Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, सप्टेंबर ०६, २०२१

सविता गोविंदवार यांना विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी

मूल : येथे पदवीपर्यंतचे शिक्षण व व्यक्तिमत्वाची जडणघडण झालेल्या सविता अशोक गोविंदवार यांना गोंडवाना विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती (पीएचडी) Savita Govindwar phd पदवी प्रदान करण्यात आली.  गोंडवाना विद्यापीठगडचिरोलीच्या मानव्य विद्याशाखा अंतर्गत "मराठीतील बालकथा साहित्याचा चिकित्सक अभ्यास" या विषयावर निवडक बालकथा लेखकांच्या विशेष संदर्भात त्यांनी विद्यापीठाला शोधप्रबंध सादर केला होता. झाडीपट्टी रंगभूमीवरील कलावंतसमिक्षकलेखक निवृत्त प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. सविता गोविंदवार यांचे शिक्षण मूल येथे झाले. महाविद्यालयीन जीवनात त्यांची विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवड झाली होती.

Vidyavachaspati from Gondwana University to Savita Ashok Govindwar


लेखनवक्तृत्वसंशोधनाची आवड त्यांना विद्यार्थी दशेतच निर्माण झाली होती. त्या सद्या गडचिरोली बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष आहेत. पीएचडी साठी - स्वातंत्र्योत्तर मराठी बालकथा साहित्याचे मूल्यमापन करताना सविता गोविंदवार यांनी सुप्रसिद्ध बालकथा लेखक दिलीप प्रभावळकरमाधुरी पुरंदरेराजीव तांबे आणि डॉ. अनिल अवचट यांच्या बालकथा साहित्याची चिकित्सा आपल्या संशोधनांतर्गत केली. मराठी साहित्यात बालकथांचे स्थान निश्चित करणेबालकथा साहित्याचे मानसशास्त्रीय पैलू अभ्यासणेबालकांच्या व्यक्तित्व विकासात बालकथा साहित्याची भूमिका विशद करणेआजच्या काळात बालकथांची गरज अभ्यासणेनिवडक बालकथाकारांच्या लेखनाचे वेगळेपण नोंदविणे ही त्यांच्या संशोधन कार्याची उद्दिष्ट्ये होती.  

Vidyavachaspati from Gondwana University to Savita Ashok Govindwar


साहित्याच्या विविध प्रकारांमध्ये बालकथा साहित्याचे विशेष महत्व असून बालकथा साहित्य बालकाच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावते आणि मुलांना जगाकडे पाहण्याची दृष्टी देते असा निष्कर्ष त्यांनी सादर केलेल्या शोधप्रबंधातून मांडला. १९९० नंतरच्या कालखंडात मराठी बालकथा साहित्यात बालकथा साहित्यिकांचे योगदान मोलाचे असून त्यांच्या बालकथांनी मराठी साहित्य समृद्ध केले असल्याचे त्यांनी नोंदविले. 


बहिस्थ परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. पी. विठ्ठल लाभले. प्राचार्य राजेश इंगोलेसौ. वीणा मोहरकरप्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटेडॉ. सुरेश लडकेडॉ राम वासेकरविनेश रामानुजमवारबालसाहित्य समीक्षक डॉ. छाया कावळेडॉ. पृथ्वीराज तौरडॉ. नरेंद्र आरेकरडॉ. राजेश आणि डॉ. अर्चना चंदनपाटअधिव्याख्याता वैशाली येगोलपवारसमीर बोट्टवार,  प्राचार्य चेतन गोरेसंदीप लांजेवारप्रा. भगवान फाळकेअजित येरोजवारमीराताई पद्मावारडॉ. ज्ञानेश्वर हटवारयोगेश त्रिनगरीवार आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. बाळासाहेब पद्मावारप्रा. जनबंधू मेश्रामडॉ. माधवी भटडॉ. राजेश मुसणेप्रा. नगराळेप्रा. खानोरकरप्रतिभा बोरसेलायन्स क्लब गडचिरोली चे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.