Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर २८, २०२२

सामाजिक संस्था किवा संघटना नोंदणी-कशी-करायची ? संस्था रजिस्ट्रेशन | Society Registration

सेवाभावी संस्था / मंडळ / शैक्षणिक मंडळ / गरम विकास मंडल अथवा संस्था सुरु करावयाची असल्यास जिल्हा पातळीवर धर्मदायुक्त कार्यालयात संबंधित संस्थेची नोंदणी करून प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक असते.

लोक हेदेखील ‍व‍िचारतात

संस्था नोंदणी करिता सादर करावयाची कागदपत्रे

१.ज्ञापन / विधानपत्र /मेमोरेंडम ऑफ असोसिएशन
२.नियम व नियमावलीची सत्य प्रत
३.संस्था नोंदणी बाबत कार्यकारी मंडलाच्या सर्व सभासदांचे समंती पत्र
४.सर्व सभासदांच्या सहीनिशी अधिकारीपत्र ५.संस्थेच्या पत्त्याबाबत व मालमत्ते बाबतचे अध्यक्ष किंवा सेक्रेटरी यांचे प्रतिज्ञापत्र
रु.१०० व कोर्ट फी स्टॅम्प ५ रु.सह.

६.अनुसूची एक नियम ७,अनुसूची दोन नियम ८,अनुसूची सहा नियम १५.

७.समंतीपत्र व हमीपत्र
८.संस्था स्थापनेची ठराविक प्रत
९.प्रथम कार्यकारिणीची यादी
१०.संस्थेच्या जागेबाबत जागा मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र.
११.सर्व सभासदांचे ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा.
जी संस्था सुरु करावयाची आहे तीचे नाव इतर संस्थेच्या नावाप्रमाणे नसावे.संस्थेच्या जर व्यक्तीचे किंवा घराण्याचे नाव द्यावयाचे असल्यास त्यांच्या कुटुंबाचे अथवा वारसांचे संस्थेला नाव ण देण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र व नाव देण्यास समंती पत्र घेणे आवश्यक आहे.संस्थेचे व्यवस्थापकीय मंडळ यांचे वय १८ वर्षे पूर्ण असावे.व्यवस्थापक / सदस्यांची संख्या विषम असावी



७,९,११.संस्था स्थापने नंतर संस्थेच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत खाते सुरु करावे.जास्तीत जास्त व्यवहार चेकने करावा.दरवर्षी संस्थेचे ऑडित करून घ्यावे.शासकीय योजना / नविन शाळा / प्रकल्प यात संस्थेला योगदान देण्यासाठी किंवा कामे घेण्यासाठी संस्थेचे किमान ३ ऑडित लागतात.


▪पतसंस्था रजिस्ट्रेशन / नवीन पतसंस्था सुरु करणे.सहकारी पतसंस्था,मर्यादित पतसंस्था ,बिगरशेती पतसंस्था,महिलांची पतसंस्था,शहरी,ग्रामीण,विशिष्ठ सेवकांची नवीन पतसंस्था सुरु करावयाची असल्यास सहायक निबंधक यांच्या कार्यालयात प्रस्ताव सादर करून सुरु करता येते.यासाठी पतसंस्थेच्या प्रकारानुसार किमान सभासद संस्था व पतसंस्था सुरु करण्यासाठी लागणारे भाग भांडवल त्या सभासदांकडून गोळा करावे लागतात.
▪नवीन व शहरी / नागरी व ग्रामीण पतसंस्था सुरु करावयाची असल्यास सभासदांची मर्यादा व किमान भागभांडवल पात्रता:-
प्रकार कार्यक्षेत्र किमान सदस्य भाग भांडवल महानगरपालिका एक वार्ड / प्रभाग२५००२० लाख नगरपालिका१ ते २ वार्ड / प्रभाग२५०००१० लाख ग्रामीण एक गाव१०००४ लाख दुर्बल घटकांसाठीएक वार्ड / प्रभाग / गाव१०००२ लाख

▪महिला पतसंस्थासाठीप्रकार कार्यक्षेत्र किमान सदस्य भाग भांडवल महानगरपालिका एक वार्ड / प्रभाग५००५ लाख नगरपालिका१ ते २ वार्ड / प्रभाग४००२.५० लाख ग्रामीण एक गाव३५०१ लाखदुर्बल घटकांसाठी एक वार्ड / प्रभाग / गाव२००१ लाख
▪अंध व अपंग व्यक्तीच्या पतसंस्थेसाठी
प्रकार कार्यक्षेत्र किमान सदस्य भागभांडवल महानगरपालिकाएक वार्ड / प्रभाग४००५ लाख नगरपालिका१ ते २ वार्ड / प्रभाग३००२ लाख ग्रामीण एक गाव२००१ लाख.
_____
कंपनी रजिस्ट्रेशन / नवीन कंपनी सुरु करणे
स्वरूप आकारमान इ. बाबतचा विचार करून शॉप,लघु उद्योग किंवा कंपनी व्यवसाय सुरु करता येतो.१.अत्यल्प भाडे तत्वावर जागा २.उत्पादनासाठी आवश्यक वस्तूंचे सवलतीच्या दरात उपलब्धता ३.शासनाच्या वतीने दिले जाणारे अनुदान.४.मोठ्या स्वरूपातील कर्ज व त्यावरील सबसिडी.५.एम.आय.डी.सी/ उद्योग समुहासाठी आरक्षित जागा पाणी,विद्युत पुरवठा इ.सेवा सवलतीचा लाभ घेता येतो.कंपनीच्या बाबत १.प्रायव्हेट लिमिटेड कंपनी २. पब्लिक लिमिटेड कंपनी असे प्रकार पडतात.बहुतांशी कंपन्या ह्या प्रायव्हेट लिमिटेड असतात.प्रत्येक राज्यात कंपनी रजि.साठी कार्याक्षेत्रानुसार कार्यालय आहेत.सदर कार्यालय कंपनीची नोंदणी / रजि.करणे कंपन्या नियमाने कार्य करतात कि नाही हे पहाणे.त्याचे आर्थिक लेखापरीक्षण,नाव बदल,कंपनी विरुद्ध कार्यवाही या बाबत कार्यक्षम असते.


प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्ट्रेशनसाठी

प्रा.लि.कंपनी करिता कमीत कमी २ व्यक्ती व्यवस्थापन मंडळात / संचालक बॉडीत असाव्यात त्यांचे पॅन कार्ड , आयकर भरला असल्यास,संचालक बॉडीचे नाव,पत्ता,पुराव्यासह सादर करावे.पसंती क्रमांकानुसार किमान कंपनीचे पाच नाव.नोंदणी करिता दिलीली नावे हि इतर कंपनीशी जुळती मिळती नसावी.उचित स्टॅम्प वर सामान्य नियमावली व बाह्य नियमावली जी वकील व सी.ए.यांच्याकडून कायद्याच्या चाकोरीत बसणारी असावी.कंपनीचे उत्पादन ठिकाण प्रमाणित करणारे कागदपत्रे व मालकाची ओळख पत्ता प्रमाणित करणारे दस्तऐवज द्यावेत.डीजीटल प्रमाणित स्वाक्षरी, पॅन कार्ड ,कर भरला असल्यास,प्रमाणित नियमावली इ.बाबींची पूर्तता करून,कंपनी मान्यता दिली जात. यात नजीकचे कर सल्लागार सी.ए.यांचे सहकार्य घेता येईल.कंपनी स्थापनेनंतर प्रत्येकवर्षी सी.ए.यांचे कडून ओडीत करून घेणे व त्याचा अहवाल संबंधित कार्यालयाला सादर करणे.प्रती वर्षी डिजिटल स्वाक्षरी प्रामाणित करून घेणे.आय कर भरल्या संबंधित कामे प्रती वर्षी करावे लागतात.प्रती तिमाही आर्थिक व्यवहाराचे विवरण संबंधित कार्यालयात.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.