Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल १३, २०१९

लोकसभा निवडणुकीने घेतला २ शिक्षकांचा बळी

चांपा/उमरेड:
लोकसभा निवडणुकीच्या मतदान  हिंगणा डिगडोह  केंद्रावर ड्युटी असलेल्या शिक्षकांच्या कारची जोरदार धडक झाल्याने   अपघातात एका  शिक्षकाचा घटनास्थळीच म्रुत्यु झाला . ही घटना सकाळी 3:45 च्या सुमारास घडली .नागपुर वरून मतदानाची ड्युटी पूर्ण करून उमरेड येथे परत असतांना चांपा येथे हळदगाव फाट्याजवळ निद्रा अवस्थेत गेलेल्या कार चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली कार अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या कड़े असलेल्या पार्साच्या झाडाला जोरदार धडक दिल्याने कारचा चेंदामेंदा झाला .

कार मध्ये चार व्यक्ती बसल्या होत्या .ही घटना सकाळी 3:45दरम्यान उमरेड तालुक्यातील चांपा हळदगाव फाट्यावर जवळील  नागपुर ते  उमरेड महामार्गावर झाडाला जोरदार  कारने धडक दिल्याने नुकेश नारायणराव मेंढुले वय 39रा .उमरेड व बहे सर यांचा घटनास्थळीच म्रुत्यु झाला व तीन जण गंभीर जखमी झाले. उमरेड येथील अशोक विद्यालय येथे शिक्षक या पदावर काम करीत होते . 

निवडणुकीचे काम आटोपून येत असताना शिक्षकांच्या गाडीला अपघात यात अशोक विद्यालयाचे श्री मेंढूले सर व बहे सर यांचा अपघाती मृत्यू झाला . अपघात सकाळी 4.00 वाजता चांपा जवळ झाला यात खैरी बुटी चे मुख्याध्यापकश्री बोहरुपी सर सिल्ली चे नरेंद्र पिपरे सर साळवा गंभीर जखमी झाले .शिक्षक उमरेड येथील रहिवासी असल्याचे पोलीसानी सांगितले .

हिंगणा येथे लोकसभा निवडणूक ड्युटी पूर्ण करून घरी परताना उमरेड कड़े येत असतांना ता 12.च्या  सकाळी 3:30च्या सुमारास चांपा येथे कार क्र .MA-12-GF-4547 याची पार्साच्या झाडाला जोरदार धडक दिल्याने , एकाचा घटनास्थळीच म्रुत्यु झाल्याची महिती शिक्षकानी दिली .सर्व  शिक्षकांचा ताफा नागपुर वरून उमरेड कड़े येत असतांना सोबत असल्यामुळे पोलिसांना चांपा येथे अपघात अत्यंत भीषण असल्यामुळे अपघात झाल्याची माहिती पोलिसांना दिली.
 

पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी पौर्णिमा तावरे व कुही पोलिस स्टेशन चे ठाणेदार पंजाबराव परघणे सोबत पाचगाव कुही चौकीचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक प्रमोद राऊत यांनी घटनास्थळाकड़े धाव घेतली .म्रुत्तासह कार मध्ये अडकलेल्या रुग्णांना बाहेर काढून गंभीर जखमी झालेल्या कार चालक सह दोन जण जखमी ना पोलिसांनी अम्बुलन्स वेळेवर न पोहचल्याने ठाणेदाराच्या वाहनात नागपुरच्या शासकीय रुग्णालयामध्ये तत्काळ हलविले .पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रमोद राऊत करीत आहेत .


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.