वरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड यांना निलंबित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वन संघटनेच्या माध्यमातून मागणी रेटून झाल्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
वनरक्षक संदीप वाटेकर यांना असलेली भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी वरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड यांना निलंबित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वनपाल संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यासंदर्भात चंद्रपूर वनवृत्त समोर आंदोलन देखील करण्यात आले. आज 3 डिसेंबरपासून मुख्य वनसंरक्षक कार्यालय यांच्यासमोर धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला. याशिवाय मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर यांचा देखील निषेध करण्यात आला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ मधुकर राठोड यांना पदावरून निलंबित केले आहे. chandrapur Forest RFO