Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर २१, २०१९

धनादेशाने वीज देयकाचा भरणा करतांना काळजी घ्या:महावितरणचे ग्राहकांना सूचना

 
नागपूर/प्रतिनिधी:
वीजबिलाचा भरणा केलेल्या धनादेशाचा कोणत्याही कारणामुळे अनादर (चेक बाऊंस) झाल्यास 750 रुपये दंड किंवा बँक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या रकमेचा दंड लावण्यात येणार असल्याने धनादेशाने वीज देयकांचा भरणा करतांना काळजी धेण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

वीज बिला भरणा धनादेशाव्दारे करतेवेळी धनादेश हा अकाउंट पेयी व 'MSEDCL' च्या नावे याशिवाय चालू तारखेचा आणि स्थानिक बँकेचा असावा. त्यासोबत पावती स्थळप्रत जोडावी, ती स्टॅपल करू नये. धनादेशाच्या मागे ग्राहक क्रमांक (पी.सी., बि.यु. साहित) लिहावा व स्थळप्रतीच्या मागे धनादेशाचा तपशील नमूद करावा.

 धनादेश अथवा डीडी ने देयकाचा भरणा केल्यास, महावितरणच्या खात्यात रक्कम जमा होण्याचा दिनांक हाच बिल भरणा केल्याचा दिनांक म्हणून गृहित धरली जाते. वीजबिल भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी दिलेला धनादेश वटणे आवश्यक असतो. त्यानंतरच बिलाची रक्कम प्राप्त झाल्याची नोंद होते. 

परंतु अनेक वीजग्राहक अंतिम मुदतीच्या एक-दोन दिवसांपूर्वी धनादेशाद्वारे वीजबिलाची रक्कम भरतात. धनादेश वटण्यास साधारणतः तीन ते चार दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे ग्राहकाने देय तारखेपूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या तीन दिवस अगोदर धनादेश देणे आवश्यक आहे. 

मुदतीनंतर वीजबिलाचा भरणा झाल्यास संबंधीत ग्राहकांना धनादेशद्वारे भरलेली रक्कम थकबाकी म्हणून पुढील बिलात लागून येते किंवा कोणत्याही कारणाने धनादेश अनादर (बाऊंस) झाला तर आर्थिक दंडासह वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते. 

परक्राम्य संलेख अधिनियम (Negotiable Instrument Act) 1881 च्या कलम 138 अन्वये धनादेश न वटणे हा दंडनीय अपराध असून याकरिता धनादेश देणारी व्यक्ति कायदेशीर कारवाईस पात्र ठरते. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या 2018 च्या प्रकरण क्रमांक 321 नुसार, धनादेश अनादर शुल्क रुपये 750 अधिक जी.एस.टी. (GST) किंवा बँक शुल्क यापैकी जे अधिक असेल ते लागू आहेत. 

एका पेक्षा अधिक ग्राहकांसाठी एकच धनादेश दिला असेल आणि तो कुठल्याही कारणाने वटला नाही तर प्रति ग्राहक स्वतंत्र शुल्क लागणार आहेत. धनादेश देण्यापूर्वी तारीख, स्वक्षरी योग्य असल्याची खात्री करून घ्यावी तसेच कुठलीही खाडाखोड केलेला धनादेश देऊ नये, असेही महावितरणने कळविले आहे. धनादेश ही ग्राहकाने वापरलेली सुविधा आहे त्यामुळे कुठल्याही कारणास्तव त्याचा नदार झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही ग्राहकाची असल्याचेही महावितरणतर्फ़े स्पष्ट करण्यात आले आहे.

महावितरणच्या 16 परिमंडलात धनादेशाद्वारे दरमहा सुमारे 550 कोटी रुपयांच्या वीजबिलांचा भरणा होतो. परंतु यातील सुमारे 10,000 धनादेश दरमहा विविध कारणांमुळे अनादर (बाऊंस) होतात.

 त्यासाठी संबधित वीजग्राहकांना यापूर्वी 350 रुपये दंड लावण्यात येत होता. मात्र मागिल वर्षापासून धनादेशाचा अनादर झाल्यास 750 रुपये किंवा बॅक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल तो दंड म्हणून लावण्यात येत आहे. 

महावितरणच्या ग्राहकांकरिता घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी www.mahadiscom.in हे संकेतस्थळ, महावितरन मोबाईल ॲप किंवा ईसीएसची सोय उपलब्ध आहे.. त्यामुळे धनादेशऐवजी वीजग्राहकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.