Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च २२, २०१९

विद्यार्थ्यांनी आई बाबांना मतदान करण्यासाठी प्रेरित करावे

नायब तहसीलदार मोनाली सोनवाणे
वाडी व सोनेगावात मतदान जागरूकता अभियान 
वाडी ( नागपूर )/अरूण कराळे:

राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र शासनाच्या मतदार जागरूकता मोहीम अभियान अंतर्गत हिंगणा विधानसभा क्षेत्रातील पंचायत समिती नागपूर मधील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वाडी क्रमांक १ व २ तसेच उच्च प्राथमिक शाळा सोनेगाव (निपाणी ) येथील विद्यार्थ्यांना संकल्प पत्र देऊन त्यांचे कुटुंबातील प्रौढ मतदारांकडून येत्या ११ एप्रिल २०१९ रोजी मतदान करण्याबाबत संकल्प पत्र भरून घेण्यात आली.

सदर संकल्प पत्राचे वाचन नागपूर ग्रामीणच्या नायब तहसीलदार मोनाली सोनवाणे यांनी प्रत्यक्ष शाळेत विद्यार्थ्यांची भेट घेऊन मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना आपल्या आई,बाबा, काका, मामा, मावशी, आजी आजोबा इत्यादींना मतदान करण्याबाबत महत्वाची भूमिका पार पडण्याचे आवाहन केले.

यावेळी व्यासपीठावर केंद्रप्रमुख शरद भांडारकर, नरेश चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपक मुराडे ,देवानंद वडीचार, मुख्याध्यापक भास्कर क्षीरसागर, साहेबराव मोहारे, मुख्याध्यापक प्रकाश कोल्हे प्रामुख्याने उपस्थित होते.

संचालन रुपेश भोयर तर आभार प्रदर्शन योगिता गुप्ता यांनी केले . यावेळी प्रवीण मेश्राम, राजाराम मेंघळ , युवराज उमरेडकर ,नीलिमा कामथे, मेघा आकरे, सुजाता भानसे, सुरेखा धोटे ,सुनंदा वाघाडे, संध्या राऊत ,ललीता गोंडचर , माधुरी डांगोरे , रजनी चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.