चंद्रपुर(प्रतिनिधी)दिनांक- 23/11/2017 सावली तालुक्यातील निमगाव येथे नुकतीच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत ग्राम हागणदारीमुक्त करण्याच्या अनुषंगाने सभा घेण्यात आली. भारतात उघड्यावरच्या हागणदारी मुळे दर वर्षी डायरीयामुळे एक लक्ष मुलांचा मृत्यु होतो. ही योग्य बाब नसुन, भावी पिढी ख-या अर्थाने सक्षम करायची असेल तर गावातील प्रत्येकांनी आपले ग्राम नियमीत स्वच्छ राखले पाहिजे. असे मत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ग्रामस्थांना सभेद्वारा मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.
जिल्हा हागणदारी मुक्त च्या अंतीम टप्प्यात असुन, गावक-यांचा स्वच्छतेच्या कामात सहभाग वाढावा म्हणुन, गावा-गावात जनजागरणपर कार्यक्रमाचे आयोजन केल्या जात असुन, याच प्रकारे सावली तालुक्यातील आयोजित कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर सहभागी झाले. यावेळी जिल्हा परीषदचे अर्थ व बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार,गटविकास अधिकारी अमोल भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता)रविंद्र मोहिते,निमगावच्या सरपंच व कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर पुढे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, गावातील उघड्यावरची हागणदारीची प्रथा ही काही भुषणावह बाब नसुन, गावातील प्रत्येक घराचा परीसर तसेच सार्वजनिक परिसर नियमित स्वच्छ राहल्यास त्यागावातील लोकांचे आरोग्यमान सुधारण्यास मदत होते, यातुनच गावाचा विकास होत असतो. यासाठी गावातील प्रत्येकांनी गाव शाश्वत स्वच्छ राखण्याची जबाबदारी घेण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले. जिल्हा परीषदचे अर्थ व बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार यांनी ग्रामविकासाची खरी सुरुवात ही ग्राम स्वच्छतेतुनच होते . ग्राम शाश्वत स्वच्छ करणे ही ग्रामविकासाचे पहिले पाऊल असुन, याकामात सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे . असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल भोसले यांनी केले. कार्यक्रमात स्थानिक कलावंताचा कलापथकाचा प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आला .याद्वारा स्वच्छतेचे महत्व मनोरजनांच्या माध्यमातुन माडंण्याचा प्रयत्न केला गेला .याशिवाय एका शौचलयाचे भुमिपुजन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
गुरुवार, नोव्हेंबर २३, २०१७
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments