Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, नोव्हेंबर २२, २०१९

चंद्रपूरच्या नवीन महापौर राखी कंचर्लावार तर उपमहापौर राहुल पावडे


चंद्रपूर/ललित लांजेवार:
चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक आज शुक्रवारी होती,या निवडणुकीत महापौर पदी भाजपच्या नगरसेविका राखी कंचर्लावार तर उपमहापौर पदी नगरसेवक राहुल पावडे विजयी झाले आहेत ,राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका आज पार पडल्या. यासंबंधीची अधिकृत घोषणा पीठासीन अधिकारी व जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी २२ नोव्हेंबर रोजी मनपा राणी हिराई सभागृहात झालेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर केली.

काँग्रेसनेही महानगरपालिकेच्या निवडणुकीत रणशिंग फुंकल्याने या निवडणुकीची चुरस मागील काही दिवसांपासून वाढली होती. मात्र भाजपचे नगरसेवक न फुटल्याने भाजपच्या राखी कंचर्लावार यांचा पुन्हा एकदा दणदणीत विजय झाला. राखी कंचर्लावार यांना ४२ मते तर काँग्रेसच्या कल्पना लहामगे यांना २२ मते पडली. 

यासोबत उपमहापौर पदासाठी भाजपचे राहुल पावडे आणि काँग्रेसचे अशोक नागापुरे रिंगणात होते. यात भाजपचे राहुल पावडे यांचा २० मतांनी विजय झाला. त्यांना ४२ मते पडली तर काँग्रेसचे नागापुरे यांनाही २२ मतांवर समाधान मानावे लागले. 

पालिकेत एकूण ६६ नगरसेवक आहेत,भाजपकडे स्पष्ट बहुमत म्हणजे ३७ नगरसेवक आहेत. त्यापाठोपाठ कॉंग्रेसकडे १३, बसपा - ६, राष्ट्रवादी -२, शिवसेना - २, मनसे - २, इतर ४ नगरसेवक अपक्ष आहेत.तर या निवळणुकीत २ नगरसेवक गैरहजर राहिले.

विद्यमान महापौर अंजली घोटेकर यांचा कार्यकाळ ३० आक्टोंबरला संपला. मात्र विधानसभा निवडणुकीमुळे त्यांना २१ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली होती. त्यानंतर ह्या निवळणूक घेण्यात आल्या.


चंद्रपूरच्या महापौर गादीवर सलग ४ वेळा महिला महापौर
२०१२ ला चंद्रपूर महापालिका अस्तित्वात आल्यापासून सलग ३ महिला महापौरांना चंद्रपूरच्या महापौर पदाची गादी सांभाळण्याचा योग्य आला. या तिन्ही महापौर महिलाच होत्या,आणि आता चौथ्या वेळीस देखील चंद्रपूर महानगरपालिकेचे महापौर पद महिलेसाठी (खुला प्रवर्ग) राखीव ठेवल्याने पालिकेवर महिलाराज बघायला मिळाला.

यांनी घेतले नामांकन परत
बसपा आघाडीचे अनिल रामटेके, शहर विकास आघाडीचे दीपक जयस्वाल,काँग्रेसच्या सुनिता लोढिया यांनी आपले नामांकन परत घेतले.काँग्रेसचे प्रशांत दानव आणि मनसेचे सचिन भोयर यांनी आपले नामांकन शुक्रवारी निवडणुकीपूर्वी परत घेतले.

नगरसेवक फुटण्याच्या भीतीने नगरसेवकांना पेंच दर्शन
भाजकडे स्पष्ट बहुमत असतांना भाजपचे नगरसेवक हे भाजप नेतृत्व व माजी महापौर अंजली घोटेकर यांच्यावर नाराज होते.अश्या परिस्थिती भाजपचे नगरसेवक फुटण्याची दाट शक्यता होती तर ११ नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात देखील होते,राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्याची चिन्हे दिसू लागल्यामुळे भाजपामधील अनेक असंतुष्ट नगरसेवकांनी काँग्रेसच्या सोबतीला येण्याची तयारी दर्शविली होती. अश्या परिस्थिती भाजपच्या गटाला भगदाळ पडून नये म्हणून भाजप नेतृत्वाने त्यांना सहलीचा आनंद घेण्यासाठी पेंचला रवाना केले. मात्र त्यातही देखील काही नगरसेवक नाराज होते.

काँग्रेस नेतृत्व आमदार विजय वडेट्टीवार,खासदार बाळू धानोरकर आणि अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी देखील आपल्या अनेक नगरसेवकांची मनधरणी केली होती,मात्र भाजपनगरसेवक भाजप नेत्यांच्या शब्दापलीकडे गेले नसल्याचे भाजपला निवडणूक जिंकता आली.हे या निवडणुकीच्या माद्यमातून दिसून येत आहे.

मी पुन्हा येईन चे वादळ शांत 

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पावलावर पाऊल टाकत निघालेल्या चंद्रपूरच्या माजी महापौर अंजली घोटेकर यांनी महापौर पदाचे आरक्षण जाहीर होताच एका कार्यक्रमात ,मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन  असे माध्यमांपुढे सांगितले होते मात्र आरक्षण जाहीर होताच मागील अडीच वर्ष अंजली घोटेकर यांना चान्स देण्यात आला होता,मात्र अंजली घोटेकर यांच्यावर भाजपमधील अनेक नगरसेवक नाराज असल्याने त्यांचे मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, चे वादळ भाजप नेतृत्वाने थंड केले.यासाठी अनेक नगरसेवकांनी वरिष्ठांकडे घोटेकर पुन्हा महापौर नकोत अशी कानफुकनी देखील दिली होती,

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.