Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, फेब्रुवारी १५, २०२३

गूगल मैप का उपयोग कैसे करें? | Google map ka upyog kaise kare


How to Use Google Maps 


नागपूर: गुगलने आज गुगल मॅप्स मध्ये उपलब्ध असलेली अत्याधुनिक वैशिष्ट्य सादर करून कोणताही पत्ता शोधणे अधिक सोपे केले आहे. टू व्हिलर मोड, प्लस कोड्स, मॅप्स गो, मॅप्सवर स्थानिक भाषा, स्थानिक जागा शोधणे, रिअल टाईम लोकेशन शेअरिंग, मल्टी स्टॉप डायरेक्शन, रिअल टाईम वाहतूक परिस्थिती (वाहतूक संदेशांसह) आणि स्थानिक गाईड्स अशा सगळ्या वैशिष्ट्यांमुळे नागपूर म ध्ये फिरणे आता अधिक वेगवान आणि सोयीचे होणार आहे. 


नागपूर मध्ये माध्यमांशी बोलताना गुगल मॅप्स इंडियाचे प्रोग्रॅम मॅनेजर अनल घोष आणि प्रॉडक्ट मॅनेजर नेहा वाईकर म्हणाले, “अ बिंदुपासून ब पर्यंत पोहोचणे म्हणजेच केवळ गुगल मॅप्स नाही. खास भारतासाठी रचना करताना आणि इथे भेडसावणाऱ्या आव्हानांचा सामना करत संधींशी जुळवून घेत गुगल मॅप्स अधिकाधिक समग्र, अचूक आणि विश्वासार्ह बनवणे हे आमचे एकमेव उद्दिष्ट आहे.त्यामुळे याचा वापर करणाऱ्यांना अधिक प्रभावी माहिती आणि दिशादर्शन करणे शक्य होईल. गुगल मॅप्स आता तुम्हांला तुमच्या प्रवासाचे नियोजन करण्यासाठी, तुम्हांला हवे असलेले ठिकाण शोधण्यासाठी, तुम्हांला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि तुमच्या प्रवासाचा अनुभव अधिक सुखकारक करण्यासाठी मदत करू शकेल.”


प्रो टीप १: भारतात प्रथमच गुगल मॅप्समध्ये टू व्हिलर मोड
Find local businesses, view maps and get driving directions in Google Maps.
भारत ही दुचाकीमधील जगातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. लाखो मोटरसायकल आणि दुचाकी चालकांना वेगवेगळे मार्ग जाणून घेण्याची गरज असते. मॅप्स मधील दुचाकी मोडमुळे चालकांना मोटर,बस आणि ट्रक साठी नसलेले मार्ग कळू शकतील. त्या त्या ग्राहकानुसार वाहतूक आणि पोहोचण्याच्या वेळेचा अंदाज मिळू शकेल. अनेक भारतीय दिशादर्शनासाठी स्थानिक महत्वाच्या जागांवर विसंबून राहत असल्यामुळेटू व्हीलर मोड मध्येही खुबीने त्यांच्या मार्गावरील महत्वाच्या स्थानिक जागांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे चालक सुरुवात करण्याआधी त्यांच्या प्रवासाचे नीट नियोजन करू शकतील आणि गाडी चालवताना त्यांना स्वतःचा फोन तपासावा लागणार नाही. केवळ ८ महिन्यात भारतात दरमहा २ कोटी हून अधिक ग्राहक या टू व्हीलर मोड (दुचाकी मोड) चा वापर करत आहेत!

मी ते कसे मिळवू शकतो?
Real time traffic updates. Find the best route when driving

असं समजा की तुम्हांला हनुमान नगर पासून नागपूर मधील व्हिएनआयटीमध्ये जायचे आहे. गुगल मॅप्स मध्ये तुमच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून “व्हिएनआयटी मुख्य प्रशासकीय इमारत” असे टाईप करा. मग “गेट डायरेक्शन्स” हे बटण दाबा आणि मग “टू व्हीलर” आयकॉन सिलेक्ट करा. मग तुम्हांला सर्वात कमी वेळेत तुम्हांला जायचे असलेल्या ठिकाणाचा मार्ग दिसू लागेल.

Navigate your world faster and easier with Google Maps. Over 220 countries and territories mapped and hundreds of millions of businesses and places on the .

प्रो टीप २: रिअल टाईम ट्रॅफिक प्रमाणे खरोखरच वाहतूक सुरु आहे का हे बघणे
वाहतूक कोंडीत अडकणे हा खूप वाईट प्रकार असतो. त्यातही असं किती वेळ अडकून पडावं लागेल हे माहीत नसणं तर आणखी त्रासदायक असतं. रिअल टाईम ट्रॅफिक वैशिष्ट्यामुळे गुगल मॅप्समधून तुम्ही सध्या असलेली वाहतुकीची परिस्थिती बघू शकता आणि कोणकोणते वेगवेगळे मार्ग तुम्ही अवलंबू शकता याची तुलना करू शकता. या वैशिष्ट्यामध्ये भारतातील सगळे राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्ग समाविष्ट आहेत आणि ३४ शहरांमध्ये हे उपलब्ध आहे.


गुगल मॅप्सवर गुगल वाहतुकीचे संदेशही पुरविते. सर्वात कमी वेळात तुम्हाला हव्या असलेल्या ठिकाणी पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग शोधायला गुगल मॅप्स तुम्हांला मदत करू शकेल आणि जोडीला गुगल मॅप्सवरील वाहतूक संदेशांमुळे तुम्हांला कोठे कोठे वाहतूक कोंडी व्हायची शक्यता आहे याची आगाऊ सूचनाही मिळू शकेल.आता जेव्हा तुम्ही स्वतःच्या इच्छित स्थळाची माहिती द्याल गुगल तुम्हाला आगामी वाहतूक कोंडीची माहिती देईल. त्यातून सर्वात जलद मार्ग शोधायला मदत होईल. तुम्ही रस्त्यावरून जात असताना अचानकपणे वाहतूक कोंडीचीपरिस्थिती उद्भवली तर गुगल मॅप्स तुम्हांला मार्गदर्शन करेल आणि त्यामुळे किती उशीर होऊ शकेल हेही सांगेल. दुसऱ्या एखाद्या मार्गाचा वापर करण्याचा पर्यायही तुम्हांला मिळेल. मग तो पर्याय सर्वाधिक जलद आहे का केवळ वाहतूक कोंडी टाळण्याचा पर्याय आहे याचे स्पष्टीकरणही देण्यात येईल.

मी ते कसे मिळवू शकतो?
तुमच्या सेटिंग्ज मेनू मध्ये जा आणि ट्रॅफिक लेयर सुरू करा. एकदा का हे सुरू केले की तुम्हांला वेगवेगळ्या रंगातील मार्ग दिसतील. त्यातून या रस्त्यांवरील वाहतुकीचा वेगवेगळा दिसणारा वेग सूचित होत असेल. हिरवा रंग म्हणजे रस्त्यावर सुरळीत वाहतूक सुरू आहे, केशरी रंग म्हणजे मध्यम प्रमाणात वाहतूक सुरू आहे तर लाल रंग म्हणजे प्रचंड वाहतूक कोंडी असल्याचे सुचविले जाते.
गुगल मॅप्स होम स्क्रीन वरून तुम्ही जवळपासची वाहतूक थेटही बघू शकता. तुमच्या फोनवर गुगल मॅप्स सुरू करा. स्क्रीनच्या तळाशी असलेला ‘ड्रायव्हिंग’ आयकॉन सिलेक्ट करा आणि ‘ट्रॅफिक नियरबाय’ असं चेक करा.


प्रो टीप ३: कमी आधुनिक अँड्रॉईड फोन्सवर देखील सुरळीत अनुभूती
मिळवण्यासाठी ‘मॅप्स गो’चा वापर करा!


गुगल मॅप्स गो हे मूळ गुगल मॅप्स अॅपचे हलके प्रगतीशील व्हर्जन आहे. मॅप्स गोसाठी गुगल क्रोमची आवश्यकता असते आणि त्यामुळे तुमच्या फोनच्या स्टोअरेजमधील अतिरिक्त जागा अजिबात व्यापली जात नाही. मर्यादित मेमरी (१जीबी रॅमपेक्षा कमी) असलेल्या, प्रोसेसरचा वेग मर्यादित (१ ते १.५ जीएचझेड) असलेल्या अँड्रॉईड उपकरणांवर आणि बेभरवशाच्या नेटवर्क्सवर देखील अतिशय सुलभतेने चालावे यादृष्टीने याची रचना करण्यात आलेली आहे. यामध्ये वेगाबाबत कुठलीही तडजोड केली जात नाही आणि तुम्हांला तुमचे लोकेशन, अद्ययावत अचूक वाहतुकीची परिस्थिती, दिशा आणि सार्वजनिक वाहतुकीची माहिती पुरविली जाते. मॅप्स गोची होमस्क्रीन ही खास भारतीय वापरकर्त्यांच्या गरजा ध्यानात घेऊन त्यानुसार तयार करण्यात आली आहे. यावर विविध पर्यायांचे शॉर्टकट्स देण्यात आले आहेत, ज्यामध्ये सार्वजनिक वाहतुकीच्या विविध प्रकारांचाही समावेश करण्यात आला आहे. आणि अलीकडेच, आम्ही मॅप्स गोवर प्रत्येक वळणावरील व्हॉईस नेव्हिगेशन सुविधा देखील सादर केली असून त्यामुळे आता मॅप्स गोमधून देखील गुगल मॅप्स इतकाच सुरळीत अनुभव मिळू शकणार आहे. त्याजोडीला वापरकर्त्यांना लक्षावधी ठिकाणे, दूरध्वनी क्रमांक, पत्ते, छायाचित्रे, श्रेणी, मानांकन, परीक्षणे इत्यादीची माहिती शोधणे आणि मिळवणे शक्य होणार आहे.



मी हे कसे मिळवू शकतो?
गुगल प्ले स्टोअरमधून मॅप्स गो डाऊनलोड करून घ्या किंवा तुमच्या क्रोम ब्राउझर अॅपवरती maps.google.co.in येथे जा. एकदा मॅप्स लोड झाले की तिथे होमस्क्रीनला शॉर्टकट जोडण्याचा पर्याय उपलब्ध होईल. जर तुमच्याकडे अँड्रॉईड गो स्मार्टफोन असेल तर त्यामध्ये मॅप्स गो आधीपासूनच इंस्टॉल असेल


प्रो टीप ४: प्लस कोडचा वापर करून ठिकाणे शोधा आणि शेअर करा
भारतासारख्या देशात, पत्ते हे विस्कळीत स्वरुपात असतात आणि पत्ते सापडणं ही एक अशी गोष्ट आहे जी लोक गृहीत धरतात. पण तुम्ही कुठे राहता, किंवा काम करता किंवा प्रवासाला जात आहात या साध्या सोप्या माहितीच्याव्यतिरिक्त अनेक लोकांना महत्वाच्या सेवा जसे की टपाल, डिलिव्हरीज किंवा अगदी अत्यावश्यक, आणीबाणीच्या गोष्टी देखील कशा पोचवायच्या हे ठाऊक नसते. या आव्हानाला उत्तर देण्याचा प्रयत्न म्हणून अलीकडेच आम्ही ‘प्लस कोड्स’ सादर केले आहेत. हे कोड्स ज्यांच्याकडे प्रत्यक्ष स्थायी पत्ता नाही असे लोकअथवा ठिकाण यासाठी डिजिटल पत्ता म्हणून काम करतात. अगदी साध्या आणि नियमीत पत्ता व्यवस्थेवर आधारित असलेली ही यंत्रणा भारतात आणि जगभरात उपयुक्त ठरते आहे. या कोड्समध्ये केवळ ६ अक्षरे आणि शहर एवढीच माहिती असते, जी कधीही तयार करता येते, शेअर करता येते आणि कोणीही ती शोधू शकते.त्यासाठी तुमच्याकडे फक्त स्मार्टफोनवर गुगल मॅप्स असले की काम झाले. प्लस कोड्सचे खुले मुक्त (ओपन सोर्स) प्रकारचे स्वरूप असल्याने ही लोकेशन सेवा अगदी सहजपणे कोणीही आपल्या उपकरण व्यासपीठा
वर विनामूल्य समविष्ट करून घेऊन शकतात.




मी हे कसे मिळवू शकतो?

तुमच्या अँड्रॉईड फोन किंवा टॅबलेट्सवर गुगल मॅप्स अॅप उघडा.
गुगल मॅप्सवर पिन निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणावर बोट दाबून धरा.
 तळाशी, पत्ता किंवा वर्णन टाईप करा. प्लस कोड शोधण्यासाठी खाली स्क्रोल करा.  जसे की ४३ एमएफ + एफ६ नागपूर


प्रो टीप ५: तुमचे घर आणि कामाचे ठिकाण अतिशय सुलभतेने सेट
करा आणि सुरळीतपणे दळणवळण करा आपले घर आणि कामाचे ठिकाण या दरम्यानचा प्रवास असा असतो, जो आपण सगळेजण दैनंदिन करत असतो.
  •  जर दररोज तुम्हाला घराचे किंवा कामाचे ठिकाण टाईप करावे लागत असेल, तर ते मोठे वैतागवाणे ठरते. त्यामुळे कमीतकमी टायपिंग करायला लागावे आणि आपली दिशा अधिक जलद सापडावी यासाठी आम्ही अधिक सहकार्य पुरवले असून तुम्ही आता आपल्या घराचे आणि कामाच्या ठिकाणाचे लोकेशन गुगल मॅप्सवर सेट करून ठेवू शकणार आहात. 

  • तुम्ही हे करता क्षणीच आम्ही आपोआप त्या दोन्ही ठिकाणांच्या भोवतीचा ऑफलाईन नकाशा डाऊनलोड करून घेऊ जेणेकरून समजा कधी अचानक नेटवर्क खंडित झाले तरीही मॅप्स विना अडथळा काम करतील.

  • आम्ही मॅप्सच्या होमस्क्रीनवरती नुकताच नवीन “ड्रायव्हिंग” टॅब जोडला असून त्यामुळे हा अनुभव अधिक सुकर होणार आहे. आता जेव्हा कधी तुम्ही घरून कामावर जाण्यासाठी किंवा कामावरून घरी परतण्यासाठी वाहन चालवत असाल तुम्हांला काहीही टाईप करायची गरज नाही. फक्त “ड्रायव्हिंग” या टॅबवर क्लिक करा आणि त्यावेळेचा सर्वोत्तम मार्ग आपोआप तुम्हाला दिसू लागेल.


मी हे कसे मिळवू शकतो?
तुमच्या अँड्रॉईड फोन किंवा टॅबलेटसवर गुगल मॅप्स अॅप उघडा. ‘मेनू’वर क्लिक करा आणि ‘युवर प्लेसेस’वर जा. त्यातून ‘घर’ किंवा ‘काम’ अशी निवड करा आणि पत्ता नोंदवा. किंवा गुगलमॅप्सच्या सर्च बारमध्ये जा आणि तुम्हांला आपोआप ‘होम’ किंवा ‘वर्क’ लोकेशन सेट करण्यासाठी सहाय्य मिळेल.
गुगल मॅप्स वापरून सर्वोत्तम दळणवळण अनुभव मिळवण्यासाठी ‘होम’ किंवा ‘वर्क’ लोकेशन सेट केल्यानंतर तळाशी असणाऱ्या ‘ड्रायव्हिंग’ टॅबचा उपयोग करा.



प्रो टीप ६: नेव्हिगेट करा आणि स्थानिक भाषांचा धांडोळा घ्या

गुगल मॅप्समधील स्थानिक भाषांच्या माहितीने दररोज लक्षावधी लोकांना उत्तम ठिकाणे शोधण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी सहाय्य पुरवलेले आहे. गुगल मॅप्स नकाशावरील सर्व ठिकाणे दोन भाषांत दाखवते.हे दुहेरी लेबल हिंदी, कन्नड, पंजाबी, मल्याळम, गुजराती, मराठी तमिळ, तेलुगु, बंगाली आणि नेपाळी अशा दहा स्थानिक भाषांत उपलब्ध असून तुमच्या स्थानानुसार गुगल मॅप्स आपोआप ठिकाणाचे नाव स्थानिक भाषेत दुहेरी लेबलमध्ये दाखविते. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात तुम्ही इंग्रजी आणि मराठीमध्ये नावे पाहू शकता. व्हॉईस नेव्हिगेनच्या साह्याने तुम्ही ट्रॅफिक अलर्ट्स पाहू शकता. कुठे वळायचे, कोणत्या मार्गावर जायचे, एखादा अधिक चांगला मार्ग आहे का अशी माहिती तुम्हाला मिळू शकते. गुगलने सात भारतीय भाषांमध्ये व्हॉईस नेव्हिगेन आणले आहे : हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड, तेलुगु, तमिळ आणि मल्याळम.




मी हे कसे मिळवू शकतो? तुमच्या अँड्रॉईड फोन किंवा टॅबलेट्सवर गुगल मॅप्स अॅप उघडा. ‘मेनू’वर क्लिक करा आणि ‘सेटिंग्ज’मध्ये जा. सेटिंग्जमध्ये ‘नेव्हिगेशन सेटिंग्ज’मध्ये जा आणि ‘व्हॉईस सिलेक्शन’ची आणि तेथून हव्या त्या भाषेची निवड करा.


प्रो टीप ७: कलेक्शन आणि फोटो यांच्याद्वारे स्थानिक ठिकाणांचा धांडोळा घ्या

तुम्ही आता तुमच्या गुगल मॅप्सच्या सहयोगाने तुमच्या अवतीभोवतीच्या ठिकाणांचा धांडोळा घेऊ शकता आणिआपले अनुभव इतरांसोबत शेअर करू शकता. याला अधिक सुलभ बनविण्यासाठी गुगल मॅप्स आपोआप सुसंगत श्रेणींची निवड करेल ज्या तुम्ही तिथल्या तिथे क्लिक करून अगदी सहज बघू शकाल. रेस्टॉरंटस, हॉटेल्स, फार्मसीज, ग्रोसरी दुकाने आणि अन्य कित्येक ठिकाणे धुंडाळा आणि ती कधी सुरू असतात, त्यांचे मानांकन काय आहे, फोटोज इत्यादी पाहा. दिवसाच्या कोणत्या वेळात तिथे सर्वाधिक गर्दी असते याचीही माहिती तुम्हांला मिळू शकेल आणि त्यांच्या नकाशा नोंदणीतूनच तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकाल किंवा त्यांच्या व्यावसायिक संकेतस्थळाला भेट देऊ शकाल.

मी हे कसे मिळवू शकतो?
तुमच्या अँड्रॉईड फोन किंवा टॅबलेटसवर गुगल मॅप्स अॅप उघडा. होम स्क्रीनवर ‘एक्सप्लोर’वर क्लिक करा आणि रेस्टॉरंटस, कॅफेज, पेट्रोल पंप, एटीएम केंद्रे,फार्मसीज आणि ग्रोसरी दुकाने यांच्यासह विविध पर्याय निवडा.



प्रो टीप ८: तुमचे स्थानिक खास वैशिष्ट्य शेअर करा
स्थानिक व्यक्तीइतके ते ठिकाण अन्य कोणालाच चांगले माहिती नसते. जर तुम्ही तुमच्या भागातील तज्ञजाणकार असाल, तर तुम्ही गुगल मॅप्सवर परीक्षण, माहिती, छायाचित्रे इत्यादी योगदान देऊन किंवा गुगल मॅप्सवर नवीन ठिकाणांची भर घालून स्थानिक गाईड म्हणून भूमिका बजावू शकता. स्थानिक गाईड्स हामु शाफिर लोकांचा एक जागतिक समुदाय आहे, जे गुगल मॅप्सवरती परीक्षण लिहितात, छायाचित्रे शेअर करतात, प्रश्नांना उत्तरे देतात, ठिकाणांची भर घालतात किंवा माहितीची दुरुस्ती करतात, तथ्ये तपासून बघतात. कुठे जायचे आणि काय करायचे याचा निर्णय घेण्यासाठी तुमच्या सारखे लक्षावधी लोक या माहितीच्या योगदानावर विसंबून राहतात. तुम्ही दिलेले माहितीचे योगदान अन्य लोकांना गुगल मॅप्सची अधिक चांगली अनुभूती मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरतील. आता तुम्ही स्थानिक रस्त्यामधील वाहतूक कोंडी, बंद असलेले मार्ग, नवीन अनोळखी मार्ग यांची माहिती तसेच व्हिडीओज आणि ३६० अंशातील छायाचित्रे आदी अपलोड करून गुगल मॅप्सला अधिक उपयुक्त,अधिक व्यवहार्य, संयुक्तिक आणि समावेशक बनवू शकता. जागतिक स्तरावरील स्थानिक गाईड समुदायात भारताचा तिसरा क्रमांक आहे.एक स्थानिक गाईड या भूमिकेतून तुम्ही गुगल मॅप्सवर परीक्षण, माहिती, छायाचित्रे इत्यादी योगदान देऊ शकता.यामुळे तुम्ही या कार्यक्रमाच्या वरच्या पातळीवर पोहोचू शकता, जिथे तुम्हांला गुगल फीचर्स इतरांपेक्षा जलदमिळणे आणि भागीदारांकडून खास सुविधा मिळणे आदी लाभ होऊ शकतात. चौथ्या पातळीवर तुम्हांला स्थानिक गाईड असा बिल्ला प्राप्त होतो, ज्यामुळे तुम्ही दिलेले योगदान अधिक चटकन इतरांकडून पहिले जाण्यास सहाय्य होते.

मी नोंदणी कशी करू शकतो? तुम्ही थेट गुगल मॅप्स अॅपमध्ये जाऊन नोंदणी (साईन अप) करू शकता आणि गुगल मॅप्सवर शहरातील तज्ञ जाणकार बनू शकता.
हे कसे मिळवू शकतो?
  • तुमच्या अँड्रॉईड फोन किंवा टॅबलेटसवर गुगल मॅप्स अॅप उघडा.
  • ‘मेनू’वर क्लिक करा आणि ‘युवर कॉन्ट्रीब्युशन्स’मध्ये जा. तुमच्या नावावर क्लिक करा
  • आणि तुमच्या प्रोफाईलमध्ये तुमचे जमा पॉईंटस दिसू लागतील. तुम्ही योगदान दिल्यानंतर
  • तुमच्या प्रोफाईलमध्ये तुमचे जमा पॉईंटस दिसण्यासाठी साधारण २४ तासांचा कालावधी लागू शकतो.


प्रो टीप ९: तुमचे नेमके ठिकाण इतर लोकांना अगदी अचूक कळू द्या
रिअल टाईम लोकेशन शेअरिंग या सुविधेमुळे तुम्ही स्वतःचे नेमके स्थान/ठिकाण अगदी अचूकपणे तुम्हाला हव्या त्या व्यक्तीपर्यंत पोचवू शकणार आहात. आणि ज्यांना तुम्ही हे कळवाल ते लोक अँड्रॉईड उपकरण किंवा आयफोन काहीही वापरत असले तरीही ते तुमचे नेमके स्थान कुठे आहे ते पाहू शकतील.
पुढच्या वेळी तुम्ही प्रवासात असाल आणि उशीर होत असेल, तर तुमचे अचूक वेळेचे ठिकाण तसेच नेव्हीगेशनच्या माध्यमातून प्रवास कुठून कसा सुरू आहे तो तपशील इतरांसोबत शेअर करा. तुमच्या पुढच्या ट्रीपमध्ये नेव्हीगेशन स्क्रीनवर तळात असलेले “मोअर” हे बटन दाबा आणि त्यानंतर “शेअर ट्रीप”वर क्लिक करा. जेव्हा तुम्ही आपला प्रवास इतरांसोबत शेअर कराल, त्यांना तुमची पोचण्याची अंदाजे वेळ कळू शकेल आणि तुम्ही आपल्या नियोजित ठिकाणी पोचत असताना ते तुमच्या प्रवासावर लक्ष ठेवू शकतील. गुगल मॅप्समधील रिअल टाईम लोकेशन शेअरिंगद्वारे तुमच्या ठिकाणावर कोण लक्ष ठेवू शकते, आणि किती वेळासाठी ठेवू शकते याचे संपूर्ण नियंत्रण सर्वस्वी तुमच्या हातात असणार आहे. जेव्हा तुम्ही आपल्या नियोजित ठिकाणी पोहोचाल, शेअरिंग सुविधा आपोआप बंद होईल.


  • मी हे कसे करू शकतो?
  • “शेअर लोकेशन”वर क्लिक करा. आणि मग कोणाला लोकेशन शेअर करायचे ते निवडा आणि किती वेळ शेअर करत राहायचे तो कालावधी निवडा – आणि काम फत्ते झालं! 

  • तुमचे गुगल कॉन्टॅकट्स वापरून तुम्ही अचूक रिअल टाईम लोकेशन शेअर करू शकता किंवा, तुमच्या आवडत्या मेसेंजर अॅपवर आपले मित्र किंवा कुटुंबीय यांना लिंक पाठवू शकता.
  • जेव्हा तुम्ही स्वतःचे लोकेशन शेअर करता, तुम्ही निवडलेले लोक त्यांच्या मॅपवर तुम्हाला पाहू शकतात.

प्रो टीप १०: एकाचवेळी अधिकाधिक दिशांचे थांबे निवडून तुमचा प्रवास आखा आणि नियोजित नसलेल्या गरजांसाठी मार्गावरून जाता जाता हवी ती ठिकाणे शोधा तुम्ही आपल्या मित्रांना विविध ठिकाणांहून पिकअप करण्याची योजना आखत असला किंवा एकटेच भ्रमंतीला निघून शहराच्या विविध कानाकोपऱ्यातील ठिकाणे धुंडाळण्याच्या विचारात असाल, तर गुगल मॅप्स निश्चितपणे
तुम्हाला मार्गदर्शन करेल, आपल्या मल्टी स्टॉप डायरेक्शन या फिचरच्या सहाय्याने! त्यामुळे तुम्हाला तोच एव्हाना अंगवळणी पडलेला पूर्वीसारखा विनासायास, विनाअडथळा भ्रमंती करण्याचा अनुभव मिळेल, आणि तुम्ही एकाच प्रवासात १० विभिन्न ठिकाणांची भर घालू शकाल!


प्रवास सुरु असताना इंधन भरण्यासाठी, कॉफीपानासाठी, पोटोबा करण्यासाठी किंवा अन्य कशाहीसाठी तुम्ही थांबलात तरीही मूळ मार्गाचा धागा कायम राहील. उदाहरणार्थ, जर तुम्ही गाडी चालवत आहात, आणि अचानक
लक्षात आलं की इंधन अगदीच कमी होत चाललं आहे, तर गाडी वळवून वाटेत दिसलेल्या पेट्रोल पंपाकडे पुन्हा मागे फिरायचं की पुढच्या येऊ घातलेल्या पंपापर्यंत जायचं, याचा नेमका निर्णय कधी कधी तुम्हाला घेता येत नाही.
“सर्च अलोंग युवर रूट” या सुविधेमुळे केवळ काही क्लिक्स करून तुम्हाला हा निर्णय आता सुकरपणे घेता येणार
आहे.

मला एकाचवेळी अधिक डायरेक्शन्स कशी मिळू शकतील?
  • अॅप उघडा, जिथे जायचे ते ठिकाण टाका,
  • कडेच्या मेनूवर क्लिक करा आणि मग त्यामध्ये “अॅड स्टॉप”वर क्लिक करा. तुमच्या ठिकाणांची फेरआखणी
  • करण्यासाठी “अॅड स्टॉप”च्या डाव्या बाजूला असलेली तीन ठिपक्यांची खूण दाबून धरा आणि इच्छित
  • ठिकाणी ती ओढून आणा – तुम्ही ठिकाणांचे प्रकार जसे की पेट्रोल पंप, एटीएम किंवा रेस्टॉरंट आदी जे
  • तुम्ही वरचेवर शोधता ते देखील शोधू शकता. तुम्हाला हवे तेवढे थांबे यामध्ये समाविष्ट करू शकता
(पण जास्तीत जास्त १० हे लक्षात असू द्या!) आणि एकदा काम झालं की “फिनिश्ड”वर क्लिक करा
जेणेकरून तुमचे एकावेळी अधिक थांबे शोधण्याचे कार्य पूर्णत्वास जाईल.


मी मार्गाने जात असताना शोध कसा घेऊ शकतो?
जेव्हा नेव्हीगेशन मोडमध्ये असाल, तळातील बार ओढा आणि “सर्च अलोंग रूट” निवडा. यामुळे तुम्हाला पेट्रोल पंप, रेस्टॉरंट, ग्रोसरी स्टोअर, कॉफी शॉप्स अशी सर्वात लोकप्रिय, प्रसिद्ध ठिकाणांची यादी आपोआप दिसू लागेल. एकदा तुम्ही निवड केलीत, की त्या ठिकाणापाशी गेल्याने तुमच्या अंतिम नियोजित ठिकाणापाशी जाण्याचा मार्ग ध्यानात घेऊन एकंदर प्रवासातील किती वेळ वाढेल हे गुगल मॅप्स तुम्हाला सांगेल.

वाहतूक कोंडीत अडकणे हा खूप वाईट प्रकार असतो. त्यातही असं किती वेळ अडकून पडावं लागेल हे माहीत नसणं तर आणखी त्रासदायक असतं. रिअल टाईम ट्रॅफिक वैशिष्ट्यामुळे गुगल मॅप्समधून तुम्ही सध्या असलेली वाहतुकीची परिस्थिती बघू शकता आणि कोणकोणते वेगवेगळे मार्ग तुम्ही अवलंबू शकता याची तुलना करू शकता. या वैशिष्ट्यामध्ये भारतातील सगळे राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्ग समाविष्ट आहेत आणि ३४ शहरांमध्ये हे उपलब्ध आहे.


गुगल मॅप्सवर गुगल वाहतुकीचे संदेशही पुरविते. सर्वात कमी वेळात तुम्हाला हव्या असलेल्या ठिकाणी पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग शोधायला गुगल मॅप्स तुम्हांला मदत करू शकेल आणि जोडीला गुगल मॅप्सवरील वाहतूक संदेशांमुळे तुम्हांला कोठे कोठे वाहतूक कोंडी व्हायची शक्यता आहे याची आगाऊ सूचनाही मिळू शकेल.आता जेव्हा तुम्ही स्वतःच्या इच्छित स्थळाची माहिती द्याल गुगल तुम्हाला आगामी वाहतूक कोंडीची माहिती देईल. त्यातून सर्वात जलद मार्ग शोधायला मदत होईल. तुम्ही रस्त्यावरून जात असताना अचानकपणे वाहतूक कोंडीचीपरिस्थिती उद्भवली तर गुगल मॅप्स तुम्हांला मार्गदर्शन करेल आणि त्यामुळे किती उशीर होऊ शकेल हेही सांगेल. दुसऱ्या एखाद्या मार्गाचा वापर करण्याचा पर्यायही तुम्हांला मिळेल. मग तो पर्याय सर्वाधिक जलद आहे का केवळ वाहतूक कोंडी टाळण्याचा पर्याय आहे याचे स्पष्टीकरणही देण्यात येईल.

मी ते कसे मिळवू शकतो?
तुमच्या सेटिंग्ज मेनू मध्ये जा आणि ट्रॅफिक लेयर सुरू करा. एकदा का हे सुरू केले की तुम्हांला वेगवेगळ्या रंगातील मार्ग दिसतील. त्यातून या रस्त्यांवरील वाहतुकीचा वेगवेगळा दिसणारा वेग सूचित होत असेल. हिरवा रंग म्हणजे रस्त्यावर सुरळीत वाहतूक सुरू आहे, केशरी रंग म्हणजे मध्यम प्रमाणात वाहतूक सुरू आहे तर लाल रंग म्हणजे प्रचंड वाहतूक कोंडी असल्याचे सुचविले जाते. गुगल मॅप्स होम स्क्रीन वरून तुम्ही जवळपासची वाहतूक थेटही बघू शकता. तुमच्या फोनवर गुगल मॅप्स सुरू करा. स्क्रीनच्या तळाशी असलेला ‘ड्रायव्हिंग’ आयकॉन सिलेक्ट करा आणि ‘ट्रॅफिक नियरबाय’ असं चेक करा.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.