Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च ३१, २०२०

शेतकर्‍याने चालवली द्राक्षबागेवर कुर्‍हाड




येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार

येवला : सततच्या तोट्यामुळे अन करोनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था बंद असल्याने व्यापारी द्राक्ष बागा घेण्यास धास्तावत नसल्याने द्राक्ष उत्पादक द्राक्षबागेवर कुर्‍हाड चालवत आहेत नाशिक जिल्ह्यातील निफाड व येवला तालुक्याचा द्राक्ष उत्पादनात वरचा क्रमांक लागतो मात्र गत सलग दोन-तीन वर्षे पडलेला दुष्काळ त्यामुळे द्राक्षबागा तोट्याच्या ठरत आहेत. यावर्षी अनुकूल पाऊस झाला त्यामुळे यावर्षी तरी झालेला तोटा भरून निघेल अन या सगळ्यातून सावरता येईल या आशेवर शेतकरी होता यावर्षीच्या अनुकूल पावसाने व रोगराई मुक्त वातावरणाने मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उत्पादन झाले आहे परंतु अचानकपणे करोना विषाणूचे संकट उभे राहिल्यामुळे सर्व बाजारपेठा बंद झाल्या व पर्यायाने द्राक्षाची मागणी घटली.
द्राक्ष बाजारात 20 ते 30 रुपये किलो घाऊक बाजारात जानारा द्राक्ष व्यापारी दहा रुपये किलोला सुद्धा भाव मिळेनासा झाला आहे वाहतूक सुरू झाल्यास आजही द्राक्षाला भाव मिळू शकतो परंतु वाहतुकीच्या एक ना अनेक अडचणींमुळे व्यापारी धोका पत्करायला तयार नाही. शेतीमाल वाहतुकीला परवानगी तर दिली आहे, परंतु यामागे नियमितपणे ज्याप्रमाणे रस्त्यावरती, हायवेच्या कडेला, फुटपाथ वरती, बाजारांमध्ये कित्येक ठिकाणी द्राक्ष विकला जायचा आणि लोक सहजपणे त्याची खरेदी करू शकत होते, त्याप्रमाणे आत्ता करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बंद पाळला जात असल्यामुळे, द्राक्ष खरेदी करण्यासाठी खवय्ये बाहेर पडू शकत नाही. पर्यायाने द्राक्षांची मागणी घटली. परंतु हातविक्री करणार्‍या दुकानदारांचे दुकान लावण्याचे प्रमाणही कमी झाल्यामुळे तो माल विकावा कुठे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे व्यापारी जास्त बाजारभावाने खरेदी करण्यास तयार नाही. दुसरीकडे या द्राक्षांचे बेदाणे तयार करण्यासाठी दरवर्षी बरेच बेदना निर्माते तयार राहायचे, परंतु यावर्षी त्यांना कमी किमतीत चांगला मला उपलब्ध होत आहे मात्र वाहतुकीची अडचण येत आहे. सोबतच बेदाना मध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते आणि हे मनुष्यबळ कोरोणामुळे संचारबंदी लावण्यात आली आहे जिथं तीस-पस्तीस माणसं कामाला लावायची गरज आहे तिथे जर पाच माणसांपेक्षा अधिक लोक जमले तर तो गुन्हा समजला जातो त्यामुळे कामगार जाण्यास धजत नाही त्यामुळे कामगार आणायचे कुठून असा प्रश्न बेदाणा निर्मात्यां समोर उभा राहिला आहे. त्यामुळे शेतकर्‍याला धड व्यापार्‍याला एक द्राक्ष देता येत नाहीये आणि बेदानेवाले घ्यायला येत नाहीये.
शेतकर्‍याने जरी व्यापार्‍याला द्राक्ष द्यायचे ठरवले, तरी व्यापारी जितक्या कमी किमतीत भेटेल तितक्या कमी किमतीत ते घेण्याचा प्रयत्न करत आहे कारण त्याला मालवाहतूकीची शाश्वती नाही एकरी सरासरी द्राक्षाचा जास्तीत जास्त उत्पन्न 150 क्विंटल होतं आणि दहा रुपये भाव जरी धरला तरी त्यातून होणारे शेतकर्‍याला उत्पन्न होतं दीड लाख रुपये अन खर्च होतो तीन लाख रुपये त्यामुळे शेतकरी बाग तोडतो आहे कृषी औषधांच्या वाढत्या किमतीमुळे औषधांचा खर्च 80 ते 85 हजारापर्यंत जातो. कामगारांच्या वाढलेल्या मजुरी मुळे एकराची छाटणी, फेल काढणे, डिपिंग, थिनिंग यासाठीचा खर्च 35 ते 40 हजार पर्यंत येतो. आणि पुन्हा खतांचा खर्च वीस ते तीस हजारापर्यंत एकत्रित सगळा खर्च वजा जाता शेतकर्‍यांना एक नवा पैसाही शिल्लक राहत नाही. अशा वेळेस जर दहा-पंधरा रुपये भावाने द्राक्ष विकायची वेळ आली तर तो कर्जबाजारी झाल्याशिवाय राहत नाही. या सगळ्या परिस्थितीत त्याला द्राक्षबाग तोडल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.