Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट २८, २०२१

शेतकऱ्यांना वातावरणाचा अंदाज देणारे तंत्रज्ञान भारतीय भाषांमध्ये विकसित करणार | @ajinkyadatalkar

 

ग्रामायण सृजन गाथा कार्यक्रमात श्री अजिंक्य दाताळकर



नागपूर -  वातावरणातील अनिश्चितता हा शेतकऱ्यांना नेहमीच काळजीचा विषय राहिला आहे.तज्ञांचा अंदाज हाच एकमेव उपाय त्यावर आहे. परंतु  श्री अजिंक्य विलास दाताळकर या भारतीय युवा संशोधकाने "ॲग्रोली" नामक अँप विकसित करून जागतिक स्तरावर अभिमानास्पद कामगिरी केली आहे. ग्रामायण प्रतिष्ठान व्दारा आयोजित सृजनगाथाच्या पाचव्या भागात श्री दाताळकर (Ajinkya Datalkar) यांनी अमेरिकेतूनआपल्या संशोधनाची माहिती दिली.

आपल्या संशोधनाविषयी बोलतांना त्यांनी सांगितले की, आयबीएम (इंटरनँशनल बिझनेस मशिन) व नासा या संस्थांच्या सहकार्याने ते या संशोधनाचा अभ्यास करीत आहेत.आयबीएम च्या स्पर्धा परिक्षेत त्यांनी  या ॲपची प्रस्तुती केली.त्यांच्या या संशोधनाला पुरस्क्रुत सुद्धा केले गेले.  या अँपमुळे तापमान व पावसाचा अंदाज मिळतो.तसेच शेती उत्पादनाची प्रगतीनुसार होणारी वाढ,पाण्याची आवश्यकता, तापमान या विषयी माहिती मिळते.तर काही फळभाज्यांची त्यांच्या पेरणी पासून तर कापणी पर्यंतचं संपूर्ण विवरण या अँप मधून मिळते. 

एकप्रकारे वातावरणातील बदल शेतकऱ्यांना सूचित करुन हे ॲप होणाऱ्या परिणामांपासून शेतकऱ्यांना सावध करते.लवकरच उपयोगी खतं, बी-बियाणे, पिकांना लागणारी कीड, किटकनाशके या विषयीचं संशोधित तंत्रज्ञान अँप व्दारे उपलब्ध करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. युरोप व अमेरिकेत त्यांच्या तंत्रज्ञानाची दखल घेतली जात आहे.भारतात हे ॲप जुलै महिन्यात स्थापित झाले. समाज माध्यम व जाहिराती व्दारे लोकांपर्यंत ते पोचवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे श्री दाताळकर यांनी सांगितले. आज १७० भारतीय याचा वापर करत असून लवकरच ते सर्व भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल. शेतीशिवाय विमान सेवा वा अन्य उद्योगांमध्ये या ॲप ची उपयोगिता सिद्ध होईल. आयबीएम व नासा सारख्या संस्था "टेक्नॉलॉजी फार गुड" या कार्यक्रमांतर्गत आवश्यक आकडेवारी मोफत उपलब्ध करुन देतात. या ॲप व्दारे मिळणारी सेवा नि:शुल्क आहे.तसेच ते तांत्रिक दृष्टीने परिपूर्ण करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत.

त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण मुंबईत घेतले तर उर्वरीत शिक्षण अमेरिकेत घेतले. भारतात सांघिक स्तरावर प्रशिक्षण असते तर तिथे व्यक्तिगत स्तरावर स्वत:ला सिद्ध करावे लागते.संशोधनात चिकाटी व संयम आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.एका भारतीय युवकाची जागतिक स्तरावरील भरारी बघून दर्शक आनंदित झाले.

मुलाखतीवर आधारित हा कार्यक्रम होता. सौ वृषाली भालेराव यांनी ही मुलाखत घेतली. श्री पंकज खिरवाडकर यांनी अतिथिंचे स्वागत व धन्यवाद व्यक्त केले.सोबतच सृजनशील लोकांच्या रचना लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ग्रामायणचे व्यासपीठ सदैव उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

Ajinkya Datalkar

SRE2 at Akamai
Co-founder @agrolly.tech
Winner 2020 IBM's Call for Code challenge

Ajinkya Datalkar. Guest. CTO at Agrolly. IBM Call for Code – TechStrong TV. Daniel Krook, IBM CTO leading the Call for Code initiative, Agrolly CEO Manoela ...


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.