च करून देखील केलेले संशोधन हे लोकांपुढे येऊ शकले नाही याची खंत बेंद्र्यांना होती.त्यांनी तुकारामांचं चरित्र प्रकाशित करण्यासाठी चव्हाणांनासंपर्क केला. जेव्हा यशवंतरावांना कळलं कि ह्या माणसाने शिवकाळाचा इतका सखोल अभ्यास केलाय तेव्हा त्यांनी आधी शिवचरित्र लिहून पूर्ण करा असा तगादा त्यांच्यामागे लावला.
जवळजवळ अडीच तास त्यांची समजूत काढल्यानंतर बेंद्रेतयार झाले. महाराष्ट्रावर खूप मोठे उपकार त्यांनी केले. असं म्हणण्याचं कारण असं की, त्याआधी ज्या काही १६ बखरी reference म्हणून इतिहासकार वापरत होते त्या फार विश्वासार्ह नव्हत्या.

हे कुण्या सामान्य माणसालाही लक्षात येईल. बेंद्र्यांनी डच, ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज यांच्या दप्तरात उपलब्ध असलेली कागदपत्र शिवायनिजामशाही, कुतुबशाही, तुर्क यांचे records या सर्वांचा सखोल अभ्यास करून शिवचरित्र पूर्ण केलं. इतिहासाचे लेखन कसे करतात याचा नवीन पायंडा त्यांनी पडून दिला. महाराज, संभाजी महाराज यांची प्रतिमा काहीतरी भलतीच करून जातीपातीत फूट पाडून काहीही पुरावे, संदर्भ न देता इतिहासावर पुस्तके लिहिणाऱ्या लेखकांच्या आजच्या काळात वा.सि. बेंद्रे यांच्यासारख्या ऋषितुल्य इतिहासकाराचे आपण ऋणी असलं पाहिजे.
____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498☜♡☞
➰ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव  ➰
______________________________

सोमवार, एप्रिल ०५, २०२१

गुढीपाडवा व संभाजीराजेंचा संबध दाखवुन बोंब मारणारया नतद्रष्टानो हा घ्या पुरावा

गुढीपाडवा व संभाजीराजेंचा संबध दाखवुन बोंब मारणारया नतद्रष्टानो हा घ्या पुरावा

गुढीपाडवा व संभाजीराजेंचा संबध दाखवुन बोंब मारणारया नतद्रष्टानो हा घ्या पुरावा
-
  

 छत्रपती संभाजीराजे आणि गुढीपाडवा : “खरा” इतिहास  


दि ५ एप्रिल २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3wAFQ4n
    गुढीपाडवा जवळ आला की उठणारी आवई म्हणजे “छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू हा मनुस्मृतीनुसार झाला, आणि राजांच्या हत्येच्या आनंदात ब्राह्मणांनी गुढ्या उभारण्यास सुरुवात केली. त्यामूळे गुढीपाडवा हा ब्राह्मणांचा सण साजरा करू नये” ही !_
व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसारख्या सोशल मिडीया साईट्स आणि अ‍ॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून पद्धतशीरपणे तरुणांची माथी भडकवण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत. अशातच, ज्यांना सत्य काय माहित नसते अशांना या सगळ्या गोष्टी खऱ्या वाटू लागतात आणि समाजात आणखी तेढ निर्माण होते.

छत्रपती संभाजीराजे आणि गुढीपाडवा : “खरा” इतिहास

❗पण – गुढीपाडव्याचे उल्लेख शंभूराजांच्या मृत्यूपूर्वीच्या अनेक ऐतिहासिक कागदपत्रात असल्याने असल्या गैरप्रचाराला बळी पडण्यास काही कारण आहे असं वाटत नाही.

गुढीपाडव्याचे १६८९ पूर्वीचे उल्लेख आपण पाहूया
🔹पुरावा १) शिवचरित्र साहित्य खंड १ या पुस्तकात पृ ५९ ते ६५ वर लेखांक ४१ म्हणून एक जुना महजर दिला आहे. महजर म्हणजे न्यायाधिशाचे अंतिम लिखित मत ! हा महजर मार्गशीर्ष शुद्ध १ विरोधीनाम संवत्सर शके १५७१ अथवा सुहूर सन खमसेन अलफ म्हणजेच दि. २४ नोव्हेंबर १६४९ रोजीचा असून सदर महजरात “गुढीयाचा पाडवा”असा स्पष्ट उल्लेख आहे.
म्हणजे पाडव्याला गुढ्या उभारत असत हे स्पष्ट दिसते.

🔹पुरावा २) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २० (जुना खंड) या पुस्तकात पृ २३४ ते २३८ वर लेखांक १७६ म्हणून एक निवाडपत्र दिले आहे. सदर गृहस्थाला निवाड्यासाठी काही पुरावे म्हणून दाखवायला सांगितले असता त्याने दिलेल्या कागदपत्रातील संबंधीत मजकूर असा –
शके १५५२ मध्ये कार्तिक पौर्णिमा ग्रामस्थ कसबे वाई याणी ग्रहण काळी कडत जोसी क॥ (कसबे) मजकूर यास प्रतिवर्षी पासोडी येक व गहू व ‘गुढीयाचे पाडव्यास’ कुडव येक देऊ म्हणोन पत्र लेहूँ दिल्हे यास वर्षे तागायत १४८ होतात.”

म्हणजे इ.स. १६३१-३२ मध्ये सुद्धा पाडव्याला गुढ्या उभारल्या जात असत हे येथे स्पष्ट होते.
🔹पुरावा ३)  श्री रामदासांची कविता खंड १ या पुस्तकात पृ ९६ वर समर्थ रामदासस्वामी श्रीराम रावणाचा वध करून पुन्हा महाराष्ट्रात आल्यावर महाराष्ट्रातील जनतेने ‘गुढ्या उभारल्या’ असे देतात-
ध्वजा त्या गुढ्या तोरणे उभविली ।
अर्थात “राम आल्यावर गुढ्या” इत्यादी विषय बाजूला ठेवला तरी समर्थांची समाधी ही संभाजीराजांच्या मृत्युपूर्वी किमान ८ वर्षे असल्याने आणि त्याही पूर्वी समर्थांनी हे काव्य रचल्याने “गुढ्या” या महाराष्ट्राला नविन नव्हत्या हे दिसते.एकूणच काय, हे सगळे स्पष्ट असताना आम्ही अजूनही अशा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवायचा का?

🔹पुरावा ४) शिवकालीन पत्रसारसंग्रह या पुस्तकात पृ ४७७ वर लेखांक १६२५ म्हणून एक नारायण शेणव्याचे मुंबईच्या गव्हर्नरला लिहीलेले चैत्र शुद्ध ८ शके १५९६ म्हणजेच दि. ४ एप्रिल १६७४ रोजीचे पत्र दिले आहे. या पत्रात नारायण शेणवी.
“निराजी पंडित पाडव्याकरीता आपल्या घरी आला” असा उल्लेख असून ऐन राज्याभिषेकाच्या दोन महिने आधी “पाडव्याचा सण” महत्वाचा होता असे दिसते.
✍बहुत काय लिहीणे? अगत्य असु द्यावे.

साभार: © लेखक (इतिहासाच्या पाऊलखुणा) आणि संचालक मंडळ (इतिहासाच्या पाऊलखुणा facebook group).
____________________________
WᕼᗩTᔕAᑭᑭ  9890875498 ☜♡☞

______________________________

गुरुवार, मार्च २५, २०२१

शत्रुच्या नजरेतून: छत्रपती संभाजी महाराज

शत्रुच्या नजरेतून: छत्रपती संभाजी महाराज

 शत्रुच्या नजरेतून: छत्रपती संभाजी महाराज 


दि. २५ मार्च २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3cjxiGC
स्वतः छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल्या लिखाणातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असंख्य पैलू आपल्यासमोर जसे उलगडतात त्याचप्रमाणे त्याकाळात त्यांनी अंगावर घेतलेले पोर्तुगीज, इंग्रज, मुघल इत्यादि शत्रू देखील महाराजांबद्द्ल नेमके काय लिहितात हे पाहिल्यास शंभूराजांची किती भीती या शत्रूंना वाटत होती याचे प्रत्यक्ष पुरावेच मिळतात.

शत्रुच्या नजरेतून: छत्रपती संभाजी महाराज

बलाढ्य आरमार असलेल्या पोर्तुगीजांवर शंभूराजांनी गोव्यात शिरून आक्रमण केले. या मोहिमेत स्वतः महाराज आघाडीवर लढत होते.

त्यांनी पोर्तुगीजाना इतका चोप दिला की पोर्तुगीज विजरईफ्रान्सिस्को द ताव्होर कोंद दे अल्व्होर याने २४ नोव्हेंबर १९८३ रोजी खानदानी पोर्तुगीज, पाद्री आणि अधिकारी यांची सभा बोलवली. या सभेत तो म्हणतो;
“चौलचा वेढा शत्रूने आवळला आहे. आता तर तो गोव्यात शिरला आहे. त्याने सगळीकडे लुटालूट आणि जाळपोळ सुरु केली आहे. अगदी चर्चेसनादेखील त्याने यातून सोडलेले नाही….” (मराठ्यांच्या इतिहासाची साधने: खंड तिसरा; लेखक:ए.बी.डी.ब्रागांस परेरा; गोवा पुरातत्व विभाग प्रमुख १९४०)
अवघ्या महिन्याभरातच जवळपास ३/४ गोवा काबीज करत शंभूराजे आणि मराठा सैन्याने इतकी धामधूम केली होती की; पोर्तुगीजांना चर्चमधले पाद्री आणि आपल्या कैदेतले गुन्हेगार सोडून त्यांनाही लढायला पाठवावे लागले होते असे समकालीन संदर्भ सांगतात. विशेष म्हणजे या मोहिमेनंतर पोर्तुगीजांना इतकी जरब बसली की; त्यांनी ‘छत्रपती संभाजी महाराज’ असा संपूर्ण बिरुदांसह पत्रांत उल्लेख करायला सुरुवात केली. यापूर्वी ते ‘संभाजीराजे’ असा उल्लेख करीत. हा बदल म्हणजे शंभूछत्रपतींच्या जरबेची साक्षचनव्हे काय!अशीच जरब स्वतः औरंगजेबलादेखील बसली होती.
“संभाजीला ठार वा कैद केल्याशिवाय डोक्यावर किमांश धारण करणार नाही आणि तलवार हातात उचलणार नाहीं असा पण त्याने केला आहे.”  असे कारवारकर इंग्रजांनीआपल्या पत्रात नमूद केले होते. (हिस्ट्री ऑफ औरंगजेब; लेखक: जदुनाथ सरकार)
फार कशाला?‘तारीख-ए-खाफीखान’ या आपल्या ग्रंथात महमद हशीम खाफीखान हा शंभूराजेंना ‘आपल्या वडिलांपेक्षाही दस पटीने अधिक तापदायक’ असे म्हणतो.खाफीखानाने तर अनेक ठिकाणी महाराजांचा उल्लेख ‘नरकवासी’ या विशेषणाने केला आहे. हे विशेषण मुघलांच्या वैफल्यातून आलेले आहे हे अर्थातच सांगायला नको. थोड्क्यात; हे संदर्भदेखील शंभूराजांच्या समशेरीच्या धाकाचे पुरावेच आहेत.स्वाभिमानाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे सुपुत्र. अत्यंत क्रूरतेने त्यांची हत्या औरंगजेबने केली. त्याच्यासाठी अशा हत्यांत नाविन्यपूर्ण असे काहीच नव्हते म्हणा! आपला भाऊ दारा शिकोह व शीखांचे नववे गुरु तेगबहादूरजी यांना तसेच त्यांच्या तीन शिष्यांनाही औरंगजेबने असेच निर्घृणपणे मारले होते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबच्या दरबारात उभे केल्यावरही ते मुळीच झुकले नाहीत.या घटनेचा औरंगजेबाच्या दरबारी असलेला आणि या प्रसंगाचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेला ईश्वरदास नागर म्हणतो;‘…….पण संभाजी हा गर्विष्ठ होता. त्याची अशी अवस्था झाली तरी त्याने बादशहाला ताजीम देण्यासाठी म्हणून यत्किंचितही मान लवविली नाही. इखलास खान आणि हमिदुद्दिन खान यांनी त्याला पुष्कळ समजावले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. बादशाहने आज्ञा केली की सिकंदरखानाच्या तंबूजवळ एक जागा ठरवून संभाजीला अशाच स्थितीत ठेवण्यात यावे. कवी कलश आणि त्याचे साथीदार यांच्यावर कडक नजर ठेवण्यात यावी. त्यांच्यापायात बेड्या ठोकण्यात याव्या. यानंतर दोन दिवसांनी बादशहाने रुहुल्लाखन यास खालील प्रमाणे आज्ञा केली.
“तुम्ही जाउन संभाजीपाशी चौकशी करावी की तुझे खजिने, जडजवाहीर आणि इतर संपत्ती कुठे आहे?? तसेच बादशाही सरदारांपैकी कोण कोण तुझ्याशी पत्रव्यवहार करून संबंध ठेवीत होते.”
पण माणसाची जीविताची आशा सुटली कीतो मनात येईल ते बडबडत सुटतो. संभाजी हा गर्विष्ठ होता. त्याने बादशहा संबंधी घाणेरडे शब्द उच्चारले आणि त्यांची निंदानालस्ती केली. त्याने जे काही म्हटले ते रुहुल्लाखानाने बादशहाला सांगितले नाही. पण ते बोलणे कशाप्रकारचे होते याचा त्याने बादशाहाला इशारा दिला. यावर बादशाहने आज्ञा केली की, संभाजीच्या डोळ्यात सळई फिरवून त्याला ‘नवी दृष्टी’ द्यावी. (गरम लोखंडी सळईने डोळे फोडण्यात यावे.) त्याप्रमाणे करण्यात आले.
पण संभाजी गर्विष्ठ आणि स्वाभिमानी होता. त्याने त्या दिवसापासून जेवणखाण सोडले. त्याच्या पहारेक-यांनी त्याला अन्नसेवन करण्याबद्दल पुष्कळ सांगितले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.त्याला काही उपास घडले. शेवटी ही बातमी बादशाहाला कळवण्यात आली. संभाजीचे दिवस भरले होते. बादशाहाच्या आज्ञेनेत्याला वधस्तंभाकडे नेण्यात आले…….’
(फुतुहात-ए-आलमगिरी लेखक: ईश्वरदास नागर, अनुवाद: सेतुमाधवराव पगडी)

अन्य एक प्रत्यक्ष साक्षीदार असलेला साकी मुस्तैदखान यानेही ‘मासीर-ई-आलमगिरी’ या आपल्या ग्रंथात असेच वर्णन केले आहे. काझींनी काढलेला आणि उमरावांनी मंजूर केलेला मृत्यूच्या फतव्याची औरंगजेबने अंमलबजावणी केली असेही तो नमूद करतो. इतकेच नाही तर शंभूराजे आणि कवी कलश यांच्या शवांची जी विटंबना करण्यात आली त्याबद्दलही याच प्रत्यक्षदर्शींनी केलेले वर्णनवाचून अंगावर काटा येतो. फाल्गुन अमावस्येला हैन्दव स्वराज्याच्या (हा शब्दही शंभूराजांनीच नमूद केला आहे.)
गनिमांच्या देखता फ़ौजा। रणशूरांच्या फ़ुर्फ़ुरती भुजा।ऐसा पाहिजे की राजा । कैपक्षी परमार्थी ॥
राजा कसा असावा? याचे उत्तर देताना समर्थ रामदास स्वामी वरीलप्रमाणे वर्णन करतात. शत्रूला पाहताच ज्याचे बाहू स्फुरण पावतात असा राजा असावा. छत्रपती संभाजी महाराज हे असेच समरधुरंधर राजे होते.  उपलब्ध असलेले सर्व समकालीन कागदोपत्रीचे पुरावे सर्व बाजूंनी अभ्यासून मगच इतिहासाची मांडणी होवू शकते. त्यातही दोन्हीबाजूंचे असे पुरावे अभ्यासल्यास चित्र अधिक स्पष्ट होत जाते.
दुसऱ्या छत्रपतींची नृशंस हत्या केली गेली. मात्र यानंतरही शिवप्रभूंचे हे स्वराज्य झुंजत राहिले. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे महाराष्ट्र लढला. अखेरीस दक्खन मुठीत काबीज करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या औरंगजेबला याच महाराष्ट्राच्या मातीत मूठमाती घ्यावी लागली. नियतीचे खेळ असेच असतात!!
____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🥇माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
______________________________

बुधवार, फेब्रुवारी २४, २०२१

एका अलौकिक बलिदानाची आठवण

एका अलौकिक बलिदानाची आठवण

 एका अलौकिक बलिदानाची आठवण 



फेसबुक लिंक http://bit.ly/2ZNdC6U
'स्वराज्यावर वारंवार चालून येणाऱ्या बहलोलखानास गर्दीस मिळविल्याविना आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका' या निरोपामुळे उद्विग्न झालेल्या प्रतापराव गुजरांनी आपल्या सहाच सैनिकांनिशी (१) विसाजी बल्लाळ २) दिपाजी राउतराव ३) विठ्ठल पिलाजी अत्रे ४) कृष्णाजी भास्कर ५) सिद्धी हिलाल ६) विठोटजी ७) आणि खुद्द कडतोजी, उर्फ स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच “सरनौबत” प्रतापराव गुजर .) बहलोलखानाच्या चाळीस हजार फौजेवर चालून जाऊन स्वतःच्या प्राणाची आहूती दिली तो हा पुण्यदिवस.
दि. २४ फेब्रुवारी १६७४...
कुड्तोजी नावाच्या स्वाभिमानी मराठ्याने मोघलाई सहन न झाल्याने मोगलांशी आपल्या गावातून लढा देण्याचे ठरवले. प्रामुख्याने मुघल सैनिकांना विरोध करणे. गावातील स्त्रिया आणि गायींचे रक्षण करणे असा त्याचा कार्यक्रम असे.
एकदा मोगलांच्या खजिन्यावर एकाच वेळी दोन मराठी वाघांनी झेप घेतली शिकार तर झाली मात्र शिकारीवर हक्क कुणाचा यावर हातघाईवर आलेली बाब शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार सांगून मैत्रीत परावर्तित केली. हे दोन वाघ म्हणजे दस्तूरखुद्द शिवाजी महाराज आणि कडतोजी गुजर.
यावेळी शिवाजी महाराजांनी कुड्तोजी यांना स्वराज्याचा विचार दिला आणि कुड्तोजींनी आपलं इमान शिवाजींना अर्पण केलं.

पुढे कुड्तोजी स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच सरनौबत झाले. त्यांच्या पराक्रमाला साजेसे नाव (किताब) देऊन महाराजांनी त्यांचे प्रतापराव गुजर केले.
बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला.

एका अलौकिक बलिदानाची आठवण

मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरीस आणले. वेळ प्रसंग पाहून बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहेरबान झाला. युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाईधर्म सांगत होता. प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली. तो जीव वाचवून गेला.
शिवाजी महाराजांना खबर पोहोचली, “प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला!” आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली. त्या पत्रात एक वाक्य असं होतं की बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. त्याकाळी मावळ्यांचा शिवाजीमहाराजांवर असलेला जीव पाहता ही किती भयंकर शिक्षा सुनावल्या गेली होती हे लक्षात येईल.
महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी? हा एकच प्रश्न प्रतापरावांना दिवसरात्र सतावीत होता. जिवाची तगमग होत होती. सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले. सर्वत्र जासूद पाठवले. माग काढा ! फक्त माग काढा आणि सांगा कुठे आहे तो गनीम . त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही.
अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता. मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले. काही मैल गेल्या नंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे? तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे.
बस! प्रतापरावांना राग अनावर झाला. त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठवला सैन्याला स्वारीचे आदेश दिले. पण… पण… सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना थांबवल्या गेलं नाही. त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला.
अवघे सात मराठे सुमारे पंधरा हजारच्या सैन्यावर चढाई करतात. यात काय नाही? दुर्दम्य विश्वास , पराकोटीची स्वामीनिष्ठा सारं – सारं काही ! प्रतापरावंचं ठीक पण त्या सहांपैकी एकाचे ही पाय अडखळले नाहीत. केवळ मरणावर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णीम पराक्रम पर्व आहे.
प्रतापराव आणि सोबतचे सहा सरदार मरण पावले. महाराजांना अतीव दु:ख झाले. स्वराज्याची अपरिमित हानी झाली. मात्र शौर्याला एक नवं परिमाण लाभलं होतं. पराक्रमाला एक नवं कोंदण मिळाले होतं.
वेडात मराठे हे गीत पहिल्यांदा ऐकल्यावर अंगावर शहारा आला होता. हा काय प्रकार आहे याची कल्पना नव्हती. मग माग काढायला सुरवात केली. काही पुस्तके मिळवली आणि अधाश्यासारखी वाचून काढली. अनेकवर्षांपुर्वी वाचलेली ही शौर्य कथा वर दिली आहे.
प्रतापरावांसारख्या वरिष्ठ योध्याने असं वागायला नको होतं असं सर्वाचंच मत. पण प्रतापरावांची बनावट आणि शिवाजीमहाराजाचे शब्द यांचा परिपाक म्हणजे त्यांची ती कृती असावी असं मला वाटतं . महाराजांनी हरतऱ्हेने पारखून घेतलेले प्रतापराव मूर्ख असतील असं मला वाटत नाही. मुळात त्याकाळी शिवाजी महाराज होणे हा एक चमत्कार आहे असं म्हणायला अडचण वाटत नाही. एक उदाहरण घेऊया. लढाईत एकतर मारायचं किंवा मरायचं असे दोनच पर्याय मराठी शिपाई गड्याजवळ असायचे. तेथे शिवाजी महाराजांनी गनीमीकावा आणि यशस्वी माघार यांसारखे प्रकार रुजवले. येथे शिवाजी महाराजांची बुद्धिमत्ता दिसून येते.
महाराज कित्येकदा मराठ्यांना राजपुतांचा दाखला देत असत आणि म्हणत की राजपुत मरतात किंवा मारतात पण जिंकत नाहीत. रणात यश महत्त्वाचं आहे. माघार – पुढाकार नाही. वेळ पडली तर माघार घ्या पण लढाई जिंका. असं महाराजांचं तत्त्व. मात्र प्रत्येक मराठा शिपाईगडी हे पचवू शकला नव्हता. कदाचित आपले प्रतापरावसुद्धा याच प्रकारातले.
पण त्यांचे शौर्य आणि पराक्रम त्यामुळे कुठेच झाकोळला गेला नाही.
एका अलौकिक बलिदानाची आठवण

प्रतापराव आणि त्या  सहा वीरांना मानाचा मुजरा...
कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले. या प्रेरणादायी घटनेवरच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी लिहीलेल्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या कवितेने सर्व मराठीजनांच्या मनात कायमचे घर केले आहे.
_____________________________
म्यानातुनि उसळे तरवारीची पातं
वेडात मराठे वीर दौडले सात॥धृ.॥

श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥१॥

ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात!
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥२॥

वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पातं
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥३॥

जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥४॥

ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥५॥

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥६॥

खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥७॥

दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥८॥....

शनिवार, फेब्रुवारी १३, २०२१

एेतिहासिक मंगळवेढा

एेतिहासिक मंगळवेढा

  

   एेतिहासिक मंगळवेढा 


दि. १३ फेब्रुवारी   २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/2ZaIBcW
सोलापूर पासून ५० किमीवर सोलापूर-सांगली रस्त्यावरील मंगळवेढा हे तालुक्याचे ठिकाण आहे.चालुक्य,कलचुरी घराण्याची राजधानी काही काळ या ठिकाणी होती. विजापूरच्या आदिलशाहीच्या जवळीकीमुळे नेहमीच हे ठिकाण आदिलशाहाच्या काळात महत्वाचे होते. संत चोखामेळा, संत दामाजी या संतांच्या वास्तव्याने मंगळवेढा गाव पावन झालेले आहे. मंगळवेढा गावात आता किल्ल्याचे फ़ारच थोडे अवशेष उरलेले असले तरी, अनेक ऐतिहासिक प्राचीन अवशेष गावात विखुरलेले आहेत.मंगळवेढा प्राचीन काळी महामंडलेश्वर, मंगलवेष्टक अशा नावांनी प्रसिद्ध होते.मंगळवेढ्याचा इतिहास इसवी सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकापर्यंत पोचतो. दक्षिण भारतातील चालुक्य/राष्ट्रकुट यांच्या काळात भरभराटीला आलेले ते शहर. ते नंतर देवगिरीच्या यादवांकडे आले. तेथे बहामनी राजवट इसवी सनाच्या चौदाव्या शतकात सुरू झाली. राष्ट्रकुटांचे उत्तराधिकारी कलचुरी, त्यांच्या राज्यात मंगळवेढे हे राजधानीचे शहर होते. वीरशैव पंथाचे संस्थापक महात्मा बसवेश्वर हे कलचुरी राज्याचे मुख्य प्रधान होते. म्हसवड, तेर, अक्कलकोट येथील शिलालेखांतून कलचुरी राजसत्तेत महामंडलेश्वर राजधानी असल्याचे उल्लेख आलेले आहेत.नंतर, 1489 साली ते गेले विजापूरच्या आदिलशहाकडे. आदिलशहाची राजधानी विजापूर मंगळवेढ्याच्या जवळ आहे. इसवीसन १६६५ साली शिवाजी महाराज यांनी मिर्झाराजे जयसिंग यांचे सोबत आदिलशाही विरुध्द मोहिम काढली. त्यावेळी नेताजीने मंगळवेढा किल्ला जिंकला.

 हा किल्ला विजापूरच्या जवळ असल्याने तो ताब्यात ठेवणे अवघड असल्यामुळे मिर्झा राजे जयसिंहाने दिलेरखानाला किल्ला उध्वस्त करण्याची आज्ञा केली होती. पुढील काळात मंगळवेढे पुन्हा आदिलशहाच्या ताब्यात गेले. इसवीसन १६८५ मध्ये औरंगजेब बादशाहाच्या बक्षीने उध्वस्त झालेला मंगळवेढा किल्ला ताब्यात घेतला.मोगलांनी विजापूरची आदिलशाही १६८६ साली नष्ट केली आणि मंगळवेढा मोगलांच्या ताब्यात आले.मंगळवेढे गावापासून जवळच माचणूर येथे सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आणि माचणूर किल्ला भीमेच्या काठी आहे. याठिकाणी इसवीसन १६९५ ते १६९९ औरंगजेबाचा मुक्काम होता.त्यावेळी औरंगजेब मंगळवेढे येथील जुम्मा मशिदीत नमाज पढण्यासाठी येत असे.औरंगजेबाचा मृत्यू 1707 मध्ये झाला. त्यानंतर शाहूंच्या पश्चात, संस्थाने खालसा होईपर्यंत मंगळवेढा सांगलीच्या पटवर्धनांच्या ताब्यात होते.आताच्या स्थितीत उभी असलेली वास्तू म्हणजे किल्लेवजा गढी आहे.

 त्याला चार सुस्थितील मातीचे बुरुज आहेत. सध्या किल्ल्यात उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यालय आहे. किल्ल्याचा खंदक नष्ट झालेला आहे. किल्ल्यात एका कोपऱ्यात काही कोरलेल्या मूर्ती सप्त मातृकांची मुर्ती, गणपतीची मूर्ती पाहायला मिळतात.राजवाडे, धर्मस्थळे, तीर्थस्थळे यांचे भग्नावशेष मंगळवेढ्यात सर्वत्र विखुरलेले पाहण्यास मिळतात. त्यात कोरीव स्तंभ, भग्न मूर्ती, शिलालेख आहेत. 

शिवरायांचा मुक्काम सोलापूर जिल्ह्यात झाल्याची दाखवणारी एकमेव नोंद मंगळवेढे येथेच आहे. शिवरायांचा मुक्काम तेथील भुईकोट किल्ल्यात 18 नोव्हेंबर 1665 या दिवशी होता.


एेतिहासिक मंगळवेढा
एेतिहासिक मंगळवेढा
            
मंगळवेढ्यातील भुईकोट किल्ला, काशी विश्वेश्वर मंदिर, महादेवाची विहीर, ज्योतिबा माळावरील मंदिरे, गैबीसाहेब दर्गा या इतिहासाच्या खुणा सांगणाऱ्या वास्तू.पुष्कर येथील ब्रम्हदेवाच्या मूर्ती नंतर किल्ल्यापाठीमागील महादेव विहिरीत आहेत. किल्ल्याच्या मागील बाजूस असलेले काशीविश्वेश्वराचे मंदिर आणि विहीर पाहण्यासारखी आहेत.यादवोत्तर काळात हे मंदीर मोडकळीस आले होते. पुढे मुसलमानी राजवटीत विजापूरच्या गादीवर आल्ली अदिलशाह असताना हिप्परगीचे श्री. बाहयानी धनाजी कुलकर्णी यांनी शके १४९४, इ.स. १५७२ साली मंदीराचा जिर्णोध्दार केला. याची हकीकत रंगशिळेच्या डावीकडील खांबावर पाच भागात कोरली आहे. मुळ लेख ६० ओळीचा आहे विहिरीची रचना सुंदर आहे.काही पायर्‍या उतरल्यावर ब्रह्मदेवाची दुर्मिळ मुर्ती पहावयास मिळते. विहिरीच्या मध्यभागी गावाच्या बाहेर पडणारे भुयार आहे असे गावकरी सांगतात.

ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🥇      

गुरुवार, फेब्रुवारी ०४, २०२१

‼  गड आला पण सिंह गेला  ‼

‼ गड आला पण सिंह गेला ‼

  गड आला पण सिंह गेला  


.        दि. ४ फेब्रुवारी २०२१ 

फेसबुक लिंक http://bit.ly/2YHRF90
        तानाजी मालुसरे, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात खास व्यक्ती होते. शिवाजी महाराजांना देखील त्यांच्यावर अत्यंत विश्वास होता. जे काम कोणाकडून शक्य होत नसेल ते केवळ तानाजींच करु शकतात याबद्दल त्यांना पूर्णपणे खात्री होती.

गड आला पण सिंह गेला

एकदा कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजानी तानाजी मालुसरेला दिली होती. जेव्हा तानाजीला ह्या जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारीत होते. महाराजांचा संदेश मिळत्याक्षणी तानाजींना जाणवले की निश्चितच काही महत्त्वाचं काम असावं. तानाजी तयारी अर्धवट सोडून स्वराज्यासाठी आपल्या कामाला प्राधान्या देत महाराजांसमक्ष प्रस्तुत झाले.

महाराजांनी सांगितले की आता कोंढणा किल्ला जिंकणे मानाची गोष्ट झाली असून जगहसाई होता कामा नये. तेव्हा तानाजींनी चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले. आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे. "हे त्यांचे शब्द इतिहासात प्रसिद्ध पावले आहेत.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,गडावर किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता, आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० हशमांची फौज होती. रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले. ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा.
रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता किल्ला दिवसा चढणे दिवसा होते. तानजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करून त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्‍न केले.

शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागुन 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७० रोजी घडली.
गड आला पण सिंह गेला

तिथे झालेल्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसर्‍या दिवशी श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे सिंहगडावर पोहचले तेव्हा त्यांना समजले. महाराज म्हणाले "गड आला पण सिह गेला". अत्यंत दुःखी झालेल्या राजांनी तानाजीचे शव त्यांच्या उमरठे या गावी पाठवले. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा 'वीरगळ' स्थापन करुन एक सुंदर स्मारक उभे केले गेले आहे.

༺━━━━━━━━━━━━━━━༻
🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞
    _*🎈 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव🎈
༺━━━━━━━━━━━━━━━༻
.      

सोमवार, फेब्रुवारी ०१, २०२१

 मराठ्यांचा भगवा झेंडा लाल किल्ल्यावर फडकला होता का? 🚩

मराठ्यांचा भगवा झेंडा लाल किल्ल्यावर फडकला होता का? 🚩

 मराठ्यांचा भगवा झेंडा लाल किल्ल्यावर फडकला होता का? 


१ फेब्रुवारी २०२१
सोशल मीडियावर प्रश्न विचारला जात आहे की जर मराठा शासकांनी अटकेपार झेंडे रोवले होते तर त्यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झेंडा फडकवला की नाही?
1788 मध्ये मराठ्यांचा भगवा झेंडा लाल किल्ल्यावर होता इतकंच नाही तर महादजी शिंदे हे दिल्लीच्या मुघल बादशाहचे संरक्षणकर्ते बनले होते. त्यामुळे लाल किल्ल्यावर मुघलांचा आणि मराठ्यांचा झेंडा काही काळ फडकत असल्याचंही सांगितलं जातं.
एखाद्या ठिकाणी ध्वज फडकवणे याला संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्या ठिकाणी ज्याचा ध्वज असतो त्याची ती सत्ता किंवा जागा असते असा त्याचा अर्थ असतो.
मराठ्यांचा भगवा ध्वज लाल किल्ल्यावर फडकला पण तो सार्वभौमत्व दाखवण्यासाठी नव्हता तर मुघलांसोबत असलेली मित्रत्वाचे नाते दाखवण्यासाठी होता, असं इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत सांगतात.
पण या निमित्ताने पुन्हा एक प्रश्न मनात येतो तो म्हणजे 18 व्या शतकात मराठे प्रभावशाली होते तर त्यांनी दिल्लीवर आपला दावा का सांगितला नाही?
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा 65 वर्षांचा मुलगा बहादुरशहा जफरच्या हाती दिल्लीची सत्ता आली. त्याने शाहू महाराज आणि ताराबाई यांच्यापैकी कुणीच्याही गादीला मान्यता नव्हती दिली. इतकेच नव्हे तर बहादुरशहाने मराठ्यांना चौथाईचे अधिकार दिले नव्हते फक्त देशमुखीचेच अधिकार दिले होते.
बाळाजी विश्वनाथ हे शाहू महाराजांचे पेशवे बनले आणि 1711 मध्ये त्यांनी मुघलांकडून चौथाई आणि सरदेशमुखीचे अधिकार मिळवून घेतले. दक्षिण राज्य करायचे असेल तर दोन्ही राजघराण्यांना नाराज करता येणार नाही असे जाणून बहादुरशहाने शाहू महाराजांना झुकते माप दिले.
त्याबदल्यात शाहू महाराजांनी दिल्लीच्या संरक्षणासाठी सैन्य सज्ज ठेवायचे असा करार झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 39 वर्षानंतर मुघल आणि मराठ्यांमध्ये असलेला संघर्ष थांबला होता.मराठ्यांनी दिल्लीवर सत्ता का काबिज केली नाही?
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत या प्रश्नाचे उत्तर असे देतात की "छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई यांच्यानंतर दिल्लीला न जुमानणारे राजेच झाले नाहीत. दिल्लीच्या गादीबद्दल असलेल्या आदरातून थेट दिल्लीवर राज्य करावं ही इच्छाच त्यांच्यात निर्माण झाली नसल्याचं दिसतं.
"आधी सदाशिवराव भाऊ पेशवे आणि महादजी शिंदे इतके शक्तिशाली होते की ते सहज मराठ्यांचं सार्वभौमत्व जाहीर करू शकले असते पण दिल्लीच्या तख्ताबद्दल असलेल्या आदरामुळे ते करू शकले नसावे," असं मत इंद्रजीत सावंत मांडतात.
मराठ्यांचा भगवा झेंडा लाल किल्ल्यावर फडकला होता का?
'मराठ्यांची तलवार तळपली, पण ध्वज तेजाने फडफडला नाही' मराठ्यांचं दिल्ली, आग्रा आणि अलीगड मधील वर्चस्व 1818 साली संपुष्टात आले, जेव्हा इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला.
"मराठ्यांनी एकदाही मुघल शासकांचा पूर्णपणे बिमोड करण्याचा ना विचार केला, ना प्रयत्न केला. मराठे नेहमीच त्यांचे संरक्षक आणि कारभारी बनून राहिले

मंगळवार, जानेवारी १९, २०२१

मुघल बादशहा स्त्रियाना  बंदिस्त  (हरम) व्ययस्थेत कसे ठेवत?

मुघल बादशहा स्त्रियाना बंदिस्त (हरम) व्ययस्थेत कसे ठेवत?

मुघल बादशहा स्त्रियाना  बंदिस्त  (हरम) व्ययस्थेत कसे ठेवत ?   


.        📯 दि.१९  जानेवारी २०२१ 📯

फेसबुक लिंक http://bit.ly/38SKReG
        मुस्लिम बायकांचा निर्जनपणा(खाजगीपणा) कुराण मध्ये सांगितला आहे. घरात राहणे, बाहेर न फिरणे, पती व्यतिरिक्त इतर कोणत्याही पुरुषाशी संबंध न ठेवणे हे एका प्रतिष्ठित मुस्लिम बाई साठी अनिवार्य होते. दैवी अधिनियमाची शक्ती लाभलेला हा कायदा योग्य रित्या बजावण्यासाठी मुस्लिम बाईकांकरिता वेगळी बंद अंगणे आणि खोल्या बनविल्या जात, ज्या बाहेरील जगापासून वगळलेल्या असत. या ज्या जागा असायच्या त्यांना 'हरम' म्हणायचे.

मुघल बादशहा स्त्रियाना  बंदिस्त  (हरम) व्ययस्थेत कसे ठेवत?


हरम हा शब्द मूळच्या ३ भाषांमधून आला आहे. अरेबीक, पर्शियन, संस्कृत(हरम्या - राजवाडा/Palace). हरम या शब्दाचा अर्थ 'पवित्र' किंवा 'निषिद्ध' असाही होतो.
याला 'हरम-सेरा', 'हरम-गाह', 'महल-सेरा', 'राणीवास' असेही शब्द आहेत. पुढच्या काळात याला राजपूत राज्यात 'झेनानी दयोधि' असेही म्हणायचे.
हरमचा जो मुख्य अधिकारी असायचा त्याला 'नाजिर', 'नाजिर-इ-महल', 'ख्वाजा-सेरा'(Eunuchs, हिजरा) म्हणायचे.
मुघलांच्या हरम मध्ये वेगवेगळ्या भागांतून आलेल्या, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या असंख्य स्त्रिया असत. त्यांना अतिशय सुरक्षिततेत आणि खाजगीपणे 'पडद्यात' ठेवलेले असे. या संदर्भात एक म्हणही आहे की, 'एखादी बाई हरम मध्ये लग्न करून यायची ती मेल्यावर बाहेर पडायची'. हे अक्षरशः खरं असायचं. हरमातील बायकांचा राजा(बादशाह) सोडल्यास कोणत्याही पुरुषाबरोबर संबंध यायचा नाही. परपुरुषच काय, त्यांची मुलं मोठी झाल्यानंतर त्या मुलांना सुद्धा हरमात जाण्यास परवानगी नसायची.या सगळ्या प्रथा, परंपरा तिसरा मुघल सम्राट अकबराने चालू केल्या आणि पुढे त्याच्या वंशजांनी पाळल्या. अबुल फझल ने 'आईन-ई-अकबरी' मध्ये लिहिले आहे की, हरमाची सेवा करण्यासाठी अकबराने त्याच्या अतिशय विश्वासू माणसांना ठेवले होते. विविध श्रेणीचे अधिकारी हरम मधील कामं पाहत होते. स्वतः बादशाह या कामांमध्ये लक्ष घालायचे.
🔹'स्थापत्य रचना'
मुघल हरम भिंतींनी बंदिस्त असायचा आणि आतमध्ये इमारती असायच्या. प्रत्येक खोल्यांना पडदे असायचे. सगळ्या इमारतींच्या मधोमध मोठं अंगण असायचं. बागा असायच्या. कारंजी असायची.
प्रत्येक इमारतीत शौचालयांची व्यवस्था असायची. तसेच काही शौचालये राहायच्या मुख्य भागाच्या बाहेरच्या बाजूस सुद्धा असायची.
🔹 संस्थागत रचना
मुघल काळात हजारो स्त्रिया हरम मध्ये राहिलेल्या आहेत. अबुल फजल लिहितो की अकबराच्या काळात ५,००० स्त्रिया हरम मध्ये होत्या. आत्ताच्या काळात असे गैरसमज आहेत की हरम मधील प्रत्येक स्त्रीचे बादशाहशी लैंगिक संबंध असायचे. पण असे नाही  आहे. अकबरकाळातल्या ५००० बायकांपैकी फक्त ५ टक्के बायकांचा अकबरशी संबंध होता बाकी राण्यांबरोबरच्या दास्या, कामं करणाऱ्या बायकाही असायच्या.मुघल काही मुस्लिम जनानखान्यात पुरूष नसायचे कारण हे बादशाह कैक लग्न करायचे अकबर ने तर 4000 लग्न केलेलं.यांच्या बायका सेक्स बाबतीत असंतुष्ठ राहायचे .मग जनानखाण्यात जर इतर पुरुष ठेवले तर आणखी लफडी होईल अशी भीती मुळे खोजे राहायचे हे खोजे ठेवण्याची प्रथा अगदी प्राचीन काळापासून जगभरात आहे..भारतात तर या संदर्भात अस्सल ऐतिहासिक पुरावे सल्तनत काळाकाळापासून मिळतात..मुघलाच्या काळात बळबळजबरीने खोजा बनवल जायचे.त्याप्रमाणे जनानखाना राखण्यासाठी तृतीयपंथी नंपुसक लोक कमी पडतात म्हणून सशक्त तरूणानाच नपुसंक केल जायचे.
त्यात पुन्हा हकीमानी किंवा वैद्यांना शारीरिक चाचणी घेऊन पुर्णपणे खोजा झाल्याची खात्री पटल्यानंतर अश्या त्यांना जनानखान्यात प्रवेश दिला जाई..परतु या खोजाना देखील जनानखान्यात स्त्रियाच्या भागात प्रवेश नसायचा..
या मुघल स्त्रियांना पडद्यातच राहावे लागे.जेंव्हा तीर्थक्षेत्र, किंवा पर्यटन किंवा स्वारी साठी जावे लागायचे तेंव्हा त्यांना पालखी मधून जावे लागे त्यांच्या आसपास अन्य पुरुष ऐवजी हे खोजे असायचे.मुघल जनानखान्यात किंवा हरम मध्ये सर्व सुविधा असायचे.बागबगीचे , कारंजे, लहान लहान दुकाने.प्रत्येक स्त्रीला स्वतःची खोली असायची.जेवण हे मुघलांच्या सेंट्रल kitchen माखताब मधून यायचे.
ऐकेका जनानखाजनानखा 20 नंपुसक सेवेत असायचे या प्रत्येकाची कामे ठरवुन दिलेली असायची त्यात मुख्य खोजाला (तिला दरोगा अस म्हणायचे) मोठा मान होता..जनानखान्यातील कुठला खोजा चुकला तर तो थेट राजा सरदाराकडे तक्रार करायचा.
त्यामुळे या मुख्य खोजाला सगळं जनानखाना घाबरायचा..इतकच काय बेगमाही त्याला घाबरायची..कधी कधी जनानखान्यात आडोसा पकडुन दासी व खोजाचे चाळे चालायचे..यात जर रंगेहाथ सापडला तर व्याभिचाराचा गुन्हा म्हणून थेट मृत्यूदंडाची शिक्षा दिली जायची
अरब आक्रमणानंतर भारतात जनानखान्यातील स्त्रिया या रशिया जार्जिया कर्कैशिया रोम सिरिया या भागातुन मागवायचे , औरंगझेब ची एक बायको तिकडची होती हिजडे ही तिथलेच मागवले जात..त्या काळात हिजड्याचा व्यापार तेजीत होता गुलामा पेक्षा, हिजड्याची किमंत इतर गुलमापेक्षा तीन ते चार पट असे.एखाद्या राजाचा पराभव झाला तर हजारो सशक्त माणसांना बीजे फोडून हिजडे बनवायचे.आणि युद्धामध्ये ही संपत्ती वेगळीच.प्रत्येक भागासाठी पवित्र(Virgin) महिला वरिष्ठ अधिकारी म्हणून ठेवलेल्या असत. त्यांना 'दरोघा' म्हणत. एक घडामोडी लिहीण्यासाठी 'नवीस' ठेवलेला असे.
हरम व्यवस्थे मध्ये खोजे(हिजडे) असायचे. नैसर्गिक खोजे संख्या कमी पडायची म्हणून हे मुघली तुर्क बादशाह चांगल्या सशक्त तरुणाचे बीज फोडायचे आणि खोजे बनवायचे.मुघल स्त्रिया, राण्या, राजकन्या या च्या सेवेसाठी पुरुष लोक ठेवायच्या ऐवजी हे खोजे ठेवायचे.फारशी शब्द आहे हरम आणि संस्कृत शब्द अंतःपुर.
त्यामुळे जसं मुघल दरबाराचे 'दप्तर' (ऑफिस) असायचं तसंच हरम दप्तरही असायचं. या हरम मधील सगळ्या बायकांचे पगार ठरलेले असायचे. आपल्याकडे अकबराच्या काळातील या हरममधील महिला अधिकाऱ्यांचे पगार माहित आहेत. त्यांना दरमहा साधारण रुपये १०२८ ते १६१० पगार असायचा.(त्या काळी साधारण ५ रुपयात अक्खा घर चालायचं!)
संदर्भ - आईन-इ-अकबरी
आभार-- अोंकार ताम्हनकर
༺━━━━━━━━━━━━━━━༻
🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞
    🎈 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 🎈
༺━━━━━━━━━━━━━━━༻

रामदास स्वामी: छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू: पुरावा

रामदास स्वामी: छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू: पुरावा


रामदास स्वामी: छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू: पुरावा 




.        📯 दि. १९ जानेवारी २०२१  📯

फेसबुक लिंक http://bit.ly/3oR7cPf
        इतिहास मध्ये एक पुरावा आहे म्हणजे चाफळ सनद कि जे दर्शवतो की शिवाजी महाराजांचे गुरू रामदास स्वामी आहे.पण ते एकटेच गुरू नव्हते हे पण तितकेच खरे.
शिवाजी महाराजांना समर्थ रामदास याविषयी प्रचंड आदर होता, पण ते त्यांचे गुरू होते आणि एकटे गुरू नव्हते. तर पाटगावचे मौनी महाराज, , केळशीचे याकुतबाबा अशा अनेक संत लोकांचे शिवाजी महाराज सल्ला घ्यायचे.लहानपण पासून त्यांच्यावर संस्कार हे जिजाबाई नि केलं म्हणून खऱ्या गुरुस्थानी या जिजाबाईच आहेतच.

खूप लोक चाफळ सनद चा उल्लेख करतात पण इतिहासकार गजानन मेहंदळे आणि इंद्रजित सावंत यांनी ही सनद वर शंका उपस्थित केली होती पण .इतिहास संशोधक संकेत कुलकर्णी आणि कौस्तुभ कस्तुरे यांनी 2018 मध्ये शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना १६७८ मध्ये पाठवलेली एक सनद नुकतीच प्रकाशात आणली होती.,या सनदेत महाराजांनी 33 गावे इनाम म्हणून दिल्याचा उल्लेख आहे. या सनदेच्या हस्तलिखिताच्या इतरांनी तयार केलेल्या नक्कल प्रती यापूर्वीही उपलब्ध होत्या. मात्र लंडनच्या ब्रिटिश संग्रहालयात या अस्सल दस्तावेजाची छायांकित प्रत सापडली आहे.

१५ सप्टेंबर १६७८ रोजी लिहिलेल्या या सनदेत शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना काही गावे इनाम म्हणून दिल्याचे नमूद आहे. महाराष्ट्रात आजवर सापडलेल्या नकलांवर जे शेरे दिले आहेत, त्याबरहुकूम ही प्रत असल्याचे सिद्ध होत आहे. या सनदेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘मर्यादेयं विराजते’ अशी अक्षरे असलेल्या एकूण ११ मोर्तबा असून एक मोर्तब पत्राच्या मुख्य बाजूवर असून उरलेल्या १० मोर्तबा पत्राच्या मागील बाजूस आहेत. या पत्रातील हस्ताक्षर हे शिवकालीन प्रसिद्ध बाळाजी आवजी चिटणीसांच्या हस्ताक्षराशी मिळतेजुळते असल्याचेही बोलले जाते. ही सनद बदलापूरचे इतिहास संशोधक कौस्तुभ कस्तुरे यांनी उजेडात आणली आहे .
चाफळ सनदेच्या मायन्यात "श्री सद्गुरुवर्य" हा लिहले असले तर असला तरीही हा मायना राजकीय दृष्टीने आहे की आध्यात्मिक गुरुस्थानी हे पाहावे लागेल.
इतिहासकार कौस्तुभ कस्तुरे यांनी सुद्धा म्हणाले आहे की समर्थ संप्रदाय आणि शिवाजी महाराज यांचा परिचय 1658 ला आला आणि रामदास स्वामी यांची भेट 1672 नंतर झाली .नंतर अतिशय मधुर संबंध झाले.
आता पर्यंत जवळपास सर्व इतिहासकाराने ही गोष्ट मान्य केली आहे.शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट 1672 पूर्वी झाली याचा पुरावा नाही.शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माणताचे कार्य 1648 च्या आसपास चालू केले .आणि बहुतेक ते 1672 पर्यंत भेटलेच नाही.पण त्यांच्या(समर्थ संप्रदाय) शिष्यांचा संबंध 1658 ला आला होता.
सोबत दोन फोटो. 


रामदास स्वामी: छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू: पुरावा