Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

अमरावती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अमरावती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, जानेवारी १०, २०२३

अमरावती येथे आले देशभरातील किन्नर; नेमके संमेलन आहे तरी काय? Amravati Transgender Maharashtra

अमरावती येथे आले देशभरातील किन्नर; नेमके संमेलन आहे तरी काय? Amravati Transgender Maharashtra

अंबादेवी, एकवीरा देवीची भरली ओटी  

अमरावती येथे आले देशभरातील किन्नर; नेमके संमेलन आहे तरी काय? Amravati Transgender Maharashtra


काेरोनानंतर पहिल्यांदाच अमरावती येथे संमेलनाच्या माध्यमातून किन्नर एकवटले आले आहे. सोमवारी काढलेल्या कलश यात्रेत किन्नरांनी डोक्यावर चांदीचा कलश होता. जागोजागी किन्नरांच्या कलश यात्रेवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. खुल्या जीपमध्ये आयोजकांसह काही प्रमुख किन्नर बसले होते. यावेळी चौका-चौकात किन्नारांचे स्वागत करण्यात आले. 
amravati transgender Maharashtra


देशभरातील मंगलमुखी किन्नरांचे १ ते १५ जानेवारी दरम्यान राष्ट्रीय संमेलन अमरावतीत होत आहे. याच श्रृखंलेत सोमवारी शहरातील प्रमुख मार्गावरून कलश यात्रा काढण्यात आली. अंबादेवी, एकवीरा देवीची पूजा अर्चा करून किन्नरांनी ओटी भरली. कलश यात्रेत ढोल ताशे, ढोल- नगारा, डीजेवर किन्नारांनी सादर केलेले नृत्य लक्ष वेधून घेणारे होते.


अमरावतीच्या धर्मादाय कॉटन फंड येथे गत नऊ दिवसांपासून हे संमेलन सुरु आहे. देशभरातून ग्वालियर, दिल्ली, ईंदूर, द्रुर्ग, आग्रा, मुंबई, नागपूर, हैद्राबाद, बंगळुरू, अकोला यासह अनेक शहरातून साडेतीन हजाराच्यावर किन्नरांनी या संमेलनाचा हजेरी लावलेली आहे. या मेळाव्याला मंगलमुखी संमेलन असे नाव देण्यात आलेले आहे. सोमवारी सर्व किन्नरांनी धर्मदाय कॉटन फंडपासून अंबादेवीपर्यंत कलश यात्रा काढली. यात नाचत गाजत किन्नर हे देवीच्या दर्शनाला गेले. अंबादेवी व एकवीरा देवीच्या मंदिरात किन्नरांनी ओटी भरली तसेच कलश अर्पण केले.


The national conference of transgenders is being held in Amravati from January 1 to 15. In all, 600 transgenders from all over the country reached Amravati to attend the meeting. Neha Nayak, along with another transgender, explained the difficulties they are facing in society.



बुधवार, सप्टेंबर १४, २०२२

 राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी पदाधिकारी करणार पाहणी दौरा raj thakrey nagpur

राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी पदाधिकारी करणार पाहणी दौरा raj thakrey nagpur

येत्या 18 सप्टेंबरपासून राज ठाकरे विदर्भ दौऱ्यासाठी नागपुरात दाखल होत आहेत. त्यापूर्वी आज मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर, प्रदेश उपाध्यक्ष आनंद एम्बडवार आणि मनसेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते नागपुरात दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी ही टीम नागपूर चंद्रपूर आणि अमरावती येथील दौरा १५, १६ आणि १७ सप्टेंबर असे तीन दिवस करणार आहेत.



१७_सप्टेंबरला नागपूर येथे रेल्वेने रवाना होतील. १८_सप्टेंबर रोजी सकाळी नागपूर येथे त्यांचं आमगन होईल. त्यानंतर, १८ आणि #१९ सप्टेंबर रोजी निवडणुकांसाठी #पदाधिकारी आणि #कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. २०_सप्टेंबरला १ दिवसीय चंद्रपूर दौऱ्यावर जातील. २१ सप्टेंबर रोजी अमरावती दौरा करतील. २१ आणि २२ सप्टेंबर रोजी पुन्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतील. #२३_सप्टेंबर रोजी ते #मुंबई येण्यासाठी रवाना होतील. 


रविवार, जून ०५, २०२२

अंतर 34 किमी, मग 75 चे उद्दिष्ठ कसे; जाणून घ्या

अंतर 34 किमी, मग 75 चे उद्दिष्ठ कसे; जाणून घ्या

राष्ट्रीय महामार्गाचे ५१ तास; 17845 रानिंग मीटर रस्त्यांचे काम पूर्ण




लोणी ते मुर्तीजापूर 75 किमी कसे?




अनेकांना एकच प्रश्न पडला आहे, की अकोला महामार्गावरील लोणी ते मुर्तीजापूर अवघ्या 34 किमीचे अंतर असताना 75 किमीचा वर्ल्ड रेकॉर्ड कसा बनत आहे ? , नियमानुसार चौपदीकरणाचा मार्ग हा एकुण 18 मीटर रुंदीचा असतो. या मार्गाची एक बाजु ही साधारणत: 9 मीटरची रुंदीची असते, या 9 मीटरचे दोन भाग म्हणजे दुपदरी, अशा प्रमाणे 4.5 मी. अधिक 4.5 मी.याप्रमाणे या मार्गाच्या निर्माण कार्याची लेंन मोजल्या जाते. या दोन लेनचे काम हे डबलने मोजल्या जाते. जे एकुण 75 किमीचे होत आहे. या कामावर कायमस्वरुपी ड्रोन व व्हिडीओ कॅमेरे लक्ष ठेवून आहेत. इतकेच नाहीतर गिनीज बुकची 12 लोकांची अत्यंत प्रशिक्षीत व जानकार टीमही याचे मोजमाप करित आहे. अमेरिकेच्या अॅक्युवेदर या संस्थेकडून हवामानाची माहिती काढल्यानंतरच 3 ते 7 जून कामाचे दिवस निवडले गेले आहे.

राष्ट्रीय महामार्ग-6 वर लोणी ते मुर्तीजापूर पर्यंत एकूण 5 दिवसात 75 किलोमीटरचा महामार्ग पुर्ण करुन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मिळविण्याचे ध्येय घेऊन राजपथ इंफ्राकॉनची 750 लोकांची टीम हळूहळू आपल्या लक्षपुर्तीकडे जात आहे. माना गावाच्या 1 किलोमीटर अगोदर असलेल्या तीन पुलांमुळे निर्माण झालेली गुंतागुतीची प्रक्रीया शनिवार (4जून) रोजी पुर्ण करण्यात आली. यावेळी तब्बल दिड तासाहून अधिक काळ या मार्गावर वाहतुक खोळंबली होती. परंतू हा टप्पा पुर्ण करुन लगेच वाहतुक नियमीत करण्यात आली. 5 जून रोजी 2 days, 3 तासाचा (एकूण ५१ तास) कालावधी उलटून गेला तेव्हा 17845 रानिंग मीटर म्हणजेच दोन लेन मिळून 35 किमीचे काम निर्विघ्नपणे पार पडले होते.

व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम म्हणाले की, कोरोना काळात कंपनीचे 1200 व इतर असे 1700 कर्मचा:यांच्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न माझ्यासमोर उद्भवला होता. मोठ्याप्रमाणात नकारात्मकता निर्माण झालेली होती. परंतू खचून न जाता, सर्वांना 100 टक्के वेतन दिले. कोरोना काळातच कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाची वाडी येथे 30 किलोमीटरच्या मार्गाचे अत्यंत कमी वेळात काम संपवुन आम्ही लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदविला. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याहून मोठा विक्रम महामार्गाच्याबाबतीत करावा अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर आम्ही लोणी ते मुर्तीजापूर या मार्गावर विश्वविक्रम करण्याचे ठरविले आणि कामाला लागलो. हा विक्रम केला जात असताना मार्गाच्या गुणवत्तेसोबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही. येथून 15 वर्ष या मार्गाला काही होणार नाही, याची हमीसुध्दा जगदीश कदम यांनी यावेळी घेतली. शिवाजी महाराजांच्या चरित्रातून अनेक गोष्टी शिकून आज मी या ठिकाणी पोहचलो असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या ‘वॉर रुमला’ जावळी हे नाव दिल्याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.


शुक्रवार, जून ०३, २०२२

लोणी येथून राष्ट्रीय महामार्गाच्या विक्रमी बांधकाम कार्याला उत्साहात प्रारंभ

लोणी येथून राष्ट्रीय महामार्गाच्या विक्रमी बांधकाम कार्याला उत्साहात प्रारंभ


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राजपथ इन्फ्राकॉनचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड"चा प्रयत्न.


110 तास, "नॉन स्टॉप" चालणार बिटुमिनस काँक्रिट रस्ता बांधकाम कार्य.


अमरावती/अकोला

अमरावती ते अकोलादरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर लोणी ते मूर्तीजापूरपर्यंत एका बाजूच्या दोन लेनमधील, चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बिटुमिनस काँक्रिटीकरणासह सर्वात लांब व अखंड रस्ता निर्मितीच्या कामाला आज सकाळी प्रारंभ झाला. महामार्गावरील लोणी येथे ६ वाजतापासून विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य प्रवर्तक राजीव अग्रवाल आणि राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांनी यंत्र सामग्रीची पूजा केली. दरम्यान, गिनीज बुक ऑफ रिकॉर्ड्सचे समन्वयक मिलिंद वेर्लेकर यांनी अधिकृत घोषणा केल्यानंतर, सकाळी ७.२७ वाजतापासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्यात आली. सकाळी १०.३० वाजेपर्यंत ११८० रनिंग मीटर बिटुमिनस काँक्रिटचे काम करण्यात आले.


पुण्यातील पायाभूत सुविधा निर्माण क्षेत्रातील, सुप्रसिद्ध आणि दिग्गज राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. दमदार कामगिरीसाठी सर्वत्र ओळखली जाते.राष्ट्रीय महामार्गावरील अमरावती ते अकोला जिल्हयातील चौपदरीकरणाच्या कामाला गती येण्याच्या दृष्टीने ३ जूनला सकाळी ६ वाजतापासून ते ७ जूनच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत ‘बिटुमिनस काँक्रिट’च्या सर्वात लांब रस्त्याची अखंड निर्मिती करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास त्याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये होईल.



राजपथ इन्फ्राकॉनचा हा प्रयत्न गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या संपूर्ण नियमानुसार होत आहे. तसेच NHAI (नॅशनल हायवे ऑथॉरिटीज ऑफ इंडिया) द्वारे हा प्रकल्प करारानुसार त्यांच्या देखरेखीत सुरू आहे. त्यासाठी एकूण ७२८ मनुष्यबळ तीन शिफ्टमध्ये कार्यरत आहेत. या कामाची नोंद घेण्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची संपूर्ण टीम दाखल झाली आहे.



राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम (Jagadish Kadam) यांनी सांगितले की, मागील वर्षी जुलैमध्ये राष्ट्रीय महामार्ग कामाची संधी मिळाली. जवळपास ९- १० वर्षांपासून या मार्गाचे काम रखडले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांना वाहतुकीचा प्रचंड त्रास होत होता. या रस्त्याचे काम करताना, काहीतरी वेगळी कामगीरी करून दाखविण्यासाठी आम्ही संकल्प केला.यंदा देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली आहेत. यानिमित्त सारा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. म्हणून या कामाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद व्हावी, अशी कामगिरी करता येईल का, याची चाचपणी केली. मागील चार महिन्यांपासून, गिनीज बुकसोबत संपर्क साधून उपक्रमाची माहिती दिली. यापूर्वी अशा प्रकारचा रेकॉर्ड कतार देशामध्ये दोहा येथे करण्यात आलेला आहे. हा विक्रम मोडून देशाला 75 व्या  अमृत महोत्सवानिमित्त, दोन लेनमध्ये,न थांबता, महामार्ग बांधकामाची अनोखी भेट देण्याचा संकल्प सोडला. त्यानुसार कंपनीने सूक्ष्म नियोजन केले. आज त्यास प्रारंभ झाला . 7 जून रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत सलग 110 तास काम करून विश्वविक्रम प्रस्थापित केला जाईल, असा विश्वास श्री. कदम यांनी व्यक्त केला. हा विक्रम राष्ट्राला समर्पित केला जाईल, असेही ते म्हणाले. 



राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य प्रवर्तक राजीव अग्रवाल (Rajiv Agarwal) यावेळी म्हणाले, अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. येत्या डिसेंबर 2022 पर्यंत 95 टक्के बांधकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी कंपनीकडून अथक प्रयत्न केले जात आहेत. दोन लेनची रुंदी 9 मीटर राहणार असून, दोन्ही लेन मिळून विश्वविक्रमी रस्ता बांधकाम विक्रमी वेळेत पूर्ण केला जाईल, असेही ते म्हणाले.



आमदार प्रतापदादा अडसड यांची भेट 

याप्रसंगी काम सुरू होताच धामणगाव मतदार संघाचे आमदार प्रतापदादा अडसड (MLA Pratapdada Adasad) यांनी लोणी येथील महामार्गावर भेट देऊन विश्वविक्रमी कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी यावेळी सदर महामार्ग कामाबद्दल आनंद व्यक्त केला आणि शुभेच्छा दिल्या.



Exciting start of record construction work of National Highway from Loni

गुरुवार, जून ०२, २०२२

विश्वविक्रमी रस्ता बांधकामासाठी लोणीत जय्यत तयारी

विश्वविक्रमी रस्ता बांधकामासाठी लोणीत जय्यत तयारी




लोणी ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर सतत पाच दिवस चालणार विश्वविक्रमी रस्ता बांधकाम

3 ते 7 जून कालावधीत विश्वविक्रमी बिटुमिनस काँक्रिटचा रस्ता बांधणार

जगात सर्वात लांब व अखंड रस्ता निर्मितीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" मध्ये नोंद होणार

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज पथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेडकडून जय्यत तयारी

अमरावती/अकोला (Akola/Amarawati)
पुण्यातील ,पायाभूत सुविधा निर्माण क्षेत्रातील दिग्गज राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. दमदार कामगिरीसाठी ओळखली जाते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, असाच एक ऐतिहासिक,जागतिक विक्रम करण्यासाठी ती सज्ज आहे. बिटुमिनस काँक्रिटीकरणासह,जगातील सर्वात लांब व अखंड रस्ता निर्मितीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" मध्ये नोंद होण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आली आहे.अमरावती ते अकोला या दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर, लोणी ते मुर्तीजापूरपर्यंत एका बाजूच्या दोन लेनमधील चौपदरीकरणाचे काम, 3 ते 7 जून दरम्यान, करण्याचे नियोजन कंपनीने केले आहे.



राष्ट्रीय महामार्गावरील, अमरावती ते अकोला जिल्हयातील, चौपदरीकरणाच्या कामाला गती येण्याच्या दृष्टीने ३ जूनला सकाळी ६ वाजतापासून ते ७ जूनच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत, ‘बिटुमिनस काँक्रिट’च्या जगातील सर्वात लांब रस्ता निर्मितीचे काम करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास, त्याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये होईल.  (world record road 🚧)




गुणवत्ता आणि मानवी सुरक्षितता:
ही कंपनी जशी नियोजित वेळेत आणि गतीने काम करण्यासाठी सुविख्यात आहे,तशीच दर्जा(Quality) आणि मानवी सुरक्षिततेसाठीसुद्धा ( human Safety)प्रसिद्ध आहे.त्यासाठी कोणत्याही साईटवर त्यांची गुणवत्ता नियंत्रण अभियंते आणि तंत्रज्ञ तसेच सुरक्षितता अधिकारी यांची चमू सतत कार्यरत असते.इतकेच नव्हे तर, रस्त्यांच्या कामाच्या दर्जा नियंत्रणासाठी, सुसज्ज अशी दर्जा नियंत्रण प्रयोगशाळा ही उभारलेली असते. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून वापरल्या जाणारे मटेरियल आणि करण्यात येत असलेले काम यावर सतत निगराणी ठेवून कामाचा दर्जा राखला जातो.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या निर्धारित दर्जाप्रमाणेच हे काम होईल याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष्य दिले जाते.त्याबाबतीत कसलीही तडजोड स्वीकारली जात नाही.



राज पथ इन्फ्राकॉनचा हा धाडसी प्रयत्न गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या संपूर्ण नियमानुसार होणार आहे. तसेच नॅशनल हायवे ऑथॉरिटीज ऑफ इंडिया (NHAI) द्वारे हा प्रकल्प करारानुसार त्यांच्या देखरेखीत पूर्ण केला जाईल. त्यासाठी ७२८ मनुष्यबळ कार्यरत राहणार आहे. तज्ज्ञ चमूचे कामावर लक्ष राहील. कामाच्या दर्जाची प्रयोगशाळेतून तपासणी देखील करण्यात येणार आहे.


जागितक विक्रमासाठी अभूतपूर्व तयारी
• या विक्रमी प्रयत्नांची अंमलबजावणी करण्यासाठी राज पथ टीमने सूक्ष्म नियोजन केले आहे. प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. यात प्रकल्प व्यवस्थापक, हायवे इंजिनिअर, क्लालिटी इंजिनिअर, सर्व्हेअर, सेफ्टी इंजिनिअर आणि अन्य कर्मचारी यांची चमू तैनात करण्यात आली आहे. त्या या महामार्गावरच, माना कॅम्प येथे व्यवस्थापन थिंक टँक व वॉर रूम उभारण्यात आली आहे. यात ४ हॉट मिक्सप्लांट, ४ व्हीललोडर, १ पेव्हर, १ मोबाईल फिडर, ६ टँडेम रोलर, १०६ हायवा, २ न्युमॅटीक टायर रोलर आदी यंत्रसामग्रीसह ७२८ मनुष्यबळ कार्यरत असतील. यंत्रसामग्री सतत कार्यरत आणि दोषमुक्त ठेवण्यासाठी, टाटा मोटर्सचे ५ इंजिनिअर आणि अन्य ५ अधिकारी येथे तैनात आहेत. ही चमू त्या यंत्रांवर सतत लक्ष ठेवून आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून, रस्ता निर्मितीचा हा विक्रम करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.



साधनसुविधा
विदर्भातील ४५ अंश तापमानांत, हा विक्रम करण्यासाठी, टीमवर्कच्या माध्यमातून हा प्रयत्न केला जाणार आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाईल. यासाठी अकोला - अमरावती मार्गावर माना येथे सुसज्ज कॅम्प उभारण्यात आला आहे. येथे प्रशासकीय आणि अभियांत्रिकी कक्ष,चांगली निवास व्यवस्था,दर्जेदार भोजन व्यवस्था, वाहन देखभाल दुरुस्ती कक्ष, पेट्रोल व डिझेल पंप इत्यादी व्यवस्था आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर, वातानुकुलीत व्यवस्थासुद्धा करण्यात आली आहे.


यापूर्वीचे विक्रम मोडणार
राज पथ इन्फ्राकॉनने सांगली- सातारा दरम्यान,पुसेगाव ते म्हासुर्णे दरम्यान,सतत २४ तास रस्ता तयार करीत विश्वविक्रम स्थापित केला होता. सार्वजनिक कार्य प्राधिकरण- अश्गुल यांनी दोहा, कतार येथे यापूर्वी विक्रम नोंदविला होता. यात त्यांनी सुमारे 242 तास म्हणजेच 10 दिवस नॉनस्टॉप बांधकाम करून, २५ किलोमीटर रस्ता निर्मितीचा विक्रम केला होता. राज पथ इन्फ्राकॉनने आता तो रेकॉर्ड मोडण्याचा चंग बांधला आहे. लोणी-मूर्तीजापूर दरम्यान,विश्वविक्रम रचण्याचा प्रयत्न राहणार आहे. ही आव्हानात्मक कामगिरी यशस्वी झाल्यास, राज पथ इन्फ्राकॉन प्रा. लि. या रस्ते बांधकाम क्षेत्रातील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जागतिक विक्रम नोंदवणारी पहिली भारतीय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल.

- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त राष्ट्राला समर्पित कार्य

विशेष म्हणजे, पायाभूत सुविधा, विशेषत: रस्ते बांधणी आणि फरसबंदी या क्षेत्रात असे लक्ष्य आजवर कधीच ठेवले गेले नाही. म्हणून राज पथ इन्फ्राकॉनने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त हा अथक प्रयत्न आणि हे यश आपल्या राष्ट्राला समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताचे पंतप्रधान, माननीय नरेंद्र मोदी यांनी भारत सरकारमधील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या सक्षम आणि गतिमान नेतृत्वाखाली, ‘गती-शक्ती’ नावाचा एक भव्य महामार्ग बांधकाम प्रकल्प सुरू केला आहे. या विशाल देशामध्ये लोक, वस्तू आणि सेवांच्या वाहतुकीसाठी, एकात्मिक आणि अखंडित, मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी प्राप्त करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.


*राज पथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड बद्दल*
राज पथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड,ही कंपनी भारतातील नामांकित आणि विश्वासार्ह पायाभूत सुविधा कंपन्यांमध्ये प्रशंसित आणि मान्यताप्राप्त अशी कंपनी आहे.आधुनिक बांधकाम यंत्रांच्या सेट-अपच्या सर्व आवश्यक श्रेणींनी सुसज्ज, राज पथ इन्फ्राकॉन टीममध्ये अनुभवी अभियंते आणि मशीन ऑपरेटर यांच्या कुशल आणि अनुभवी मनुष्यबळाचा समावेश आहे. तसेच उद्योगक्षेत्रातील सर्वात योग्य अशा एकसंघ तज्ज्ञांचा उत्साही व्यवस्थापकीय टास्कफोर्स आहे. या बळासह , राज पथ इन्फ्राकॉनने प्रकल्प वेळेवर पूर्ण करून आणि सर्वोच्च आणि कठोर गुणवत्ता मानकांचे पालन करून, भारतीय पायाभूत उद्योगात नवीन मानदंड स्थापित केले आहेत.


पायाभूत सुविधांच्या विकासात विशेष, राजपथ इन्फ्राकॉनने आजपर्यंत राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग तसेच अंतर्गत रस्ते, पूल आणि कालवे, बॅरेजेस आणि धरणांपर्यंतचे विविध प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. राज पथ इन्फ्राकॉनने 8 HAM (हायब्रीड ॲन्युइटी मॉडेल) प्रकल्पांतर्गत बिटुमिनस काँक्रीटस तथा लवचिक फुटपाथसह 450 किलोमीटरचे राज्य महामार्ग रस्ते आणि PQC कठोर फुटपाथ रस्त्यांचे 100 किलोमीटर सिमेंटचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय, भारत (MORTH) द्वारे गेल्या 3 वर्षांत भारतात जाहीर केलेले कंत्राटी प्रकल्प. हे आधीच वितरित केलेल्या अनेक BOT (बांधा, चालवा आणि हस्तांतरित करा) रस्ते प्रकल्पांव्यतिरिक्त आहे.

Amravati Akola murtijapur National Highway road construction Guinness Book of record

शुक्रवार, फेब्रुवारी ०४, २०२२

तरूणीच्या गुप्तांगाचा स्वॅब घेणाऱ्यास १० वर्ष कारावास

तरूणीच्या गुप्तांगाचा स्वॅब घेणाऱ्यास १० वर्ष कारावास

कोरोना तपासणीच्या नावावर अमरावती येथील शासकीय रूग्णालयात तरूणीच्या गुप्तांगाचा स्वॅब घेण्याची संतापजनक घटना घडली होती. याप्रकरणी दोषी नराधमाला १० वर्ष कारावासाची शिक्षा मा.न्यायालयाने ठोठावली.




महाराष्ट्रातील अमरावती येथील सत्र न्यायालयाने कोरोना चाचणीच्या नावाखाली महिलेच्या प्रायव्हेट पार्टचे नमुने घेतल्याप्रकरणी लॅब टेक्निशियनला १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण जुलै 2020 चे आहे, जेव्हा देशात कोरोना विषाणू संसर्गाची पहिली लाट शिगेला पोहोचली होती. ही घटना उघडकीस येताच सगळेच अवाक् झाले असून महिलेच्या प्रतिष्ठेशी खेळणाऱ्या लॅब टेक्निशियनवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली.

महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतर न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली, त्यादरम्यान लॅब टेक्निशियनवरील आरोप खरे असल्याचे निष्पन्न झाले. हे प्रकरण अमरावतीच्या बडनेरा ट्रॉमा केअर युनिटचे आहे, जिथे लॅब टेक्निशियनने महिलेच्या पुढील तपासणीसाठी ती कोविड पॉझिटिव्ह असल्याचे सांगून खाजगी भागातून स्वॅबचा नमुना घेतला. महिलेने आपल्या भावाला आपला त्रास कथन केल्यावर ही बाब उघडकीस आली.

बुधवार, नोव्हेंबर २४, २०२१

 अमरावतीच्या हिंसक घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमुर्तीकडून चौकशी करा #amarawati

अमरावतीच्या हिंसक घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमुर्तीकडून चौकशी करा #amarawati

 अमरावतीच्या हिंसक घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या

निवृत्त न्यायमुर्तीकडून चौकशी करा

भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी

 

            त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसतानाजगात कोठे तरी मशिदीची नासधूस झाल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल करूनमहाराष्ट्रात मालेगावअमरावती व नांदेड येथे नुकत्याच दंगली झाल्या. पंधरा हजार ते चाळीस हजार लोकांचे जमाव रस्त्यावर उतरून दुकानेकार्यालयेगाड्या यांचा विध्वंस केला गेला. या घटनेचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोल्हापुरात तीव्र निषेध करण्यात येत आहे. आज भाजपा प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना भेटून मा मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांना द्यावयाचे निवेदन सादर केले.

            याप्रसंगी माजी मंत्री मा. सुभाषबापू देशमुख,  भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगेभाजपा शहराध्यक्ष राहूल चिकोडेभाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधवभाजपा शहर संघटन सरचिटणीस अशोक देसाईभाजपा ग्रामीण संघटन सरचिटणीस नाथाजी पाटीलसरचिटणीस विजय जाधवविठ्ठल पाटीलदिलीप मेत्रांणीजिल्हा उपाध्यक्ष राहूल देसाई  यांची उपस्थिती होती.

            त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेच्या आधारे मालेगावअमरावती व नांदेड येथे अफवा पसरवून व धार्मिक भावना भडकवून दंगल घडविण्याच्या प्रकाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत करावी,  ही दंगल घडविणाऱ्या सूत्रधारांना व त्यांच्या समर्थकांना अटक केली पाहिजेदंगलीत हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घातली पाहिजेस्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरील कारवाई बंद करावीभारतीय जनता पार्टीच्या नेते – कार्यकर्त्यांवरील पूर्वग्रहदूषित कारवाई थांबवावी आणि त्यांच्याविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेतअशा मागण्या करण्यात आल्या. या सर्व मागण्या आम्ही फक्त राजकीय विरोधीपक्ष म्हणून न करता हि घटना महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याने करत असल्याचे नमूद केले. त्याचबरोबर हे निवेदन मुख्यमंत्री महोदय यांना आहे तसे न पाठवता या जिल्ह्यातील याविषयातील घटनांचा जिल्हास्तरीय अहवाल सोबत पाठवा अशी विनंती देखील करण्यात आली.

            यानंतर माध्यमांशी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील म्हणालेराज्यात अराजकता माजली असून कोणत्याही गोष्टीवर शासनाचा वचक राहिला नाही. पोलीस यंत्रणा हप्तेदडपशाहीन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणा-या लोकांना धाक दाखवण्यापुरती वापरली जात आहे. दंगलखोरांना अभय देण्याचे काम सुरु आहे.  झुंडशाहीची प्रकार घडत आता पोलिसांवर देखील हल्ले होऊ लागले आहेत. फक्त जातीच्या राजकारणासाठीसत्तेच्या हव्यासापोटी अशा गंभीर घटनेकडे कानाडोळा करण्याचे कार्य हे सरकार करत आहे.  २०१४ ते २०१९ मध्ये केंद्रातील मोदीजींचे सरकार आणि २०१४ ते २०१९ मध्ये राज्यात देवेंद्रजी यांचे सरकार असताना एकही दंगल घडली नाही. आता मात्र चाळीस हजाराचे मोर्चे निघत आहेत. याबाबतची माहिती पोलीस यंत्रणेला माहित नसणे हे दुर्देवी आहे. अशा हिंसक मोर्चावर पोलीस कारवाई होत नाही पण अन्याया विरुद्ध लढा देण्यासाठी शांततेने सुरु असणाऱ्या मोर्चावर कारवाई असा अजब न्याय सुरु आहे. या घटनेची निपक्षपणे चौकशी व्हायची असेल तर याची पाळेमुळे शोधून काढली पाहिजेत. त्यामुळे भाजपाच्या वतीने काल झालेली निदर्शनेधरणेनिवेदने हा सरकारला इशारा असल्याचे सांगितले. कान-नाक-डोळे बंद ठेवून आजचा दिवस पुढे ढकलणा-या या राज्यकर्त्याकडे राज्यातील जनता लक्ष ठेवून असून योग्य वेळ धडा शिकवेल असे नमूद केले.



रविवार, ऑगस्ट ०१, २०२१

आणि मंत्र्यानी मारला वाहनचालकास सॅल्यूट!  बातमी वाचाल तर समजेल नेमके कारण.. !

आणि मंत्र्यानी मारला वाहनचालकास सॅल्यूट! बातमी वाचाल तर समजेल नेमके कारण.. !




मारोतीभाऊ किन्हाके, माझ्या शासकीय पोलिस ताफ्यातील वाहन चालक! आज ते शासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत. मंत्री म्हणून कार्यभार सांभाळल्यापासून मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरू शकले ते मारोतीभाऊ यांच्यासारख्या सहकाऱ्यांमुळे. आज त्यांचं औक्षण करून शाल व श्रीफळ देत त्यांचा सत्कार केला. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर 
 Yashomati Thakur यांचे हे ट्विट. आपल्या ताफ्यातील या वाहन चालकास सॅल्युट मारला.

मारुतीराव किन्हाके 1989 साली पोलीस दलात रुजू झाले गेल्या दोन वर्षांपासून ते महिला आणि बालकविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या ताफ्यात कार्यरत आहेत. यशोमती ठाकूर यांच्या वाहनाचं ते राज्यभरात चालक म्हणून ते सारथ्य करीत असतात. मारुतीराव यांची आज सेवानिवृत्ती आहे. कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी त्यांचं औक्षण करून तसेच त्यांना शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार यशोमती ठाकूर Yashomati Thakur यांनी केला. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या मारुतीराव यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या सहकार्याबद्दल गौरवोद्गार काढत त्यांना मंत्री ठाकूर यांनी चक्क सॅल्यूट केला तसेच त्यांना भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या. मंत्र्यांच्या सॅल्युटला मारुतीराव किन्हाके यांनी सॅल्युट केला.




पेज नेव्हिगेशन


शनिवार, जुलै २४, २०२१

 आजपासून दोन दिवस मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन |

आजपासून दोन दिवस मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन |

 आजपासून दोन दिवस मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

Dabur India Blood Donation

 Dabur India Blood Donation

आषाढी एकादशी निमित्त डाबर इंडिया आयुर्वेदिक व शाश्वत आयुर्वेंद व पंचकर्म, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २४ व २५ जुलै रोजी मोफत रोगनिदान ( Dabur India Blood Donation) शिबीराचे आयोजन शाश्वत आयुर्वेदिक व पंचकर्म केंद्र, मशानकर हॉस्पीटल जवळील ग्राऊंडच्या बाजूला स्टेशन ते गोपाल टॉकीज रोड, अमरावती येथे  सकाळी १० ते सायं. ५.०० वाजेपर्यंत करण्यात आले असून अमरावती तसेच इतर ग्रामीण परिसरातील नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन डाबर इंडिया तर्फे डॉ अशोक ढोबळे, रेहान खान व गौरव धर्मे यांनी केले आहे.


प्रथम नोंदणी करणा-या २०० रूगणांना मोफत रोगनिदान व औषधोपचारात १०% सूट व पंचकर्मावर २५% सूट देण्यात येणार आहे.  या शिबीरात गुडघेदुखी, मान, पाठ, कंबरदुखी, संधीवात, आमवात, मनक्यात गैप, स्पॉंडेलायसीस, सायटिका, रूमाटाईड अर्थोरायटीस आणि दमा, पोटाचे आजार, अल्सर, ऐसिडीटी, मूळव्याध, त्वचारोग तसेच पाळीच्या सर्व तक्रारी, वंध्यत्व पी सी ओ डी, उंची वाढविणे, वजन कमी करणे यासारख्या इतर आजारांवर तज्ञ व नामवंत डॉक्टर उपचार करणार आहेत. त्यामध्ये वैद्य मंगेश हेडाऊ, आयुर्वेदाचार्य बालरोग व दमातज्ञ व वैद्य शुभांगी हेडाऊ (क्षीरसागर) एम. डी. (आयु.)स्त्रीरोग व पंचकर्मतज्ञ यांचा समावेश आहे.  शिबीरस्थान व नोंदणीसाठी रुग्णांनी 8208709858 व 9422344266 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आयोजकाकडून आवाहन करण्यात आले आहे.




रविवार, मार्च २८, २०२१

आत्महत्येपूर्वी दीपालीने पतीला लिहिलेले भावनिक पत्र:  वाचा तिच्याच शब्दात

आत्महत्येपूर्वी दीपालीने पतीला लिहिलेले भावनिक पत्र: वाचा तिच्याच शब्दात



आपल्या बाळाला गमावलं... मला माफ कर तुला लग्नात दिलेली सगळी वचन अर्धवट सोडून मी जात आहे

आत्महत्येपुर्वी दिपालीने पतीला लिहीलेले भावनीक पत्र

वाचा तिच्याच शब्दात
अमरावती - मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी एकूण तीन सुसाईट नोट लिहल्याच समोर आलं आहे. पहिले पत्र वरिष्ठ अधिकारी श्रीनिवास रेड्डी यांना तर दुसरे पतीला आणि तिसरे आई शंकुतला चव्हाण यांच्या नावे आहे. हे तिनही पत्र धारणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दीपालीने पती राजेश मोहिते यांना लिहीलेले पत्र अतिशय भावनिक आहे. वाचा तिच्याच शब्दात...
प्रिय नवरोबा,
लिहून लिहून थकले. खूप डोकं दुखत आहे. मला तुझी आठवण येत आहे. तुमच्या सोबत बोलत बोलत मी तुम्हाला पत्र लिहीत आहे. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. आता नाही म्हणू शकत जिवापेक्षा जास्त कारण आता मी जीव देत आहे...
साहेब मला काय काय बोलले ते सगळं मी तुला सांगितलं. तू मला शांत राहायला सांगतोय मी शांत राहते. पण मला सहन नाही होत. तू नेहमी म्हणतोस माझी हार्डडिस्क भरली आहे. खरंच भरली आहे. साहेबाने मला पागल करून सोडलय. माझा इतका अपमान कधीच कोणी केला नाही जितका शिवकुमार साहेब करतात... मी खूप सहन केलं पण, आता माझी लिमिट खरच संपली आहे... यावर उपाय असू शकतो. मी सुट्टी घेऊ शकते पण, सुट्टी देखील तो मंजूर करत नाही. तुझ्याशी बोलायला हवं होत. मी तुझी वाट पाहत होते घरी यायची... आज आई पण गावी गेली. घरी कोणीच नाहीये घर खायला उठत आहे. मी हे पाऊल उचलत आहे मला माफ कर. जगातला सगळ्यात चांगला नवरा तु आहेस. माझ्यावर खूप प्रेम करतोस... मला मानसिक त्रास होत आहे म्हणून तू माझ्या जवळ येऊन राहिलास. आपण रेड्डी सरांना सगळं सांगून सुद्धा त्याच त्रास देन कमी झालं नाही.
मला माफ कर मी आपल्या बाळाला गमावलं... मला माफ कर तुला लग्नात दिलेली सगळी वचन अर्धवट सोडून मी जात आहे... आपल्या संसाराला नजर लागली.. माझ्या बोलण्याने मी कधी तुला दुखावलं असेल तर मला माफ कर. मी नेहमी म्हणते तू मला सोडून नको जाऊ पण, आज मी तुला सोडून जात आहे. माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार विनोद शिवकुमार, उपवनसंरक्षक गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा यास धरावे. त्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी जीव देत आहे. आपला संसार अपूर्ण राहिला. पुढच्या जन्मी आपण नव्याने सुरुवात करू. माझ्यासाठी तू सगळं काही केलंस मीच कमी पडत आहे. माझी हार्डडिक्स फुटत आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे. मला माफ कर. माझ्या मृत्यूला सर्वस्वी जबाबदार शिवकुमार आहे...
- दीपाली...

शनिवार, मार्च २७, २०२१

  दीपाली चव्हाण आत्महत्या : अमरावतीत तणाव; आरोपी शिवकुमारला पोलिसांची मानवी साखळी करून कोर्टात नेले

दीपाली चव्हाण आत्महत्या : अमरावतीत तणाव; आरोपी शिवकुमारला पोलिसांची मानवी साखळी करून कोर्टात नेले




वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर अमरावतीत तणाव निर्माण झाला आहे. आरोपी शिवकुमारला ताब्यात देण्याची मागणी करीत शेकडो महिलांनी पोलिस ठाण्यात धडक दिली. यावेळी महिला आक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी मानवी साखळी करून आरोपीला कोर्टात हजर केले.  शिवकुमारला धारणी न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.  

last Update 26/3/2021
#RFO दीपाली आत्महत्या : उपवनसंरक्षक शिवकुमार सेवेतून निलंबित

विशाखा समित्या तात्काळ कार्यरत होणार; संकटग्रस्त महिलांनी थेट संपर्क साधण्याचे आवाहन

अप्पर प्रधान मुख्य संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना सहआरोपी करणार

दीपालीच्या पार्थिवावर मोरगाव येथे होणार अंत्यसंस्कार

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. प्रारंभी दीपालीच्या कुटुंबातील सदस्य व बेलदार समाज संघटना यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नकार दिला. शवविच्छेदन गृहासमोर दिवसभर धरणे आंदोलन केले. त्यांनतर पोलिसांनी सहआरोपी म्हणून अप्पर प्रधान मुख्य संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे पोष्टमार्टेम सुरू झाले. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. दिपालीच्या पार्थिवावर मोरगाव ता. नांदगाव जि. अमरावती येथे अंत्यसंस्कार होणार असून, पार्थिव गावी रवाना करण्यात आले.

दरम्यान, आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक शिवकुमार यांना अमरावती पोलीसांनी आज नागपुरातून अटक केली. दक्षिणेतील कर्नाटक या त्यांच्या मूळगावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या शिवकुमार यांना नागपूर रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी ताब्यात घेतले. आज सायंकाळी त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.


दिवंगत श्रीमती दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येसंदर्भात श्री . विनोद शिवकुमार , उपवनसंरक्षक , गुगामल वन्यजीव विभाग , चिखलदरा यांचेविरुध्द धारणी पोलीस ठाणे येथे भारतीय दंड विधान संहितेमधील कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल झाला असून त्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे . त्यांच्या निलंबनाचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत . यास्थितीत उपवनसंरक्षक , गुगामल वन्यजीव विभाग , चिखलदरा या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री . अविनाश कुमार , भावसे , उपवनसंरक्षक ( वन्यजीव ) , सिपना विभाग यांचेकडे पुढील आदेश होईपर्यंत सोपविण्यात येत आहे . त्याचप्रमाणे , दिवंगत श्रीमती दीपाली चव्हाण यांनी श्री . विनोद शिवकुमार यांच्या वर्तणुकीबाबत वेळोवेळी अवगत करुनही श्री . एम . एस . रेड्डी , अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक , मेळघाट व्याघ्र प्रकल्प , अमरावती यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही . सदरची बाब देखील गंभीर आहे . त्यामुळे त्यांना सदर पदावरुन अन्यत्र पदस्थापना देण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे . यास्तव , श्री . रेड्डी यांची अन्यत्र पदस्थापना होईपर्यंत त्यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वनबल प्रमुख ) , नागपूर यांचे कार्यालयात हजर राहून पुढील आदेशाची प्रतिक्षा करावी व सद्यस्थितीत त्यांच्या पदाचा कार्यभार श्री.प्रविण चव्हाण , भावसे , मुख्य वनसंरक्षक ( प्रा . ) , अमरावती यांचेकडे सोपविण्यात येत आहे . सदरचे पत्र सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्यांचे मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे .






मेळघाट व्याघ्र प्रकल्पातंर्गत येणाऱ्या हरीसाल येथील वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून गुरूवारी आत्महत्या केल्याने खळबळ माजली होती. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दीपाली चव्हाण यांच्या सुसाइड नोटमध्ये काही वरीष्ठ अधिकार्‍यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. या अनुषंगानेच उपवनसंरक्षक शिवकुमार यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी चौकशी करून आणखी काही वरिष्ठ अधिकारी दोषी आहेत का हे तपासून पुढील कारवाई करण्यात येईल असे अमरावतीचे पोलीस अधीक्षक डॉ. हरीबालाजी एन यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या शिवकुमार यांना अमरावतीच्या न्यायालयात आज हजर करण्यात येणार आहे. अत्यंत धाडसी स्वभावाच्या चव्हाण यांनी आत्महत्या केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दीपाली चव्हाण आपल्या आईसोबत मेळघाटात राहात होत्या. मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास चव्हाण यांनी आईला बाहेरगावी पाठवले. गावाला गेल्यानंतर आईने फोन केला असता त्यांनी मोबाइल उचलला नाही. म्हणून त्यांच्या आईने हरिसाल येथे शेजारील गार्डशी संपर्क साधून घरी जाऊन पाहायला सांगितले. गार्डने घरी जाऊन पाहिले असता त्या घरात पडलेल्या आढळल्या. त्यांच्या शेजारी पिस्तुल पडलेले होते. चव्हाण यांच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा गावकर्‍यांमध्ये होती. चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाइड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.


आत्महत्येप्रकरणीउपवनसंरक्षक शिवकुमार यांना अमरावती पोलीसांनी आज नागपुरातून अटक केली. दक्षिणेतील कर्नाटक या त्यांच्या मूळगावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या शिवकुमार यांना नागपूर रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी ताब्यात घेतले. गुरूवारी ही घटना घडल्यानंतर शिवकुमार शुक्रवारी नागपूर रेल्वे स्थानकातून कर्नाटककडे जाणार्‍या एक्स्प्रेसमध्ये बसत असताना, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. शिवकुमारना घेऊन पोलीस आता अमरावतीच्या दिशेने निघाले आहेत. त्यांना आधी अमरावती येथे आणि नंतर धारणी येथे नेण्यात येईल. शिवकुमार यांच्या वरिष्ठांची देखील आवश्यकता भासल्यास चौकशी केली जाईल, असे अमरावतीचे पोलीस अधीक्षक डॉ. हरीबालाजी एन यांनी सांगितले.


महिला वन परिक्षेत्र अधिकारी आत्महत्या प्रकरणी

जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी

मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

·      विशाखा समित्या तात्काळ कार्यरत करण्याचे सर्व विभागीय आयुक्तांना निर्देश

 

            मुंबईदि. 26 : हरीसालता. धारणी (जि. अमरावती) येथे कार्यरत वन परिक्षेत्र अधिकारी श्रीमती दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जबाबदार अधिकाऱ्यावर त्वरित गुन्हे दाखल करून निलंबित करावेअशी मागणी महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

            श्रीमती दिपाली चव्हाण यांनी स्वत:च्या रिव्हॉल्वरने गोळ्या घालुन दि. 25 मार्च2021 रोजी आत्महत्या केलेली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात त्यांनी गुगामल वन्यजीव विभागचिखलदराचे उप वनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. तरी या प्रकरणामध्ये संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करुन त्वरित निलंबन करण्यात यावेअशी मागणी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

            त्याचबरोबर या आत्महत्या प्रकरणात दोषींवर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री ॲड. ठाकूर यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

विशाखा समित्या तात्काळ कार्यरत करा

            कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमानुसार राज्यात सर्व शासकीय कार्यालयांमध्ये विशाखा समित्या स्थापन करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या असून जर कोठे या समित्या कार्यान्वित नसल्यास त्या तातडीने पंधरा दिवसांच्या आत कार्यान्वित कराव्यात तसेच या समित्यांच्या नियमित बैठका घेऊन महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यात यावेअसे निर्देशही ॲड. ठाकूर यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिले आहेत.

संकटग्रस्त महिलांनी थेट संपर्क साधावा

            लैंगिकमानसिक छळाची समस्या असल्यास महिलांनी आपल्याशी थेट संपर्क साधावाअसे आवाहनही मंत्री ॲड. ठाकूर यांनी केले आहे.



या नोट मधुन लक्षात येते की, मागील वर्षापासुन कशा पध्दतीने एक महिला अधिकारी वरिष्ठांच्या जाचाला सामोरं जात होती. वेळोवेळी वरिष्ठांना याबाबत सांगुन सुध्दा, तक्रार करून सुध्दा सुधारणा होण्याएवजी यात भरच पडत गेलेली दिसुन येते. सोबत आरोग्याच्या समस्या, प्रेगनंट असतांना सुध्दा त्याकडे दुर्लक्ष करीत नाहक त्रास दिला गेला. वेळोवेळी कित्येकदा कनिष्ठ कर्मचारी, गावकरी यांचेसमोर अपशब्द बोलणे, रात्रीच्या वेळेस एकाटयाने बोलावणे, एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणे, वरिष्ठाच्या मर्जीप्रमाणे न वागण्याची शिक्षा दिली जात असल्याचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांचे नावाने ही नोट लिहीत उपवनसंरक्षक शिवकुमार यांचेविषयी लिहतांना, दिपाली चव्हाण हिने आपल्या आत्महत्येस सर्वस्वी जवाबदार विनोद शिवकुमार, उप वनसंरक्षक यांना ठरविले आहेत.

यांसदर्भात शासन आणि वनविभागाने त्वरीत गंभीर दखल घेत, आरोपीस शिक्षाच नाही तर या प्रकरणाची सखोल चैकशी करून यात दोषी असणारे इतर अधिकारी यांचेवर कायदेशीर कार्यवाही झाली पाहीजे. तसेच महीला अधिकारी-कर्मचारी विषयी अशा पध्दतीने वागणारी मानसिकताच ठेचुन काढली पाहीजे याकरीता कठोर पावले उचलण्याची गरज आहे. आपणाकडून अपेक्षा आहे की, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात यावी, ही विनंती...!
बंडू धोतरे,
अध्यक्ष, इको-प्रो...

शुक्रवार, मार्च १२, २०२१

DoctorOfLiterature : शंकरबाबा पापळकर यांना मिळणार डि.लीट मानद पदवी

DoctorOfLiterature : शंकरबाबा पापळकर यांना मिळणार डि.लीट मानद पदवी




संत गाडगे बाबा #अमरावती विद्यापीठाची अधिसभा कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचे अध्यक्षतेखाली आज आभासी पध्दतीने संपन्न झाली. या सभेत वझ्झर, अचलपूर येथील स्व . अंबादासपंत वैद्य दिव्यांग अनाथालयाचे शंकरबाबा पापळकर यांची डि.लीट मानद पदवीकरिता एकमताने निवड करण्यात आली.
#विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने समाजकार्यामध्ये बहुमूल्य योगदान देणारे श्री शंकरबाबा पापळकर यांना विद्यापीठाची मानद डि.लीट. देण्याचा निर्णय घेतला होता.
संपन्न होणा­या 37 व्या दीक्षांत समारंभामध्ये त्यांना ससन्मान डि.लीट मानद पदवी प्रदान केल्या जाणार आहे.
#DoctorOfLiterature

शुक्रवार, फेब्रुवारी १९, २०२१

 अमरावती, यवतमाळमध्ये कोरोना विषाणूचा  परदेशी स्ट्रेन नाही

अमरावती, यवतमाळमध्ये कोरोना विषाणूचा परदेशी स्ट्रेन नाही



                                                                    - आरोग्य विभाग

 

मुंबईदि.19: अमरावतीयवतमाळसातारा आणि पुणे अशा राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे.  या वाढीची कारणे शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. या भागातील करोना विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये काही बदल झालेला आहे काया संदर्भातही पाहणी करण्यात येत आहे असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. 

            आतापर्यंत अमरावती,यवतमाळसातारा या भागातील प्रत्येकी चार नमुने पुणे येथील बी जे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तपासण्यात आले असून या नमुन्यांच्या तपासणी अहवालानुसार या जिल्ह्यांमधील विषाणूमध्ये ब्रिटन,दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझील या देशांमध्ये आढळलेल्या नवीन विषाणू प्रकारासारखा कोणताही बदल दिसून आलेला नाही.

            पुण्यातील 12 नमुने देखील या वैद्यकीय महाविद्यालयात तपासण्यात आले असून त्यामध्येही जनुकीय क्रमामध्ये कोणतेही बदल दिसून आलेले नाहीत.

            या अनुषंगाने अधिक तपासणी सुरू असून अकोलाअमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यातील आणखी काही नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थापुणे या ठिकाणी जनुकीय तपासणी करता पाठवण्यात आले आहेत. या संदर्भातील सविस्तर अहवाल पुढील आठवड्यापर्यंत मिळण्याची शक्यता आहे.


शनिवार, डिसेंबर ०५, २०२०

येत्या १ मे पर्यंत शिर्डीपर्यंत जाऊ आणि त्याच्या पुढच्या १ मे पर्यंत मुंबईपर्यंत पोहोचलेलो असू - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

येत्या १ मे पर्यंत शिर्डीपर्यंत जाऊ आणि त्याच्या पुढच्या १ मे पर्यंत मुंबईपर्यंत पोहोचलेलो असू - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 


          

 नागपूर, दि. 5 :   मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज अमरावती जिल्ह्यातील शिवणी (रसुलपूर) येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी केली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणाले,

आज प्रथमच मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे महामार्ग या प्रकल्पाची पाहणी करायला आलो. या प्रकल्पाचे अप्रतिम काम चालू आहे. हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा ज्याचा महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा आपल्या देशातील सर्वोत्तम महामार्ग बनेल, असं काम आपण केलेलं असेल.

आपण हे काम गतीने करतो आहे. लॉकडाऊनच्या काळात असं वाटलं होतं की कामात खंड पडेल किंबहुना काम थोडंसं हळुवारपणे होईल पण त्या काळात सुद्धा प्रकल्पाचं काम मंदावलेलं नाही. मला खात्री आहे, येत्या १ मे पर्यंत आपण नागपूर ते शिर्डी प्रवास या रस्त्यावरून करू शकू. या मार्गाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललं आहे, सर्वतोपरी काळजी घेऊन आपण हे काम पूर्ण करत आहोत. येत्या १ मे पर्यंत आपण शिर्डीपर्यंत जाऊ आणि त्याच्या पुढच्या १ मे पर्यंत आपण मुंबईपर्यंत पोहोचलेलो असू.

 

 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे

नागपूर विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास नागपूर विमानतळावर आगमन झाले. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची ते अमरावती जिल्ह्यामध्ये पाहणी करणार आहेत. यासाठी नागपूर येथून हेलिकॉप्टरने ते लगेच अमरावतीकडे रवाना झाले.

       तत्पूर्वी, नागपूर विमानतळावर विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री विशेष विमानाने नागपूर येथे आले होते. या ठिकाणावरून अमरावतीकडे हेलिकॉप्टरने रवाना झालेत. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील शिवणी रसुलापूर हेलिपॅडवरून ते मौजे देऊळगव्हाण येथे पोहोचणार आहेत. याठिकाणी उतरून ते समृद्धी महामार्गाची पाहणी करतील. 

      त्यानंतर दुपारी सव्वाबारा वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील मौजे गोळवाडीकडे प्रयाण करतील. दोन वाजता गोळवाडी हेलिपॅड येथे आगमन व समृद्धी महामार्गाची पाहणी ते करणार आहेत. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता औरंगाबाद तेथून ते विमानाने मुंबईला प्रयाण करतील.

     आज सकाळी साडेदहा वाजता नागपूर विमानतळावर विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासह अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर व अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी देखील नांदगाव खंडेश्वरकडे प्रयाण केले.

       विमानतळावरील त्यांच्या स्वागतासाठी यावेळी खासदार कृपाल तुमाने उपस्थित होते. याशिवाय महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, अप्पर पोलीस आयुक्त दिलीप झळके, सुनील फुलारी, उपायुक्त नरुल हसन, बसवराज तेली, जिल्हा पोलीस अधीक्षक ( ग्रामीण ) राकेश ओला, वरिष्ठ विमानतळ अधिकारी आबीद रूही, विमानतळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंतराव सराटकर उपस्थित होते.

 

मंगळवार, डिसेंबर १०, २०१९

चिडलेल्या शेतकऱ्याने शुवैद्यकीय उपायुक्तांच्या टेबलवर ठेवली मेलेली शेळी

चिडलेल्या शेतकऱ्याने शुवैद्यकीय उपायुक्तांच्या टेबलवर ठेवली मेलेली शेळी


Dead goat livestock deputy commissioner | मृत शेळी पशुधन उपायुक्तांच्या दालनात
अमरावती:
 चांदूर बाजार येथील पशुवैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने शेतकऱ्याची   १६ हजार रुपये किमतीची शेळी दगावली. या प्रकाराने चिडलेल्या शेतकऱ्याने मृत शेळी अमरावती येथील पशुसंवर्धन सहउपायुक्त राजेंद्र पेठे यांच्या चेंबरमध्ये आणली.रवि पाटील असे आंदोलक शेतकऱ्याचे नाव आहे .  

चांदुर बाजार तालुक्‍यातील बेसखेडा येथे रवि पाटील यांच्या मालकीचे गोटफार्म आहे. या ठिकाणी असलेल्या शेळ्यांपैकी एक, राजस्थान येथून आणलेली १६ हजार रुपये किमतीची शेळी आजारी पडली. तिच्यावर बेलोरा व चांदूर बाजार येथील पशुदवाखान्यात उपचारासाठी आणले.
सदर शेळीची प्रकृती अधिकच खराब झाल्यामुळे पाटील यांनी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी संपर्क केला. मात्र, कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.
अधिकारीच मुख्यालयी राहत नसल्याने शेळी दगावल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

शनिवार, जुलै २०, २०१९

महावितरणच्या नवरदेवाला महावितरणने दिला घरच्या अहेरासोबत 'शॉक'

महावितरणच्या नवरदेवाला महावितरणने दिला घरच्या अहेरासोबत 'शॉक'

अमरावती/प्रतिनिधी: 

अमरावती महावितरण कार्यालयासमोर उपोषण मंडपात लग्न करण्याच्या तयारीत असलेल्या महावितरणच्या उपोषणकर्त्या नवरदेवाला महावितरणने घरच्या अहेरासोबत चांगलाच 'शॉक'दिला.

बदली प्रक्रियेत झालेल्या अन्यायाला वाचा फोडत महावितरणचे सात कर्मचारी ९ जुलैपासून उपोषणाला बसले. त्यातलाच एक निखिल अरुण तिखे होता.या लग्नाला त्यांनी जिल्ह्यातील सर्व राजकीय नेते, शासकीय अधिकारी, पोलीस आयुक्त, यांनाही निमंत्रण पाठवले. उपोषण मंडपातच त्याला हळद लावण्यात आली आणि शुक्रवारी याच मंडपात त्याचे दोनाचे चार होणार होते.पण महावितरणने हाय व्होल्टेजचा झटका देत त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला. 

महावितरण नाराज असलेला निखिल गुरुवारी वरात घेऊन उपोषण मंडपात पोहोचला ,त्याच उपोषण मंडपात निखिलला हळद लावण्यात आली आणि उपोषण मंडपात निखिलचे लग्न होणार होते. मात्र, महावितरणतर्फे एक पत्रक काढून उपोषणकर्त्याना कारवाई करण्याचे संकेत देताच निखिलने आपले लग्न नियोजित स्थळीच उरकले ,लग्न करण्याचा निर्णय मागे घ्या, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. 

तसेच त्याहून अधिक कठोर करवाईही होऊ शकते असा धमकीवजा समज कंपनीने दिल्याने निखिल तिखे व उपोषणकर्त्यांना दिला होता,महावितरणतर्फे आपल्या मागण्या पूर्ण करण्याचे तोंडी आश्वासन मिळाले असल्याने उपोषण मंडपातील लग्न सोहळा स्थगित करण्यात आल्याचे संघटनेच्या अध्यक्षांनी सांगितले.

महावितरणच्या घरच्या आहेरासोबत मिळालेल्या शॉकचा धसका घेत नवरदेव वरात घेऊन आपल्या पूर्वीच्या नियोजित स्थळीच गेला व लग्न उरकले.

या घटनेनंतर इतर महावितरणच्या कर्मचारयांच्या मनात देखील धास्ती निर्माण झाली आहे,आपण विभागाच्या विरोधात गेल्यास आपल्याही वरिष्ठ ४४० व्होल्टेजचा झटका देऊ शकतात,अशी चिंता कर्मचाऱ्यांच्या मनात सतावू लागली आहे.
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध