*राज्यातील खाजगी शाळांच्या प्रलंबित मागण्याबाबत* *शिक्षणमंत्री नाम. दीपक केसरकर यांच्याबरोबर चर्चा*
*प्लॅनमधील शाळांच्या वेतनासाठी अनुदान, केंद्र प्रमुख भरतीमध्ये खाजगी शाळांना सामावून घ्यावे, शिक्षक* *भरती,खाजगी शाळांनाही मोफत गणवेष , जुनी पेन्शन योजना या मागण्यावर चर्चा*
जुन्नर /आनंद कांबळे
15 जून नंतर शाळांची संच मान्यता करण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षकांच्या रिक्त पदाची संख्या निश्चित करून तात्काळ शिक्षक भरती करण्यात येईल असे आश्वासन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी *महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या शिष्टमंडळास दिले.
खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिक्षण मंत्री नाम. दीपक केसरकर यांची भेट घेऊन राज्यातील खाजगी प्राथमिक शाळांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली यामध्ये प्रामुख्याने शिक्षक भरती करावी, खाजगी शाळेतील शिक्षकांनाही मोफत गणवेश द्यावे, केंद्रप्रमुख भरतीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये खाजगी शाळांतील पात्र शिक्षकांनासुद्धा समाविष्ठ करून घ्यावे आणि प्लॅनमधील शिक्षकांच्या वेतनासाठी तात्काळ अनुदान उपलब्ध करुन द्यावे अशा प्रकारच्या मागण्या शिक्षण मंत्री नाम दीपक केसरकर* यांच्याकडे करण्यात आल्या यावेळी त्यांनी 15 जूननंतर शाळांची संच मान्यता तातडीने करण्यात येणार असून ,त्यानंतर रिक्त पदांची संख्या निश्चित करून शिक्षक भरती करण्यात येईल अशी आश्वासन त्यांनी दिले .तसेच खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांनाही मोफत गणवेश द्यावेत , प्लॅनमधील शिक्षकांच्या वेतनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, केंद्रप्रमुख भरतीच्या विभागीय स्पर्धा परीक्षेमध्ये खाजगी शाळातील पात्र
शिक्षकांनाही समाविष्ठ करून घ्यावे या मागणी संदर्भात शिक्षण आयुक्त डॉ. सूरज पांढरे यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेण्याची आश्वासन त्यांनी दिले पहिल्याच दिवशी होणारे पाठयपुस्सकांचे वितरण , कमी झालेले दप्तराचे ओझे व प्रत्येक प्रश्नाबाबत सकारात्मक दृष्टिकोन याबाबत शिक्षण मंत्री नाम दीपक केसरकर यांचा समितीच्या वतीने राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .नाम. दीपक केसरकर यांना भेटलेल्या राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्यासह राज्यसचिव शिवाजी भोसले शहर कार्याध्यक्ष शिवाजी सोनाळकर व पांडुरंग गवळी यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.