Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च २२, २०१९

खाजगी बसमधील अवैध पार्सलच्या विरोधात शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना आक्रमक

नागपूर / अरूण कराळे:

खाजगी बसमधील अवैध पार्सलच्या विरोधात शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना आक्रमक झाली असून पदाधिकाऱ्यांनी मंगळवार १९ मार्च रोजी नागपूर काटोल मार्गावरुन जाणारी महिंद्रा ट्रॅवल्स बस नंबर ओडी १७ जी १५३९ या खाजगी बस मध्ये अवैध पार्सल आढळून आल्यामुळे आरटीओच्या अधिकाऱ्यांना माहीती देऊन ते वाहन जमा केले . 

आश्चर्य म्हणजे ही खाजगी बस सूरत ते राजनांदगांव पर्यत जात होती महाराष्ट्र मध्ये प्रवेश केल्यावर आणि महाराष्ट्र सोडल्यावर महाराष्ट्राचे आरटीओ बैरियर्स क्रॉस करून जावे लागते . तिथे आरटीओचे अधिकारी असुनही या खाजगी बस वर कुठलीच कारवाई झाली नाही . सध्या लोकसभा निवडणूकीची आचार संहिता लागली असल्यामुळे प्रत्येक नाक्यावर खाजगी वाहनाची तपासणी सुरू आहे . या ट्रॅवल्स वर अवैद्य पार्सल दुरुनच दिसून येत असूनही कानाडोळा करीत असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे . एक महीना अगोदर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अवैद्य पार्सल वाहणाऱ्या खाजगी बस जप्त करण्याचे आदेश दिले होते . तरीही महाराष्ट्रात अवैद्य पार्सल चा गोरखधंदा शुरू आहे . अवैद्य पार्सल वाहतुकीचा गोरखधंदा हाणून पाडण्याचा ठाव शिवसेना महाराष्ट्र वाहतुक सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश कान्हारकर ,कार्याध्यक्ष भाऊराव रेवतकर, मनोज बरगट, लालसिंह ठाकुर,सचिव अखिलेश सिंह, नागपुर उपाध्यक्ष राकेश अग्रवाल , स्वप्निलबोरोडे,राम सिंह, अभय वर्मा, रिंकू अग्रवाल यांनी हाणून पाडला .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.