Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जून २८, २०२०

चंद्रपुरात सुरु असलेल्या सर्व पुलांचे काम जलद गतीन करा - आमदार जोरगेवार यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सुचना


अधिका-यांशी बैठक, वरोरा नाका, दाताळा पुलाची पाहणी
चंद्रपूर(खबरबात):
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरात पाच उड्डान पुलाचे काम सुरु आहे. मात्र या कामात होत असलेल्या दिरंगाईमूळे नागरिकांची गैरसोय वाढतांना दिसून येत आहे. महाविकास आघाडी सरकार विकासकामांना चालना देण्यासाठी प्रयत्नशिल असून या कामात येणा-या अडचणी सोडविण्यासाठी कटिबंध्द आहे. त्यामूळे या पुलांच्या निर्मीती कामात येणा-या अडचणी तात्काळ सोडवून पाचही पुलांचे काम जलद गतीने करा अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना दिल्यात.

आज शनिवारी शासकीय विश्राम गृह येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांची बैठक घेतली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी शहरात सूरु असलेल्या पाच उड्डान पुलाच्या बांधकामाबाबतच्या आजच्या स्थितीबाबतचा आढावा घेतला. बैठक आटोपताच अधिका-यांसह आमदार किशोर जोरगेवार यांनी वरोरा नाका पूलासह दाताळा येथील पुलाच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, क्र.१ चे कार्यकारी अभियंता संतोष जाधव, क्र. २ चे कार्यकारी अभियंता भास्करवार, प्रभारी उप कार्यकारी अभियंता अनिल गिरनाड, कोरे, मेंडे, चव्हाण, ज्युनियर अभियंता श्रीकांत भट्टड, विवेक अंबुले, सी. आर. पाल, बोधनवार, डोंगरे, यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे अजय जयस्वाल, अमोल शेंडे, विलास वनकर, बंटी राखडे आदिंची उपस्थिती होती.

यावेळी दाताळा पुलाच्या कामाची पाहणी करतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-यांना महत्वाच्या सूचना दिल्यात. तब्बल ८० कोटी रुपये खर्च करुन या पूलाची निर्मीती केली जात आहे. असे असतांनाही या पूलाच्या कामात दिरंगाई होणे हा नागरिकांच्या पैशाचा दूरपयोग नाही का असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. हा पूल १५ ऑगस्ट पर्यंत नागरिकांसाठी सुरु होईल या दिशेने काम करा अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्यात. तर वरोरा नाका पुलाची पाहणी करतांना या पुलाच्या आराखड्याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी नाराजी व्यक्त केली. या पुलाची वळण बघता येथे अपघात होण्याची दाट शक्यता असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार वर्तविली याला अधिका-यांनीही दुजोरा दिला. 

यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी या पुलावरील वळणावर अपघात टाळण्यासाठी योग्य सुचना फटक, गतिरोधक लावण्याच्या सुनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-यांना दिल्यात. बाबूपेठ वासीयांसाठी महत्वाचा असलेल्या बाबूपेठ पूलाचे काम थांबले आहे. 
बागला चौका कडील पुलाच्या बांधकामाला सुरुवात कारीवी अश्या सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगीतले, घूग्घूस ते वणी या पुलाचे कामही तात्काळ करुन पुला जनतेसाठी सुरु करण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्यात. पठाणपूरा जवळील आरवट पुलाचे कामही रखडले आहे. हे हि काम जलद गतीने पूर्ण करावे तसेच या लगतच्या मार्गाची डागडुजी करावी अश्या सूचना आमदार यावेळी किशोर जोरगेवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना दिल्यात.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.