Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, सप्टेंबर २५, २०२०

जागतिक फार्मासिस्ट दिवस : २०२० World Pharmacist Day:




लेखन : श्री. भास्कर पोपटराव डुंबरे.  

            २५ सप्टेंबर हा दिवस जगभर फार्मासिस्ट डे म्हणुन साजरा केला जातो. यानिमित्ताने माझ्या देश विदेशात सेवा कार्यात कार्यरत असणाऱ्या सर्व फार्मासिस्ट बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा. मुंबई विभागातील के.एम.कुंदनानी कॉलेज ऑफ फार्मसी मधून सन १९८२ सालीं  औषधनिर्माणशास्त्र विषयात मी पदविका संपादन केली. लगेचच जे. जे. ग्रुप हॉस्पिटल ,मुंबई येथील डिपार्टमेंट ऑफ फारमॅकॉलॉजी च्या त्यावेळच्या प्रोफेसर डॉक्टर मिसेस पेडणेकर मॅडम यांच्या शिस्तबद्ध मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलमधील प्रत्येक फ्लोअर फार्मसीत, प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणाचा कालावधी संपतो न संपतो तोच, त्याच ठिकाणी जवळपास एक वर्षभर सेवेची संधी ही मिळाली. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलकडून मला रजिस्ट्रेशन प्राप्त झाले. 

            सन १९८३ च्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ओतूर या ठिकाणी चैतन्य मेडिकल्स या नावाने किरकोळ औषध विक्रीचे दुकान सुरू करीत मी रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणून सन २००० पर्यंत व नंतर साई मेडिकल जुन्नर याठिकाणी आज पावेतो काम पहात आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करीत प्रत्येक रजिस्टर फार्मासिस्ट ला शिस्तबद्ध जीवन जगावे लागते. रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक यांचा प्रत्यक्ष संबंध हा फार्मासिस्टच्या दैनंदिन व्यवहारात येत असतो. मान्यताप्राप्त डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शन नुसारच औषधांची विक्री करावी लागते. त्याचबरोबर औषध घेण्याच्या वेळा व त्याच्या मात्रा ( डोस ) समजावून द्यावे लागतात. नवनवीन संशोधनानंतर बाजारात आलेली नवीन औषधांची उत्पादने, त्यांची उपलब्धता व व्यवस्थित साठवणूक करून प्रिस्क्रिप्शन नुसार रुग्णांना पुरवठा करावा लागतो. 

            १९८० चे दशकाचे आधी देश-विदेशात मोजक्या औषधी कंपन्या औषधांचे निर्माण कार्य करीत. परंतु १९८५ चे नंतर कुशल मनुष्यबळाची (फार्मासिस्ट) उपलब्धता झाल्यानंतर औषध निर्मितीचे कार्यास वेग आला. अलीकडच्या काळात अनेक देश औषधांच्या बाबतीत भारतावर अवलंबून आहेत याचे सर्व श्रेय औषध निर्माण कार्यात कार्यरत असणाऱ्या फार्मसिस्ट मंडळींना द्यावे लागेल. महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल मुंबई यांच्या वतीने वेळोवेळी फार्मासिस्ट साठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. या निरंतर शिक्षण उपक्रमातून फार्मसी चे ज्ञान वेळोवेळी वर्धित करून रिफ्रेश केले जाते. यात पेशंट कौन्सलिंग (रुग्ण समुपदेशन ) हा कोर्स फार्मासिस्ट साठी उपयुक्त ठरत आहे . मी आता जवळपास चार दशके प्रॅक्टिसिंग फार्मासिस्ट म्हणून कार्यरत आहे . माझ्याही पेक्षा अजून दोन दशके जास्त फार्मासिस्ट म्हणून सेवा कार्य करणारे फार्मसिस्ट जुन्नर , आंबेगाव, खेड तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन मधील माझे ज्येष्ठ सहकारी आदरणीय श्री चंद्रभान कोठारी साहेब ,श्री चंद्रशेखर जोशी साहेब, माननीय श्री ललित भाई पारेख साहेब ,यांच्या दीर्घकालीन सेवेस विनम्र अभिवादन.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.