Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च २२, २०१९

लाव्हा येथील बकुताई नगर मधील २०० नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सेफ्टी टॅन्कचे पाणी सार्वजनिक जागेवर
स्थानिक प्रशासन व बिल्डर्सचे दुर्लक्ष,परिसरात विविध आजाराचा फैलाव 
 
नागपूर / अरुण कराळे:

लाव्हा ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या बकुताई नगर येथे सार्वजनिक जागेवर बिल्डर्सने सदनिका बांधताना सार्वजनिक जागेत सेफ्टी टॅंक बांधल्याने दूषित पाण्याचे तळे तयार होऊन स्थानिक परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. सन २००९ मध्ये जेसीका कन्स्ट्रक्शन कंपनी नागपूर द्वारा ग्राम पंचायत लाव्हा येथील बकुताई खसरा नंबर २४५ / २४६ मध्ये सरोजीनी व सुभाष अपार्टमेंट नावाने दोन सदनिका व ९ डुप्लेक्स बिल्डर राकेश मानकर यांनी बनविले त्याच परिसरात बगीचा,व लहान मुलांना खेळण्यासाठी तसेच इतर उपयोगासाठी मोकळ्या असलेल्या जागेवर संबंधित इमारतीचे गटाराचे पाणी साठवून ठेवण्यासाठी कमी क्षमता असलेली सेफ्टी टॅंक बनविल्याने काही वर्षात सेफ्टी टॅंक भरल्याने दूषित पाणी सार्वजनिक जागेवर पसरून गटाराचे पाण्याचे तळे तयार होऊन यांमध्ये म्हशी,डुकरे यांनी आपले बस्तान मांडले आहे तसेच मच्छर व डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने अदृश्य स्वरूपात विविध आजाराने परिसरात थैमान घातले असून मागील वर्षी मोठ्या प्रमाणात डेंगूचे रुग्णही आढळले होते.या आजाराने रिषभ भीमलवार, अनिता महाकाळे, अर्चना गोरे,अजिंक्य गोरे,तृषाली महाकाळे यांना रोगाने घेरले होते .तरीही स्थानिक प्रशासन कुंभकर्णी झोपेत असून स्थानिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मंगळवार १९ मार्च रोजी स्थानिक नागरीकांनी सरपंच ज्योत्स्ना नितनवरे,उपसरपंच महेश चोखांद्रे यांना निवेदन देऊन वरील समस्या त्वरित निकाली काढून सेफ्टी टॅंक बुजविण्याची मागणी केली.यापूर्वी स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी नागपूर,पोलीस आयुक्त,जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी,पालकमंत्री,पंचायत समिती,स्थानिक आमदार,पोलीस स्टेशन वाडी तसेच स्थानिक ग्राम पंचायत प्रशासनाला वारंवार लेखी पत्र देऊनही मागील दोन वर्षापासून कोणतेही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही.
प्रतिक्रिया
१ ) सदर ले आउट बिल्डरने स्थानिक ग्राम पंचायत प्रशासनाला हस्तांतर केले नाही तरीही ग्राम पंचायतने ३० लाख रुपये खर्च करून गडर लाईन टाकण्याचे काम सुरू केले आहे.
विकास लाडे
ग्राम विकास अधिकारी ग्राम पंचायत लाव्हा
२ ) संबंधित सदनिका व डुप्लेक्स करिता सेफ्टी टॅंक बनविली होती त्यानंतर स्थानिकांची मेंटनन्स करण्याची जबाबदारी असतानाही त्यांनी केली नाही,शेवटी २०१७ ला ५० हजार रुपये खर्च करून टॅक खाली व दुरुस्ती केली,आजही स्थानिक तयार असल्यास प्रत्येकांकडे सेफ्टी टॅंक बनून देतो,स्थानिक ग्राम पंचायतीने जो निर्णय घेणार तो मान्य राहील.
राकेश मानकर
जेसीका कंस्ट्रक्शन कंपनी

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.