Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

chandrapur लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
chandrapur लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, डिसेंबर ०७, २०२२

फेब्रुवारीत चंद्रपुरात 35 वे राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन  | Maharashtra pakshimitra sammelan 2023

फेब्रुवारीत चंद्रपुरात 35 वे राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन | Maharashtra pakshimitra sammelan 2023



इको-प्रो संस्थेकडे यजमानपद, महाराष्ट्र पक्षिमित्र कडून घोषणा

चंद्रपुरात प्रथमच राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलनाचे आयोजन

Maharashtra pakshimitra sammelan 2023 | यंदा राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन चंद्रपूर येथे फेब्रुवारीत होणार असून, या संमेलनाचे यजमानपद इको-प्रो संस्थेकडे देण्यात आल्याची घोषणा नुकतीच महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेने केली आहे. 

महाराष्ट्र पक्षीमित्रचे अध्यक्ष डॉ. जयंत वड़तकर आणि पदाधिकारी यांनी चंद्रपूरला भेट देत इको-प्रो कार्यालयात छोटेखानी बैठक घेत संमेलन आयोजन बाबत प्रारंभीक चर्चा केली.

 इको-प्रो संस्था व महाराष्ट्र पक्षिमित्र च्या माध्यमातून ११ व १२ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर शहरात 35 वे राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन आयोजित करण्यात येत आहे, यासंदर्भात संमेलन आयोजन बाबत महाराष्ट्र पक्षिमित्र व इको-प्रो संस्थेचे पदाधिकारी यांच्यात चर्चा झाली.

राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलनाच्या आयोजनासंदर्भात चंद्रपूर शहरात इको प्रो कार्यालयात नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र पक्षिमित्रचे अध्यक्ष डॉ जयंत वड़तकर, कार्यवाह प्रा. डॉ गजानन वाघ, किरण मोरे, सहा. संपादक पक्षिमित्र त्रैमासिक, इको-प्रो अध्यक्ष बंडू धोत्रे, पर्यावरण विभाग प्रमुख, नितिन रामटेके, सचिन धोतरे, स्वप्निल मेश्राम व अॅड. राजमेहेर निशाने, सौरभ जवंजाळ आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

महाराष्ट्र पक्षिमित्र संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत राज्यातील एका शहरात पक्षिमित्र संमेलनाचे आयोजन करण्यात येत असते. पक्षी संवर्धन, जनजागृती, संशोधन, उपचार सेवा या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती आणि संस्थांचा गौरव व्हावा, यासाठी महाराष्ट्र पक्षिमित्र संस्थेतर्फे पुरस्कार देखील देण्यात येत असतात. 1981 मध्ये सुरुवात झालेल्या महाराष्ट्र पक्षिमित्र चळवळीत संस्थेच्या माध्यमातून मागील 42 वर्षात 34 राज्य स्तरीय व ३० पेक्षा जास्त विभागीय संमेलनांचे आयोजन आजवर करण्यात आले आहे. यंदा 35 वे संमेलन चंद्रपूर शहरात आयोजित करण्यात येत असल्याची घोषणा डॉ. जयंत वडतकर यांनी केली. यापूर्वी 2019 ला इको-प्रो संस्थेने 19 वे विदर्भस्तरीय पक्षिमित्र संमेलनाचे यशस्वी आयोजन केले होते. चंद्रपूर शहरात प्रथमच राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन होत असून ही मानाची बाब आहे.

चंद्रपूर येथे आयोजित होणाऱ्या संमेलनामध्ये इको प्रो संस्था प्रमुख आयोजक म्हणून राहणार असून, 11 व 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या  संमेलनाचे सोहळ्यात पुरस्कार वितरण, विविध मान्यवरांची व्याख्याने व सादरीकरणे,  स्मरणिका प्रकाशन, पुस्तक प्रकाशन पक्षी निरीक्षण कार्यक्रम, प्रगट मुलाखत, चित्रकला, छायाचित्र, रांगोळी स्पर्धा होणार असून, पर्यावरणपूरक विविध प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल राहणार आहेत.

इको-प्रो तर्फे आयोजित राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनबाबत लवकरच शहरातील स्थानिक पर्यावरण संस्था व पक्षीमित्र यांचेसोबत आयोजन संदर्भात बैठक घेतली जाणार असल्याचे इको-प्रो पक्षी संरक्षण विभाग चे बंडू दुधे आणि हरीश मेश्राम यांनी कळविले आहे.
Maharashtra Pakshimitra has been striving to protect Birds of Maharashtra since the past 20 years. Being a non-profit NGO, we rely on your help in securing

सोमवार, डिसेंबर ०५, २०२२

"जुबिली शाळेच्या विद्यार्थ्यांची रिलायन्स ट्रेन्डस् स्टोर ला क्षेत्रभेट

"जुबिली शाळेच्या विद्यार्थ्यांची रिलायन्स ट्रेन्डस् स्टोर ला क्षेत्रभेट





चंद्रपूर- जिल्हा परिषद जुबिली हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, चंद्रपूर येथील वर्ग ९ ते १२ वी च्या व्यवसाय अभ्यासक्रमातील रिटेल विषय शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट शुक्रवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ ला चंद्रपुरातील रिलायन्स ट्रेन्डस् स्टोअर या फॅशन दुकानात आयोजित केली गेली. "विद्यार्थ्यांचे पुस्तकी शिक्षणाबरोबरच व्यावसायिक कौशल्य सुद्धा विकसित होणे आवश्यक आहे" तसेच विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन वाढावा या उद्देशाने समग्र शिक्षा अभियानांतर्गत व्यवसाय शिक्षण विभागातर्फे या क्षेत्रभेटीचे नियोजन व्यवसाय शिक्षक श्री. पवन खनके सरांनी केले व विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट घडवून आणली.
या क्षेत्रभेटी दरम्यान स्टोअर चे प्रबंधक श्री. अजय सिंगणापूर यांचे मार्गदर्शनात कुमारी सोनाली मॅडम आणि प्रकाश सर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. सदर क्षेत्रभेट प्राचार्य श्रीमती वाघमारे मॅडम यांच्या नेतृत्वात रिटेल विषय शिक्षक श्री. पवन खनके यांनी आयोजित केली होती. त्यात सहकारी श्री गोविंद सर तसेच सर्व शिक्षकांचे आणि पालकांचे सहकार्य लाभले.
"ते पन्नास दिवस" : पंधराशे किलोमीटरचा पायदळ प्रवास

"ते पन्नास दिवस" : पंधराशे किलोमीटरचा पायदळ प्रवास

पवन भगत यांच्या या कादंबरी ला ऑथर ऑफ दि ईयर


मुंबई ते बनारस या १५०० किलोमीटरच्या पायी प्रवासात मानवी अंतरंगात घडणार्‍या एका वेगळ्या महाप्रवासाचे दर्शन लेखक घडवतो. मुंबई या आर्थिक राजधानी कडून बनारस या एका पारंपरिक शहराकडे हे सगळे चालले आहेत. जणू आधुनिकतेकडून पुरातन काळाकडे ते चालले असावेत. दलित, मुस्लिम आणि ब्राह्मण असलेल्या या पात्रांचा भौतिक प्रवास असा घडत असला तरी त्यांचा मानसिक प्रवास मात्र एका वेगळ्याच अदभूत दिशेला होतो. ती दिशा कोणती? शेवटी ते त्यांच्या गावी पोहोचू शकतात का? दरम्यान त्यांच्यात कोणते आंतरबाह्य बदल होतात, हे जाणून घेण्यासाठी ही कादंबरी नक्कीच वाचावी. वेगळे काहीतरी गवसेल.   

बहुचर्चित कादंबरी ते पन्नास दिवस..या पुस्तकाचे लेखक पवन भगत यांना या वर्षी चा इंडियन पब्लिशर फेडरेशन च्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार जाहीर झाला आहे. पन्नास हजार रोख आणि सन्मान पत्र या पुरस्काराचे स्वरूप असून. महामारी च्या काळात अचानक पणे लादण्यात आलेल्या टाळेबंदी च्या निर्णयाने स्थानांतरित मजुरांची ससेहोलपट भूक उपसमारीचा सामना करीत केलेला पंधराशे किलोमीटर चा पायदळ प्रवास या कादंबरीत विशद करण्यात आला आहे.

 Those Fifty Days : A fifteen hundred kilometer march on foot


कोरोना काळातील माणूस पण हरवलेल्या समाजाचे चित्र महामारी ला अवसर म्हणून केलेल्या काळाबाजारी, भेदभाव, सावकारी, कर्जबाजारी, रस्त्यावरील मजुरांचा मृत्यू, रेल्वे रुळावरील स्थानांतरित मजुरांची प्रेते,पायदळी चालणाऱ्या मजुरांचे शोषण,पोलिसी अत्याचार, बहिष्कृत जगणे ,रस्त्यावरील होत असलेल्या प्रसूती, महिलांच्या मासिक पाळीच्या समस्या, कोरोना चे सांप्रदायिकरण,निसर्ग निर्मित महामारी च्या दहशतीचे अमानवीय स्वरूप, रस्त्यावरील चालणाऱ्या मजुरांचे भुके समोर जात,धर्म,पंथाच्या उभ्या असलेल्या इमारती कोसळल्या,केवळ मजूर म्हणून जंगलातील पाने फुले खाऊन एकमेकांना सांभाळत केलेला पंधराशे किलोमीटर चा पायदळ प्रवास ..या कादंबरीत मांडण्यात आला असल्याने साहित्य वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे..



अमेझॉन वर या कादंबरी ला चांगली मागणी असल्याने,या वर्षीच्या ऑथर ऑफ दि यिअर या पुरस्काराने कलकत्ता येथे देश विदेशातील साहित्यिक, पब्लिशर च्या पुढे हा पुरस्कार देण्यात येत आहे..
लेखक पवन भगत यांचे सिद्धार्थ वाघमारे,अशोक निमगडे सर, सुरेश नारनवरे जितेंद्र डोहणे तसेच अनेक साहित्य संस्थेने अभिनंदन केले..

शनिवार, डिसेंबर ०३, २०२२

Death of 4 tiger cubs in Sheoni Buffer range Tadoba Chandrapur

Death of 4 tiger cubs in Sheoni Buffer range Tadoba Chandrapur

*Preliminary report on death of tiger cubs in Sheoni Buffer range of Tadoba Andhari Tiger Reserve, Chandrapur.*



On 1.12.2022 four tiger cubs aged between 3-4 months were sighted in compartment no 265. The location is 3 km (areal distance) from gat no 185 where a decomposed by of tigress (T 75) was found on 30.11.2022. A search team of RFO Sheoni and staff along with PRT members were monitoring the cubs ever since. On 2.12.2022, a male tiger was located in the same vicinity. 




During further search on 3.12.2022 the search team found dead bodies of all the four tiger cubs (2 male and 2 female) along with the presence of the male tiger. All four bodies are found with bite injuries and are apparently killed by the male tiger.



 There is presence of 2 males and an other female in the same area due to which identity of the mother is not confirmed. All the cubs are being taken to TTC chandrapur for PM examination. Tissue samples of all the cubs and the dead tigress will be analysed by DNA identification methods and identity of mother and cubs will be confirmed.




 Further intensive monitoring in the area for presence and movement of anther tigers will be continued by placing camera traps and by deploying field personnel.
चंद्रपूर जिल्ह्यात आणखी चार वाघांचा मृत्यू  | Tadoba Chandrapur Tiger

चंद्रपूर जिल्ह्यात आणखी चार वाघांचा मृत्यू | Tadoba Chandrapur Tiger



मागील दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील ताडोबा (tadoba) अभयारण्यातील बफर झोनमध्ये दोन वाघांचा (Tiger) मृत्यू झाल्याची घटना घडली.   handrapur breaking news

ही घटना घडल्यानंतर आणखी आज चार बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ताडोबाच्या बफर झोन मधील शिवनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या जंगलात चार बछडे मृत अवस्थेत आढळून आले. मोठ्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे याबाबत वन विभागाने अद्याप पर्यंत अधिकृत माहिती दिलेली नाही सूत्राने दिलेल्या माहितीनुसार चार बछडे जंगलात आढळून आले होते या संदर्भात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर पंचनामा करण्यात येत आहे. Forest | tiger exch247 | Tadoba
-------------- Read News-----------

ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान असून ते चंद्रपूर जिल्हयात आहे. याची स्थापना १९५५ साली झाली व महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. उद्यानात आढळणाऱ्या मगरी-सुसरी आणि गवा हे इथले मुख्य वैशिष्ट्य आहे. tiger exch247 tiger exch247 handrapur breaking news
 

वरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित; ही एक चूक पडली महागात

वरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित; ही एक चूक पडली महागात



वरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड यांना निलंबित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वन संघटनेच्या माध्यमातून मागणी रेटून झाल्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

वनरक्षक संदीप वाटेकर यांना असलेली भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी वरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड यांना निलंबित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत नपाल संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यासंदर्भात चंद्रपूर वनवृत्त समोर आंदोलन देखील करण्यात आले. आज 3 डिसेंबरपासून मुख्य वनसंरक्षक कार्यालय यांच्यासमोर धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला. याशिवाय मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर यांचा देखील निषेध करण्यात आला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ मधुकर राठोड यांना पदावरून निलंबित केले आहे. chandrapur Forest RFO

बुधवार, नोव्हेंबर ३०, २०२२

व्हिडीओ चित्रफीत बनवून उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडे मागितली ५० लाखाची खंडणी |

व्हिडीओ चित्रफीत बनवून उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडे मागितली ५० लाखाची खंडणी |

व्हिडीओ चित्रफीत बनवून उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडे मागितली ५० लाखाची खंडणी |  


चंद्रपूर (Chandrapur) | शहरातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांचेकडे तक्रार दिली की, काही इसमांनी संगणमत करून काही महिण्यापुर्वी त्यांना फ्लॅटवर बोलवून एका महिलेसोबतचे बेडरूममध्ये छुपा कॅमेरा लावून चित्रफीत तयार केली. काही दिवसांनी ती रेकॉर्ड केलेली चित्रफीत तक्रारदार यांना पाठवून ति प्रसारीत करण्याची धमकी देवून 3,00,000/- रू.ची खंडणी उखळली. त्यानंतर पुन्हा खंडणी वसुल करण्याची लालसा निर्माण झाल्याने सदरची चित्रफीत एका अनोळखी इसमास पाठवून त्याचे मार्फतीने तक्रारदार यांना आणखी 50,00,000/- रू. चे खंडणीची मागणी करीत असून त्या अनोळखी इसमाने त्याचे मोबाईलवरून तक्रारदार यांना सदर चित्रफीतीचे स्क्रिनशॉट पाठवून ति चित्रफीत सामाजीक माध्यमावर प्रसारीत करण्याची धमकी देत आहे. 
(Superintendent of Police | Chandrapur | camera | bedroom | broadcast)
 
त्यावर तक्रारदार याने त्याचेकडे पैसे नसल्याचे सांगीतल्याने अनोळखी इसम हा तक्रारदार यांचे कार्यालयात जावून तक्रारदार यांचेकडून 5,00,000/- रू.चा चेक व काही नगदी रक्कमेची मागणी केली. अशा प्राप्त तक्रारीचे अनुषंगाने कारवाई करणे सबंधाने मा.पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांनी पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. बाळासाहेब खाडे यांना आदेशीत केल्यावरून त्यांनी खंडणी मागणाऱ्या अनोळखी इसमास पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेतील स. पो. नि. जितेंद्र बोबडे, मंगेश भोयर, संदिप कापडे, पोउपनि अतुल कावळे यांचे विशेष पथक स्थापन करून सापळा कारवाई करण्या बाबत आदेशीत केले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दि. 29/11/2022 रोजी खंडणी मागणारा इसम नामे सादीक खॉन रसिक खॉन पठाण यास तक्रारदार यांचेकडून 30,000/- रू. रोख व 5,00,000/- रू. चा चेक घेत असतांना रंगेहात पकडले व त्यास अधिक विचारपूस केली असता त्याने सांगीतले की, सादीक खान याच्या मैत्रीणीने तिचे मोबाईल वरून पाठविले व तिने त्यास संबंधीत उच्च पदस्थ अधिका-यास पाठवुन व भेटुन प्रसारीत करण्याची धमकी देवून पैशाची मागणी करण्यास सांगीते त्यानुसार त्याने सदर कामाकरीता त्याचे नावावर नविन सिम कार्ड घेतले व त्या मोबाईल क्रमांकावरून तक्रारदाराचे मोबाईलवर व्हॉट्सअॅप द्वारे चित्रफितीचे स्किन शॉट पाठविले व ते प्रसारीत करण्याची धमकी देवुन प्रकरण संपवायचे असल्यास भेटण्यास प्रवृत्त केले व भेटीमध्ये 50 लाख रू. खंडणीची मागणी केली.

तक्रारदाराने ऐवढे पैसे नसल्याचे सांगीतले तेव्हा त्याने पाच लाख रू. चे चेक व असतील तेवढी रोख रक्कम देण्यास सांगीतले. तसेच अधिक चौकशी मध्ये निष्पन्न झाले की सदरची चित्रफित ही आरोपी नामे झिबल मारोतराव भारसाखरे याने त्याची दुसरी पत्नी (आरोपी) हिचे राहते घरी छुपा कॅमेरा लावुन चित्रफित मध्ये असलेल्या आरोपीत महीलेच्या संगणमताने तकारदार यांना घरी बोलावुन बेडरूम मध्ये चित्रीकरण केले होते. त्यावरून आरोपी नामे 01) सादीक खॉन व 02 ) झिबल भारसाखरे व त्यांच्या इतर तिन महिला आरोपीत साथीदारांविरूद्ध पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे अपराध क्र. 641 / 2022 कलम 384, 385, 34 भा.द.वी. प्रमाणे खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंग संतोषसिंग परदेशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर, सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, पो.उप.नि. अतुल कावळे, पोलीस अंमलदार संजय आतकुलवार, प्रकाश बलकी, प्रमोद डंबारे, संतोश येलपुलवार, कुंदन बावरी, नितीन रायपूरे, गोपाल आतकुलवार, नरेश डाहूले, अजय बागेसर, भास्कर चिचवलकर, महिला अंमलदार अपर्णा मानकर, निराशा तितरे, सोनाली पेन्दाम यानी केली.  (police Presnote)
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती वरील स्थगिती कायम

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती वरील स्थगिती कायम




चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती वरील स्थगिती कायम

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सहकार खात्याची मागील 10 वर्षात घडलेल्या अनेक गंभीर तक्रारी लपवून मिळवलेल्या 360 पदाची नोकर भरतीबाबत सत्यता शासनाकडे खासदार व आमदार यांनी पाठपुरावा करून सत्यता निदर्शनास आणून दिल्याने 12 मे 2022 ला सहकार विभागाने स्थगीती दिली होती. त्यावर 23 नोव्हेंबर रोजी स्थगिती उठविण्यात आली होती. मात्र, 29 नोव्हेंबर रोजी सुधारित आदेश निघाले असून, स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. 


 2017 ला विहित कार्यकाळ संपल्यानंतर कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्याचे न टाळता नोकर भरती, अमाप व अवास्तव खरेदीवर खर्च, मानधनावर लपून छपून भरती, निवृत्त अधिकारी यांना मानधनावर नेमणूक विम्यावर खर्च, अव्यवहार्य पोटनियम दुरुस्ती, शेतकरी कल्याण निधीचा गैरवापर, मुख्य कार्यकारी अधिकारी याची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नाबार्ड, सहकार खाते चे फिट अॅड प्रॉपर क्राईटरिया नियमात न बसणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती करून गंभीर गुन्हे लपवून केंद्र व राज्य सरकारची दिशाभुल इत्यादी गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्याची खासदार श्री बाळूभाऊ धानोरकर व आमदार सौ. प्रतिभाताई धानोरकर यानी शासन दरबारी लावून धरली. काही निवडक मंडळींनी सहकार खात्याची वर नमुद बाबी दडपून बँकेच्या रक्कमेची उधळपट्टी करीत होते. खासदार व आमदार यांचे जागरूप भूमिकेने स्वप्नभंग झालेला आहे.

 खासदार बाळुभाऊ धानोरकर व आमदार सौ. प्रतिभा धानोरकर यांनी बँकेतील काळजीवाहू संचालक मंडळ करीत असलेल्या गैरकृत्य पुराव्यासह आळा घालण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत आहेत.
 अनेक गंभीर गैरप्रकार रोखण्यासाठी काही संचालकांनी खासदार यांचेशी संपर्क साधुन पुरावे दिल्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष काही संचालक व अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Finally, the dream of Chandrapur District Central Co-operative Bank recruitment failed 
गायरान जमीनीवरील अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा

गायरान जमीनीवरील अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा

गायरान जमीनीवरील घरे अतिक्रमण म्हणून काढणार नाही


सुधीर मुनगंटीवार यांच्या आग्रहानंतर मंत्रीमंडळाचा निर्णय

*सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार*

मुंबई, दि. 29 नोव्हेंबर 2022:




गायरान जमीनीवरील गरीबांची घरे अतिक्रमण म्हणून काढली जाणार नाहीत असा निर्णय आज राज्य मंत्रीमंडळाने चर्चेअंती घेतला. ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांच्या आग्रहानंतर मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय मंत्रीमंडळ बैठकीत मांडून मंजूर करून घेतला. त्याबद्दल ना.श्री.मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत. राज्यातील सुमारे सव्वादोन लाख कुटुंबांना याचा फायदा मिळणार आहे. Sudhir mungantiwar Maharashtra political Vidhan mandal 

सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार गायरान जमीनीवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात महसुल विभागाने संबंधितांना नोटिसा बजावल्‍या आहेत. परंतु या गरीबांची घरे निष्कासित करणे योग्य नाही, असे ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी आग्रहपूर्वक मांडले. त्‍यास सकारात्मक प्रतिसाद देत एकाही व्‍यक्‍तीचे अतिक्रमण काढले जाणार नाही असे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यासंदर्भात राज्‍य सरकार सर्वोच्‍च न्‍यायालयात फेरयाचिका दाखल करेल, असेही श्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

राज्‍यात दोन लाख 22 हजार 382 व्‍यक्‍तींची घरे शासनाच्‍या गायरान जमिनीवर आहेत. ती अतिक्रमणे असल्याने महसुल विभागाने त्‍या प्रत्‍येकांना अतिक्रमण काढण्‍यासंदर्भात नोटीस बजावली आहे. परंतु या गरीबांची घरे निष्कासित करणे शक्य नसल्याने त्‍याठिकाणी गावठाणचे पट्टे तयार करता येतील का याची चाचपणी करण्याचे सरकारने ठरवले आहे.

गाव किंवा शहराजवळील गायरान जमिनीवर अनेक वर्षापूर्वी हातावरील पोट असलेल्‍या निराधार व्‍यक्‍तींनी घरे बांधली आहेत. त्‍यातील अनेकांना राहायला स्‍वतःची जागा देखील नाही. त्‍यामुळे त्‍यांचे गायरान जमिनीवरील अतिक्रमण न काढण्‍या बाबत राज्य सरकार अनुकूल आहे. या लोकांसाठी राज्‍य सरकार सर्वोच्‍च न्‍यायालयात दाद मागणार आहे, अतिक्रमणासंदर्भात ज्‍यांना ज्‍यांना नोटीस दिली आहे, त्‍या नोटीसा मागे घेण्‍याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे. त्‍यामुळे राज्यातील सव्‍वादोन लाख कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.

परंतु यापुढील काळात शासकीय जमिनीवर अतिक्रमण होणार नाही, याद़ृष्‍टीने देखील स्‍वतंत्र धोरण आखले जाणार आहे.

Big relief to the encroachers on Gayran land

मंगळवार, नोव्हेंबर २९, २०२२

आमदार जोरगेवार यांनी केली अहिरांकडे "ही" मागणी | Hansraj Ahir | Kishor Jorgewar

आमदार जोरगेवार यांनी केली अहिरांकडे "ही" मागणी | Hansraj Ahir | Kishor Jorgewar

माता महाकाली मंदिराच्या ६० कोटी रुपयांच्या विकासकामाच्या निविदेला प्रशाकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर मंदिराच्या दुस-या टप्याच्या विकासकामासाठी ७५ कोटी रुपयांची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. या दोनी कामाला एकत्रीतरित्या पूरातत्व विभागाची मंजुरी मिळवून देण्यासाठी केंद्र स्तरावर प्रयत्न करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष हंसराज अहीर यांची भेट घेत केली आहे. 





Hansraj Ahir | Kishor Jorgewar 

माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निमित्त आज आमदार किशोर जोरगेवार यांनी हंसराज अहीर यांची भेट घेतली असुन नियुक्ती झाल्या बदल त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर मागणी हंसराज अहिर यांना केली आहे. यावेळी माजी नगरसेवक बलरामजी डोडानी, यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता,  अजय जैस्वाल, प्रा. श्याम हेडाऊ, देवानंद साखरकर, पूनम तिवारी आदिंची उपस्थिती होती.

महाकाली मंदिराच्या पहिल्या टप्यातील ६० कोटी रुपयांच्या विकासकामाच्या निविदेला शासनाच्या वतीने प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. असे असले तरी सदर कामासाठी अद्यापही पुरातत्व विभागाची मंजुरी प्राप्त झालेली नाही. तर दुस-या टप्यातील विकासकामांसाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ७५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. सदर निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासनही ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. सदर मंदिराच्या विकासासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. आमच्या मागण्यांची सरकारच्या वतीने दखल घेतल्या जात आहे. मात्र पुरातत्व विभागाच्या अटीमुळे या विकासकामात अडचण निर्माण होत आहे. मंदिराच्या मुळ रचनेत कोणताही बदल न करता सदर विकासकामे केल्या जाणार आहे. असे असले तरी या कामाला अद्यापतरी पुरातत्व विभागाची मंजुरी प्राप्त झालेली नाही. हा केंद्राचे विषय असल्याने आता माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री तथा नवनियुक्त राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी यात लक्ष घातल सदर मंदिराच्या विकासकामाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्यातील कामासाठी पुरातत्व विभागाची एकत्रीत परवाणगी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी हंसराज अहीर यांची भेट घेत केली आहे. यावेळी सदर मागणी संदर्भात केंद्रातील संबधित मंत्र्यासोबत बैठक लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. 


Hansraj Ahir is an Indian politician and current Chairman of the National Commission for Backward classes. He is a former Union Minister of State for Home Affairs and Minister of State for Chemicals and Fertilizers in the First Modi Ministry. He was the former member of the 16th Lok Sabha in India.

 बल्लारपूर रेल्वे पूल दुर्घटनेप्रकरणी दोन अधिकारी निलंबित Chandrapur | Ballarpur | Update - Railway Station Foot Over Bridge Slab Collapse

बल्लारपूर रेल्वे पूल दुर्घटनेप्रकरणी दोन अधिकारी निलंबित Chandrapur | Ballarpur | Update - Railway Station Foot Over Bridge Slab Collapse

Chandrapur | Ballarpur | Update - Railway Station Foot Over Bridge Slab Collapse

बल्लारपूर | रेल्वे पूल दुर्घटनेप्रकरणी  चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर (Mp balu dhanorkar) यांनी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केंद्रीय रेल्वेमंत्र्याकडे केली होती.  तात्काळ दखल घेऊन रेल्वे विभागाने इन्स्पेक्टर ऑफ वर्क जी. जी. राजुरकर व याच पदावरील तत्कालीन अधिकारी विनयकुमार श्रीवास्तव याना निलंबित केले आहे. 


चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा रेल्वे स्थानकावर ओवर ब्रीज तुटल्याने झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. नीलिमा रंगारी असे या शिक्षिका असलेल्या मृत महिलेचे नाव असून, त्याच्या कुटंबीयांना आर्थिक साहाह्यासोबतच कुटुंबातील एकाला रेल्वेमध्ये नोकरी देण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. चंद्रपूर आणि बल्लारशा रेल्वे स्थानकाला सुंदर रेल्वे स्थानकाचे नामांकन देण्यात आले होते. मात्र सौंदर्यकरणासोबत मजबुतीकरण झालेली नाही, असे या घटनेवरून दिसून येते. त्यामुळे रेल्वे ओवर ब्रिजचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी देखील खासदार धानोरकर यांनी केली  यासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. सात महिन्यांपूर्वी या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते. मात्र, ते योग्य पद्धतीने केले गेले नाही. रेल्वे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडली, असा आरोप होत आहे. या संपूर्ण प्रकरणात दोन अधिकारी दोषी दिसून आल्याने त्यांच्यावर रेल्वे विभागाने निलंबनाची कारवाई केली आहे. Ballarpur railway bridge accident


सोमवार, नोव्हेंबर २८, २०२२

खासदार बाळू धानोरकर यांनी केली *ही* मागणी | Ballarpur Railway Station overbridge

खासदार बाळू धानोरकर यांनी केली *ही* मागणी | Ballarpur Railway Station overbridge


balu dhanorkar demands

railway group d result 2022
smvt railway station
railway bharti 2022
railway minister of india 2022

free job alert 2022 railwaySuresh Narayan Dhanorkar, also called Balubhau Dhanorkar, is the newly elected member of Lok Sabha from Chandrapur constituency. He belongs to the Indian National Congress political party. He is the only candidate for Indian national Congress to be elected as MP from Maharashtra.
Watch video on YouTube here: https://youtu.be/f5oZ5K2fH0k
*रेल्वे पूल अपघाताची सखोल चौकशी करून अपघातग्रस्तांना तातडीने मदत द्या - माजी मंत्री आ. वडेट्टीवार*

*रेल्वे पूल अपघाताची सखोल चौकशी करून अपघातग्रस्तांना तातडीने मदत द्या - माजी मंत्री आ. वडेट्टीवार*



बल्लारपूर रेल्वे स्थानकावर काल सायंकाळचे सुमारास पादचारी पुलाला अपघात होऊन यात एकाचा नाहक बळी गेला तर अनेक जण जखमी झाले. सदर अपघाताची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी तसेच मृतकाच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपये अर्थिक मदत व कुटुंबातील सदस्यांना रेल्वे प्रशासनात नोकरी आणि जखमींना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री ,काँग्रेस नेते तथा आ. विजय वडेट्टीवार यांनी क्षतीग्रस्त पुलाची पाहणी करताना केली .

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक बल्लारपूर येथे आहे. अशातच लांब पल्याच्या रेल्वे गाड्यांचा थांबा असल्याने येथे प्रचंड प्रवास्यांची वर्दळ असते. अशातच काल सायंकाळची सुमारास रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल कोसळल्याने या अपघातात दोन जण गंभीर जखमी व इतर 13 जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. तर उपचारादरम्यान एका शिक्षिकेला प्राणही गमवावे लागले. गेल्या वर्षानुवर्षांपासून सदर पादचारी पुलाचा वापर होत असताना रेल्वे प्रशासनाने पादचारी पुलाचे मजबुतीकरण व देखभाल दुरुस्ती कामाचे ऑडिट केले काय ?असा प्रश्न उपस्थित करीत माजी मंत्री, आ. विजय वडेट्टीवार यांनी रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढले. तसेच बल्लारशा रेल्वे स्थानकाच्या डी आर एम रीचा खरे यांच्याशी पूल अपघाता बाबत चर्चा करून सदर पादचारी पूल अपघाताची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत अपघातात मृत पावलेल्या शिक्षिका रंगारी यांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची आर्थिक मदत देऊन कुटुंबातील एका व्यक्तीला रेल्वे प्रशासनात नोकरी देण्याची व इतर जखमींना देखील आर्थिक मदत देण्याची मागणी केली.

यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे, डॉ. रजनीताई हजारे, काँग्रेस सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मुन्ना तावाडे, कुणाल साहारे, राजेश अडुर, रमिज शेख,बल्लारपूर काँग्रेसचे घनश्याम मुलचांदाणी, शहराध्यक्ष करीमभाई शेख , भास्कर माकोडे, मेघा भाले, कासिम शेख, रेखा रामटेके व बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रशासनाच्या निष्काळजीपणा बाबत रोष व्यक्त करीत घोषणाही देण्यात आल्या.

 * Provide immediate help to the accident victims by conducting a thorough investigation into the railway bridge accident - Former Minister A. Vadettivar* 
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विनंती मुख्‍यमंत्र्यांनी केली मान्‍य   | Ballarpur | Update - Railway Station Foot Over Bridge Slab Collapse

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विनंती मुख्‍यमंत्र्यांनी केली मान्‍य | Ballarpur | Update - Railway Station Foot Over Bridge Slab Collapse

बल्‍लारपूर येथील दुर्घटनेतील मृतकेच्‍या कुटूंबियांना मुख्‍यमंत्री निधीतून ५ लाख रू. चे अर्थसहाय्य जाहीर


Ballarpur railway bridge accident
बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍टेशनवर पादचारी पुल कोसळल्‍याने झालेल्‍या दुर्घटनेतील मृत शिक्षिका श्रीमती रंगारी यांच्‍या कुंटूंबियांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्‍याचप्रमाणे जखमींवर योग्‍य उपचार शासकीय खर्चाने करण्‍याचे निर्देश त्‍यांनी जिल्‍हा प्रशासनाला दिले आहेत.

Chandrapur | Ballarpur | Update - Railway Station Foot Over Bridge Slab Collapse

रविवारी दुर्घटनेनंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्‍थळाला भेट दिली व सामान्‍य रुग्‍णालय चंद्रपूर येथे भेट देत जखमींची विचारपूस देखील केली. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याशी संपर्क साधुन मृतकाच्‍या कुटूंबियांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रु.चे अर्थसहाय्य प्रदान करण्‍याची विनंती केली. त्‍यानुसार मुख्‍यमंत्र्यांनी ५ लाख रु.चे अर्थसहाय्य मृतकेच्‍या कुटूंबियांना जाहीर केले आहे.
बल्लारपूर रेल्वे पूल अपघात : महिलेच्या मृत्यूनंतर खासदारांनी केली "ही" मागणी : Ballarpur railway bridge accident

बल्लारपूर रेल्वे पूल अपघात : महिलेच्या मृत्यूनंतर खासदारांनी केली "ही" मागणी : Ballarpur railway bridge accident

बल्लारपूर रेल्वे पूल अपघात : मृत महिलेच्या कुटुंबातील सदस्याला रेल्वेत नोकरी द्या

खासदार बाळू धानोरकर यांची मागणी

Ballarpur railway bridge accident

Ballarpur railway bridge accident


चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा रेल्वे स्थानकावर ओवर ब्रीज तुटल्याने झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. नीलिमा रंगारी असे या शिक्षिका असलेल्या मृत महिलेचे नाव असून, त्याच्या कुटंबीयांना आर्थिक साहाह्यासोबतच कुटुंबातील एकाला रेल्वेमध्ये नोकरी देण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. यासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केले जाईल अशी माहिती देखील त्यांनी दिली.


चंद्रपूर आणि बल्लारशा रेल्वे स्थानकाला सुंदर रेल्वे स्थानकाचे नामांकन देण्यात आले होते. मात्र सौंदर्यकरणासोबत मजबुतीकरण झालेली नाही, असे या घटनेवरून दिसून येते. त्यामुळे रेल्वे ओवर ब्रिजचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी देखील खासदार धानोरकर यांनी केली आहे.
बल्लारपूर रेल्वे पूल अपघात : मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांनी घेतला "हा" निर्णय

बल्लारपूर रेल्वे पूल अपघात : मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांनी घेतला "हा" निर्णय


Chandrapur | Ballarpur railway bridge accident
चंद्रपूर येथील एकोरी वार्डात राहणाऱ्या भीमराव रंगारी यांची धम्म सहचारिणी नीलिमाचे काल दिनांक 27 नोव्हेंबर 2022 ला बल्लारपूर येथील रेल्वे पुलाच्या अपघातामध्ये दुःखद निधन झाले. नीलिमा या मागच्याच वर्षी एका अपघातामध्ये जखमी झाल्या होत्या. परंतु त्यातून बरी झाल्या होत्या. परंतु या वेळेस मात्र, काळाने बरोबर डाव साधला आणि आपल्या सगळ्यांपासून निलीमाला हिरावून नेले. परंतु या दुखाच्या प्रसंगी सुद्धा रंगारी परिवाराने सामाजिक भान राखून स्मृतीशेष निलिमाच्या इच्छेचा मान ठेवत शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथील नेत्रपेढीला निलीमाचे मरणोत्तर नेत्रदान केले. रंगारी परिवाराचा हा निर्णय स्तूत्य असुन समाजाला नक्कीच एक नवीन दिशा देणारा आहे.

Chandrapur | Ballarpur | Update - Railway Station Foot Over Bridge Slab Collapse


गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील रहीवाशी भगत कुटूंबीय आपल्या मुलीला पुणे येथे शिक्षणासाठी सोडण्यासाठी निघाले होते. बल्लारपूर निवासी आत्याची गळाभेट घेऊन रंगारी व भगत कुटूंबीय पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यासाठी बल्लारपूर रेल्वे स्थानकावर आले. पादचारी पुलावरून जात असताना एकाच वेळी पादचारी पुल कोसळल्याने सर्व जण खाली पडले. आणि यात मामी निलीमा भिमराव रंगारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भाचीला निरोप देताना ती जगाचा निरोप घेईल, असे कधी वाटले नव्हते. पण, तसेच घडले.
Ballarpur railway bridge accident
दि.२७/११/२०२२ रोजी सुमारे ६.३० वाजे दरम्यान साप्ताहिक असलेली काजीपेठ पुणे या रेल्वेने कु.निधि (छकूली) हीला पुणे येथे शिक्षणासाठी भगत व रंगारी कुटूंबीय जात होते.मात्र रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सदर पादचारी पुलावरील पत्रे निघून गेल्याने तो कोसळला आणि मोठी दुर्घटना घडली.

रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे निधी देखील अंपगत्वाची बळी ठरली. या दुर्घटनेत तिच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने निधी ही घटनेची शिकार ठरली. आपल्या मुलीला सोडण्यासाठी गेलेले मनोज भगत हे गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील रहीवासी असून ते आष्टी ग्राम पंचायत चे माजी सरपंच आहेत. कुटूबांचा गाडा हाकलण्यासाठी ते बिल्टमध्ये काम करतात.

रविवार, नोव्हेंबर २७, २०२२

रेल्वे जंक्शनवर पुल तुटला; महिलेचा उपचारादम्यान मृत्यू | Chandrapur | Ballarpur | Update - Railway Station Foot Over Bridge Slab Collapse

रेल्वे जंक्शनवर पुल तुटला; महिलेचा उपचारादम्यान मृत्यू | Chandrapur | Ballarpur | Update - Railway Station Foot Over Bridge Slab Collapse

चंद्रपूर  Chandrapur | जिल्ह्यातील बल्लारपूर Ballarpur जंक्शन येथील दादरा पुलाला अपघात झाला असून, 13 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.  Ballarpur over bridge collapsed
Ballarpur railway bridge accident
चंद्रपूर:-- बल्लारपूर रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाचा स्लॅब कोसळल्याप्रकरणी महिलेचा मृत्यू, शिक्षिका असलेल्या 48 वर्षीय नीलिमा रंगारी यांचा मृत्यू, नीलिमा या बल्लारपूर येथील रहिवासी होत्या



चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील फूट ओव्हर ब्रीज कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत जवळपास १३ प्रवाशी जखमी झाले असून यातील निलिमा रंगारी, (वय 48 वर्ष) यांचा उपचारादम्यान मृत्यू झाला. 

मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या बल्लारपूर स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक १ व ४ यांना जोडणारा व साधारण ३० फूट उंच असा हा ओव्हर ब्रीज आहे. 



आज दिनांक 27/11/2022 रोजी सायंकाळी 04.55 वाजता चंद्रपूर जिल्‍ह्यातील बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍टेशन वरील प्‍लॅटफॉर्म क्र 1 व 2 वरील पादचारी पूलाचा काही भाग कोसळला. प्राप्‍त माहितीनूसार सदर घटनेमध्‍ये 13 व्‍यक्‍ती जखमी झालेल्‍या आहेत. जखमींना जिल्‍हा सामान्‍य रूग्‍णालय, चंद्रपूर येथे भरती करण्‍यात आले आहे. त्‍यापैकी 02 व्‍यक्‍ती गंभीर होत्या. त्‍यांच्‍यावर अती दक्षता विभागात उपचार सुरू होते. यातील नीलिमा रंगारी यांचा मृत्यू झाला. 02 व्‍यक्‍तींवर बाह्य रूग्‍ण विभागात उपचार करून घरी पाठविण्‍यात आले आहे. जखमींची नावे खालीलप्रमाणे आहेत. 
साची निलेश पाटील, प्रेम तितरे (४५ वर्ष), चैतन्य मनोज भगत ( वय १८), निधी मनोज भगत, छाया मनोज भगत, नयन बाबाराव भिवनवार, राधेश्याम सिंग, अनुराग खरतड, रिया खरतड, स्विटी खरतड, विक्की जयंत भिमलवार, पूजा सोनटक्के (वय ३७), ओम सोनटक्के. यातील राधेश्याम सिंग यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. Ballarpur over bridge collapsed

अति दक्षता विभागातील रूग्‍ण 
1. निलिमा रंगारी, वय 48 वर्ष (मृत्यू)
2. रंजना खडतड, वय 55 वर्ष 

रूग्‍णालयातील इतर वार्डमध्‍ये भरती रूग्‍ण 
1. छाया भगत, 45 वर्ष, 12 नं, वार्ड 
2. निधी भगत, 21 वर्ष, 11 नं. वार्ड 
3. चैतन्‍य भगत, 18 वर्ष, 19 नं. वार्ड
4. साची पाटिल, 29 वर्ष, 12 नं. वार्ड
5. अंजली वर्मा, 21 वर्ष, 12 न. वार्ड 

रूग्‍णालयातून उपचार करून घरी पाठ‍वलेल्‍यांची नावे 
6. प्रिया खडतड, 28 वर्ष 
7. अनुराग खडतड, 30 वर्ष

सद्यस्थितीत प्‍लॅटफॉर्म क्र 1 व 2 बंद करण्‍यात आहे आहेत. उर्वरीत प्‍लॅटफॉर्म क्र 3, 4 व 5 सुरू आहेत.

 



शासन स्तरावरुन मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करणार : सुधीर मुनगंटीवार | Sudhir Mungantiwar Chandrapur | Ballarpur | Update

शासन स्तरावरुन मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करणार : सुधीर मुनगंटीवार | Sudhir Mungantiwar Chandrapur | Ballarpur | Update

*बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍टेशन वरील फुटओव्‍हर ब्रिज कोसळल्याच्या प्रकरणाची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने घेतली दखल*

*पालकमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना चौकशीचे आदेश*


Sudhir Mungantiwar Chandrapur | Ballarpur | Update - Railway Station Foot Over Bridge Slab Collapse

दि. 27 नोव्हेम्बर रोजी संध्याकाळी बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍टेशनवरील फुटओव्‍हर ब्रिजचा एक भाग कोसळल्याने जवळपास १३ जण जखमी झाल्‍याचे प्रथम दर्शनी कळले. या सर्वांना तातडीची मदत करीत रेल्‍वे प्रशासन व पोलिस प्रशासनाने रूग्णवाहिके द्वारा रुग्णालयात पोहचवून त्‍यांच्‍यावर तातडीने उपचार सुरु झाले आहेत. यापैकी काही रुग्‍णांना चंद्रपूर येथील जिल्‍हा सामान्य रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. 


ही बातमी कळताच राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री व चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी त्वरित दखल घेत  त् सर्व जखमींना आवश्‍यक त्‍या सर्व सुविधा पुरविण्‍याचे निर्देश जिल्‍हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला दिले. तसेच या घटनेची संपूर्ण चौकशी करण्‍याचे निर्देश ना. मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचे जिल्‍हाधिकारी  श्री विनयकुमार गौड़ा तथा पोलिस अधिक्षक श्री परदेशी यांना दिले आहेत.

 अपघातानंतर लगेचच भाजपाचे बल्‍लारपूर येथील पदाधिकारी रेल्‍वे स्‍टेशनवर पोहचून त्‍यांनी जखमींना ताबडतोब मदत केली. या प्रकरणी शासन स्तरावरुन मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

Sudhir Mungantiwar Chandrapur | Ballarpur | Update - Railway Station Foot Over Bridge Slab Collapse




रुग्णालयात जावून जखमींची घेतली भेट | Chandrapur | Ballarpur | Update - Railway Station Foot Over Bridge Slab Collapse

रुग्णालयात जावून जखमींची घेतली भेट | Chandrapur | Ballarpur | Update - Railway Station Foot Over Bridge Slab Collapse

 बल्लारशाह रेल्वे फुट ओव्हरब्रिज दुर्घटना दुर्देवी, सखोल चौकशी करावी-हंसराज अहीर


चंद्रपूर:- बल्हारशाह रेल्वे स्थानकावरील फुट ओव्हरब्रिज कोसळून झालेल्या दुर्घटनेला मध्य रेल्वेचे वरीष्ठ अधिकारी जबाबदार असल्याचे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी म्हटले आहे. सदर फुट ओव्हर ब्रिज अतिशय जिर्णावस्थेत असल्याने त्याची दुरुस्ती करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत  होती. रेल्वे यात्री संघटनेद्वारासुध्दा याकडे लक्ष वेधल्या जात असतांना वरिष्ठांनी याकडे दुर्लक्ष केल्यानेच दुर्घटना घडली असावी त्यामुळे या दुर्घटनेची सखोल चैकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर  कारवाई करावी असेही अहीर यांनी म्हटले आहे.
रेल्वे प्रवाशांना रेल्वे संदर्भात माहिती देण्यासाठीची उद्घोषणा अगदी वेळेवर केली जात असल्याने प्रवासी गाडी पकडण्यासाठी एका फलाटावरुन दुसऱ्या फलाटावर धावपळ करीत या फुट ओव्हरब्रिजने जातात. त्यामुळे प्रवाशांची क्षमता जास्त झाल्याने सदर प्रकार घडण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेत 2 प्रवासी अत्यव्यस्थ व 11 जखमी झाले आहेत.  या दुर्घटनेतील जखमींची जिल्हा सामान्य रुग्णालयात जावून अहीर यांनी भेट घेवून त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चैकशी केली. उपस्थित वैद्यकीय अधिका़ऱ्यांशी  जखमींवर होत असलेल्या उपचाराबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी अधिष्ठाता डाॅ. नितनवरे, जिल्हा शल्य चिकीत्सक डाॅ बंडू रामटेके, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, ब्रिजभूषण पाझारे, राहुल सुर्यवंशी व अन्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.      

Ballarpur railway bridge accident