Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च ३१, २०२०

घुग्गुस वेकोली वसाहत परिसरात कोरोना खबरदारीकरीता निर्जंतुकरण मोहिम



घुग्गुस वेकोलि वसाहत परिसरात कोरोना विषाणुचे नायनाट करिता स्यानीटायझेशन *माजी अध्यक्ष जिप चंद्रपुर देवराव भोंगळे यांनी वेकोलीचे जी. एम. उदय कावळे साहेबांना विनंती केली.* त्यांच्या विनंतीला मान देत वेकोली कंपनीच्या टॅंकर मध्ये सोडीयम हायड्रोक्लोराईड चे मिश्रण करुन राम नगर, गांधी नगर, सुभाष नगर, इंदिरा नगर, शास्त्री नगर, शिव नगर, बंगाली कॅम्प, शिवाजी नगर या परिसरात कोरोना निर्जंतुकरणा साठी फवारनी करण्यात येणार आहे. राम नगर पासून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यात पुढाकार घेतल्याबद्दल सिनु इसारप ग्रापं सदस्य घुग्गुस, राजकुमार गोडसेलवार, सुषमा सावे, मैत्री ग्रुप चे श्रीकांत सावे यांचे कौतुक करण्यात आले.

यावेळी वेकोली वणी एरियाचे जी. एम. उदय कावळे साहेब, मनोग्रहन साहेब, घुघुसचे सब एरिया पिसारेडी साहेब, विवेक बोढे शहराध्यक्ष भाजपा घुग्गुस, सरपंच संतोष नुने, नितुताई चौधरी सभापती जिप चंद्रपुर, निरिक्षण तांड्रा उपसभापति पंस चंद्रपुर संजय तिवारी ग्रापं सदस्य घुग्गुस, राजकुमार गोडसेलवार ग्रापं सदस्य घुग्गुस, सिनु इसारप ग्रापं सदस्य घुग्गुस, वणी एरिया मित्रा टीम से कोर्डिनेटर श्री सुशांत वाघ,घनश्याम छानीकर,श्रीकान्त सावे,रवि जाधव, उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.