येथील पंचायत समितीचे वादग्रस्त गटविकास अधिकारी उमेश नंदागवळी यांच्यावर कारवाई करण्यात करण्यात यावी या मागणीसाठी स्थानिक पत्रकार व नागरिकांच्या वतीने लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते, परंतु न्याय न मिळाल्याने 15 जून ला पंचायत समितीसमोर पत्रकारांचे उपोषण करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे व आमदार दादाराव केचे यांनी भेट देत कारवाईचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते,परंतु कारवाई न झाल्याने पुन्हा प्रशासना विरोधात 3 जुलै पासून मुंडन आंदोलनासह उपोषण सुरू करण्यात आले,अद्यापही प्रशासनाकडून कारवाई होतांना दिसून येत नसल्यामुळे आज दि,7 मंगळवारला स्थानिक पत्रकार व नागरिकांच्या वतीने पंचायत समिती परिसरात बेशरमच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले व गटविकास अधिकाऱ्याला संरक्षण देणाऱ्या प्रशासणाच्या बेशरमपणाचा पत्रकार व नागरिकांच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला यावेळी जगदीश कुरडा, गजानन बाजारे, संजय नागापुरे,सारंग भोसले, उमेश खापरे यांची उपस्थिती होती,