Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट १६, २०२१

काश्मीरमधील दहशतवादाचे कंबरडे मोडले, मात्र पाकिस्तानी घुसखोरीमुळे लढाई सुरूच राहाणार | Brigadier Hemant Mahajan

 ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांचे मत


 मुंबई  : काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाचे कंबरडे जवळजवळ मोडून काढले आहेत. लडाखमध्ये दहशतवाद नाही, जम्मू- उधमपूर येथेही दहशतवादी कृत्ये नसल्याचे दिसते. मात्र काश्मिरी खोऱ्यामध्ये आजही दोनशेच्या आसपास दहशतवादी असून भारतीय लष्कर कारवाई करून त्यांना मारत आहे. मात्र पाकिस्तानकडे दहशतवादी घुसवण्याची क्षमता अधिक असून त्यामुळेच काश्मीर खोऱ्यात ही लढाई, सुरूच राहाणार आहे, असे मत ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) Brigadier Hemant Mahajan  यांनी व्यक्त केले आहे.


 स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. सेंटरचे मानद संचालक असलेल्या हेमंत महाजन यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने रविवारी १५ ऑगस्ट २०२१ या दिवशी ‘गेल्या ७५ वर्षात संरक्षण क्षेत्रातील बदल, आव्हाने व उपाय योजना’ या विषयावर व्याख्यान दिले. 

व्याख्यानात त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यापासून लढलेली युद्धे, त्यानंतर पाकिस्तानने बदललेले लढाईचे धोरण जो,  एक नवीन प्रकारच्या युद्धाचा भाग आहे. त्याला त्यांनी ऑपरेशन काराकोरम असे नाव दिले आहे. असे त्यांनी सांगितले.  या काराकोरममध्ये नेमके काय आहे,  ते सांगताना महाजन म्हणाले की, काराकोरम युध्दाचे तीन भाग होते. काराकोरम एक म्हणजे खलिस्तान, काराकोरम दोन म्हणजे कश्मीरमधे छुपे युध्द किंवा दहशदवाद आणि काराकोरम तीन म्हणजे देशाच्या इतर भागात दहशदवाद सुरू करणे. ऑपरेशन काराकोरमची परिस्थिती काय आहे आणि आपण ते कसे लढतो आहे हे समजणे गरजेचे आहे, असे सांगून त्यांनी त्याची तपशीलवार माहिती दिली. त्याचप्रमाणे अंतर्गत सुरक्षेची आव्हाने, बाह्य सुरक्षेची आव्हाने, सोशल मीडिया, हायब्रीड युद्ध, आर्थिक युद्ध वा व्यापार युद्ध आदींबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली. सध्याच्या अफगाणिस्तानातील स्थितीच्या संबंधात त्यांनी सांगितले की, अमेरिकी सैन्य परत जाऊ लागले आणि त्यामुळे अफगाण सैन्य आणि तालिबान यांच्यात गृहयुध्द सुरू झाले आहे. तालिबान्यांना पाकिस्तान आणि चीन मदत करीत आहे. येणाऱ्या काळात या गृहयुध्दाची व्याप्ती अधीक वाढेल. तालिबान सत्तेमध्ये आले तर पाकिस्तान तालिबानच्या मदतीने भारतात दहशतवाद वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करील, म्हणून दहशतवादाच्या लढाई करता भारतीय सैन्याला सदैव तयार राहावे लागेल. या सर्व पार्श्वभूमीवर देशाच्या नागरिकांनी काय करायला हवे, त्याबद्दल ते म्हणाले की,    प्रत्येक नागरिकाने स्वतःला प्रश्न करायला हवा की मी देशासाठी काय करू  शकतो. आपल्या क्षेत्रात त्याने चांगली कामगिरी करायला हवी. जागतिक दर्जा आपण मिळवणे हे देशासाठीही महत्त्वाचे आहे, त्यादृष्टीने प्रत्येकाने वाटचाल करायला हवी.





SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.