Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च २८, २०२१

आत्महत्येपूर्वी दीपालीने पतीला लिहिलेले भावनिक पत्र: वाचा तिच्याच शब्दात



आपल्या बाळाला गमावलं... मला माफ कर तुला लग्नात दिलेली सगळी वचन अर्धवट सोडून मी जात आहे

आत्महत्येपुर्वी दिपालीने पतीला लिहीलेले भावनीक पत्र

वाचा तिच्याच शब्दात
अमरावती - मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी एकूण तीन सुसाईट नोट लिहल्याच समोर आलं आहे. पहिले पत्र वरिष्ठ अधिकारी श्रीनिवास रेड्डी यांना तर दुसरे पतीला आणि तिसरे आई शंकुतला चव्हाण यांच्या नावे आहे. हे तिनही पत्र धारणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दीपालीने पती राजेश मोहिते यांना लिहीलेले पत्र अतिशय भावनिक आहे. वाचा तिच्याच शब्दात...
प्रिय नवरोबा,
लिहून लिहून थकले. खूप डोकं दुखत आहे. मला तुझी आठवण येत आहे. तुमच्या सोबत बोलत बोलत मी तुम्हाला पत्र लिहीत आहे. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. आता नाही म्हणू शकत जिवापेक्षा जास्त कारण आता मी जीव देत आहे...
साहेब मला काय काय बोलले ते सगळं मी तुला सांगितलं. तू मला शांत राहायला सांगतोय मी शांत राहते. पण मला सहन नाही होत. तू नेहमी म्हणतोस माझी हार्डडिस्क भरली आहे. खरंच भरली आहे. साहेबाने मला पागल करून सोडलय. माझा इतका अपमान कधीच कोणी केला नाही जितका शिवकुमार साहेब करतात... मी खूप सहन केलं पण, आता माझी लिमिट खरच संपली आहे... यावर उपाय असू शकतो. मी सुट्टी घेऊ शकते पण, सुट्टी देखील तो मंजूर करत नाही. तुझ्याशी बोलायला हवं होत. मी तुझी वाट पाहत होते घरी यायची... आज आई पण गावी गेली. घरी कोणीच नाहीये घर खायला उठत आहे. मी हे पाऊल उचलत आहे मला माफ कर. जगातला सगळ्यात चांगला नवरा तु आहेस. माझ्यावर खूप प्रेम करतोस... मला मानसिक त्रास होत आहे म्हणून तू माझ्या जवळ येऊन राहिलास. आपण रेड्डी सरांना सगळं सांगून सुद्धा त्याच त्रास देन कमी झालं नाही.
मला माफ कर मी आपल्या बाळाला गमावलं... मला माफ कर तुला लग्नात दिलेली सगळी वचन अर्धवट सोडून मी जात आहे... आपल्या संसाराला नजर लागली.. माझ्या बोलण्याने मी कधी तुला दुखावलं असेल तर मला माफ कर. मी नेहमी म्हणते तू मला सोडून नको जाऊ पण, आज मी तुला सोडून जात आहे. माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार विनोद शिवकुमार, उपवनसंरक्षक गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा यास धरावे. त्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी जीव देत आहे. आपला संसार अपूर्ण राहिला. पुढच्या जन्मी आपण नव्याने सुरुवात करू. माझ्यासाठी तू सगळं काही केलंस मीच कमी पडत आहे. माझी हार्डडिक्स फुटत आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे. मला माफ कर. माझ्या मृत्यूला सर्वस्वी जबाबदार शिवकुमार आहे...
- दीपाली...

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.