नागपूर / अरुण कराळे ( खबरबात )
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी द्वारा आयोजित केंद्र सरकारद्वारे मंजुर केलेल्या कृषी कायदयामुळे होणाऱ्या दुष्परिणामवर लाईव्ह डिजीटलद्वारे शेतकऱ्यांना माहीती दिली शेतकरी बचाओ लाईव्ह डिजीटल रॅलीचे स्वागत वाडी काँग्रेस कमेटी , नागपूर तालुका काँग्रेस कमेटी व हिंगणा विधानसभा युवक काँग्रेस कमेटी तर्फे दत्तवाडी चौकातील गुरुदत्त सभागृहा जवळ करण्यात आले . या रॅलीमध्ये वाडी, सोनेगाव, लाव्हा, खडगाव, दवलामेटी, सुराबर्डी, द्रुगधामना येथील शेतकऱ्यांना केंद्र सरकारद्वारे मंजुर केलेल्या कृषी कायदयामुळे शेतकऱ्यांवर होणाऱ्या दुष्परिणामाची माहीती लाईव्ह डिजीटलद्वारे देण्यात आली .केंद्र सरकार शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडत असल्याचा आरोप लाईव्ह डिजीटल द्वारे देण्यात आला .
रॅलीचे उदघाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना गावंडे यांच्या हस्ते,अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव कुंदाताई राऊत , जि .प. शिक्षण अर्थ व नियोजन सभापती भारतीताई पाटील, पं . स . सभापती रेखाताई वरठी , जि. प . सदस्य ममताताई धोपटे , नागपूर जिल्हा काँग्रेस कमेटी सचिव भीमरावजी कडू , माजी नगराध्यक्ष प्रतीक्षा पाटील , माजी उपनगराध्यक्ष राजेश थोराने, माजी सरपंच भीमराव लोखंडे, माजी पं . स . सभापती प्रमिलाताई पवार , माजी सरपंच बेबीताई ढबाले यांच्या उपस्थितीत करण्यात आले .
यावेळी जिल्हा महासचिव दुर्याधन ढोणे, नागपूर तालुका अध्यक्ष प्रकाश कोकाटे ,हिंगणा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष आश्विन बैस , वाडी शहर अध्यक्ष शैलेश थोराने ,उपसरपंच महेश चोखांद्रे ,संजय जिवनकर, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पियुष बांत्ते, महीला अध्यक्ष रेखा कटे,पांडुरंग बोरकर,गौतम तिरपुडे,अशोक गडलिंग,रवी रघटाटे,शेषराव ठीसके,सुरेखा कटे,आशिष पाटील,प्रमोद गिरीपुंजे,रुपेश गुहे,अभिनव वड्डेवर,पियूष बांते,सागर बैस,रोहित रेवतकार,अविनाश बारंग,आकाश गायकवाड,केशव चौधरी,निखिल कोकाटे प्रामुख्याने उपस्थित होते .