बेपत्ता मुलीला वाडी पोलीसांनी शोधले
नागपूर / अरूण कराळे (खबरबात)
वाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सुराबर्डी येथील एक वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलीचा वाडी पोलिसांनी शोधून काढल्याने पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असून पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, २४ जून २०१९ रोजी सुरबर्डीमधील १८ वर्षाची मुलगी हरविल्याची तक्रार मुलीच्या आईने दाखल केली होती.या प्रकरणात सुरबर्डी येथील रहिवासी लाला त्रिपाठी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते,परंतु त्याला काही दिवसाने कोर्टाने जामीन दिला.मुलीचा शोध लागत नसल्यामुळे मुलीची आई सतत वाडी पोलिसात चक्करा मारत होती. सहा महिन्यांनंतरही मुलगी सापडली नाही म्हणून मुलगी भेटण्याची अपेक्षा आईने सोडली होती .
वाडी पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतले.युवतीच्या उत्तरप्रदेश मधील गावात पोलिसांनी माहिती घेतली पण ती सापडली नाही.लाला त्रिपाठी याचीही चौकशीही झाली.परंतु लालानेही मुलीला पळविले नसल्याचे समजले त्यामुळे पोलीसासमोर एक मोठे आव्हान होते.मुलीच्या आईचा आत्मविश्वास पोलिसांवरून उडाला.शेवटी उपोरोक्त प्रकरणाचा तपास पीएसआय प्रशांत देशमुख यांच्याकडे देण्यात आला.मुलीचा शोध कोणत्या बाजुने सुरू करावा असा प्रश्न वाडी पोलिसासमोर होता.स्वतःपीएसआय प्रशांत देशमुख यांनी आपल्यासोबत कमलेश जावीकर,महिला पोलीस अधिकारी अर्चना यांना हाताशी घेऊन मुलीचा शोध सुरू केला मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार लाला त्रिपाठी यांनी मुलीला त्रास दिल्यामुळे मुलगी विचलित होऊन घर सोडून गेली.त्या आधारावर तपास सुरू केला असता छत्तीसगढ मध्ये मुलगी असल्याची माहीती मिळताच वाडी पोलीस मंगळवार २३ जून रोजी नागपुर वरून छत्तीसगढ़ साठी रवाना झाले बुधवार २४ जून रोजी छत्तीसगढ़ राज्याच्या दुर्ग मधील न्यू दीपक नगर ग्रीन चौकातील एका किरायाच्या घरातुन मुलीला नागपूरला घेऊन आले. मुलीचे इंग्रजी माध्यमात अकरावीपर्यंत शिक्षण झाले असल्याने इंग्रजीवर तिची कमांड होती.याच कौशल्यावर तीने दुर्गमधील एका कंपनीत नोकरी मिळविली होती.एक वर्षानंतर वाडी पोलिसांनी मुलीचा अखेर शोध लावला .मुलीच्या आईने वाडी पोलिसांचे आभार मानले .