अमरावती/प्रतिनिधी:
अमरावती महावितरण कार्यालयासमोर उपोषण मंडपात लग्न करण्याच्या तयारीत असलेल्या महावितरणच्या उपोषणकर्त्या नवरदेवाला महावितरणने घरच्या अहेरासोबत चांगलाच 'शॉक'दिला.
बदली प्रक्रियेत झालेल्या अन्यायाला वाचा फोडत महावितरणचे सात कर्मचारी ९ जुलैपासून उपोषणाला बसले. त्यातलाच एक निखिल अरुण तिखे होता.या लग्नाला त्यांनी जिल्ह्यातील सर्व राजकीय नेते, शासकीय अधिकारी, पोलीस आयुक्त, यांनाही निमंत्रण पाठवले. उपोषण मंडपातच त्याला हळद लावण्यात आली आणि शुक्रवारी याच मंडपात त्याचे दोनाचे चार होणार होते.पण महावितरणने हाय व्होल्टेजचा झटका देत त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला.
महावितरण नाराज असलेला निखिल गुरुवारी वरात घेऊन उपोषण मंडपात पोहोचला ,त्याच उपोषण मंडपात निखिलला हळद लावण्यात आली आणि उपोषण मंडपात निखिलचे लग्न होणार होते. मात्र, महावितरणतर्फे एक पत्रक काढून उपोषणकर्त्याना कारवाई करण्याचे संकेत देताच निखिलने आपले लग्न नियोजित स्थळीच उरकले ,लग्न करण्याचा निर्णय मागे घ्या, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
तसेच त्याहून अधिक कठोर करवाईही होऊ शकते असा धमकीवजा समज कंपनीने दिल्याने निखिल तिखे व उपोषणकर्त्यांना दिला होता,महावितरणतर्फे आपल्या मागण्या पूर्ण करण्याचे तोंडी आश्वासन मिळाले असल्याने उपोषण मंडपातील लग्न सोहळा स्थगित करण्यात आल्याचे संघटनेच्या अध्यक्षांनी सांगितले.
महावितरणच्या घरच्या आहेरासोबत मिळालेल्या शॉकचा धसका घेत नवरदेव वरात घेऊन आपल्या पूर्वीच्या नियोजित स्थळीच गेला व लग्न उरकले.