उपचार घेणाऱ्या पाच जणांचा अहवाल
निगेटिव्ह आल्यावर रुग्णांना सुटी
वर्धा:विशेष प्रतिनिधी(खबरबात):
जिल्ह्यात आज एकही नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली नाही ही वर्धा जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी असली तरी दुर्दैवाने सावंगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वाशीम येथील एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर पाच कोरोना रुग्ण ठणठणीत बरे होऊन आज घरी पोहचले आहेत. यात सावंगी रुग्णालयातील दोन तर सेवाग्राम येथील कोविड रुग्णालयातील तीन रुग्णांचा समावेश आहे.
वर्ध्यात आज सेवाग्राम रुग्णालयातील तीन तर सावंगी रुग्णालयातील दोन रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. धामणगाव येथील एका 21 वर्षीय तरुणीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मेंदूज्वर झालेल्या या तरुणीला कोरोनाची लक्षणे होती ती पोझेटिव्ह निघाली, सोबतच तिच्या दोन बहिणी आणि आई याचे अहवाल देखील पोझेटिव्ह आले होते. त्यांच्यावर उपचार करण्यात आले त्यापैकी दोघेजण ठणठणीत बरे झाले आहेत. सावंगी रुग्णालयातून सन्मानपूर्वक त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जिल्हाधिकारी व डॉकटर चमूने टाळ्या वाजवून यांचे अभिनंदन केले आहे.
मे रोजी आर्वी तालुक्याच्या जामखुटा येथे एका परिवारातील तीन लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आला होता. या तीन पॉजिटिव्ह रुग्णामध्ये एक महिला , एक पुरुषासह व तीन वर्षीय बालकाचा समावेश होता. ११ मे रोजी नवी मुंबई येथून ते आले होते. जिल्हा परिषद शाळेत करण्यात आले होते यांना क्वारेन्टाईन करण्यात आले होते. त्यांची प्रकृती देखील आता स्थिरावली आहे. त्यांचा आताच अहवाल निगेटिव्ह आला आहे. या तिघांना देखील डिस्चार्ज देण्यात आला आहे.