Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

वर्धा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वर्धा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, मे ३०, २०२१

वर्धा:ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या इमारतीसह ट्रामा केअर उपयोगात घ्या

वर्धा:ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या इमारतीसह ट्रामा केअर उपयोगात घ्या

 

कारंजा,(घाडगे) : 
आर्वीी मतदारसंघाच्या तीनही तालुक्यातील रुग्णालयाच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी तिसऱ्या लाटेसाठी पूर्व तयारी करण्यासाठी आज पाहणी केली.

कारंजा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात जुनी इमारतसह, ट्रामा केअर इमारत कोविड सेंटर सुरू करण्यासाठी उपयोगात घ्या असे जिल्हाधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले. शहरातील ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत व ट्रामा केअर इमारत खाली असल्याने येथेच चांगल्याप्रकारे १०० खाटाचे कोविड सेंटर सुरू करता येणार आहे. येथे तशी जागा उपलब्ध आहे. आणि आष्टी व कारंजासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बाजूला ऑक्सिजन प्लॅन्ट तयार करू असे यावेळी प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले. ट्रामा केअर इमारतीला लिफ्ट नसल्याने त्वरीत मागणी करा तात्काळ लिफ्ट लावण्यात येणार असेही यावेळी सांगण्यात आले.रुग्णाच्या सोयीसाठी लवकरात लवकर सूरु केलं तर नागरिकांना त्याचा फायदा होईल. यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार , मुख्याधिकारी सचिन ओंबासे, जिल्हा शल्य चिकित्सक सचिन तडस, उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक , तहसीलदार सचिन कुमावत , गटविकास अधिकारी प्रवीण देशमुख, प्रभारी वैद्यकीय अधिकारी प्रभाकर वंजारी ,डॉ .महेंद्र घागरे, डॉ राजेंद्र कोटेवार यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

प्रशांत धारपूरेच जिल्हाधिकारीनी केलं कौतुक
ग्रामीण रुग्णालयात मोठमोठ्या इमारत असताना येथे जनरेटर उपलब्ध नसल्याने तालुक्यातील राजनी येथील ऍग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड व्यवस्थापक असलेला प्रशांत उत्तम धारपूरे याने ५ लाख ४० हजार किंमतीचे ६२.५ केव्हीचे जनरेटर व पाच ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर भेट दिले याची आज जिल्हाधिकारी ,मुख्याधिकारी,जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पाहणी केली यावेळी या युवकाचा कौतुक करण्यात आले.

ग्रामीण रुग्णालयात भेट दिलेल्या वॉटर प्लॅन्टच उद्घाटन

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक संघाकडून ग्रामीण रुग्णालयात पाण्याची व्यवस्था करून देण्यात आली यावेळी तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी पैसा गोळा करून दोन लाख 50 हजाराचे वॉटर प्लॅन्ट लावण्यात आले याचे आज जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी उद्घाटन केले. यावेळी शिक्षक संघ उपस्थित होते.

गुरुवार, मे ०६, २०२१

वर्धा येथे रेमडेसीवीर इंजेक्शनच्या उत्पादनाला सुरुवात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि केंद्रीय  उद्योग मंत्री नितिन गडकरी यांनी केली प्रकल्पाची पाहणी

वर्धा येथे रेमडेसीवीर इंजेक्शनच्या उत्पादनाला सुरुवात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि केंद्रीय उद्योग मंत्री नितिन गडकरी यांनी केली प्रकल्पाची पाहणी

 वर्धा येथे रेमडेसीवीर इंजेक्शनच्या उत्पादनालासुरुवात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि केंद्रीय  उद्योग मंत्री नितिन गडकरी यांनी केली प्रकल्पाची पाहणी



 वर्धा येथील जेनेटिक लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड  द्वारे कोविड उपचारासाठी वापरल्या जाणा-या रेमडेसीवीर  इंजेक्शनच्या उत्पादनाला आजपासून सुरुवात झाली असून आपण स्व:त या प्रक्रीयेची पाहणी केली असल्याची माहिती  केंद्रीय  रस्ते वाहतूक आणि केंद्रीय सुक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योग  मंत्री नितिन गडकरी यांनी आज वर्धा येथे दिली. वर्धा जिल्ह्याच्या एम.आय.डी.सी. भागात  जेनेटिक लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या पाहणी दौऱ्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते  .यावेळी  वर्धाचे खासदार रामदास तडस,  जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार,  कंपनीचे संचालक विरेंद्र क्षीरसागर उपस्थित होते. 

 हैदराबाद स्थित हेटरो कंपनीने सदर इंजेक्शन निर्मितीसाठी असणारी परवानगी ही वर्ध्याच्या जेनेटिक लाइफ सायन्सला दिली असून यामध्ये केंद्रीय मंत्री मनसुख मांडवियाराज्याचा अन्न व औषध प्रशासन विभाग यांचे सहकार्य मिळाल्याचे गडकरी यांनी सांगितले.  अशी  परवानगी मिळणारी ही देशातील  पहिलीच कंपनी आहे   . या लाइफ सायन्स कंपनीचे संचालक विरेंद्र क्षीरसागर यांनी कमी वेळात आवश्यक असणारी   सामग्री तसेच इतर  यंत्रणा  विकसित केली. कंपनीद्वारे दर दिवसाला  30  हजार इंजेक्शन निर्मितीची क्षमता  विकसित करण्यात येणार असून सर्व चाचणी यशस्वी झाल्यानंतर  आजपासून इंजेक्शन  उत्पादन सुरू झाले आहे.रेमेडसवीर इंजेक्शनचे 1 लाख  व्हायल्स  रविवारपर्यंत उपलब्ध होणार आहेत. या इंजेक्शनचे विदर्भात  वितरण संबंधित जिल्हाधिका-यांमार्फत  होईल नंतर राज्यातही त्याचा पुरवठा करण्यात येईल . वर्धा जिल्ह्याला प्रथम प्राथमिकता मिळेल असेही  गडकरी यांनी  नमुद केले. 

या प्रकल्पामुळे विदर्भातील करोना रुग़्णांना लाभ मिळणार आहे. सेवाग्राम येथील रुग्णालयाला तसेच सावंगी मेघे येथील विनोबा भावे रुग्णालयाला  प्रत्येकी 10 वेंटिलेटर देण्यात आले आहेत. वर्ध्यातील ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी सेवाग्राम येथे 20 टन तर विनोबा भावे रुग्णालय येथे  20 टन  ऑक्सिजन संग्रहाची क्षमता निर्माण करण्यात आली आहे असेही  गडकरी यांनी यावेळी  सांगितल.   

मंगळवार, मे ०४, २०२१

डॉ. अभय बंग यांच्या आईचे कोरोनाने निधन

डॉ. अभय बंग यांच्या आईचे कोरोनाने निधन

दुःखद वार्ता...




ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्त्या सुमनताई बंग यांचे वर्धा येथील सेवाग्राम रूग्णालयात निधन झाले. त्या कोरोना ने आजारी होत्या. बरेच दिवस हॉस्पिटल मध्ये होत्या. त्यांनी आणि डॉक्टरांनी बरेच प्रयत्न करूनही त्यांनी आज शेवटचा श्वास घेतला.

सुमनताई बंग या स्वातंत्र्य चळवळीतील धडाडीच्या कार्यकर्त्या, गांधीजींच्या प्रेरणेने सुरू झालेल्या ' नई तालीम ' वर आधारित आनंद निकेतन या शाळेच्या सुरुवातीच्या काळातल्या कार्यकर्त्या, शिक्षिका. चेतना विकास या संस्थेच्या संस्थापक. ग्रामीण भागात विशेषतः स्त्री सक्षमीकरणाचे मोठे काम त्यांनी उभारले. आयुष्यभर समता, सादगी, स्वावलंबन आधारित ग्राम स्वराज्याचा ध्यास त्यांनी घेतला होता. अखेरपर्यंत त्या कार्यरत होत्या. ज्येष्ठ सर्वोदयी नेते ठाकूरदास बंग यांच्या त्या पत्नी, अशोक आणि डॉ अभय बंग यांच्या आई.

सुमन ताईंच्या (बाईंच्या) समर्पित जीवन यात्रेस सलाम.
शोधग्राम परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

Hon. Suman Bang was a committed, motivated ‘life-activist’ for social development and women’s rights; and the co-founder of Chetana Vikas.

She had a Masters in Economics from Nagpur University. She was the principal of an experimental high school running on the Gandhian model of “New Education.” She was also the editor of a weekly for peaceful change with state wide outreach. She had been a leading participant in National Movement for village republics and voluntary land reform movement (Bhoodan movement). She was a trustee and executive member of Kasturba Gandhi Memorial Trust – a national organization for women and rural development.

She was also a pioneer activist on various issues related to self-reliant and holistic empowerment of rural women. A true inspiration!

Tribute from Shodhgram family

मंगळवार, फेब्रुवारी ०९, २०२१

 सेवाग्राम विकास आराखड्यातील अपूर्ण कामे आणि सोलर पॅनल

सेवाग्राम विकास आराखड्यातील अपूर्ण कामे आणि सोलर पॅनल



निर्मिती करणाऱ्या राज्यातील एकमेव प्रकल्पाला देणार गती

                           उपमुख्यमंत्री अजित पवार

 

·         वर्धा जिल्ह्याची अतिरिक्त निधी मागणीचा विचार मुंबईच्या बैठकीत करणार

·         जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री सुनील केदारांकडून  272 कोटींची अतिरिक्त मागणी           

       

वर्धा, दि. 8 : वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम विकास आराखडयातंर्गत मंजूर असलेला तसेच आराखड्यातील लोकार्पण कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कामे पूर्ण करण्यासाठी घोषित केलेला निधी देण्यासोबतच महिला बचत गटामार्फत राज्यातील पहिल्याच सोलर पॅनल निर्मिती प्रकल्पास गती देण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.

नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना नियोजन आराखडा अंतिम करण्यासंदर्भात राज्यस्तरीय बैठक झाली, यावेळी वर्धा जिल्ह्याच्या बैठकित श्री पवार बोलत होते.

या बैठकीला राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार , जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार रणजित कांबळे, आमदार अभिजित वंजारी, वित्त व नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त संजीव कुमार , जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुरणे उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजना 2021- 22 सर्वसाधारण अंतर्गत जिल्ह्याच्या विकासा साठी प्राथमिक शाळेच्या धोकादायक इमारती, वर्गखोल्या, धोकादायक इलेक्ट्रिक पोल, पूर संरक्षण भिंत, अंगणवाडी बांधकाम, ग्रामीण रस्ते, ग्रामपंचायत भवन, स्मशानभूमी शेड, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस व आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा, अपारंपारिक ऊर्जा विकास इत्यादी बाबींसाठी 272 कोटी रुपये अतिरिक्त देण्याची मागणी पालकमंत्री सुनील केदार यांनी यावेळी केली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेऊ असे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

यावेळी श्री पवार म्हणाले, सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत संपूर्ण कामासाठी मंजूर केलेला निधी देण्यात येईल तसेच या आराखड्यांतर्गत झालेल्या कामांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नावीन्यपूर्ण संकल्पना राबवून निधी उभारावा. निधी उभारणे शक्य झाले नाही तर जिल्हा वार्षिक योजनेतून सदर कामासाठी निधी देण्याचा विचार करण्यात येईल.

वर्धा जिल्ह्यात महिला बचत गटांकडून सोलर पॅनल निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. मागासवर्गीय महिला बचत गटाकडून निर्मित होणारा देशातील अशा प्रकारचा दुसरा व राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पातून उत्पादित होणारे सोलर पॅनलची गुणवत्ता अपारंपारिक ऊर्जा विकास संस्थेच्या अधिकाऱ्यांनी तपासून त्याचा अहवाल सादर करावा. सदर बचत गटामार्फत निर्मित सोलर पॅनलची गुणवत्ता उत्तम असल्यास राज्यातील अपारंपारिक ऊर्जा निर्मिती साठी आवश्यक असलेले सोलर पॅनल महिलांच्या या कंपनीकडून खरेदी करू अशी ग्वाही देत त्यांनी वर्धा जिल्ह्यातील तेजस्वी सोलर पॅनल निर्मिती प्रकल्पाला गती देण्याची बाब अधोरेखित केली.

यावेळी पालकमंत्री सुनील केदार यांनी जिल्ह्यातील धडक सिंचन योजनेचे कामे शेतकऱ्यांनी पूर्ण केली असून त्यांचे अनुदान निधीअभावी प्रलंबित आहे. सदर अनुदानासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच जलयुक्त शिवार योजने मधून यशोदा नदी पुनरुज्जीन करण्यासाठी कमलनयन बजाज फाउंडेशन, टाटा ट्रस्ट आणि राज्य शासन यांनी संयुक्तपणे काम केले आहे. त्यातील राज्य शासनाचा प्रलंबित हिस्सा अकरा कोटी रुपये मिळावा, तसेच समृद्धी महामार्गाचे कामाकरता लागणारे गौण खनिजाचे स्वामित्व धनाचे 10% रक्कम जिल्हा खनिज निधी अंतर्गत जिल्ह्याला मिळायला हवी, सदर रक्कम जिल्ह्याला उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने रस्ते विकास महामंडळाशी चर्चा करावी अशी मागणी पालकमंत्री सुनील केदार यांनी यावेळी केली. याबाबत श्री मोपलवार यांच्याशी चर्चा करून यावर मार्ग काढू असे श्री पवार यांनी सांगितले.

या बैठकीला जिल्ह्यातील अंमलबजावणी यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

नागपूर, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्याच्या आराखड्यावर मुंबईत होणार निर्णय

नागपूर, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्याच्या आराखड्यावर मुंबईत होणार निर्णय





गडचिरोलीला 275 गोंदीयाला 165 तर भंडारा जिल्हयाला 150 कोटीचा निधी

· राज्यस्तरीय नियोजन समितीची आढावा बैठक

· उत्कृष्ट नियोजन करणाऱ्या जिल्हाला 50 कोटी अतिरिक्त

· कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेवर खर्च, आराखडयाला मर्यादा


नागपूर, दि. 8 : जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये नागपूर विभागातील गडचिरोली, गोंदीया व भंडारा जिल्ह्याला अनुक्रमे २७५, १६५ व १५० कोटी निधीची मंजुरी देण्यात आली. विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर या तीन जिल्ह्याच्या अंतीम निधी वाटपाबाबतचा निर्णय मुंबई येथे होणार आहे.

उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2021-22 चा प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांची राज्यस्तरीय बैठक आज 8 फेब्रुवारीला विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती. वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, नियोजन विभागाचे उपायुक्त धनंजय सुटे यांच्यासह प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक व सर्व विभाग प्रमुख जिल्हानिहाय बैठकीला उपस्थित होते.
नागपूर विभागातील जिल्ह्यांनी जिल्हा वार्षिक योजनेचा (सर्वसाधारण) सन 2021-22 चा प्रारुप आराखड्यास संबंधित जिल्हा नियोजन समितीची, शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेत मान्यता घेतली होती. जिल्ह्यांची गरज विचारात घेता काही योजनांसाठी जिल्ह्यांकडून अतिरिक्त निधीची मागणी नोंदविण्यात आलेली होती. आज त्यावर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.

दुपारी चार वाजता सर्वप्रथम गडचिरोली जिल्ह्याच्या आराखड्यावर चर्चा झाली. जिल्ह्यासाठी शासनाने कळविलेली आर्थिक मर्यादा 187.05 कोटी तर जिल्ह्यांची अतिरिक्त मागणी 320.68 कोटी होती. आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. यावेळी आमदार कृष्णा गजबे, आमदार देवराव होळी, आमदार धर्मराव आत्राम,आमदार अभिजित वंजारी, जिल्हाधिकारी दिपक सिंगला, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आर्शिवाद उपस्थित होते. चर्चेअंती जिल्हाला निर्धारित आर्थिक मर्यादा १८७.०५ कोटी रुपयांमध्ये अतिरिक्त 88 कोटी मंजूर करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यासाठी आर्थिक मर्यादा 149.64 कोटी असून आकांक्षित जिल्ह्यासाठी म्हणून अतिरिक्त 25 टक्के प्रमाणे 37.41 कोटी अनुज्ञेय असून समाविष्ट आहे.

गोंदिया जिल्ह्यासाठी शासनाने कळविलेली आर्थिक मर्यादा 108.39 कोटी रुपये होती तर जिल्‍हामार्फत अतिरिक्त 140.41 कोटीची मागणी करण्यात आली होती. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहमंत्री अनिल देशमुख कोरोनामुळे आजारी असल्याने अनुपस्थित होते.त्यांच्या अनुपस्थितीत आमदार डॉ.पारिणय फुके, अभिजित वंजारी, विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कुमार डांगे, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती कावेरी नाखले यांनी चर्चा केली. मूळ मागणीमध्ये ५७ कोटीची भर घालत एकूण १६५ कोटीच्या आरखड्यास मंजूरी देण्यात आली.
भंडारा जिल्हयासाठी शासन आणि ठरवलेली मर्यादा 94.18 कोटी होती. तर अतिरिक्त मागणी एकूण 210.87 कोटीची होती. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजीत कदम यांच्यासह आमदार डॉ.परिणय फुके, नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनय मून उपस्थित होते. चर्चेअंती जिल्ह्याच्या आराखड्यात 56 कोटीची भर घालत एकूण दीडशे कोटींच्या जिल्ह्याच्या आराखड्यास आज मंजुरी देण्यात आली.

चंद्रपूर जिल्ह्यासाठी शासनाने कळविलेली आर्थिक मर्यादा 180.95 कोटी होती. तर अतिरिक्त मागणी 321.64 कोटी रूपयांची होती. बैठकीला मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले उपस्थित होते. नागपूर नंतर सर्वात मोठा जिल्हा असणाऱ्या जिल्ह्यात संदर्भात मुंबई येथे निर्णय घेतला जाणार आहे.
वर्धा जिल्हयासाठी शासनाने कळविलेली आर्थिक मर्यादा 110.76 कोटी आहे.अतिरिक्त मागणी 162.07 कोटीची होती. या जिल्ह्यात संदर्भातील सेवाग्राम विकास आराखडा व राज्यातील महिला बचत गटामार्फत निर्मित होणाऱ्या पहिल्या सोलर प्रकल्पाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार , जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार रणजित कांबळे, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे उपस्थित होते.

नागपूर जिल्हयासाठी 241.86 कोटीची शासनाने आर्थिक मर्यादा कळविली होती. तर जिल्ह्याची अतिरिक्त मागणी 373.72 कोटीची होती. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत महत्त्वाच्या बैठकीमुळे अनुपस्थित होते त्यामुळे नागपूर जिल्ह्याच्या आराखड्यावर देखील मुंबईत निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले. बैठकीला यावेळी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषेदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, आमदार ॲड. आशिष जायस्वाल, अभिजित वंजारी, राजीव पारवे, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभोजकर, महानगर पालिकेचे अतिरिक्त सजल शर्मा, नियोजन विभागाचे उपायुक्त धनंजय सुटे, जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारिंगे तसेच विविध अंमलबजावणी यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नागपूर विभागातील सहा जिल्हयाची आर्थिक मर्यादा 923.19 कोटी ठरवण्यात आली आहे. विभागासाठी अतिरिक्त मागणी 1388.98 कोटी रूपयांची आहे. यावर्षी विभागात सर्व शासकीय नियमाचे पालन करुन आर्थिक आराखडयाची अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हयाला अतिरिक्त 50 कोटी रुपये दिले जाणार आहे.


बुधवार, फेब्रुवारी ०३, २०२१

गरम राख अंगावर उडल्यामुळे 38 कामगार जखमी

गरम राख अंगावर उडल्यामुळे 38 कामगार जखमी


 

उत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडल्यामुळे 38 कामगार जखमी

 

                * सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू

                * जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची घटनास्थळी भेट

 

            वर्धा दि 3 (जिमाका):- वर्धा तालुक्याच्या भुगाव येथील  उत्तम गलवा स्टील प्लँटमध्ये आज सकाळी सुमारे 5.30 वाजताच्या सुमारास   एक अपघात  झाला. स्टील प्लँट  वार्षिक देखभालीसाठी काल सायंकाळी बंद करण्यात आला होता. सकाळी 5.30 वाजता फरनेस पूर्णपणे बंद  झाल्यावर  फरनेस मधील राख बाहेर काढन्यासाठी 50 कामगार काम करीत होते. फरनेस मधील राख काढत असताना  गरम हवे सोबत राखेचे कण एकदम अंगावर उडाल्यामुळे 38 लोक जखमी झालेत. यातील  28 व्यक्तींना सावंगी मेघे येथील विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तर 10  व्यक्तींना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने यात कुणाचाही मृत्यू नाही. तसेच 40 टक्के भाजल्याच्या गंभीर जखमा असलेल्या  6 व्यक्तींना अति दक्षता केंद्रात दाखल करण्यात आले आहे.  

            जिल्हाधिकारी विवेक भीमनवारजिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांची विचारपूस करून रुग्णांच्या नातेवाईकांना धीर दिला.

मंगळवार, जानेवारी २६, २०२१

मुलगी चालवित होती कार;  भीषण अपघातात तीन ठार

मुलगी चालवित होती कार; भीषण अपघातात तीन ठार



वर्धा : मंगळवारी पहाटे पुलगाव नजीकच्या मलकापूर शिवारात नेक्सा कंपनीची बोलेनो कार क्रमांक mh-40 BE8394 गाडीने उभ्या ट्रकवर धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता गाडी चकनाचूर झाली. या अपघातात दिलीप वामनराव इंगोले, सुरेखा दिलीप इंगोले, दीपक चैतराम मुंजेवार हे ठार झाले. अपघातग्रस्त गाडी ही शेगाववरुन नागपूरला जात होती व मुलगी गाडी चालवित होती. अपघातात तिच्या आई वडिलांचा दुर्देवी मृत्यू झाला हे सर्व नागपुरमधील हिंगणा परिसरातील रहिवाशी होते. पुलगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
मुलगी चालवित होती कार;  भीषण अपघातात तीन ठार

बुधवार, नोव्हेंबर २५, २०२०

संदीप जोशी यांच्या ऋणातून मुक्त व्हायची वेळ : डॉ. आर.जी.भोयर

संदीप जोशी यांच्या ऋणातून मुक्त व्हायची वेळ : डॉ. आर.जी.भोयर




वर्धा/चंद्रपूर, ता. २३ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीमध्ये सिनेट सदस्य असलेल्या संदीप जोशी यांनी समर्थन दिले. त्यावेळी संदीप जोशी यांनी दिलेल्या समर्थनामुळे आणि त्यांच्या मतामुळे आपण व्यवस्थापन परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो. आज पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने संदीप जोशी यांच्या त्या ऋणातून मुक्त व्हायची वेळ आली आहे, अशी भावना वर्धा येथील महिला विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ.आर.जी.भोयर यांनी व्यक्त केली.

भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ), बहुजन रिपब्लिकन एकता मंच व खोरिप महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांनी वर्धा जिल्हा संपर्क दौऱ्यादरम्यान डॉ. आर.जी. भोयर यांची भेट घेतली. यावेळी आर.जी. भोयर यांनी संदीप जोशी यांच्या विजयाचा संकल्प केला.

ते म्हणाले, आज संदीप जोशी पदवीधरांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज आहेत. भारतीय जनता पक्षाने दिलेला हा उमेदवार विधानपरिषदेत पोहोचण्यासाठी संपूर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहोतच. संदीप जोशी विजयी होतील, हे शंभर टक्के निश्चित आहे. मात्र त्यांना मोठ्या बहुमताने विधीमंडळाच्या वरीष्ठ सभागृहात पाठविण्याची संधी आज मिळाली. निःस्वार्थ भावनेने इतरांची मदत करणारे संदीप जोशी हे समाजकारणी विधानपरिषदेत जाणे हा विभागातील पदवीरांचा मोठा सन्मान ठरणार आहे. कुणावर कधी कसलीही वेळ आली तर मदतीसाठी मागे न पाहणाऱ्या संदीप जोशींबाबत ऐकूण होतो. त्याची अनुभूती प्रत्यक्ष घेता आली. व्यवस्थापन परिषदेत त्यांनी दिलेल्या आपुलकीच्या आधाराने त्यांच्या ऋणबंधात गुंफून आहे. आज संदीप जोशी यांच्या विजयात योगदान देऊन त्या ऋणबंधातून मुक्त होण्याची वेळ आहे. संदीप जोशी विजयी होऊन विभागातील पदवीधर, प्राध्यापक, शिक्षक, बेरोजगार आणि शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देतील, असा विश्वासही डॉ. आर.जी. भोयर यांनी व्यक्त केला.

रविवार, नोव्हेंबर २२, २०२०

जातीपेक्षा कर्तृत्वाला कौल द्या : खा. रामदास तडस

जातीपेक्षा कर्तृत्वाला कौल द्या : खा. रामदास तडस




पुलगावच्या सभेत आवाहन

पुलगाव, ता. २२ : प्रत्येक निवडणुकीत विरोधक जातीचे राजकारण करतात. जेथे जातीचे राजकारण होते, तेथे चुकीचा उमेदवार निवडला जातो. ही पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे. येथे उमेदवारांची जात न बघता कर्तृत्व बघा, कर्तृत्वाला कौल द्या, असे मार्मिक आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले.

नागपूर पदवीधर मतदारसंघाचे भाजप-मित्र पक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ पुलगाव येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर उमेदवार संदीप जोशी, भाजपचे वर्धा जिल्हा अध्यक्ष डॉ.शिरीष गोडे, संघटन महामंत्री अविनाशजी देव, महाराष्ट्र प्रदेश सचिव राजेश बकाने, भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुधीर दिवे, वर्धा जिल्हा परिषद उपाध्यक्षा वैशाली येरावार, नगराध्यक्ष शीतल घाटे, बाबारावजी देशमुख, पुलगाव शहर अध्यक्ष नितीन बडगे, भाजपा युवा मोर्चा वर्धा जिल्हा अध्यक्ष वरूण पाठक, संजय गाथे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, ही निवडणूक सुशिक्षित, उच्चशिक्षितांची आहे. या निवडणुकीसाठी मतदान करणारे मतदारही सुशिक्षित आहेत. त्यामुळे या निवडणुकीत जातीचा विखारी प्रचार कामात येत नाही. मतदार सूज्ञ आहेत. आपण काय केले हे सांगण्यासाठी विरोधकांजवळ काहीही नाही. ज्यांना यापूर्वीच्या निवडणुकीत मतदारांनी दोनदा नाकारले तेच पुन्हा जनतेसमोर येत आहेत. सत्तेसाठी ज्यांनी पक्षाशी बेईमानी केली ते पक्षाशी आणि मतदारांशी कसे प्रामाणिक राहू शकतात, याचा विचार मतदारांनी करणे आवश्यक आहे. संदीप जोशी हे राजकारणातील समाजकारणी आहेत. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरींच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भक्कम साथ त्यांच्या सोबत आहे. संवेदनशील मनाच्या संदीप जोशी यांनी अनेक समाजपयोगी प्रकल्प उभारले. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेक गरजूवर मोफत शस्त्रक्रिया केल्या. हा माणूस आपले कर्तृत्व घेऊन रिंगणात उतरला आहे. त्यांच्या कर्तृत्वापुढे जात गौण ठरते. त्यामुळे या निवडणुकीत कर्तृत्वाला मतदान करा, असे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले.

उमेदवार संदीप जोशी यांनी उपस्थितांना भावनिक साद घातली. पदवीधर आणि शिक्षक हे समाजातील महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्याशी आपली नाळ जुळलेली आहे. प्रश्न आणि समस्या कुठल्याही असो, माझा हेतू प्रामाणिक आहे. मी निवडून आल्यानंतर आपल्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे, असा विश्वास त्यांनी दिला.
यावेळी अन्य प्रमुख वक्त्यांचीही भाषणे झालीत. उपस्थितांनी भाजप- मित्र पक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांना निवडून देण्याचा संकल्प केला.

गुरुवार, जुलै ०९, २०२०

लेखी आश्वासनानंतर पत्रकारांचे उपोषण तात्पुरते स्थगित:गटविकास अधिकारी नंदागवळी दिर्घरजेवर

लेखी आश्वासनानंतर पत्रकारांचे उपोषण तात्पुरते स्थगित:गटविकास अधिकारी नंदागवळी दिर्घरजेवर

समुद्रपूरचे सहाय्यक गटविकास अधिकारी 
देशमुख यांनी स्वीकारला पदभार 
कारंजा (घाडगे):
जिल्हा परिषद प्रशासन व जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले,  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार  दादाराव केचे,आमदार रामदासजी आंबटकर, तसेच जिल्हा परिषदेचे पंचायत विभागाचे सहाय्यक गटविकास अधिकारी एस, पी, पडघन यांची यावेळी उपस्थिती होती, येथील पंचायत समितीचे वादग्रस्त  गटविकास अधिकारी नंदागवळी यांच्या अनागोंदी कारभारा बाबत स्थानिक पत्रकारांनी बातम्यांच्या माध्यमातून याला वाचा फोडली होती, 
पण पत्रकारांविरुद्ध येथील बीडीओ ने खंडणीची खोटी तक्रार देत धमक्या दिल्या होत्या त्यामुळे स्थानिक पत्रकार व नागरिकांनी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती, न्याय न मिळाल्याने 15 जून रोजी येथील पंचायत समिती समोर एक दिवसाचे उपोषण करण्यात आले,यावेळी आमदार दादाराव केचे व जिल्हापरिषद अध्यक्ष सरिता गाखरे यांनी भेट देत कारवाई चे आश्वासन दिल्याने उपोषण  
  तातपुरते स्थगित करण्यात आले होते, 
पण अखेर बेदखल झालेल्या प्रशासनाला पुन्हा निवेदन देऊन इशारा देण्यात आला, पण निगरगट्ट प्रशासनाला अखेर जाग न आल्याने नाईलाजास्तव  पुन्हा  दुसऱ्यांदा 3 जुलै पासून मुंडन आंदोलन करत उपोषण करण्यात आले ,अखेर पत्रकार व स्थानिक नागरिकांचा वाढत  असलेला तणाव पाहून दि, 8 बुधवार ला जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे यांनी स्वतःतर्फ पत्र देऊन व जिल्हा परिषद कडून पंचायत विभागाचे सहाययक गटविकास अधिकारी एस, पी, पडघन यांनी वेगवेगळे  पत्र देऊन कारवाईचे आश्वासन दिले,त्यामुळे हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले, यावेळी आमदार दादाराव केचे, आमदार रामदासजी आंबटकर,व जिल्हापरिषद अध्यक्ष सरिता गाखरे यांनी उपोषणाला बसलेले गजानन बाजारे, जगदीश कुरडा,संजय नागापूरे यांनी निंबू  पाणीपाजून उपोषण सोडले, 
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मुकुंदराव बारंगे,जिल्हा उपाध्यक्ष शिरीष भांगे,नगरसेवक संजय कदम,पंचायत समितीचे उपसभापती जगदीश डोळे यांची उपस्थिती होती,येथील पंचायत समितीचे बीडीओ नंदागवळी हे दिर्घरजेवर गेल्याने समुद्रपूर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी प्रवीण देशमुख यांनी पदभार स्वीकारला



मंगळवार, जुलै ०७, २०२०

गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई न करणाऱ्या प्रशासणाचा ,पंचायत समिती आवारात बेशरमचे झाड लावून नोंदविला निषेध

गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई न करणाऱ्या प्रशासणाचा ,पंचायत समिती आवारात बेशरमचे झाड लावून नोंदविला निषेध

कारंजा (घाडगे):
येथील पंचायत समितीचे वादग्रस्त गटविकास अधिकारी उमेश नंदागवळी यांच्यावर कारवाई   करण्यात  करण्यात यावी या मागणीसाठी स्थानिक पत्रकार व नागरिकांच्या वतीने लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते, परंतु न्याय न मिळाल्याने 15 जून ला पंचायत समितीसमोर पत्रकारांचे उपोषण करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे व आमदार दादाराव केचे यांनी भेट देत कारवाईचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते,परंतु कारवाई न झाल्याने पुन्हा प्रशासना विरोधात 3 जुलै पासून मुंडन आंदोलनासह उपोषण सुरू करण्यात आले,अद्यापही प्रशासनाकडून कारवाई होतांना दिसून येत नसल्यामुळे आज दि,7 मंगळवारला  स्थानिक पत्रकार व नागरिकांच्या वतीने पंचायत समिती परिसरात बेशरमच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले व गटविकास अधिकाऱ्याला संरक्षण देणाऱ्या प्रशासणाच्या बेशरमपणाचा पत्रकार व नागरिकांच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला यावेळी जगदीश कुरडा, गजानन बाजारे, संजय नागापुरे,सारंग भोसले, उमेश खापरे यांची  उपस्थिती होती,

रविवार, जुलै ०५, २०२०

युवकाने घेतली विहिरीत उडी; तर अंकिताने घेतला गळफास

युवकाने घेतली विहिरीत उडी; तर अंकिताने घेतला गळफास


कारंजा घाडगे/ प्रतिनिधी
तालुक्यातील सोनेगाव येथील रहिवाशी रमेश चौधरी वय 30 वर्ष या युवकाने गावातीलच काशीबाई उकले यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली ही घटना आज पाच जुलै ला 5 वाजताची दरम्यान घडली आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

तरुणीची आत्महत्या
शेलगाव लवणे येथील अंकिता दिलीप बागडे वय 22 वर्ष या तरुणीने स्वतःच्या काकाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दिनांक ५/७/२०२० ला दुपारी १'२० वाजता घडली पुढील तपास कारंजा पोलीस करत आहे आत्महत्येचे कारण कळू शकले नाही
सेल्फी काढण्याच्या नादात गेला दोन युवकांचा जीव

सेल्फी काढण्याच्या नादात गेला दोन युवकांचा जीव


कारंजा घाडगे:
आज दिनांक ५/७/२०२० ला दुपारी ३'३० चे दरम्यान उमरी येथील पाच युवक गुरुपौर्णिमेच्या निमित्त्याने पूजा करण्यासाठी धावसा हेटी येथील दुर्गा देवी मंदिरात पूजा करण्यासाठी गेले होते पूजा आटोपल्यानंतर धवसा गावाला लागून असलेल्या पाझर तलावा जवळ सेल्फी काढण्याकरिता तलावाच्या काठावर पाचही युवक गेले त्यातील मृतक तेजस राजेश चोपडे वय १५ व हर्षल संजय चौधरी वय १६ हे सेल्फी काढण्याकरिता तलावाच्या काठावर उभे झाले परंतु सेल्फी फोटो चांगले निघावेत याकरिता थोडे मागे सरकले तेव्हा ते तलावात जाऊन पडले तलावाच्या काठावर उमरी गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर आहे
 उन्हाळ्यात तलावाला कमी पाणी असल्याने विहिरीत पाणी जात नव्हते म्हणून तलावाजवळून विहिरीत पाणी जाण्यासाठी जी शी पी च्या साह्याने खोल नाली काढून विहिरीत पाणी नेण्यात आले होते.


त्यामुळे तेथे मोठा खड्डा होता तरुणांना त्याची माहिती नव्हती नालीच्या खड्ड्यात अंदाजे८ ते १० फूट पाणी असल्याने गावकऱ्यांनी सांगितले मृतक युवकांना पोहणे नसल्याने खड्ड्यात पडल्यावर त्यांना आपला जीव गमवावा लागला घटना घडल्यानंतर सोबत असलेले तीन मित्रांनी आरडाओरड केल्याने रस्त्याने जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात आली त्यानंतर संपूर्ण परिसरात ही बाब माहित झाल्यावर कारंजा पोलिसांना पाचारण करण्यात आले ५'३० चे दरम्यान दोन्ही मूर्त कांचा मृतदेह मच्छिमारांच्या साह्याने बाहेर काढण्यात आला

गुरुवार, जुलै ०२, २०२०

नापिकीला कंटाळून संपविली जीवनयात्रा !

नापिकीला कंटाळून संपविली जीवनयात्रा !




आष्टी तालुक्यातील अंतोरा (माणिकनगर) येथे शेतकऱ्याची आत्महत्या !

आष्टी/तालुका प्रतिनिधी :
   गेल्या काही वर्षांपासून कमी होणाऱ्या  पावसाळ्यामुळे पाणीटंचाई, नापिकी, दुष्काळ वादळी पाऊस , गारपिट , शेती पिकांवर येणारे रोग , शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव , यामुळे नापिकी,पाणीटंचाई, या सर्व प्रकाराला कंटाळून वाढलेल्या शेतकरी आत्महत्यांनी शेतकऱ्यांच्या रंगाचा बेरंग झाला आहे. नापिकीला कंटाळून शेतकरी आत्महत्या वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यातील खरे रंगच नाहीसे झाले आहे .
     आष्टी तालुक्यातील माणिकनगर (अंतोरा) येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने सततच्या नापिकीला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. अंतोरा ( माणिकनगर) येथील अल्पभूधारक तरुण शेतकरी शरद बापुरावजी पोहकार वय ५२ वर्ष यांनी सततच्या नापिकीला कंटाळून गुरुवार दिनांक २जुलै रोजी सकाळी विष प्राशन करून आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्या कडे कोरडवाहु तीन एकर जमिन असून सतत तीन वर्षापासून दुष्काळ, पाऊस अल्प प्रमाणात पडत असल्याने शेतात काही पिकले नाही. खाजगी कर्ज कसे फेडायचे कसे घरचा गाडा चालवायचा कसा या चिंतेत ते होते. कुटुंबाचा गाडा कसा हाकलायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी,  म्हातारे आई वडील,  असा परिवार असून त्यांचा उदरनिर्वाह शेतीवर चालत होता.
         स्वर्गीय शरद बापुरावजी पोहकार हे अंतोरा माणिकनगर येथील प्रतिष्ठित व्यक्ती असून माणिकनगर येथील माजी सरपंच म्हणून त्यांनी गावाची धुरा सांभाळी समाजसेवा करून अनेकांच्या समस्या सोडविणारे अंतोरा ( माणिकनगर ) येथील नेतृत्व हरवल्यामुळे गावामध्ये हळहळ व्यक्त केल्या जात आहे .

रविवार, जून ०७, २०२०

वर्धा;टॅक्टर व टूव्हीलरअपघात;टुव्हिलर चालक जागीच ठार तर महीला गंभीर जखमी

वर्धा;टॅक्टर व टूव्हीलरअपघात;टुव्हिलर चालक जागीच ठार तर महीला गंभीर जखमी

वर्धा(खबरबात):One killed in Manikpur Road Accident - Pratidin Time
जिल्ह्यातील अल्लीपुर नजदीकच्या पवनी पुलाजवळ टॅक्टर व टूव्हिलर अपघातात मध्ये टुव्हिलर चालक जागीच ठार तर महीला गंभीर जखमी 
वर्धा जील्हातील अल्लीपुर नजदीकच्या पवनी पुलाजवळ टॅक्टर व टूव्हीलर च्या अपघात झाल्याने टूव्हिलर चालक व एक महीला टॅक्टर मध्ये दबल्याने टूव्हिलर चालक जागीच ठार झाला तर महीला गंभीर जखमी आहे .

अपघात झाला याची माहीती गावातील प्रकाश चंदनखेडे यांन्ना मीळताच स्वताहाची गाडी घेऊन प्राथमीक आरोग्य केंन्दात आनले .व डॉ . रूचीरा कुंभारी यांनी तपासनी केली असता टूव्हिलर चालक याला मृत घोशीत केले . व गंभीर जखमी महीलेला 108 गाड़ीची वाट न बघता डॉ . रूचीरा कुंभारे यांनी प्राथमीक आरोग्य केंन्दाच्या यांबुलंन्स मध्ये रेफर केले .त्यांच्या सोबत वर्धा येथील दवाखान्यात जान्या साठी तयार नोव्हते तेव्हा माझी ग्रा . प . सदस्य यांनी पुढाकार घेऊन दवाखान्यात घेऊन गेले. 
त्या नंतर टूव्हिलर चालक व महीला यांना शासकीय दवाखान्यात नेन्यात आले घटना स्थळी पोलीस नीरीक्षक योगेश कामाले ,जमादार मडावी,पोलीस शीपाई सतीश मेश्राम यांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला आहे.टूव्हिलर चालक दीलीप आंजीकर रा . डोंगरखड्डा हा जागीच ठार झाला आहे .टॅक्टर चालक घटना स्थळावरून पसार झाला आहे .
पुढील तपास पोलीस नीरीक्षक योगेश कामाले हे करीत आहे

शनिवार, मे ३०, २०२०

 वर्धा:जिल्ह्यात ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना डिस्चार्ज:तर एकाचा मृत्यू

वर्धा:जिल्ह्यात ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना डिस्चार्ज:तर एकाचा मृत्यू

Image may contain: one or more people, people standing and outdoor
उपचार घेणाऱ्या पाच जणांचा अहवाल 
निगेटिव्ह आल्यावर रुग्णांना सुटी
वर्धा:विशेष प्रतिनिधी(खबरबात):
जिल्ह्यात आज एकही नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली नाही ही वर्धा जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी असली तरी दुर्दैवाने सावंगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वाशीम येथील एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर पाच कोरोना रुग्ण ठणठणीत बरे होऊन आज घरी पोहचले आहेत. यात सावंगी रुग्णालयातील दोन तर सेवाग्राम येथील कोविड रुग्णालयातील तीन रुग्णांचा समावेश आहे.

 वर्ध्यात आज सेवाग्राम रुग्णालयातील तीन तर सावंगी रुग्णालयातील दोन रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. धामणगाव येथील एका 21 वर्षीय तरुणीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मेंदूज्वर झालेल्या या तरुणीला कोरोनाची लक्षणे होती ती पोझेटिव्ह निघाली, सोबतच तिच्या दोन बहिणी आणि आई याचे अहवाल देखील पोझेटिव्ह आले होते. त्यांच्यावर उपचार करण्यात आले त्यापैकी दोघेजण ठणठणीत बरे झाले आहेत. सावंगी रुग्णालयातून सन्मानपूर्वक त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जिल्हाधिकारी व डॉकटर चमूने टाळ्या वाजवून यांचे अभिनंदन केले आहे. 

 मे रोजी आर्वी तालुक्याच्या जामखुटा येथे एका परिवारातील तीन लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आला होता. या तीन पॉजिटिव्ह रुग्णामध्ये एक महिला , एक पुरुषासह व तीन वर्षीय बालकाचा समावेश होता. ११ मे रोजी नवी मुंबई येथून ते आले होते. जिल्हा परिषद शाळेत करण्यात आले होते यांना क्वारेन्टाईन करण्यात आले होते. त्यांची प्रकृती देखील आता स्थिरावली आहे. त्यांचा आताच अहवाल निगेटिव्ह आला आहे. या तिघांना देखील डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शुक्रवार, मे २९, २०२०

वाशीम येथील कोरोनाबाधित रुग्णाचा सेवाग्राम रुग्णालयात मृत्यू

वाशीम येथील कोरोनाबाधित रुग्णाचा सेवाग्राम रुग्णालयात मृत्यू

वर्धा/विशेष प्रतिनिधी:
8 मे रोजी हृदय रोगाच्या उपचारासाठी  सावंगी येथे  दाखल झाले होते. सोबतच पॅरालिसिस आणि  बी पी या आजारानेही त्रस्त होते.१० मे रोजी त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना सेवाग्राम  येथील कस्तुरबा रुग्णालायत  पुढील उपचारासाठी भरती करण्यात आले होते. 
या 63 वर्षीय रुग्णाची प्रकृती मागील 8 दिवसांपासून  गंभीर होती. त्यांना व्हेंटिलेटर सुद्धा लावण्यात आले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. आज  त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर वर्धेतच  स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत...

बुधवार, मे २७, २०२०

कोरोनाबाधित परिचारिका व पतीवर गुन्हा दाखल

कोरोनाबाधित परिचारिका व पतीवर गुन्हा दाखल

difference between quarantine and isolation nck 90 | Loksatta
गृह विलगिकरणात असताना बाहेर फिरून पसरविला संसर्ग 
वर्धा(खबरबात):
 मुंबईहून सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता वर्धा जिल्ह्यात आलेली सायन येथील परिचारिका आणि तिच्या पतीवर गृह विलगिकरणाचे नियम मोडून कोरोनाचा संसर्ग पसरविल्याबाबत आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावंगी मेघे येथील परिचारिका मुंबई येथून 16 मे रोजी वर्धा जिल्ह्यात आली. तिने कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेतली नाही. जिल्हा बंदी असताना सदर महिला वर्धा जिल्ह्यात दाखल झाली. मुंबईहून आल्यावर वर्धेत आल्याची कुणालाही माहिती दिली नाही व आरोग्य तपासणी सुद्धा करुन घेतली नाही. आरोग्य विभागाने 21 मे रोजी संपूर्ण कुटुंब गृह विलागीकरण केल्यावर सुद्धा तिचे पती गावात इतरत्र फिरत होते.

 सदर महिला आज कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले असून महिलेच्या पतीने कुणाच्याही संपर्कात न आल्याची खोटी माहिती दिली. मात्र प्राप्त माहितीनुसार महिलेचा पती गावभर फिरत असल्याचे उघड झाले असून त्यांनी कोरोनाचा संसर्ग पसरविल्याबाबत नोडल अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून परिचारिका आणि पती विरुद्ध सावंगी मेघे पोलीस ठाण्यात भा दं वि 1860 च्या कलम 188, 269, 270 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 00000

शुक्रवार, मे २२, २०२०

वर्धा: ग्रामसेवकाला 5000 रुपयाची लाच घेताना रंगेहाथ अटक

वर्धा: ग्रामसेवकाला 5000 रुपयाची लाच घेताना रंगेहाथ अटक


 वर्धा(ख़बरबात):
 ●तक्रारदार :- पुरुष,  वय 29 वर्ष ,रा.आगारगाव, ता.देवळी जि..वर्धा
●आलोसे :-राजेंद्र आत्माराम भोवते वय..45 वर्ष पद - ग्रामसेवक, वर्ग-3,पंचायत समिती देवळी,ता.देवळी , जिल्हा.वर्धा
●लाच मागणी रक्कम :-  7000/- रुपये
●स्विकारणी  - तडजोडी अंति 5000/- रुपये
●पडताळणी व सापळा :-
        दि.22/05/2020
●कारण :-  यातील तक्रारदार यांनी त्यांना मिळालेल्या कंत्राट नुसार आलोसे यांच्या ग्रामपंचायत अंतर्गत पैंटिंग चे  काम केले होते व काही काम हे बाकी होते व केलेल्या कामाचं बिल एकूण 1,40, 000/-रु तक्रारदार यांना  मिळाले होते.. तरी काढून दिलेल्या बिलाचा मोबदला म्हणून  आलोसे यांनी तक्रारदार यांना 7, 000/-रु ची मागणी करून तडजोडी अंती 5000/-रु ची मागणी करून उर्वरित 2000/-रु नंतर देण्याबाबत चे पडताळणी दरम्यान स्पष्ट मागणी करून आलोसे यांनी पंचासमक्ष लाच रक्कम स्वीकारल्याने गुन्हा नोंद...
● मार्गदर्शन : मा. पोलीस अधिक्षक श्रीमती रश्मि नांदेडकर ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर, मा.श्री.राजेश दुद्दलवार, अप्पर पोलीस अधिक्षक, परिक्षेत्र नागपूर, श्री.विजय माहुलकर  पोलिस उप अधीक्षक, परीक्षेत्र नागपूर
 ●कारवाई पथक:-श्री. गजानन विखे, पोलीस उपअधीक्षक,सुहास चौधरी, पोलीस निरीक्षक, पो.हवा रोशन निंबोलकर, नापोका अतुल वैद्य ,पोशी सागर भोसले,कैलास वालदे, मपोशी पल्लवी बोबडे, अपर्णा गीरजापुरे सर्व ला प्र वि वर्धा..

बुधवार, मे २०, २०२०

वर्धा:वाळूमाफियांकडून वनरक्षकाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न

वर्धा:वाळूमाफियांकडून वनरक्षकाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न

दुचाकीला धडक देत पाडले जमिनीवर 
आरोपीमध्ये जांगोणाच्या सरपंचाचा समावेश
प्रमोद पानबुडे(वर्धा)
 वन जमिनीतून वाळूची अवैध वाहतूक करणाºयांवर कारवाईसाठी गेलेल्या वनरक्षक मुनेश सज्जन याच्यावर अतिज्वलनशील पदार्थ टाकून त्याला जीवंत जाळण्याचा प्रयत्न वाळूमाफियांनी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना मध्यरात्री हिंगणघाट तालुक्यातील कोल्ही-सास्ताबाद पांदण रस्ता मार्गावर घडली आहे. या प्रकरणात वडनेर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीमध्ये जांगोणा येथील सरपंचाचा देखील समावेश आहे.
- जिल्ह्यात वाळू घाटाचा लिलाव झाला नाही तरीही अवैध वाळू वाहतूक जोरात सुरू आहे. रात्रीत चालणाऱ्या या अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. हिंगणघाट तालुक्यातील कोली येथे अवैध वाळू तस्करी सुरू आहे. यावर कारवाईसाठी निघालेल्या वन विभागाच्या चमुला वाळू माफियांनी रस्त्यात पकडले. 
दुचाकीने वाळू माफियांचा शोध घेणाºयांमध्ये वनरक्षक मुनेश्वर सज्जन व सदाशीव माने यांचा समावेश होता. वनरक्षक कारवाईसाठी आल्याचे लक्षात येताच आरोपींनी दुचाकीला धडक देत त्यांना जमिनीवर पाडले. आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी सोबत असलेला अतिज्वलनशील पदार्थ सज्जन यांच्या अंगावर टाकून त्यांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न केलाय. सज्जन यांनी आरडा-ओरड केल्यावर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. 
वाळूमाफिया जिल्ह्यात सक्रिय असल्याचे पुन्हा समोर आले आहे. या प्रकरणी वनरक्षक मुनेश सज्जन यांनी वडनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिलीय. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी वाळू माफिया उबालू कुबडे रा. पोहणा, जांगोनाचे सरपंच तथा वाळू माफिया नीतीन वाघ रा. जांगोणा यांच्यासह त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.