आधी केवळ एक मेसेंजर ॲप असणारं व्हॉट्सॲप आता फार महत्वाचं मेसेजिंग ॲप बनलं आहे. लोक याचा वापर केवळ एकमेकांशी चॅट करण्याकरताच नाही तर व्यवसाय, कार्यालय याच्यातही करत आहेत. ज्यामुळे सद्यस्थितीला कोट्यवधी भारतीय व्हॉट्सॲप वापरत असून चॅटिंगसह, फोटो व्हिडीओ पाठवण्यापासून ते व्हिडीओ कॉलिंगसाठीही व्हॉट्सॲप वापरतात. त्यामुळे व्हॉट्सॲपच्या वेगवेगळ्या ट्रिक्सही अनेकजण वापरत असून एक अशीच भन्नाट ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
*WhatsApp Update*
Starting today, you can log into the same WhatsApp account on up to four phones.📲
आता मागील काही दिवसांपासून व्हॉट्सॲप देखील नवनवीन अपडेट घेऊन येत आहे. आता नव्याने येणाऱ्या अपडेटनुसार एक व्हॉट्सॲप अकाउंट आता चार वेगवेगळ्या स्मार्टफोनमध्ये चालवता येणार आहे. याआधी ज्याप्रकारे व्हॉट्सॲप एकावेळी फोनसह लॅपटॉप, टॅब्लेटमध्ये चालवले जात होते, तशाचप्रकारे आता वेगवेगळ्या चार फोन्समध्येही चालवता येईल. कंपनीने नुकतीच ही घोषणा केली असून लवकरच हे ॲप वापरात येणार आहे.
एक युजर आपल्या व्हॉट्सॲप अकाउंटला चार वेगवेगळ्या स्मार्टफोनमध्ये चालवू शकणार आहे. यावेळी सेंकडरी डिव्हाईसमध्ये व्हॉट्सॲप सुरु करण्याकरता युजर्सना एक कुआर कोड स्कॅन करावा लागेल. यावेळी एक ओटीपी बेस्ड ऑथिंटिकेशन सिस्टमही काम करणार आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग याने एका ऑफिशिअल ब्रॉडकस्टमध्ये या फीचरची घोषणा ही केली आहे. तर याचा सर्वाधिक वापर तेव्हा होईल, जेव्हा तुमच्या फोनची बॅटरी संपून फोन बंद पडत असेल त्यााचवेळी मित्राच्या किंवा तुमच्या सोबत असणाऱ्या विश्वासू व्यक्तीच्या फोनममध्ये व्हॉट्सॲप सुरु शकता.
हे करण्यासाठी आपल्या आधीच व्हॉट्सअॅप इंस्टॉल केलेल्या फोनला Primary Phone असं गृहीत धरलं जाईल आणि नंतर आपण लॉगिन करणाऱ्या दुसऱ्या, तिसऱ्या, इ. फोन्सना Companion Phones असं समजलं जाईल.
1. तुमच्या नव्या / दुसऱ्या फोन (Companion) वर WhatsApp इंस्टॉल करा
2. ओपन केल्यावर उजव्या कोपऱ्यात वर असलेल्या More Options: वर टॅप करा.
3. त्यानंतर Link to existing account
4. आता एक QR कोड दिसेल जो आपल्याला पहिल्या आधीच व्हॉट्सअॅप लॉगिन केलेल्या फोन (Primary) मध्ये स्कॅन
करायचा आहे.
5. त्यासाठी पहिल्या म्हणजेच Primary फोनमध्ये व्हॉट्सअॅप उघडा
6. त्यामध्ये More Options: > Linked Devices > Link a device
7. आता कॅमेरा उघडला असेल त्याद्वारे नव्या / दुसऱ्या फोनमध्ये दिसत असलेला QR कोड स्कॅन करा.
8. आता तेच अकाऊंट या फोनमध्ये सुरू झालेलं दिसेल.