Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जून २८, २०२०

जगातील लहान देश

इतका लहान देश की,  एका तासात हा देश फिरून होतो 



                         
     ❍ दिनांक - २८.०६.२०२०. ❍
-
 जगात खरचं एक असा देश आहे जो तुम्ही केवळ एका तासात पूर्ण फिरू शकता, यावर विश्वास ठेवणे जरा अवघड आहे पण हे खरं आहे!
तो देश म्हणजे मोनॅको… हा युरोपातील एक नगर-देश आहे. मोनॅको आकाराने जगातील दुसरा सर्वात लहान सार्वभौम देश आहे.
मोनॅकोच्या पूर्वेला भूमध्य समुद्र तर इतर तीन दिशांना फ्रान्स हा देश आहे.
मोनॅकोपासून इटली देशाची सीमा केवळ १६ किमी अंतरावर आहे. मोनॅकोमध्ये राजेशाही सरकार आहे. अल्बर्ट दुसरा हा मोनॅकोचा राजकुमार व सत्ताप्रमुख आहे. 
१९२७ पासून येथे ही राजेशाही सुरु आहे.
मोनॅको हा छोटासा देश खरोखरच १ तासात पायी फिरता येतो. विशेष म्हणजे या छोट्याश्या देशात प्रचंड संख्येने पर्यटक येतात व जगातील श्रीमंत देशात त्याची गणना देखील होते.
या देशाचे क्षेत्रफळ अवघे १.९५ चौरस किलोमीटर असून मोनॅको असेच या देशातील एकमेव शहराचे नांव आहे. मोनॅकोची लोकसंख्या अंदाजे ३३,००० आहे.
त्यामुळे हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेला देश आहे.
हा देश फॉर्म्युला कार रेसिंग, जगप्रसिद्ध कॅसिनो आणि इथल्या उत्तम हवामानाबद्दल जगभरात प्रसिद्ध आहे.,त्यामुळे युरोपियन देशांमधले अनेक धनाढय़ मोनॅकोचे नागरिक बनले आहेत.बाहेर पैसा कमवायचा, तो मोनॅकोत आणून गुंतवायचा… म्हणजे कर नको, कर चुकवेगिरीपणा नको. या देशात भ्रष्टाचारही नाहीच.या देशात फ्रेन्च भाषा बोलली जाते. येथे होत असलेले फॉर्म्युला कार रेसिंग, जगप्रसिद्ध माँटेकार्लो कॅसिनो आणि इथल्या शाही परिवाराची शानोशौकत ही इथे येणाऱ्या पर्यटकांसाठीची मुख्य आकर्षणे आहेत.
येथे ऐतिहासिक आर्कीटेक्चरल कॅथेड्रल दे मोनॅको, ७ हजार प्रकारचे कॅक्टस असलेले उद्यान, जपानी गार्डन, १३ व्या शतकातील शाही निवास पॅलेस डू प्रिन्स, ४ हजार प्रकारचे गुलाब असलेले बगिचे, सरोवरातील हंस अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे बघायला मिळतात.
इथली लोकसंख्या कमी, मध्यमवर्गीय उत्पन्नस्तर आणि पुरेसे पोलीस बळ यामुळे तीव्र अशा सामाजिक समस्या मोनॅकोत नाही आहेत.
हिंसा, गुन्हे, गरिबी असही काही इथे दिसत नाही. इथे शिक्षण दहावीपर्यंत अनिवार्य आहे.
त्यामुळे या देशाची साक्षरता ९९ टक्के आहे. इथली सरकार नागरिकांना डायरेक्ट पेन्शन देतं यावरून इथली सरकार जरा जास्तच दानशूर आहे असं म्हटल्यास वावग वाटायला नको.
तसेच इथे हवी तेवढी प्रसूती रजा मिळते. तर सरकारी व्यवस्थेतून प्रत्येकाला आरोग्य सुविधाही मिळते. रोमन कॅथलिक हा इथला राष्ट्रधर्म आहे. इथे ९५ टक्के लोकसंख्या याच धर्माची आहे.
पण इतरांनाही त्यांच्या त्यांच्या धर्मपालनाचे, पूजापाठाचे स्वातंत्र्य घटनेने दिलेले आहे.     
              

जगातील लहान देश,The smallest country in the world
----=====================================================================================================================
The smallest country in the world

Such a small country that this country can be visited in an hour



-----------------------------------------
❍ MAHITIseva Group Pethwadgaon
----------------------------------------
     Date - 28.06.2020. ❍
----------------------------------------

It is hard to believe that there is a country in the world that you can complete in just one hour, but it is true!
That country is Monaco… a city-country in Europe. Monaco is the second smallest sovereign country in the world by size.
Monaco is bordered by the Mediterranean Sea to the east and France to the other three.
---------------------------------------
 Italy is only 16 km from Monaco. Monaco has a monarchical government. Albert II is the prince and ruler of Monaco.
This monarchy has been here since 1927.
Monaco is a small country that can be reached in less than an hour. What is special is that this small country attracts a huge number of tourists and is also counted among the richest countries in the world.
---------------------------------------
With an area of ​​only 1.95 square kilometers, Monaco is the only city in the country. Monaco has a population of about 33,000.
So it is the most populous country in the world.
This country is famous all over the world for Formula Car Racing, world famous casinos and great weather here. You are reading the post of Information Service Group Pethwadgaon, so many rich people from European countries have become citizens of Monaco. No. There is no corruption in this country. French is spoken in this country. Formula car racing, the world-famous Monte Carlo Casino, and the royal family's splendor are the main attractions for tourists.
Historical architectural cathedral de Monaco, 7,000 species of cactus gardens, Japanese gardens, the 13th century royal residence Palace du Prince, 4,000 varieties of rose gardens, and the lake goose are some of the places of interest.
Due to its low population, middle-class income, and adequate police force, Monaco does not have such severe social problems.
Violence, crime, poverty are not seen here. Here education is compulsory till class X.
Therefore, the literacy rate of this country is 99 percent. It is safe to say that the government is very generous in providing direct pensions to the people.
Also, you can get as much maternity leave as you want. So everyone gets health care from the government system. Roman Catholicism is the national religion here. 95% of the population here belongs to this religion.
But others have also been given the freedom to practice their religion.
               𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 9890875498
                  ❍ mahiti seva Group
Pethwadgaon, Dist. Kolhapur


---------------- ❍ --------------------

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.