चंद्रपूर/(खबरबात):
पंतप्रधानांनी २०१५ मध्ये कमी प्रीमियमवर दोन विमा योजना जाहीर केल्या आहेत.पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय) ₹ २००००० आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय) ₹ २००,०००. परंतु या योजनेतील सदस्यांनी संबंधित बँक किंवा इन्शुरन्स कंपनीकडून कोणतेही डॉक्युमें टेशन करून न घेतल्याने ते पॉलिसी डॉक्युमेंट ताबडतोब करवून घ्यावे, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे विदर्भ अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर, विदर्भ संघटक डॉ. कल्पना उपाध्याय व विदर्भ सचिव लीलाधर लोहरे यांनी केले आहे.
विशेष म्हणजे प्रीमियम खूप आकर्षक असल्याने ( ₹ १२ व ₹३६०) बर्याच जणांनी या योजनांची सदस्यता घेतली असेल व त्यांचे प्रीमियम आपल्या बँक खात्यातून दर वर्षीच्या ३१ मेला वजाती पण होत असेल. याबाबत आपण कधीही बँककडून अथवा आपल्या इन्शुरन्स कंपनीकडून पॉलिसी डॉक्युमेंट घेतले आहे का ? ९९ टक्के धारकांनी ती घेतलेली नसणार आणि इन्शुरन्स कंपनी व बँक पण स्वतःहून देणार नाही अथवा ईमेल पण करणार नाही. कारण, पॉलिसी डॉक्युमेंट तयार करणे व ती पाठविण्याची cost या प्रीमियम रक्कमे पेक्षा अधिक आहे.
एक जागरूक नागरिक म्हणून सदर पॉलिसी डॉक्युमेंट बँक अथवा इन्शुरन्स कंपनीकडून प्राप्त करून घेणे क्रमप्राप्त आहे. त्यांची एक प्रत १ आपल्या पॉलिसी डॉक्युमेंट सोबतसुध्दा ठेवायला पाहिजे. ती ठेवली नसल्यामुळे आपले कुटुंब आपल्या निधनानंतर त्यांना त्याची कल्पना नसल्यामुळे ती क्लेम करायला विसरतात आणि इन्शुरन्स कंपनी अथवा बँक पण स्वतःहून याची कल्पना देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
आपल्या नजीकच्या लोकांना याची माहिती द्या त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती नजीकच्या काळात निधन पावली असल्यास त्यांचे बँक स्टेटमेंट तपासा. ३१ मे रोजी पॉलिसी रक्कम वजा झाली असल्यास त्याचा, माहिती घेऊन इन्शुरन्स कंपनीकडे मागोवा घ्या. पॉलिसी रक्कम प्राप्त करून घेण्याबाबतची प्रक्रिया आपणास बँक अथवा गूगल वर प्राप्त होऊ शकते.
ज्या ग्राहकांनी बँकांना Standing Instruction / authorization दिले असेल त्यांच्याच बाबतीत दरवर्षी 31 मे रोजी विम्याचा हफ्ता त्यांच्या खात्यात शिल्लक असल्यास वळता होईल. जर ग्राहकाने बँकेस दर वर्षी 31 मे रोजी विमा पॉलिसीचा वार्षिक हप्ता भरून पॉलिसीचे नूतनीकरण करण्याविषयी अधिकारपत्र दिले नसेल तर त्या परिस्थितीत विमा पॉलिसी केवळ एक वर्षासाठीच असेल, हे येथे उल्लेखनीय.
Covid 19 या महामारी मध्ये आपल्याजवळची व्यक्ती, शेजारी, आपल्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या कुटुंबास याची माहिती द्या. त्यांना या महामारीमुळे आधीच विस्कळीत झालेल्या जीवनामध्ये मा. प्रधान मंत्री यांनी सुरू केलेल्या या विमा योजनेमधून काही रक्कम मिळाल्यास त्यांच्या कुटुंबाला मदत होईल. ज्यांनी या सेवेचा उपभोग घेतला नसल्यास त्यांना या योजनेबद्दलची माहिती द्या.
सर्व बँक अधिकारी व कर्मचारी यांना पण विनंती आहे की, एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबातील व्यक्ती निधन पावल्यास बँक खाते बंद करण्यासाठी येईल तेव्हा या योजनेचा सदस्य असल्यास त्यांच्या कुटुंबीयांना माहिती द्या. आपले एक सहकार्य त्या कुटुंबातील व्यक्तीला पुढील काळासाठी उपयोगी होऊ शकेल, असे आवाहनही जिल्हा अध्यक्ष परशुराम तुंडूलवार, उपाध्यक्ष वेदांत मेहरकुळे, सचिव आनंद मेहरकुरे, सहसचिव किशोर बांते, जिल्हा संघटक जनार्दन धगडी, सारिका बोराडे, छबुताई वैरागडे, अॅड. राजेश विराणी, पूर्णिमा बावने यांनी केले आहे.