Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल २९, २०२१

छ. शिवाजी महाराज व शाह शरीफ दर्गा

छ. शिवाजी महाराज व शाह शरीफ दर्गा  


दि. २९ एप्रिल २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3gNDfyg
ही गोष्ट कदाचित तुमच्या ही कानी पडली असेल कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याचा अहमदनगर मधील ‘शाह शरीफ’ दर्ग्याशी संबंध आहे. चला जाणून घेऊया काय आहे हा संबंध…!छत्रपती शिवाजी महाराजांची जी वंशावळ उपलब्ध आहे ती सुरु होते बाबाजी भोसले यांच्यापासून. त्यांचा जन्म १५३३ सालचा. त्यांनामालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले हे दोन पुत्र! त्यापैकी मालोजी राजे यांचे पुत्र म्हणजे- शहाजी राजे आणि शरीफजी राजे.      

छ. शिवाजी महाराज व शाह शरीफ दर्गा
        

आता हा प्रश्न अनेकांना पडतो की, मालोजी राजांच्या दोन्ही पुत्रांच्या नावामध्ये मुसलमानीनावांचा प्रभाव डोकावतो. असे का?तर या मागे एक कथा सांगितली जाते.त्याचं झालं असं की, मालोजी राजांना मुल होतं नव्हतं. तेव्हा अहमदनगर मधील शाह शरीफ दर्ग्याची ख्याती मालोजींच्या कानी आली. या दर्ग्यात जे काही चांगल्या मनाने मागालं ते पूर्ण होतेच अशी भाविकांमध्ये श्रद्धा होती. त्यानुसार मालोजी राजांनी संतान प्राप्तीसाठी दर्ग्यात नवस म्हटला आणि नवस पूर्ण झाल्यास होणाऱ्या मुलाला ‘तुझे’ नाव देईन असा शब्द दिला.  पण पुढे मालोजींना दोन पुत्र झाले. दिलेल्या वचनाला जागले पाहिजे या भावनेतून मालोजी राजांनी दर्ग्याच्या नावातील ‘शाह’ या शब्दावरून एका मुलाचे नाव ‘शहाजी’ ठेवले आणि ‘शरीफ’ या शब्दावरून दुसऱ्या मुलाचे ‘शरीफजी’ असे नामकरण केले. तसेच या निमित्ताने दर्ग्यावर रोज नगाऱ्याची नौबत वाजवण्याची प्रथा सुरु केली.
पुढे जेव्हा औरंगजेब दक्षिणेत उतरला होता, तेव्हा नगरात असताना एके दिवशी सकाळी ही नौबत त्याच्याकानी पडली. आपल्या धर्मासमोर काफिरांचे वाद्य वाजवणे पाहून त्याला चीड आली त्याने ती नौबत बंद करवली. त्यानंतर शाह शरीफ यांनी औरंगजेबाच्या स्वप्नात जाऊन ‘तू माझी नौबत बंद करवलीस आतामी तुझी नौबत बंद करतो’ असे सांगितले आणि नंतर अहमदनगर मध्ये असतानाच औरंगजेबाचा मृत्यू झाला. अशी कथा स्थानिकांनध्ये प्रचलित आहे.आजही अहमदनगर मध्ये हा दर्गा पहावयास मिळतो. शाह शरीफच्या दर्ग्याचे जे विद्यमान मुजावर आहेत त्यांना या गोष्टीचा अभिमान आहे की या दर्ग्याचे महापराक्रमी भोसले घराण्याशी नाते आहे. आजही भोसले घराण्याकडून दर्ग्याला वर्षासन मिळते आणि भोसले घराण्यातील मंडळी येथे दर्शनासाठी येतात.तर या दर्ग्याच्या आशीर्वादाने मालोजी राजेंना झालेला शरीफजी हा पुत्र देखील शूर निपजला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498 ☜♡☞
🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🥇       
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.