Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
शनिवार, ऑगस्ट ०४, २०१८
प्रत्येक सरपंचाने स्वच्छ सर्वेक्षणात आपल्या गावाचे योगदान द्यावे:अहिर
गुरुवार, जुलै ०५, २०१८
जि.प.अध्यक्षांचा जिवती तालुक्यातील विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद
गुरुवार, नोव्हेंबर २३, २०१७
भावी पिढी सक्षम करण्यासाठी ग्राम नियमित स्वच्छ राखा - जितेंद्र पापळकर
चंद्रपुर(प्रतिनिधी)दिनांक- 23/11/2017 सावली तालुक्यातील निमगाव येथे नुकतीच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत ग्राम हागणदारीमुक्त करण्याच्या अनुषंगाने सभा घेण्यात आली. भारतात उघड्यावरच्या हागणदारी मुळे दर वर्षी डायरीयामुळे एक लक्ष मुलांचा मृत्यु होतो. ही योग्य बाब नसुन, भावी पिढी ख-या अर्थाने सक्षम करायची असेल तर गावातील प्रत्येकांनी आपले ग्राम नियमीत स्वच्छ राखले पाहिजे. असे मत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ग्रामस्थांना सभेद्वारा मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.
जिल्हा हागणदारी मुक्त च्या अंतीम टप्प्यात असुन, गावक-यांचा स्वच्छतेच्या कामात सहभाग वाढावा म्हणुन, गावा-गावात जनजागरणपर कार्यक्रमाचे आयोजन केल्या जात असुन, याच प्रकारे सावली तालुक्यातील आयोजित कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर सहभागी झाले. यावेळी जिल्हा परीषदचे अर्थ व बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार,गटविकास अधिकारी अमोल भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता)रविंद्र मोहिते,निमगावच्या सरपंच व कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर पुढे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, गावातील उघड्यावरची हागणदारीची प्रथा ही काही भुषणावह बाब नसुन, गावातील प्रत्येक घराचा परीसर तसेच सार्वजनिक परिसर नियमित स्वच्छ राहल्यास त्यागावातील लोकांचे आरोग्यमान सुधारण्यास मदत होते, यातुनच गावाचा विकास होत असतो. यासाठी गावातील प्रत्येकांनी गाव शाश्वत स्वच्छ राखण्याची जबाबदारी घेण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले. जिल्हा परीषदचे अर्थ व बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार यांनी ग्रामविकासाची खरी सुरुवात ही ग्राम स्वच्छतेतुनच होते . ग्राम शाश्वत स्वच्छ करणे ही ग्रामविकासाचे पहिले पाऊल असुन, याकामात सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे . असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल भोसले यांनी केले. कार्यक्रमात स्थानिक कलावंताचा कलापथकाचा प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आला .याद्वारा स्वच्छतेचे महत्व मनोरजनांच्या माध्यमातुन माडंण्याचा प्रयत्न केला गेला .याशिवाय एका शौचलयाचे भुमिपुजन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
शुक्रवार, नोव्हेंबर १७, २०१७
गावागावात होणार शौचालय दिन
चंद्रपुर(प्रतिनिधी)दिनांक - 17 / 11 / 2017 दर वर्षी ''19 नोव्हेंबर '' हा जागतीक शौचालय दिन म्हणुन साजरा केला जात असुन, यावर्षी सुद्धा चंद्रपुर जिल्ह्यातील गावा-गावात विविध उपक्रमांचे आयोजन करुन, जागतिक शौचालय दिनाचे आयोजन करण्याच्या सुचना जिल्हा परिषद कडुन सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना दिलेल्या आहेत. त्यानुसार 19 नोव्हेंबर ला गावा-गावात शौचालय दिन आयोजित केल्या जाणार आहे.
स्वच्छतेचे जिवनात फ़ार महत्व असुन,स्वच्छतेच्या सवयी अंगवळणी असल्यास 80 टक्के आजार नाहिसे होतात. याचाच एक भाग म्हणुन , गावस्तरावर स्वच्छते विषयी गाव स्तरावर जनजागरण व्हावे व प्रत्येकाला स्वच्छतेचे मह्त्व कळावे यासाठी 19 नोव्हेंबर हा दिवस जगात जागतिक शौचालय दिन म्हणुन साजरा करण्यात येत आहे. चंद्रपुर जिल्हा हागणदारी मुक्तच्या अंतिम टप्प्यात असुन, हागणदारी मुक्तीकडे मार्गक्रमण करित आहे . जिल्हातील गावा-गावात शौचालय दिनाचे आयोजन करुन, सभा,गृहभेटी, लोककलावंताचे कार्यक्रम, स्वच्छता फ़ेरी,मार्गदर्शन सभा अशा विविध कार्यक्रमा द्वारा गावस्तरावर स्वच्छतेचे वातावरण निर्माण करुन, जनमानसाच्या मना-मनात स्वच्छतेचे मह्त्व वृध्दीगत करण्यात येणार आहे. या अनुषंगाने सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना निर्देश देण्यात आले असुन, प्रत्येक गावाकरिता तालुका पातळीवरुन संपर्क अधिकारी नेमण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. जागतिक शौचालय दिनाचे गावस्तरावर भव्य आयोजन करुन, गावस्तरावर विविध उपक्रमातुन ग्रामस्थांना शाश्वत स्वच्छते विषयी अभिप्रेरित करावे असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.