Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

अमरावती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अमरावती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, जानेवारी १०, २०२३

अमरावती येथे आले देशभरातील किन्नर; नेमके संमेलन आहे तरी काय? Amravati Transgender Maharashtra

अमरावती येथे आले देशभरातील किन्नर; नेमके संमेलन आहे तरी काय? Amravati Transgender Maharashtra

अंबादेवी, एकवीरा देवीची भरली ओटी  

अमरावती येथे आले देशभरातील किन्नर; नेमके संमेलन आहे तरी काय? Amravati Transgender Maharashtra


काेरोनानंतर पहिल्यांदाच अमरावती येथे संमेलनाच्या माध्यमातून किन्नर एकवटले आले आहे. सोमवारी काढलेल्या कलश यात्रेत किन्नरांनी डोक्यावर चांदीचा कलश होता. जागोजागी किन्नरांच्या कलश यात्रेवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. खुल्या जीपमध्ये आयोजकांसह काही प्रमुख किन्नर बसले होते. यावेळी चौका-चौकात किन्नारांचे स्वागत करण्यात आले. 
amravati transgender Maharashtra


देशभरातील मंगलमुखी किन्नरांचे १ ते १५ जानेवारी दरम्यान राष्ट्रीय संमेलन अमरावतीत होत आहे. याच श्रृखंलेत सोमवारी शहरातील प्रमुख मार्गावरून कलश यात्रा काढण्यात आली. अंबादेवी, एकवीरा देवीची पूजा अर्चा करून किन्नरांनी ओटी भरली. कलश यात्रेत ढोल ताशे, ढोल- नगारा, डीजेवर किन्नारांनी सादर केलेले नृत्य लक्ष वेधून घेणारे होते.


अमरावतीच्या धर्मादाय कॉटन फंड येथे गत नऊ दिवसांपासून हे संमेलन सुरु आहे. देशभरातून ग्वालियर, दिल्ली, ईंदूर, द्रुर्ग, आग्रा, मुंबई, नागपूर, हैद्राबाद, बंगळुरू, अकोला यासह अनेक शहरातून साडेतीन हजाराच्यावर किन्नरांनी या संमेलनाचा हजेरी लावलेली आहे. या मेळाव्याला मंगलमुखी संमेलन असे नाव देण्यात आलेले आहे. सोमवारी सर्व किन्नरांनी धर्मदाय कॉटन फंडपासून अंबादेवीपर्यंत कलश यात्रा काढली. यात नाचत गाजत किन्नर हे देवीच्या दर्शनाला गेले. अंबादेवी व एकवीरा देवीच्या मंदिरात किन्नरांनी ओटी भरली तसेच कलश अर्पण केले.


The national conference of transgenders is being held in Amravati from January 1 to 15. In all, 600 transgenders from all over the country reached Amravati to attend the meeting. Neha Nayak, along with another transgender, explained the difficulties they are facing in society.



बुधवार, सप्टेंबर १४, २०२२

 राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी पदाधिकारी करणार पाहणी दौरा raj thakrey nagpur

राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी पदाधिकारी करणार पाहणी दौरा raj thakrey nagpur

येत्या 18 सप्टेंबरपासून राज ठाकरे विदर्भ दौऱ्यासाठी नागपुरात दाखल होत आहेत. त्यापूर्वी आज मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर, प्रदेश उपाध्यक्ष आनंद एम्बडवार आणि मनसेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते नागपुरात दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी ही टीम नागपूर चंद्रपूर आणि अमरावती येथील दौरा १५, १६ आणि १७ सप्टेंबर असे तीन दिवस करणार आहेत.



१७_सप्टेंबरला नागपूर येथे रेल्वेने रवाना होतील. १८_सप्टेंबर रोजी सकाळी नागपूर येथे त्यांचं आमगन होईल. त्यानंतर, १८ आणि #१९ सप्टेंबर रोजी निवडणुकांसाठी #पदाधिकारी आणि #कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. २०_सप्टेंबरला १ दिवसीय चंद्रपूर दौऱ्यावर जातील. २१ सप्टेंबर रोजी अमरावती दौरा करतील. २१ आणि २२ सप्टेंबर रोजी पुन्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतील. #२३_सप्टेंबर रोजी ते #मुंबई येण्यासाठी रवाना होतील. 


रविवार, जून ०५, २०२२

अंतर 34 किमी, मग 75 चे उद्दिष्ठ कसे; जाणून घ्या

अंतर 34 किमी, मग 75 चे उद्दिष्ठ कसे; जाणून घ्या

राष्ट्रीय महामार्गाचे ५१ तास; 17845 रानिंग मीटर रस्त्यांचे काम पूर्ण




लोणी ते मुर्तीजापूर 75 किमी कसे?




अनेकांना एकच प्रश्न पडला आहे, की अकोला महामार्गावरील लोणी ते मुर्तीजापूर अवघ्या 34 किमीचे अंतर असताना 75 किमीचा वर्ल्ड रेकॉर्ड कसा बनत आहे ? , नियमानुसार चौपदीकरणाचा मार्ग हा एकुण 18 मीटर रुंदीचा असतो. या मार्गाची एक बाजु ही साधारणत: 9 मीटरची रुंदीची असते, या 9 मीटरचे दोन भाग म्हणजे दुपदरी, अशा प्रमाणे 4.5 मी. अधिक 4.5 मी.याप्रमाणे या मार्गाच्या निर्माण कार्याची लेंन मोजल्या जाते. या दोन लेनचे काम हे डबलने मोजल्या जाते. जे एकुण 75 किमीचे होत आहे. या कामावर कायमस्वरुपी ड्रोन व व्हिडीओ कॅमेरे लक्ष ठेवून आहेत. इतकेच नाहीतर गिनीज बुकची 12 लोकांची अत्यंत प्रशिक्षीत व जानकार टीमही याचे मोजमाप करित आहे. अमेरिकेच्या अॅक्युवेदर या संस्थेकडून हवामानाची माहिती काढल्यानंतरच 3 ते 7 जून कामाचे दिवस निवडले गेले आहे.

राष्ट्रीय महामार्ग-6 वर लोणी ते मुर्तीजापूर पर्यंत एकूण 5 दिवसात 75 किलोमीटरचा महामार्ग पुर्ण करुन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मिळविण्याचे ध्येय घेऊन राजपथ इंफ्राकॉनची 750 लोकांची टीम हळूहळू आपल्या लक्षपुर्तीकडे जात आहे. माना गावाच्या 1 किलोमीटर अगोदर असलेल्या तीन पुलांमुळे निर्माण झालेली गुंतागुतीची प्रक्रीया शनिवार (4जून) रोजी पुर्ण करण्यात आली. यावेळी तब्बल दिड तासाहून अधिक काळ या मार्गावर वाहतुक खोळंबली होती. परंतू हा टप्पा पुर्ण करुन लगेच वाहतुक नियमीत करण्यात आली. 5 जून रोजी 2 days, 3 तासाचा (एकूण ५१ तास) कालावधी उलटून गेला तेव्हा 17845 रानिंग मीटर म्हणजेच दोन लेन मिळून 35 किमीचे काम निर्विघ्नपणे पार पडले होते.

व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम म्हणाले की, कोरोना काळात कंपनीचे 1200 व इतर असे 1700 कर्मचा:यांच्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न माझ्यासमोर उद्भवला होता. मोठ्याप्रमाणात नकारात्मकता निर्माण झालेली होती. परंतू खचून न जाता, सर्वांना 100 टक्के वेतन दिले. कोरोना काळातच कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाची वाडी येथे 30 किलोमीटरच्या मार्गाचे अत्यंत कमी वेळात काम संपवुन आम्ही लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदविला. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याहून मोठा विक्रम महामार्गाच्याबाबतीत करावा अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर आम्ही लोणी ते मुर्तीजापूर या मार्गावर विश्वविक्रम करण्याचे ठरविले आणि कामाला लागलो. हा विक्रम केला जात असताना मार्गाच्या गुणवत्तेसोबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही. येथून 15 वर्ष या मार्गाला काही होणार नाही, याची हमीसुध्दा जगदीश कदम यांनी यावेळी घेतली. शिवाजी महाराजांच्या चरित्रातून अनेक गोष्टी शिकून आज मी या ठिकाणी पोहचलो असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या ‘वॉर रुमला’ जावळी हे नाव दिल्याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.


शुक्रवार, जून ०३, २०२२

लोणी येथून राष्ट्रीय महामार्गाच्या विक्रमी बांधकाम कार्याला उत्साहात प्रारंभ

लोणी येथून राष्ट्रीय महामार्गाच्या विक्रमी बांधकाम कार्याला उत्साहात प्रारंभ


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राजपथ इन्फ्राकॉनचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड"चा प्रयत्न.


110 तास, "नॉन स्टॉप" चालणार बिटुमिनस काँक्रिट रस्ता बांधकाम कार्य.


अमरावती/अकोला

अमरावती ते अकोलादरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर लोणी ते मूर्तीजापूरपर्यंत एका बाजूच्या दोन लेनमधील, चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बिटुमिनस काँक्रिटीकरणासह सर्वात लांब व अखंड रस्ता निर्मितीच्या कामाला आज सकाळी प्रारंभ झाला. महामार्गावरील लोणी येथे ६ वाजतापासून विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य प्रवर्तक राजीव अग्रवाल आणि राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांनी यंत्र सामग्रीची पूजा केली. दरम्यान, गिनीज बुक ऑफ रिकॉर्ड्सचे समन्वयक मिलिंद वेर्लेकर यांनी अधिकृत घोषणा केल्यानंतर, सकाळी ७.२७ वाजतापासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्यात आली. सकाळी १०.३० वाजेपर्यंत ११८० रनिंग मीटर बिटुमिनस काँक्रिटचे काम करण्यात आले.


पुण्यातील पायाभूत सुविधा निर्माण क्षेत्रातील, सुप्रसिद्ध आणि दिग्गज राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. दमदार कामगिरीसाठी सर्वत्र ओळखली जाते.राष्ट्रीय महामार्गावरील अमरावती ते अकोला जिल्हयातील चौपदरीकरणाच्या कामाला गती येण्याच्या दृष्टीने ३ जूनला सकाळी ६ वाजतापासून ते ७ जूनच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत ‘बिटुमिनस काँक्रिट’च्या सर्वात लांब रस्त्याची अखंड निर्मिती करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास त्याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये होईल.



राजपथ इन्फ्राकॉनचा हा प्रयत्न गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या संपूर्ण नियमानुसार होत आहे. तसेच NHAI (नॅशनल हायवे ऑथॉरिटीज ऑफ इंडिया) द्वारे हा प्रकल्प करारानुसार त्यांच्या देखरेखीत सुरू आहे. त्यासाठी एकूण ७२८ मनुष्यबळ तीन शिफ्टमध्ये कार्यरत आहेत. या कामाची नोंद घेण्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची संपूर्ण टीम दाखल झाली आहे.



राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम (Jagadish Kadam) यांनी सांगितले की, मागील वर्षी जुलैमध्ये राष्ट्रीय महामार्ग कामाची संधी मिळाली. जवळपास ९- १० वर्षांपासून या मार्गाचे काम रखडले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांना वाहतुकीचा प्रचंड त्रास होत होता. या रस्त्याचे काम करताना, काहीतरी वेगळी कामगीरी करून दाखविण्यासाठी आम्ही संकल्प केला.यंदा देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली आहेत. यानिमित्त सारा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. म्हणून या कामाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद व्हावी, अशी कामगिरी करता येईल का, याची चाचपणी केली. मागील चार महिन्यांपासून, गिनीज बुकसोबत संपर्क साधून उपक्रमाची माहिती दिली. यापूर्वी अशा प्रकारचा रेकॉर्ड कतार देशामध्ये दोहा येथे करण्यात आलेला आहे. हा विक्रम मोडून देशाला 75 व्या  अमृत महोत्सवानिमित्त, दोन लेनमध्ये,न थांबता, महामार्ग बांधकामाची अनोखी भेट देण्याचा संकल्प सोडला. त्यानुसार कंपनीने सूक्ष्म नियोजन केले. आज त्यास प्रारंभ झाला . 7 जून रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत सलग 110 तास काम करून विश्वविक्रम प्रस्थापित केला जाईल, असा विश्वास श्री. कदम यांनी व्यक्त केला. हा विक्रम राष्ट्राला समर्पित केला जाईल, असेही ते म्हणाले. 



राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य प्रवर्तक राजीव अग्रवाल (Rajiv Agarwal) यावेळी म्हणाले, अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. येत्या डिसेंबर 2022 पर्यंत 95 टक्के बांधकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी कंपनीकडून अथक प्रयत्न केले जात आहेत. दोन लेनची रुंदी 9 मीटर राहणार असून, दोन्ही लेन मिळून विश्वविक्रमी रस्ता बांधकाम विक्रमी वेळेत पूर्ण केला जाईल, असेही ते म्हणाले.



आमदार प्रतापदादा अडसड यांची भेट 

याप्रसंगी काम सुरू होताच धामणगाव मतदार संघाचे आमदार प्रतापदादा अडसड (MLA Pratapdada Adasad) यांनी लोणी येथील महामार्गावर भेट देऊन विश्वविक्रमी कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी यावेळी सदर महामार्ग कामाबद्दल आनंद व्यक्त केला आणि शुभेच्छा दिल्या.



Exciting start of record construction work of National Highway from Loni

गुरुवार, जून ०२, २०२२

विश्वविक्रमी रस्ता बांधकामासाठी लोणीत जय्यत तयारी

विश्वविक्रमी रस्ता बांधकामासाठी लोणीत जय्यत तयारी




लोणी ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर सतत पाच दिवस चालणार विश्वविक्रमी रस्ता बांधकाम

3 ते 7 जून कालावधीत विश्वविक्रमी बिटुमिनस काँक्रिटचा रस्ता बांधणार

जगात सर्वात लांब व अखंड रस्ता निर्मितीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" मध्ये नोंद होणार

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज पथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेडकडून जय्यत तयारी

अमरावती/अकोला (Akola/Amarawati)
पुण्यातील ,पायाभूत सुविधा निर्माण क्षेत्रातील दिग्गज राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. दमदार कामगिरीसाठी ओळखली जाते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, असाच एक ऐतिहासिक,जागतिक विक्रम करण्यासाठी ती सज्ज आहे. बिटुमिनस काँक्रिटीकरणासह,जगातील सर्वात लांब व अखंड रस्ता निर्मितीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" मध्ये नोंद होण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आली आहे.अमरावती ते अकोला या दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर, लोणी ते मुर्तीजापूरपर्यंत एका बाजूच्या दोन लेनमधील चौपदरीकरणाचे काम, 3 ते 7 जून दरम्यान, करण्याचे नियोजन कंपनीने केले आहे.



राष्ट्रीय महामार्गावरील, अमरावती ते अकोला जिल्हयातील, चौपदरीकरणाच्या कामाला गती येण्याच्या दृष्टीने ३ जूनला सकाळी ६ वाजतापासून ते ७ जूनच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत, ‘बिटुमिनस काँक्रिट’च्या जगातील सर्वात लांब रस्ता निर्मितीचे काम करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास, त्याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये होईल.  (world record road 🚧)




गुणवत्ता आणि मानवी सुरक्षितता:
ही कंपनी जशी नियोजित वेळेत आणि गतीने काम करण्यासाठी सुविख्यात आहे,तशीच दर्जा(Quality) आणि मानवी सुरक्षिततेसाठीसुद्धा ( human Safety)प्रसिद्ध आहे.त्यासाठी कोणत्याही साईटवर त्यांची गुणवत्ता नियंत्रण अभियंते आणि तंत्रज्ञ तसेच सुरक्षितता अधिकारी यांची चमू सतत कार्यरत असते.इतकेच नव्हे तर, रस्त्यांच्या कामाच्या दर्जा नियंत्रणासाठी, सुसज्ज अशी दर्जा नियंत्रण प्रयोगशाळा ही उभारलेली असते. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून वापरल्या जाणारे मटेरियल आणि करण्यात येत असलेले काम यावर सतत निगराणी ठेवून कामाचा दर्जा राखला जातो.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या निर्धारित दर्जाप्रमाणेच हे काम होईल याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष्य दिले जाते.त्याबाबतीत कसलीही तडजोड स्वीकारली जात नाही.



राज पथ इन्फ्राकॉनचा हा धाडसी प्रयत्न गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या संपूर्ण नियमानुसार होणार आहे. तसेच नॅशनल हायवे ऑथॉरिटीज ऑफ इंडिया (NHAI) द्वारे हा प्रकल्प करारानुसार त्यांच्या देखरेखीत पूर्ण केला जाईल. त्यासाठी ७२८ मनुष्यबळ कार्यरत राहणार आहे. तज्ज्ञ चमूचे कामावर लक्ष राहील. कामाच्या दर्जाची प्रयोगशाळेतून तपासणी देखील करण्यात येणार आहे.


जागितक विक्रमासाठी अभूतपूर्व तयारी
• या विक्रमी प्रयत्नांची अंमलबजावणी करण्यासाठी राज पथ टीमने सूक्ष्म नियोजन केले आहे. प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. यात प्रकल्प व्यवस्थापक, हायवे इंजिनिअर, क्लालिटी इंजिनिअर, सर्व्हेअर, सेफ्टी इंजिनिअर आणि अन्य कर्मचारी यांची चमू तैनात करण्यात आली आहे. त्या या महामार्गावरच, माना कॅम्प येथे व्यवस्थापन थिंक टँक व वॉर रूम उभारण्यात आली आहे. यात ४ हॉट मिक्सप्लांट, ४ व्हीललोडर, १ पेव्हर, १ मोबाईल फिडर, ६ टँडेम रोलर, १०६ हायवा, २ न्युमॅटीक टायर रोलर आदी यंत्रसामग्रीसह ७२८ मनुष्यबळ कार्यरत असतील. यंत्रसामग्री सतत कार्यरत आणि दोषमुक्त ठेवण्यासाठी, टाटा मोटर्सचे ५ इंजिनिअर आणि अन्य ५ अधिकारी येथे तैनात आहेत. ही चमू त्या यंत्रांवर सतत लक्ष ठेवून आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून, रस्ता निर्मितीचा हा विक्रम करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.



साधनसुविधा
विदर्भातील ४५ अंश तापमानांत, हा विक्रम करण्यासाठी, टीमवर्कच्या माध्यमातून हा प्रयत्न केला जाणार आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाईल. यासाठी अकोला - अमरावती मार्गावर माना येथे सुसज्ज कॅम्प उभारण्यात आला आहे. येथे प्रशासकीय आणि अभियांत्रिकी कक्ष,चांगली निवास व्यवस्था,दर्जेदार भोजन व्यवस्था, वाहन देखभाल दुरुस्ती कक्ष, पेट्रोल व डिझेल पंप इत्यादी व्यवस्था आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर, वातानुकुलीत व्यवस्थासुद्धा करण्यात आली आहे.


यापूर्वीचे विक्रम मोडणार
राज पथ इन्फ्राकॉनने सांगली- सातारा दरम्यान,पुसेगाव ते म्हासुर्णे दरम्यान,सतत २४ तास रस्ता तयार करीत विश्वविक्रम स्थापित केला होता. सार्वजनिक कार्य प्राधिकरण- अश्गुल यांनी दोहा, कतार येथे यापूर्वी विक्रम नोंदविला होता. यात त्यांनी सुमारे 242 तास म्हणजेच 10 दिवस नॉनस्टॉप बांधकाम करून, २५ किलोमीटर रस्ता निर्मितीचा विक्रम केला होता. राज पथ इन्फ्राकॉनने आता तो रेकॉर्ड मोडण्याचा चंग बांधला आहे. लोणी-मूर्तीजापूर दरम्यान,विश्वविक्रम रचण्याचा प्रयत्न राहणार आहे. ही आव्हानात्मक कामगिरी यशस्वी झाल्यास, राज पथ इन्फ्राकॉन प्रा. लि. या रस्ते बांधकाम क्षेत्रातील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जागतिक विक्रम नोंदवणारी पहिली भारतीय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल.

- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त राष्ट्राला समर्पित कार्य

विशेष म्हणजे, पायाभूत सुविधा, विशेषत: रस्ते बांधणी आणि फरसबंदी या क्षेत्रात असे लक्ष्य आजवर कधीच ठेवले गेले नाही. म्हणून राज पथ इन्फ्राकॉनने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त हा अथक प्रयत्न आणि हे यश आपल्या राष्ट्राला समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताचे पंतप्रधान, माननीय नरेंद्र मोदी यांनी भारत सरकारमधील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या सक्षम आणि गतिमान नेतृत्वाखाली, ‘गती-शक्ती’ नावाचा एक भव्य महामार्ग बांधकाम प्रकल्प सुरू केला आहे. या विशाल देशामध्ये लोक, वस्तू आणि सेवांच्या वाहतुकीसाठी, एकात्मिक आणि अखंडित, मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी प्राप्त करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.


*राज पथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड बद्दल*
राज पथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड,ही कंपनी भारतातील नामांकित आणि विश्वासार्ह पायाभूत सुविधा कंपन्यांमध्ये प्रशंसित आणि मान्यताप्राप्त अशी कंपनी आहे.आधुनिक बांधकाम यंत्रांच्या सेट-अपच्या सर्व आवश्यक श्रेणींनी सुसज्ज, राज पथ इन्फ्राकॉन टीममध्ये अनुभवी अभियंते आणि मशीन ऑपरेटर यांच्या कुशल आणि अनुभवी मनुष्यबळाचा समावेश आहे. तसेच उद्योगक्षेत्रातील सर्वात योग्य अशा एकसंघ तज्ज्ञांचा उत्साही व्यवस्थापकीय टास्कफोर्स आहे. या बळासह , राज पथ इन्फ्राकॉनने प्रकल्प वेळेवर पूर्ण करून आणि सर्वोच्च आणि कठोर गुणवत्ता मानकांचे पालन करून, भारतीय पायाभूत उद्योगात नवीन मानदंड स्थापित केले आहेत.


पायाभूत सुविधांच्या विकासात विशेष, राजपथ इन्फ्राकॉनने आजपर्यंत राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग तसेच अंतर्गत रस्ते, पूल आणि कालवे, बॅरेजेस आणि धरणांपर्यंतचे विविध प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. राज पथ इन्फ्राकॉनने 8 HAM (हायब्रीड ॲन्युइटी मॉडेल) प्रकल्पांतर्गत बिटुमिनस काँक्रीटस तथा लवचिक फुटपाथसह 450 किलोमीटरचे राज्य महामार्ग रस्ते आणि PQC कठोर फुटपाथ रस्त्यांचे 100 किलोमीटर सिमेंटचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय, भारत (MORTH) द्वारे गेल्या 3 वर्षांत भारतात जाहीर केलेले कंत्राटी प्रकल्प. हे आधीच वितरित केलेल्या अनेक BOT (बांधा, चालवा आणि हस्तांतरित करा) रस्ते प्रकल्पांव्यतिरिक्त आहे.

Amravati Akola murtijapur National Highway road construction Guinness Book of record