Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, नोव्हेंबर २७, २०२२

kiss scene in a movie | चित्रपटात चुंबन दृश्य कसे चित्रित करतात?

 मिठी मारणे, किस करणे, हातांनी स्पर्श करणे आणि नंतर कॅमेरा अँगल असा ठेवणे की, ज्यामुळे शरीराचा काही भाग झाकून ठेवता येतो, यालाच ब्युटी शॉट्स म्हणतात. ही सर्व कॅमेरा तंत्रे आहेत. या दरम्यान कपड्यांची काळजी घ्यावी लागते. बेड सीन करण्यासाठी २ किंवा ३ कपडे देणे, जेणेकरून तो सीन करतना तो क्षण तयार होईल. यासाठी बेडवर सॅटिन बेडशीट्स वापरली जातात आणि त्याचे आवरण बनवून केवळ भ्रम निर्माण केला जातो. चुम्मा,किस, पप्पी, चुंबन हे शब्द आता इतके नॉर्मल झाले आहेत.  (Top 10 kisses in the world)

काही वेळा कथेची गरज म्हणून नायक आणि नायिकेचे खरोखरचे चुंबनदृश्य चित्रित केले जाते,कारण तशी उत्कटता दिग्दर्शकाला त्यातून दर्शवायची असते.तर कधी नायकाच्या चेहऱ्यापुढे नायिकेचा चेहरा दाखवितात आणि नायिकेकडून डोळे बंद करून चुंबनदृश्य देत असल्याचे हावभाव चित्रित केले जातात.आजकाल कॉम्पुटर ग्राफिक्सच्या मदतीने किंवा ग्रीन स्क्रिन इफेक्टस वापरून चुंबनदृश्य चित्रित केले जाते.दोघांच्या चेहऱ्यामध्ये एक हिरव्या रंगाचा बलून ठेवला जातो, नायक आणि नायिका त्या बलूनला चुंबन देतात नंतर ग्राफिक्सच्या मदतीने बलून हटवला जातो आणि नायक नायिका एकमेकांना चुंबन देतांना पडद्यावर आपल्याला दिसतात.


कदाचित विश्वास बसणार नाही पण महिलांनी चित्रपटात काम करणे ज्याकाळी कमी लेखले जाई त्या काळी 'देविका राणी' ह्या अभिनेत्रीने 1933 साली आलेल्या चित्रपटात सलग चार मिनिटांचे चुंबनदृश्य देऊन खळबळ उडवून दिली होती.तो चित्रपट होता 'कर्मा'!   या सिनेमात देविका राणी आणि हिमांशू रॉय होते आणि या दोघांनीच तो ऐतिहासिक किसींग सीन दिला होता तोही एक दोन नाही तर तब्बल ४ मिनिटांचा. बॉलिवूडमधल्या नामांकित किसींग सीन्सला भारी पडणारा असा हा सीन होता..

विचार करा,भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या 14 वर्षे आधी हा चित्रपट रिलीज झाला होता.आजच्या काळातही सेन्सॉर बोर्ड चुंबनदृश्याला आक्षेप घेत असते तेव्हाची काय परिस्थिती असेल.त्याकाळी भारतीय मानसिकता आजच्याइतकी सरावलेली नव्हती त्यामुळे खूप गहजब उडाला.

'कर्मा' हा एक द्विभाषिक चित्रपट होता.देविका राणी आणि तिचे पती हिमांशू राय यांनी त्यात भूमिका निभावल्या होत्या.भारत,जर्मनी आणि युनायटेड किंगडम यांच्या सहयोगातून या चित्रपटाची निर्मिती झाली होती.68 मिनिटांचा हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी ह्या दोन भाषांमध्ये बनला होता.वडिलांचा विरोध झुगारून एक राजकन्या शेजारच्या राजपुत्राच्या प्रेमात पडते असा काहीसा विषय ह्या चित्रपटाचा होता.

प्रशांत रा. पाटील

मुक्त लेखक





Bollywood's Best Kisses | KISS DAY SPECIAL | RAM-LEELA


These Bollywood's Best Kissing Scenes On This #KissDay From The Superhit Movies - #Ram-Leela






SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.