चंद्रपूर/ प्रतिनिधी
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प मधील बफर क्षेत्रातील वाढोली येथील एका शेतातील विहिरीमध्ये दोन अस्वलीसह दोन पिल्ल्यासोबत पड़ून मृत्युमुखी पडल्याची घटना आज 29 एप्रिल रोजी उघडकीस आली. विहिरीला कठरे नसल्यामुळे त्यांच्या जीव गेला. जिल्ह्यातील 7 दिवसात ही दूसरी घटना आहे. या आधी वाघाचा बछडा केळझर वनक्षेत्राच्या मधील दाबगाव येथे एका शेता मधील विहिरीत पडला होता. त्या बछड्याला वाचविन्यास वन विभागाला यश मिळाले. त्यानंतर ही दूसरी घटना यात दोन अस्वल आपल्या दोन पिल्ल्यासोबत पड़ून मृत्यु झाली. अशा कठरे नसल्या विहिरीमुळे बरेच वन्यजीव मरण पावतात. शासना कडून शेत विहिरी करीता निधी मिळते तरी देखील विहीरी दुरुस्त होत नाही. विहीरीच्या मालकावर कारवाही होने गरजेचे आहे जेणे करून विहिरीला कठरे करणार व भविष्यात अशी घटना होणार नाही. असे वन्यजीव प्रेमीची हाक आहे.
वन विभागाच्या माहिती प्रमाणे ही घटना रात्रीच्या सुमारास आपल्या कुटुंबा सोबत फिरत असताना या कठरे नसल्या विहिरीत पडले असावे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील तपास शुरू आहे.