महाराजांचे अस्सल रेखाचित्र शोधून काढणारे भीष्माचार्य इतिहासकार : वासुदेव सीताराम बेंद्रे
दि. १३ एप्रिल २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3wZwb7F
फ्रान्सच्या पॅरिस मध्ये असणाऱ्या या चित्रमागची कथा अशी –Niccolao Manucci नावाचा एक इटालियन प्रवासी Veniceहुन आपल्याकडे आला. त्याने मुघलांच्या दरबारात असलेल्या चित्रकाराकडून (त्याचं नाव मीर मुहम्मद) जवळजवळ ५२ चित्र काढून घेतली. त्यासाठी त्याला भरपूर पैसे दिले. पण ती चित्र ही कल्पना करून काढलेली होती. त्यात शायिस्तेखानाच्या आणि महाराजांच्या चित्रात थोडा फार फरक! अशा प्रतीचं ते चित्र होतं. Venice च्या Senate ने ते (Manucci ने लिहिलेल्या manuscript सोबत) publish करावं अशी त्याची इच्छा होती.पण त्याआधीच नेपोलियनने Venice ला असलेलं सगळं लुटून त्याच्यासोबत नेलं, त्यात manuscript मात्र नव्हती. पुढे तेच चित्र पॅरिसच्या Musée Guimet येथे ठेवण्यात आलं!
वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी शोधून काढलेल्या चित्राची खासियत अशी की ते “रेखाचित्र” हे त्या आर्टिस्ट ने प्रत्यक्ष महाराजांना बघून काढलेलं होतं!
बेंद्र्यांनी लंडनमधे ठेवलेल्याजगदंबा तलवारीचाही शोध लावला. आज जी भवानी तलवार म्हणून आपण वाचतो, ऐकतो. ती जगदंबा तलवार आहे. तसेच शिवाजी महाराजांचे आजोबा, शहाजी राजांचे वडील मालोजीराजे यांची जी ईंदापूरला समाधी आहे ती बेंद्र्यांनीच शोधून काढली आहे. ती जेव्हा त्यांनी शोधून काढली तेव्हा तिचा दर्गा झाला होता. इतकच नव्हे तर कोरेगावला भीमा नदीच्या काठी जी संभाजी महाराजांची समाधी आहे तिचा शोधदेखील बेंद्र्यांनीच लावला आहे. केवढं मोठं हे त्यांचं योगदान होतं याचा विचार करा.
संभाजी महाराजांचं जे चरित्र बखरींमधून रंगवण्यात आलंय ते सुधारण्याचं कामसुद्धा बेंद्र्यांनी केलं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे त्यांना गुरुस्थानी मानतात. त्यांनी ईंग्रजीतूनदेखील पुस्तके लिहिली. संत तुकारामांची “मंत्रगीता” सुद्धा त्यांनी संपादित केली. “साधन चिकित्सा” नावाचा त्यांचा ग्रंथ हा इतिहास संशोधकांमध्ये प्रसिद्ध आहे. त्यांचं एवढं मोठं योगदान असूनही स्वातंत्र्यानंतरसुद्धा त्यांना हवा तसा मानसन्मान आणि ओळख मिळाली नाही.
शिवचरित्र लिहून काढण्यामागे यशवंतराव चव्हाण यांचा आग्रह हे प्रमुख कारण आहे असं स्वत: बेंद्र्यांचं म्हणणं होतं. शिवकाळाचा अभ्यास करण्यात ३० – ४०वर्षे खर्च करून देखील केलेले संशोधन हे लोकांपुढे येऊ शकले नाही याची खंत बेंद्र्यांना होती.त्यांनी तुकारामांचं चरित्र प्रकाशित करण्यासाठी चव्हाणांनासंपर्क केला. जेव्हा यशवंतरावांना कळलं कि ह्या माणसाने शिवकाळाचा इतका सखोल अभ्यास केलाय तेव्हा त्यांनी आधी शिवचरित्र लिहून पूर्ण करा असा तगादा त्यांच्यामागे लावला.
जवळजवळ अडीच तास त्यांची समजूत काढल्यानंतर बेंद्रेतयार झाले. महाराष्ट्रावर खूप मोठे उपकार त्यांनी केले. असं म्हणण्याचं कारण असं की, त्याआधी ज्या काही १६ बखरी reference म्हणून इतिहासकार वापरत होते त्या फार विश्वासार्ह नव्हत्या.
हे कुण्या सामान्य माणसालाही लक्षात येईल. बेंद्र्यांनी डच, ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज यांच्या दप्तरात उपलब्ध असलेली कागदपत्र शिवायनिजामशाही, कुतुबशाही, तुर्क यांचे records या सर्वांचा सखोल अभ्यास करून शिवचरित्र पूर्ण केलं. इतिहासाचे लेखन कसे करतात याचा नवीन पायंडा त्यांनी पडून दिला. महाराज, संभाजी महाराज यांची प्रतिमा काहीतरी भलतीच करून जातीपातीत फूट पाडून काहीही पुरावे, संदर्भ न देता इतिहासावर पुस्तके लिहिणाऱ्या लेखकांच्या आजच्या काळात वा.सि. बेंद्रे यांच्यासारख्या ऋषितुल्य इतिहासकाराचे आपण ऋणी असलं पाहिजे.
____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498☜♡☞
➰ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ➰
______________________________