Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
सोमवार, ऑगस्ट २९, २०२२
सोमवार, मार्च ०७, २०२२
जळगावच्या देवकर बीएससी नर्सिंग महाविद्यालयाला शासनाची मान्यता; प्रवेश प्रक्रिया सुरू
मंगळवार, नोव्हेंबर १६, २०२१
निळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक
रविवार, जुलै २५, २०२१
रात्रीच्या वेळी उपमहापौरांवर गोळीबार |
जळगाव : उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर आज (25 जुलै) रात्री पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाला आहे. हा गोळीबार हा त्यांच्या पिंप्राळा येथील घरावर झाला आहे. यात ते सुदैवाने बचावले आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर रात्री उशिरा गोळीबार झाला. यात ते सुदैवाने बचावले. रामानंद नगर पोलीस स्थानकात त्यांनी रितसर तक्रार केली. त्यानंतर पोलीस त्यांच्या घरी घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आले. पोलीस याप्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासण्याची शक्यता आहे. गोळीबार करणारे नेमके कोण होते ते अद्याप समजू शकलेले नाही. पण या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरु आहे.
बुधवार, मार्च २४, २०२१
चंद्रपूर, जळगावच्या शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारणी संदर्भातील कार्यवाहीस गती द्यावी
चंद्रपूर, जळगावच्या शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय
उभारणी संदर्भातील कार्यवाहीस गती द्यावी
- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
मुंबई, दि. 24 : चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासंदर्भात कराराप्रमाणे दिलेल्या सवलतीच्या कालावधीतच काम पूर्ण करावे. याचबरोबर जळगाव येथील शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे काम नियमानुसार उपलब्ध निधीत पूर्ण करावयाच्या कार्यवाहीस गती द्यावी. संबंधीत कामाचा अहवाल तात्काळ सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.
मंत्रालयात चंद्रपूर आणि जळगाव येथील शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, जे.जे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, केंद्र शासनाचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या हॉस्पिटल सर्व्हिसेस कन्सल्टन्सी कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे महाव्यवस्थापक नरेंद्र कुमार, उपमहाव्यवस्थापक बिनोद कुमार, चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अरूण हुमने, जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री.पोटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आर.के. जावन्जळ, यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.देशमुख म्हणाले, चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम केंद्र शासनाने दिलेल्या सवलतीच्या कालावधीतच पूर्ण करावे. समांतर वैद्यकीय तंत्रज्ञान खरेदी आणि त्यासंदर्भातील तांत्रिक मान्यतेबाबतही कार्यवाहीस गती द्यावी. याचबरोबर जळगाव येथील रुग्णालयासाठीच्या जमिनीची पाहणी करून, केंद्र शासनाच्या प्रकल्प सल्लागार कंपनीप्रमाणे पुढील कार्यवाही करावी. संबंधीत कामाचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देशही मंत्री श्री.देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
सोमवार, फेब्रुवारी १५, २०२१
अर्जुन किसन पाटील यांचे निधन
नागपूर जिल्हा परिषदेतील शिक्षक नेते, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागपूर विभाग संघटन मंत्री, शिक्षक सहकारी बँकेचे संचालक, सुनील पाटील यांचे वडील अर्जुन किसन पाटील, सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस निरीक्षक यांचे त्यांचे मूळ गावी तांदलवाडी जिल्हा जळगाव येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांचे पश्चात दोन मुले एक मुलगी नातवंडे व बराच मोठा आप्तपरिवार आहे. अंत्यसंस्कार त्यांचे राहते गावी करण्यात आला.
शोकाकुल
सुनील अर्जुन पाटील
मोबाईल नंबर ९१९१३०००७२५२.
गुरुवार, जुलै २५, २०१९
ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ठिकठिकाणी महावितरणचे मेळावे
![]() |
महादुला येथे आयोजित ग्राहक मेळाव्याला मार्गदर्शन करतांना अधीक्षक अभियंता नारायण आमझरे
|
शुक्रवार, मार्च २२, २०१९
विद्यार्थ्यांनी आई बाबांना मतदान करण्यासाठी प्रेरित करावे
शुक्रवार, फेब्रुवारी २२, २०१९
जन्म देण्याआधीच मुलींना संपवून नका : किरण नवले
जळगाव/प्रतिनिधी
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला तेव्हा लखुजी राजे जाधव यांनी हत्तीवरून साखर वाटण्यात अली होती , चारशे वर्षा पूर्वी सुद्धा मुलीच्या जन्माचे स्वागत इतक्या उत्साहात ' एकविसाव्या शतकात आपण का आपल्या मुली जन्म देण्याआधीच संपवतो आहोत, अशी खंत माळशेवगे तालुका चाळीसगाव येते आपल्या भाषणात किरणताई नवले यांनी सांगितले.
कित्तेक जिजाऊ सावित्री आपण जन्म देण्याअधिच त्यांची हत्या केली , एक हजार मुलांमागे नऊशे 45 मुली आहेत , हे माहीत असतांना सुद्धा आपण मुलीला जन्म देत नाही आहोत. स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण अधिक वाढलेले दिसत आहे , अजूनही काही ठिकाणी आदळत आहे , मुलगी झाली की त्याना आनंद झालेला नसतो.
मुलगी आणि मुलगा समान आहेत त्यांना समान वागणूक ध्या हे आजही सांगावे लागत आहे ही मोठी दुर्देवी बाब आहे.
आजच्या काळात मुलीचे महत्व पटवून देण्यासाठी अनेक उदाहरणे शिवमती किरण नवले यांनी दिले. किरणताई चे स्वागत हे शाळेतील मुलीच्या लेझीम पथकाने केले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊं व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून झाली. कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी गावाच्या सरपंच बेबाबाई मोरे व प्रमुख पाहुने किरण ताई नवले होत्या. समस्त ग्रामपंचायत यांनी किरण ताई इतक्या कमी वयात गावोगावी जाऊन स्त्री भ्रूण हत्येवर प्रबोधन करत आहेत व विधवा महिला च्या सन्मान साठी काम करत आहेत त्यांच्या ह्या कामाला बघून किरणताई ना सन्मान पत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तर किरन ताई नवले यांच्या हस्ते गावातील आदर्श महिलांचा सत्कार करण्यात आला. आयोजन उपसरपंच व प्रदीप पाटील यांनी केले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालीग्राम निकम सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मंगेश भिकन काकलीस यांनी केले.🚩
रविवार, फेब्रुवारी १०, २०१९
साखरपुड्यातच लग्न : पहुरचे लोढा आणि शिर्डीचा डोशी परिवाराचा आदर्श
खबरबात / लतीष जैन, जळगाव
चोपडा : लग्न सांगितले की, अनेक विधी, परंपरा, खानपान, मानपान अश्या अनेक विधी पार पाडत असतांना वधू पित्याला आणि वर पित्याला फार मोठी कसरत करावी लागते परंतु या सर्व विधींना फाटा देत साखर पुड्यातच लग्न आपटून पहुरचा लोढा परिवार, आणि शिर्डीचा डोशी परिवार यांनी नवीन आदर्श निर्माण केला आहे
सविस्तर असे की, पहुर येथील रिखबचंद रायचंद लोढा यांच्या लहान मुलगा महेंद्रकुमार लोढा यांची कन्या दिशा हिचे शिर्डी येथील प्रकाशचंद उत्तमचंद डोशी यांचा मुलगा कमलेश यांच्याशी संबंध जुडले दि २५ जानेवारी रोजी पहुर येथील राजेंद्र लोढा यांच्या मुलीचे लग्न शिर्डी येथे होते त्या ठिकाणी कु दिशा आणि तिचे आजोबा रिखबचंद लोढा हे दोघ जण शिर्डी येथे लग्नाला गेले होते त्या ठिकाणी शिर्डी निवासी मदनलाल रूणवाल, सौ रेखा रुणवाल यांचे लोढा परिवारशी संबंध असल्याने यांनी पुढाकार घेत कमलेश डोशी हा मुलगा सुंदर आहे तो पाहून घ्या याविनंतीला मान देऊन रिखबचंद लोढा यांनी मुलगा बघितला आणि पसंतीचा होकार दिला त्याचवेळी दिशा हिनेही मुलगा पाहून घेतले आणि डोशी परिवाराने सुद्धा दिशाला सर्व लोकांनी पाहून पसंतीचे होकार दिला फक्त दोन दिवसातच त्यांनी होकार देऊन साखरपुड्याची तारीख काढून घ्या असे सांगितले यानुसार ८ तारखेला नियोजित साखरपुडा ठरले होते यासाठी मुलीचे आजोबा स्वरूप लोढा, मोठे वडील सतीश लोढा, प्रफुल्ल लोढा संजय लोढा, जीतेंद्र लोढा हे तयारी करत होते मात्र खुद्द वर कमलेश डोशी यांनी लोढा परिवारा जवळ प्रस्ताव ठेवला की, आपली तयारी असेल तर साखरपुड्यातच लग्न करायचे आहे यावर लोढा परिवार चिंतेत झाले होते मात्र काही काळा नंतर लोढा परिवाराने ही होकार दिला आणि काय रात्र पूर्ण काळी करत दुरध्वनी वरून जितक्या लोकांशी संपर्क होईल तितक्या लोकांशी संपर्क करून बोलावले आणि अवघ्या २५० तो ३०० लोकांमध्ये साखरपुड्यातच दुपारीच लग्न लावले या लग्नात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन ,जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन सह अनेकांनी हजेरी लावली यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी वधू - वरांना शुभआशीर्वाद देतांना म्हणाले की आदर्श लग्न , सामूहिक लग्न ही काळाची गरज आहे आम्ही आमच्या मतदार संघात फिरत असताना अत्यंत छोट्या छोट्या गावात दहा दहा वेळा फक्त लग्नाच्या हजेरी लावत फिरावे लागते या पेक्षा अश्या संपन्न परिवाराचा आदर्श सर्वानीच घ्यायला हवा आणि असे लग्न करणे काळाची गरज होऊन गेली आहे असे सांगत त्यांनी अनेक उदाहरणे देत आदर्श विवाहाचे महत्व सांगितले या लग्नाची स्तुती अनेकांनी केली आहे हे लग्न यशस्वी करण्यासाठी प्रकाश लोढा, प्रवीण लोढा, दिलीप बेदमुथा किशोर लोढा, विजय डोशी , रमनलाल रूणवाल,नंदलाल रुणवाल, श्रेणीक रुणवाल आदींनी मेहनत घेतली

