सणासुदीच्या काळात साखर, मैदा, रवा आणि तेल हे स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने विचार करावा... ना. डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे दि.१६ : लॉकडाऊन मुळे नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. तसेच पुढील काही दिवसात दसरा आणि दिवाळी हे मोठे सण आहेत. हे सण साजरे करताना तारेवरची कसरत नागरिकांना करावी लागत आहे. *त्यातच मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र,कोकण,ऊ.महाराष्ट्र, मुंबई येथे अतिवृष्टी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.यातुन सावरुन दिवाळी ,दसरा सारखे सण साजरे करण्यासाठी शासनाकडून नागरिकांना दिलासा म्हणून गहू, तांदूळ, चणाडाळ बरोबरच साखर, तेल, रवा, मैदा हे रास्त भावात स्वस्त धान्य दुकानात देण्याचे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, भारताचे नेते शरदराव पवार,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ,महसुलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांना पत्राच्या माध्यमातून विनंती केली आहे.* तसेच आज 16आँक्टोबर 20रोजी पुण्यातील विधानभवन येथे झालेल्या ना.श्री पवार यांच्या बैठकीत देखील ना. नीलमताई गोर्हे यांनी ही अपेक्षा व्यक्त केली.
त्याप्रमाणे नवरात्रौत्सव उद्यापासून सुरू होत असून या काळात नागरिक व महिलावर्ग हे मोठया प्रमाणात उपवास करतात यासाठी रास्त भावात शेंगदाणे, साबुदाणा किंवा भगर(वरीचे तांदूळ) त्वरित उपलब्ध करून देण्याबाबत सूचना ना.डॉ.गोऱ्हे यांनी केली. याबाबत कॅबिनेट बैठकीत विचार केला जाईल असे ना.श्री पवार यांनी सदरील बैठकीत डॉ गोऱ्हे यांना दिला.