शिरीष उगे भद्रावती/प्रतिनिधी
भद्रावती : स्थानिक विवेकानंद कला व वाणिज्य महाविद्यालयात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद पालक मित्रमंडळ या जेष्ठ नागरिकांच्या सदस्यांनी
महाविद्यालयातील आरोग्य संजीवनी वाटिकेत औषधीयुक्त विविध वनस्पतींची लागवड केली. ज्यात अश्वगंधा, कोरफड, गुळवेल, खंडूचक्का, शतावरी, पर्णखुटी, हड्डीजोड, पारिजातक, पांढरी रुई, काळी तुळस, आवळा, एरंडी, अमलतास, निर्गुडी, रीठा, डिक्कीमाली, अडुळसा, भूईनिंब, ज्येष्ठपण अशा विविध प्रकारच्या एकोणवीस प्रकारच्या औषधी वनस्पतींचा समावेश आहे. तसेच कोरोना काळातील बेरोजगारीची समस्या लक्षात घेत महाविद्यालयाने ग्रामीण भागातील युवकांसाठी
"ग्रामीण रोजगाराच्या संधी" या विषयावर ई- सेमिनारचे आयोजन केले होते. यावेळी बरोडा येथील उद्योजक रमेश राजूरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षतेखाली प्रा.धनराज आस्वले होते.प्रमुख उपस्थिती अमनराव टेमुर्डे यांची होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य, डॉ नामदेव उमाटे, संचालन डॉ.ज्योती राखुंडे आभारप्रदर्शन डॉ. सुधिर आष्टुनकर यांनी केले. कार्यक्रमास विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा चे सर्व सन्माननीय पदाधिकारी व सदस्य, योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद पालक मित्रमंडळाचे सन्माननीय सदस्य, भद्रावती -वरोरा शहरातील अनेक नागरिक, महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी वर्ग ऑनलाइन उपस्थित होते.