चंद्रपूर Chandrapur | जिल्ह्यातील बल्लारपूर Ballarpur जंक्शन येथील दादरा पुलाला अपघात झाला असून, 13 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. Ballarpur over bridge collapsed
Ballarpur railway bridge accident
चंद्रपूर:-- बल्लारपूर रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाचा स्लॅब कोसळल्याप्रकरणी महिलेचा मृत्यू, शिक्षिका असलेल्या 48 वर्षीय नीलिमा रंगारी यांचा मृत्यू, नीलिमा या बल्लारपूर येथील रहिवासी होत्या
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील फूट ओव्हर ब्रीज कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत जवळपास १३ प्रवाशी जखमी झाले असून यातील निलिमा रंगारी, (वय 48 वर्ष) यांचा उपचारादम्यान मृत्यू झाला.
मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या बल्लारपूर स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक १ व ४ यांना जोडणारा व साधारण ३० फूट उंच असा हा ओव्हर ब्रीज आहे.
आज दिनांक 27/11/2022 रोजी सायंकाळी 04.55 वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म क्र 1 व 2 वरील पादचारी पूलाचा काही भाग कोसळला. प्राप्त माहितीनूसार सदर घटनेमध्ये 13 व्यक्ती जखमी झालेल्या आहेत. जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालय, चंद्रपूर येथे भरती करण्यात आले आहे. त्यापैकी 02 व्यक्ती गंभीर होत्या. त्यांच्यावर अती दक्षता विभागात उपचार सुरू होते. यातील नीलिमा रंगारी यांचा मृत्यू झाला. 02 व्यक्तींवर बाह्य रूग्ण विभागात उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. जखमींची नावे खालीलप्रमाणे आहेत.
साची निलेश पाटील, प्रेम तितरे (४५ वर्ष), चैतन्य मनोज भगत ( वय १८), निधी मनोज भगत, छाया मनोज भगत, नयन बाबाराव भिवनवार, राधेश्याम सिंग, अनुराग खरतड, रिया खरतड, स्विटी खरतड, विक्की जयंत भिमलवार, पूजा सोनटक्के (वय ३७), ओम सोनटक्के. यातील राधेश्याम सिंग यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. Ballarpur over bridge collapsed
अति दक्षता विभागातील रूग्ण
1. निलिमा रंगारी, वय 48 वर्ष (मृत्यू)
2. रंजना खडतड, वय 55 वर्ष
रूग्णालयातील इतर वार्डमध्ये भरती रूग्ण
1. छाया भगत, 45 वर्ष, 12 नं, वार्ड
2. निधी भगत, 21 वर्ष, 11 नं. वार्ड
3. चैतन्य भगत, 18 वर्ष, 19 नं. वार्ड
4. साची पाटिल, 29 वर्ष, 12 नं. वार्ड
5. अंजली वर्मा, 21 वर्ष, 12 न. वार्ड
रूग्णालयातून उपचार करून घरी पाठवलेल्यांची नावे
6. प्रिया खडतड, 28 वर्ष
7. अनुराग खडतड, 30 वर्ष
सद्यस्थितीत प्लॅटफॉर्म क्र 1 व 2 बंद करण्यात आहे आहेत. उर्वरीत प्लॅटफॉर्म क्र 3, 4 व 5 सुरू आहेत.