Chandrapur | Ballarpur railway bridge accident
चंद्रपूर येथील एकोरी वार्डात राहणाऱ्या भीमराव रंगारी यांची धम्म सहचारिणी नीलिमाचे काल दिनांक 27 नोव्हेंबर 2022 ला बल्लारपूर येथील रेल्वे पुलाच्या अपघातामध्ये दुःखद निधन झाले. नीलिमा या मागच्याच वर्षी एका अपघातामध्ये जखमी झाल्या होत्या. परंतु त्यातून बरी झाल्या होत्या. परंतु या वेळेस मात्र, काळाने बरोबर डाव साधला आणि आपल्या सगळ्यांपासून निलीमाला हिरावून नेले. परंतु या दुखाच्या प्रसंगी सुद्धा रंगारी परिवाराने सामाजिक भान राखून स्मृतीशेष निलिमाच्या इच्छेचा मान ठेवत शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथील नेत्रपेढीला निलीमाचे मरणोत्तर नेत्रदान केले. रंगारी परिवाराचा हा निर्णय स्तूत्य असुन समाजाला नक्कीच एक नवीन दिशा देणारा आहे.
Chandrapur | Ballarpur | Update - Railway Station Foot Over Bridge Slab Collapse
गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील रहीवाशी भगत कुटूंबीय आपल्या मुलीला पुणे येथे शिक्षणासाठी सोडण्यासाठी निघाले होते. बल्लारपूर निवासी आत्याची गळाभेट घेऊन रंगारी व भगत कुटूंबीय पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यासाठी बल्लारपूर रेल्वे स्थानकावर आले. पादचारी पुलावरून जात असताना एकाच वेळी पादचारी पुल कोसळल्याने सर्व जण खाली पडले. आणि यात मामी निलीमा भिमराव रंगारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भाचीला निरोप देताना ती जगाचा निरोप घेईल, असे कधी वाटले नव्हते. पण, तसेच घडले.
Ballarpur railway bridge accident
दि.२७/११/२०२२ रोजी सुमारे ६.३० वाजे दरम्यान साप्ताहिक असलेली काजीपेठ पुणे या रेल्वेने कु.निधि (छकूली) हीला पुणे येथे शिक्षणासाठी भगत व रंगारी कुटूंबीय जात होते.मात्र रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सदर पादचारी पुलावरील पत्रे निघून गेल्याने तो कोसळला आणि मोठी दुर्घटना घडली.
रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे निधी देखील अंपगत्वाची बळी ठरली. या दुर्घटनेत तिच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने निधी ही घटनेची शिकार ठरली. आपल्या मुलीला सोडण्यासाठी गेलेले मनोज भगत हे गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील रहीवासी असून ते आष्टी ग्राम पंचायत चे माजी सरपंच आहेत. कुटूबांचा गाडा हाकलण्यासाठी ते बिल्टमध्ये काम करतात.