Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल २६, २०२३

नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ११ जवान शहीद | naxals attack

छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ११ जवान शहीद झाले असून अनेक जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.


नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ११ जवान शहीद


Chhattisgarh | IED attack on a vehicle carrying DRG (District Reserve Guard) personnel near Aranpur in Dantewada district. The IED was planted by naxals.


#BreakingNews | IED attack on a vehicle claims the lives of 11 personnel, carrying DRG (District Reserve Guard) personnel near Aranpur in the Dantewada district.


Ten policemen, one civilian killed in blast carried out by Maoists in Chhattisgarh's Dantewada: officials

छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला झाला आहे. यामध्ये 11 जवान शहीद झाले आहेत. दंतेवाडा येथील अरणपूर येथे जिल्हा राखीव रक्षक दल (DRG) दलाच्या वाहनावर आयईडी हल्ला झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवादी आणि जवानांमध्ये अजूनही चकमक सुरू आहे. या घटनेला दुजोरा देत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शोक व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर पोलिसांनी नक्षलवाद्यांना घेरले आहे. दोघांमधील चकमक अजूनही सुरूच आहे. आणखी फोर्स मागवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जवान ऑपरेशनसाठी बाहेर पडले होते. दरम्यान, अरणपूरच्या पालनार भागात नक्षलवाद्यांनी आयईडीने जवानांनी भरलेले वाहन उडवले आहे. घटनास्थळी दोन रुग्णवाहिका रवाना झाल्याचे वृत्त आहे. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.