Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट २४, २०२०

(च)कलीयों 🌀का चमन’ रेसिपी

⭕ ‘(च)कलीयों 🌀का चमन’ ⭕

____________________________
.   *_🌀माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव_*
   *╰──────•◈•──────╯*
____________________________
.        📯 *_दि. २४  आॅगष्ट २०२०_* 📯

फेसबुक लिंक https://bit.ly/3aXZKvG
       *_🌀 चकली हा आपल्याकडचा एक पारंपरिक पदार्थ आहे, हे आपल्याला माहीतच आहे. आता सर्रास नेहमीच्या खाण्यात दिसणारा आणि ‘स्नॅक्स’ वर्गात मोडणारा हा पदार्थ पूर्वी फक्त ‘फराळ’ नामक पाकसिद्धीतच मुख्यत्वे असायचा आणि हा फराळ दिवाळीच्यावेळी, गौरी-गणपतीच्या वा चैत्रगौरीच्या आराशीत मांडण्यासाठी, रुखवतासाठी वगैरेच बनायचा. त्यामुळं, म्हणजे तो सर्रास उपलब्ध नसल्यामुळं त्याची अपूर्वाई होती. आता तशी अपूर्वाई नसते. चकलीचीच नव्हे, तर कशाचीच नसते. आता सगळ्या गोष्टी ‘बाहेर’ मिळतात, ‘घरगुती’ असं लेबल लावून मिळतात. पूर्वी मात्र सगळे पदार्थ घरीच बनत असत आणि प्रत्येकाच्या घरच्या फराळाची चव अर्थातच वेगवेगळी असायची._*
╔══╗
║██║      _*M⃟   a⃟   h⃟   i⃟   t⃟   i⃟  * _
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █
*- - - - - - - - - - - -●*
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
____________________________
*_🌀चकली हा पदार्थ न आवडणारा माणूस माझ्या पाहण्यात नाही. चकली चावत नाही, अशी अडचण पाहिली आहे; पण चकली आवडत नाही, असा माणूस अजून तरी पाहिलेला नाही. आता चकलीचेही विविध प्रकार दिसू लागले आहत.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,बटर चकली, पालक चकली (कशातही पालक घातला की त्याचं पोषणमूल्य प्रचंड म्हणजे प्रचंड वाढल्याचं विलक्षण समाधान असत नाही!), तांदळाच्या पिठाची चकली, ज्वारीच्या पिठाची चकली, असे चकलीचे ‘इनोव्हेटिव्ह’ प्रकार येत असतात; पण खरी चकली ती भाजणीचीच!_*
लहाणपणी तर फराळातला हा एकच ‘आयटम’ इतका प्रिय होता की, आम्ही आईला नेहमी म्हणायचो, तू फराळाचे इतके पदार्थ करण्याचा व्याप कशाला करतेस, त्यापेक्षा तू फक्त मोठा डबा भरून चकल्याच कर! पण तसं काही होत नसे. फराळाचं ताट सजवणारे इतर गोड-तिखट-खारे पदार्थ बनतच असत; पण त्यात सर्वप्रथम चकलीच उचलली जात असे आणि फराळातला हा पदार्थ सर्वात आधी संपत असे!🌀
फराळातले बाकीचे पदार्थ आहे त्या स्वरूपात ‘रॉ’ खाल्ले जात असत; पण चकलीला मात्र दह्याची किंवा लोण्याची स्निग्ध सोबत असे. त्यातसुद्धा कुणाला लोणी-चकली हे ‘कॉम्बिनेशन’ आवडत असे, तर कुणाची दही-चकलीला पसंती असे. तसंच, फराळ संपत आला की, तिखट फळीतल्या उरल्या-सुरल्याची झणझणीत मिसळ होत असे, त्यात डब्याच्या तळात उरलेले (म्हणजे चुकून उरले असले तर) चकलीचे तुकडे सन्मानाने रवाना होत असत.
पिवळसर-तपकिरी रंग, मध्यापासून सुरू होऊन गोल वेढे घेत चक्राकार धारण करणार्या चकलीच्या अंगावर नाजूकशा काट्यांची कलाकुसर असते आणि तिच्या अंतरंगात पोकळी... म्हणजे तिला ‘नळी पडलेली’ असते. हे झालं चकलीचं आदर्श रूप आणि ती खमंग, खुसखुशीत होणं हा झाला तिचा आदर्श गुण... पण प्रत्येकवेळी चकली याच रंगरूपाची बनते, असं नाही. वरकरणी अगदी साधा, रूटिन वाटणारा हा पदार्थ सगळ्यांना साधतोच, असं नाही. त्यामुळं चक्री, मुरुक्कू अशा नावांनीही ओळखल्या जाणार्या या पदार्थाची आंतरिक गुणवैशिष्ट्ये, रंग, पोत, आकार आणि अर्थातच चव घरोघरी बदलत जाते. बाहेर मिळणार्या पाकीटबंद, ठराविक मापाच्या व रंगरूपाच्या चकल्यांसारखं या चकल्यांचं नसतं. त्या आकार, रंग, पोत आणि गुणही वेगवेगळे घेऊन येतात. कुणी फिकट तर कुणी गडद, कुणी आकारबद्ध तर कुणी पसरट, अजागळ. त्यांच्यापैकी कुणी जात्याच नरम असतात, तर कुणी अतिशय कडक स्वभावाच्या असतात. (म्हणजे खाणार्याच्या दृष्टीने दातपाडी!) काहीजणी हातात घेतल्याबरोबर फक्कन् हसून अगदी ‘आरओएफएल’ (म्हणजे रोलिंग ऑन फ्लोअर लाफिंग) होतात. काहीजणी अगदी ढिम्म आणि मद्दड माणसासारख्या असतात.
काहीजणी दिसायला ओबडधोबड; पण स्वभावाने चवदार व खमंग असतात, तर काहींचे फक्त बाह्य रूपच साजिरे असते, चवीच्या नावाने उजेड असतो. काहीजणी बोथट काट्यांच्या असतात, तर काहींचे काटे नावापुरतेच असतात. काहीजणी मात्र चांगल्या उग्र काटेरी असतात. काहीजणी अंगावर ‘तीळ’ मिरवत असतात. कुणी अंतरंगात कच्च्या, तर कुणी जास्त तळल्या गेलेल्या, तर कुणी अगदी आदर्श ‘फिगरवाल्या’ असतात. काहीजणी अगदी हळव्या असतात. पाठीवर हात ठेवताच मोडून पडणार्या. अशा चकल्यांचं हळवेपण तळतानाच कळलेलं असतं. त्या सोर्यातून कागदावर सहजपणे पडतात; पण कागदावरून तेलात सोडताच अंग टाकून देतात आणि मनस्वीपणे पसरतात... असे या चकल्यांचे नखरेही भरपूर असतात; पण हा पदार्थ असतो खास, त्यामुळे इतकी अॅटिट्यूड तो बनती है... हो ना?
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.