Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर २८, २०२२

शहरात घरकुल हवाय! मग, असा करा मोबाईलवरून अर्ज | Apply for a Gharkul Yojana From Mobile

 रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत ३६५ लाभार्थ्यांना मिळाली घरकुलांची मंजुरी


चंद्रपूर २७ डिसेंबर - चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत एकुण ३६५ लाभार्थ्यांना घरकुल बांधकामास मंजुरी मिळाली आहे. यापुर्वी १०३ लाभार्थी तर आता २६२ लाभार्थ्यांना मंजुरी प्रदान करण्यात आली. विशेष म्हणजे केवळ १ महिन्याच्या कालावधीत शीघ्रगतीने कार्य करून मनपातर्फे  ३६५ घरकुलांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.  
        यासंदर्भात आयुक्त विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आज मनपा सभागृहात बैठक आयोजीत करण्यात आली होती. योजनेसंबंधी मा. पालकमंत्री यांनीही  पाठपुरावा केला होता त्याअनुषंगाने मनपातर्फे नियमित बैठकी घेल्या जात आहेत. मागील बैठकीत १०३ तर आज झालेल्या  बैठकीत २६२ घरकुल प्रकारांनां मंजुरी देण्यात आली.            ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना रमाई आवास योजना कक्ष मनपा कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल या योजनेचा लाभ अनुसूचित जाती, व नवबौद्ध प्रवर्गातील मोडणाऱ्या व्यक्तींना घेता येईल.या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिक ज्यांच्या जवळ रहायला स्वतःचे घर नाही अशा नागरिकांना घरे उपलब्ध करुन देणे.
        या योजनेच्या मदतीने गरीब वर्गाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याचा उद्देशाने या योजनेची सुरुवात केली गेली.ज्या व्यक्तीला राहायला स्वतःचे घर नाही आणि त्यामुळे ते इकडे तिकडे भटकत असतात व रस्त्याच्या लगत झोपडी बांधून राहतात तसेच आर्थिक दृष्ट्या कमजोर असल्यामुळे स्वतःचे घर बांधण्यासाठी सक्षम नसतात आणि त्यांना स्वतःचं राहत घर नसल्यामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो अशा व्यक्तींना या योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून दिली जातात.
         राज्यातील मागासवर्ग (अनुसूचित जाती,  नवंबौद्ध ) यांची आर्थिक परिस्थिती बिकट असून जे स्वतःचे घर विकत घेऊ शकत नाहीत आणि पडीक झोपडीमध्ये राहतात अशा लोकांना राज्य शासनामार्फत रमाई आवास घरकुल योजनेच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून देत आहे.योजनेचा लाभ घेण्यास लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.  
        आयुक्त विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत समाज कल्याण सहायक आयुक्त यावलीकर,समाज कल्याण अधिकारी सचिन माकोडे, मानकर, कमलाकर तिखट, इंजि.शुभम वरघट, मीनल देवतळे उपस्थित होते.        


आवश्यक कागदपत्रे -
१. जातीचा दाखला
२. उत्पन्नाचा दाखला  
३. रेशन कार्ड
४. घर टॅक्स पावती ( चालू वर्षाची )
५. व्होटींग कार्ड, निवडणूक ओळखपत्र
६. दारिद्र्य रेषेखालील दाखला ( असल्यास )
७. रहिवासी दाखला ( १५ वर्षांचा )
८. कच्चे घर/ झोपडी/खुल्या भूखंडाचा फोटो (सद्यस्थितीतील )
९. अर्जदाराचा पासपोर्ट फोटो
१०. इलेक्ट्रिक बिल
११.  दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्रातील नमूद कुटुंबातील अन्य कोणत्याही व्यक्तीने घरकुलाचा लाभ घेतला नसल्याचे शपथपत्र ( १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर पासपोर्ट लावुन नोटरी करणे. )

योजनेची ठळक वैशिष्ट्ये व पात्रता -

१. लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्धांत संवर्गातील असावा
२. घराच्या बांधकामासाठी महानगरपालिका क्षेत्रात रु. २.५० लक्ष कमाल खर्चाची मर्यादा आहे.
३. घराचे बांधकाम चटई क्षेत्र २६९ चौ. फुट राहील.
४. घर बांधकामाच्या खर्चामध्ये महानगरपालिका क्षेत्राकरिता १०.०० टक्के राहील. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी लाभार्थी हिस्सा भरण्याची आवश्यकता नाही. ५. लाभार्थीने शासनाच्या इतर कोणत्याही घरकुल संदर्भात योजनांचा लाभ घेतला नसावा.          

  • "Empowering Rural India through the Gharkul Yojana"
  • "Gharkul Yojana: A Catalyst for Rural Development"
  • "Transforming Rural Communities through the Gharkul Yojana"
  • "Gharkul Yojana: Building Sustainable Villages for the Future"
  • "Gharkul Yojana: Promoting Inclusive Growth in Rural Areas"


Pradhan Mantri Awas Yojana (Urban) Mission launched on 25th June 2015 which intends to provide housing for all in urban areas by year 2022. The Mission provides ...


लोक हेदेखील ‍व‍िचारतात


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.